नावाजलेल्या/मोठ्या लोकांतील दोष.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 18 November, 2023 - 06:32

सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
मला माहीत असेलेल्या मोठ्या लोकांच्या काही छोट्या गोष्टी.
१) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे.
२) लता मंगेशकर- ऊड्डाणपुल घरासमोर नको म्हणून तक्रार करणे, बाबासाहेबांची गाणी गाण्यास नकार.
३) सलमान खान, जाॅन अब्राहम ह्यांचे चाहत्यांचा मोबाईल ओढणे, धक्काबूक्की करणे.
तुम्हाला असं इतर मोठ्या लोकांच्या काळ्याबाजूबद्दल माहीतीय का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्यासोबत केलेलं गैरवर्तन हे खासगी असेल का सार्वजनिक?
>>>

अर्थात, आमच्यासोबत केलेले गैरवर्तन आमच्यासाठी खाजगी असेल. त्यामुळे ते कोणाला सांगावे कि नाही याचा हक्क आमच्याकडे राहील.

इथं फक्त मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या लोकांच्या गोष्टी अपेक्षित आहेत का? नसेल तर माझ्याकडचे 2,4 उदाहरण

समलैंगिक सावरकर आणि गोडसे (त्यांच्या तसे असण्याबद्दल आक्षेप नाही, पण ज्या गोष्टीचा विरोध त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी केला तीच गोष्ट स्वतः करत होते.)

गोमांस खा म्हणणारे, हिंदू देवदेवतांबद्दल आणि रुढींबद्दल वाईट साईट लिहिणारे पुन्हा सावरकर.

सुभाषबाबूंचे, सरदार पटेलांचे राजकीय महत्व कमी करून नेहरूंना पुढे आणणारे गांधी.

काँग्रेसने स्त्रियांना संसदेत पाठवण्याचा निषेध करणारे आंबेडकर

विवाहित स्त्रीबरोबर संबंध ठेवणारे, तिला नवऱ्यासकट ठेवून घेतलेले वाजपेयी

अर्थात, आमच्यासोबत केलेले गैरवर्तन आमच्यासाठी खाजगी असेल. त्यामुळे ते कोणाला सांगावे कि नाही याचा हक्क आमच्याकडे राहील. >> बर मग अस समज की तू मला हे सांगितले नि मी त्यावर (कलाकारांवर) त्याबद्दल टीका केली मग आता ? इथे तुझ्या खरे बोलण्यावर माझा १००% विश्वास आहे असे धरून चालूया.

इथे तुझ्या खरे बोलण्यावर माझा १००% विश्वास आहे असे धरून चालूया.
>>>>>

प्रश्न केवळ खरे किंवा खोटे बोलण्याचा नसतो. जर तुम्ही फक्त माझेच ऐकाल तर मी माझी बाजू माझ्या दृष्टीकोनातून मांडली असणार. अशी एक बाजू ऐकून कधीच न्यायनिवाडा करू नये. म्हणून माझ्यावर शंभर टक्के विश्वास असला तरी फक्त माझे ऐकून घ्या. हवे तर माझ्या विश्वासावर त्या व्यक्तीबद्दल आपले मत बनवा. पण ते पुढे जाऊन आणखी तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका. त्यात ती तिसरी व्यक्ती आणखी आपल्या पदरचे चार शब्द जोडून चौथ्या व्यक्तीला सांगण्याची शक्यता असते ती वेगळीच.

सेलिब्रिटींचे सत्य आपल्यापर्यंत कित्येक फिल्टर लाऊन पोहोचतात. अगदी व्हिडिओ मध्ये सुद्धा जे डोळ्यांना दिसते त्या मागे देखील काय पार्श्वभूमी असते ती आपल्याला माहीत नसते किंवा आपल्यापर्यंत कधी पोहोचत नाही.

हवेत तात्विक चर्चा झोडण्याला काहीच लागत नाही.

जेव्हां कुणी संदर्भासहीत आपले म्हणणे मांडत असते, जेव्हां कॅगचे रिपोर्ट्स, न्यायालयाची निरीक्षणे याचे संदर्भ देत असते तेव्हां ते फाट्यावर मारायचे आणि ते गौरवाने सांगायचे, मी हे वाचत नाही, वाचणार नाही हे अभिमानाने सांगायचे, पुन्हा पुन्हा प्रत्येक ठिकाणी तेच तेच करायचे, त्याच्यावर कुणी आक्षेप घेतला कि मोदींच्या थाटात मुझे नीच कहा सारखा कांगावा करायचा किंवा मोदी जसे हुषार पत्रकारांना इग्नोर करतात ते धोरण चालवायचे , मुद्द्याला बगल द्यायची आणि पुन्हा निव्वळ तात्विक चर्चा झोडायच्या हे मोदी सोडून अन्य कुणाला जमेल असे वाटले नव्हते.

