सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
मला माहीत असेलेल्या मोठ्या लोकांच्या काही छोट्या गोष्टी.
१) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे.
२) लता मंगेशकर- ऊड्डाणपुल घरासमोर नको म्हणून तक्रार करणे, बाबासाहेबांची गाणी गाण्यास नकार.
३) सलमान खान, जाॅन अब्राहम ह्यांचे चाहत्यांचा मोबाईल ओढणे, धक्काबूक्की करणे.
तुम्हाला असं इतर मोठ्या लोकांच्या काळ्याबाजूबद्दल माहीतीय का?
नावाजलेल्या/मोठ्या लोकांतील दोष.
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 18 November, 2023 - 06:32
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शक्यता!!! जेम्स लेनची पण
शक्यता!!! जेम्स लेनची पण शक्यता होती ना पुस्तकात!
मी वाचलेलं आहे पुस्तक. त्याने ते शक्यता म्हणून.... रादर सांगोवांगीच्या गोष्टी म्हणून लिहिलेलं. पण अशा सांगोवांगीच्या गोष्टी लिहायची काही एक गरज न्हवती हे ही तितकंच नक्की. ते सोडलं तर एका त्रयस्थ व्यक्तीला महाराज कसे दिसले, त्यांच्या बद्दल त्याला काय वाटलं ह्या कोनातुन वाचायला मला ते पुस्तक आवडलं.
हो. जर असे नसल्याचा पुरावा
हो. जर असे नसल्याचा पुरावा नसेल तर शक्यता म्हणून बघता येऊ शकते. गांधी, नेहरू, गोळवलकर, हेडगेवार, भीमसेन जोशी, दादासाहेब फाळके, एम एस सुब्बलक्ष्मी, सी व्ही रमण, लाला अमरनाथ ह्या साऱ्या, किंवा त्यापैकी काही व्यक्ती समलैगिक असतील किंवा अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या असतील अशी शक्यता म्हणून बघता येऊ शकते. जे अशक्य म्हणून सिद्ध झालेले नाही त्या सर्व शक्यतांकडे गांभीर्याने पाहणे ह्याला किती अर्थ आहे ते ज्याचे त्याने ठरवावे. मी स्वतः अश्या शक्यतांच्या फंदात पडणार नाही. पण ज्याला तसा विचार करायचा असेल त्याला कोण अडवणार?
इथे कोण कोणाचा ड्युआयडी आहे
इथे कोण कोणाचा ड्युआयडी आहे इतकी शक्यता सांगितली तरी शाब्दिक कोथळे बाहेर निघतात.... शक्यता म्हणे!
स्वछता राखा
स्वछता पाळा
शांतता पाळा
तसंच
शक्यता पाळा.
दुसऱ्याची निंदा नालस्ती
दुसऱ्याची निंदा नालस्ती ऐकण्यात आणि करण्यात माणसाला खूप आनंद मिळतो.
चार लोक एकत्र झाली की निंदानालस्ती करणे हाच प्रमुख चर्चेचा विषय असतो.
चांगल्या गोष्टी लोक सहसा कोणाविषयी बोलत नाहीत.
आणि त्याचा प्रचार,प्रसार पण करत नाहीत.
हा लोकांचा सामान्य स्वभाव आहे.
पण महापुरुष असतील ,देव देवता असतील, श्रद्धा स्थान असतील ह्या विषयी कोणतीही टीका लोक सहन करत नाहीत.
ह्या सर्वांची एक चांगली प्रतिमा लोकांच्या डोक्यात रुजलेली असते.
आणि ह्यांची प्रतिमा स्वच्छ च असण्यात लोकांचा पण फायदा असतो .
असा दुहेरी संबंध आहे.
त्या मुळे लोक कोणतेही निगेटिव्ह विचार सहन करत नाहीत.
आपण छिद्रान्वेषी किंवा
आपण छिद्रान्वेषी किंवा टॉक्सिक होतोय का याचा स्वतःचा आढावा आपण सतत घेतला पाहिजे.
कोणत्याही व्यक्तींबद्दल मत बनवताना आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या माहितीची आणि ती पोहोचवणाऱ्या व्यक्ती / संस्था / माध्यमे यांची गुणवत्ता तपासणी हा गुण आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी फायदेशीर असतो.