मारल ऑफ द स्टोरी
बॉलीवूड मध्ये शाहरुख
राजकारणात मोदी
आणि मायबोली वर .....
शुभ रात्री Happy

अजिंक्यराव पाटील, तुमचा मुद्दा क्रमांक एक; "समलैंगिक सावरकर आणि गोडसे ">> ह्या दाव्याला कोणताही समकालीन, ज्याला primary source म्हणतात असा पुरावा नाही.
एखाद्याने कुठल्याही पुराव्याशिवाय एखाद्या पुस्तकात असे विधान केले असेल आणि त्याचाच संदर्भ चार लोक देत असतील तर तो पुरावा होऊ शकत नाही. दुर्दैवाने आपल्या अजेंड्यासाठी खोटेनाटे लिहिणे आणि इकोसिस्टिम मार्फत त्याला circular references देऊन खोटे narrative निर्माण करणे हे प्रकार बरेचदा घडतात.
हा तुमच्यावर दोषारोप नाही. तुम्ही कुठेतरी वाचले असेल त्यावरून हा मुद्दा लिहिला असेल. तुम्हाला जर वेळ, चिकाटी, आणि रस असेल तर थोडे खोदून पहा. false narrative कसे सेट केले जाते त्याचा एक केस स्टडी होईल.

हा धागा सेलेब्रिटीं / खेळाडू / व्यापारी अशांसाठी राहू दिला तर?

वरच्या प्रतिसादातल्या व्यक्तींवर नेहमी अन्य धाग्यात दळण चालूच असते, त्यावर अद्याप एकमत झालेले नाही. या धाग्यावर पण तेच हवे असेल तर काही म्हणणे नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळात जी काही थोर व्यक्तीमत्वे होऊन गेली त्यांची तुलना करीयर म्हणून प्रसिद्धी पावलेल्या व्यक्तींशी होऊ शकत नाही. त्या काळातले लोक ध्येयवेडे होते. करीयर म्हणून आपापल्या धंद्यात त्यांनी १००% योगदान दिले असते तर आज त्यांच्या सात पिढ्या अमाप श्रीमंतीत असत्या.

या सर्व मंडळींनी देशासाठी जसे योगदान दिले तसेच विशिष्ट समाजासाठीही योगदान दिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या किंवा दुर्बल समाजाचे काय या चिंतेतून स्वातंत्र्य चळवळीत महत्वाच्या स्थानावर असलेल्या व्यक्तींना त्यांनी जे काही बोल सुनावले असतील ते संदर्भासहीत पहावे लागतात. ते ज्या समाजाचे / पक्षाचे नाहीत ते समाज / पक्ष काहीतरी खुसपट काढून आरोप करत राहतात किंवा त्यांच्या कृतींचे संघटीत क्रिमिनलायजेशन करतात. त्यात तथ्य किती हे तपासून बघावे लागते..

समलिंगी संबंधाचे पुरावे आढळले नाहीत. गांधी हत्येचे समर्थन होऊच शकत नाही. त्याचे संदर्भ मात्र वाचनात येतात. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. पण त्याची कारणे समर्थक देतात.

गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवून दिले हे योगदान नाकारता येत नाही. हत्येची कारणेही लंगडी आहेत हे सुद्धा सिद्ध झाले आहे. मात्र स्वातंत्र्य मिळवून देताना सत्ता कुणाच्या हाती असावी हे त्यांनीही पाहिले. यावरून त्यांचे योगदान नाकारता येत नाही.

डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य हे राजकीय आरक्षणातून जे अस्पृश्य काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले त्याचा धागा पकडून आहे. हे प्रतिनिधी होयबा निघाल्याने त्यांचा उपयोग नाही. तसेच हिंदू कोड बिलाला आणि स्त्रियांच्या अधिकाराला काँग्रेस मधूनच विरोध असल्याने स्त्रियांना संसदेत पाठवण्याइतकी काँग्रेस कशी उदार झाली याविषयी तत्कालीन काही स्त्रिया आणि काँग्रेस पुढारी यांची गाजलेली प्रकरणे आणि त्यांना दिलेली तिकीटे यावरून केलेले ते उपरोधिक भाषण होते, स्त्रियांना संसदेत पाठवून काँग्रेसचे काही पुढारी पुरोगामित्वाचा आव आणून स्त्रियांच्या अधिकाराला असलेल्या विरोधाचा आरोप सौम्य करू पाहत होते हा तत्कालीन घटनाक्रम त्यासाठी बघावा.

जे इतक्या खालच्या पातळीचे आहे आणि ज्याला काही ठोस आधार नाही त्यावर इथे चर्चा देखील नको असे वाटते.
मगाशी वाचून इग्नोर केले होते. आता चर्चा वाढू नये म्हणून लिहीत आहे. क्षमस्व.