तात्त्विक मुद्दा मांडायला सुद्धा मर्यादा असते. माहिती न घेता, सांगीवांगीच्या गोष्टींवर, गावगप्पांवर, अनमानधपक्यावर मत मांडणे आणि त्याला तात्त्विक मुलामा देणे हे एका लिमिट नंतर चालत नाही. सातत्याने एखादे मत अर्धवट माहिती वर मांडणे, त्याला क्रॉस क्वेश्चनिंग झाले कि ट्रोलिंग सुरू करणे आणि त्याचाही समाचार घेतला कि गळे काढणे, ड्युआयड्यांचा चक्रव्यूह उभारणे, उपहास मागच्या घटनांतून क्रॉसिंग करणाऱ्याचे प्रतिमा भंजन करणे, उपमर्द करून खच्चीकरणाचे पैतरे अजमावणे असे स्वरूप सोशल मीडियात आले आहे. हे संघटीत गुन्हेगारी प्रमाणे आहे.
मुद्दा प्रभावी असेल तर एकाच आयडीने, एकट्याने मांडता येतो.
आपण छिद्रान्वेषी किंवा
आपण छिद्रान्वेषी किंवा टॉक्सिक होतोय का याचा स्वतःचा आढावा आपण सतत घेतला पाहिजे.>>>
रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून हे स्वतःला सांगावे.
संघटीत गुन्हेगारी प्रमाणे आहे
संघटीत गुन्हेगारी प्रमाणे आहे.
संघटित गुन्हेगारी करणारे गुन्हेगार आणि येथील निष्पाप आयडी ह्यांची तुलना.
पटत नाही.
तुलना आणि उपमा दोन्ही चूक आहे.
मागच्या प्रतिसादात कुणाचेच
मागच्या प्रतिसादात कुणाचेच नाव लिहीलेले नाही. तरी काही आयडींनी थयथयाट का सुरू केला असेल ?
फेसलेस नावे घेऊन आक्रमकपणा दाखवून पुरूषार्थ गाजवला असा समज असणार्यांनी आपला फोन नंबर इथे द्यावा.
शाळेत असताना स्वा. सावरकर
शाळेत असताना स्वा. सावरकर किंवा अन्य सर्वचा महपुरूष हे आदर्शवत किंवा दैवताप्रमाणे शिकवले जातात. सरकारचे धोरण तेच असते. यापेक्षा जास्त चिकित्सक ओळख करून द्यायला समाज अजून प्रगल्भ नाही याची जाणिव असल्याने कदाचित तो निर्णय घेतला असेल. सोशल मीडीया आल्यापासून खरे, खोटे संदर्भ, अर्धवट संदर्भ देऊन एखाद्या थोर व्यक्तीची यथेच्छा बदनामी केली जाते. संदर्भ खरे असतील तर प्रश्नच नाही.
पन केवळ यावरून ती व्यक्ती बाद ठरते का ?
सावरकरांची स्वातंत्र्यवीर ही बाजू शिकलो. नंतर त्यांच्या अंदमानातून सुटका झाल्यानंतरच्या कारवाया सोशल मीडीयातून वाचल्या. मत कलुषित झालं. पण ते असे का वागले असतील असा विचार केला तर सत्तेच्या सारीपाटात आपला हिस्सा काय यात सगळेच व्यस्त असल्याने त्या काळात यांचे डावपेच पडत होते. त्याकडे तसेच पाहिले पाहिजे.
पण गांधीजींचा खून आणि त्यातला तथाकथित सहभाग याचे समर्थन होऊ शकत नाही. हा एक काळा डाग आहे. ज्याबद्दल आदराने बोलता येणे शक्यच नाही.
पण समलैंगिक असणे किंवा सत्याचे प्रयोग यावरून त्यांची लायकी काढणे हे छिद्रान्वेषी असण्याचे किंवा टॉक्सिक मनोवृत्तीचे लक्षण आहे. अशा रोगट व्यक्तींच्या मताला काहीही किंमत नसते. याच प्रकारचे लोक त्यांच्या मताप्रमाणे मत व्यक्त केले नाही कि गुन्हेगारी पद्धतीने ड्युआयड्यांचा वापर करतात. हे सभ्य माणसाला झोंबण्याचे कारण काय ?
मुन्नाभाई मधल्या सर्किट आणि
मुन्नाभाई मधल्या सर्किट आणि त्याच्या पत्नीला सेबीने बॅन केले होते.
Pages