<< हवेत तात्विक चर्चा झोडण्याला काहीच लागत नाही.
जेव्हां कुणी संदर्भासहीत आपले म्हणणे मांडत असते, जेव्हां कॅगचे रिपोर्ट्स, न्यायालयाची निरीक्षणे याचे संदर्भ देत असते तेव्हां ते फाट्यावर मारायचे आणि ते गौरवाने सांगायचे, मी हे वाचत नाही, वाचणार नाही हे अभिमानाने सांगायचे, पुन्हा पुन्हा प्रत्येक ठिकाणी तेच तेच करायचे, त्याच्यावर कुणी आक्षेप घेतला कि मोदींच्या थाटात मुझे नीच कहा सारखा कांगावा करायचा किंवा मोदी जसे हुषार पत्रकारांना इग्नोर करतात ते धोरण चालवायचे , मुद्द्याला बगल द्यायची आणि पुन्हा निव्वळ तात्विक चर्चा झोडायच्या हे मोदी सोडून अन्य कुणाला जमेल असे वाटले नव्हते.
नवीन Submitted by रघू आचार्य on 22 November, 2023 - 17:05. >>

------ लिंक वाचण्याचे कष्ट घेतले नाही, तशी काही अवशक्ताही नव्हती.
पण सचिनने टॅक्स बुडविला असेल तर नक्की किती रुपयांचा टॅक्स बुडवला एव्हढीच माहिती विचारली होती.

<< बाई दवे,
सचिनने किती रुपयांचा टॅक्स बुडवला हे एवढेच कोणी सांगू शकेल का?
पूर्ण प्रकरणं जाणून घेण्यापेक्षा हा आकडा आधी समजला तर बरे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 20 November, 2023 - 05:20 >>

बरं

<< विवाहित स्त्रीबरोबर संबंध ठेवणारे, तिला नवऱ्यासकट ठेवून घेतलेले वाजपेयी >>
------ सेलेब्रिटीने कायदे मोडले असतील तर त्यावर सार्वजनिक चर्चा होण्यास कुणाचिही हरकत नसावी. एखाद्या सेलेब्रिटीच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची अवशक्ता नाही यासाठीचे हे उत्तम उदाहरण ठरावे. कौल मॅडम, तिचा पती हे वाजपेयींसोबत एकत्र रहात होते यापेक्षा जास्त आपल्याला माहित नाही. इतरांना थोडे विचित्र वाटेल कारण आज अस्तित्वात असलेल्या प्रथेच्या विरुद्ध आहे पण असे एकत्र रहाण्यामुळे कुठल्याही कायद्याचा भंग होत नाही.

महिलेचा आक्षेप असेल, तिला जबरदस्तीने बंदिस्त केले असेल, पदाचा गैरवापर करुन तिच्यावर अत्याचार केले आहेत असे काहीच नव्हते. भाजपा खासदार ब्रिजभूषण च्या बाबतीत हे सर्व लागू होते.

आदरणीय बापूजींनी ब्रम्हचर्याबाबत जे काही चित्रविचित्र प्रयोग केले होते ते पाहून कट्टर समर्थकाना ही फेफरे येत असतील.

नाना पाटेकर विषयी सहमत. मुळात हा माणूसच थोडा सटॅक डोक्याचा आहे. त्याला दुसर्‍याचे कौतूक कधीच जमत नाही. आपण लई भारी असा काहीतरी समज आहे व त्याला आपण सडेतोड बोलले की लोकांना आवडतो असा काहीतरी समज आहे. फार पुर्वी चला हवा येऊ द्या मध्ये सागर कारंडेनी त्याची भारी मिमिक्री त्याच्यासमोरच केली होती पण एकही कौतूकाचा शब्द नानाकडून आला नाही. (राज ठाकरेंनी एकदा नानाची काढली होती. रा.ठांच्या म्हणण्यानुसार हा माणूस स्वतःला मोठ्या वरच्या पातळीवर समजतो व दुसर्‍याला शिकवायला जातो.. जे एकदम पटले)

त्याचा एक ऐकीवातला किस्सा खाली देत आहे.

नाना एकदा सिडनीला गेला होता. तिथे महाराष्ट्र मंडळाने नाटक बसवले होते आणि नाना आलाच आहे म्हणून त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले. नाटकात काम करणारे कोणीही प्रोफेशनल कलावंत नव्हते तर आपापले नोकरी व्यवसाय सांभाळून नाटकाचे काम आणि प्रॅक्टिस केली होती. तेव्हा professional सारखे काम अपेक्षित नसायला हवे. नानाने कौतुकाचे चार शब्द बोलायचे सोडून हे काय घाणेरडे काम केले आहे असे काहीतरी म्हटलं. मग महाराष्ट्र मंडळाने त्याला कोणत्याच कार्यक्रमाला बोलावले नाही.

पण माझ्यामते कलाकारांचे खाजगी आयुष्य कसे का असे ना पण त्याचा आपण त्यांनी सादर केलेल्या कलेशी संबंध लावू नये. उदा. म्हणजे रणवीरसिंग जो वैयक्तीक आयुष्यात इतका थिल्लरपणा करत असतो (काही पुरस्कार समारंभ व सोशल मिडीया वरचे व्हीडीओ पाहून माझे झालेले मत) . पण हाच रणवीरसिंग अभिनय मात्र चांगला करतो. बाजीराव, दिल धडकने दो आणि एक दोन चित्रपटात त्याचा अभिनय आवडला.

वाजपेयींचं नाव आलंच आहे, तर ती गोष्ट म्हणजे एक उघड गुपीत होती. त्या बाई गेल्यावर पेपरातही तसं छापून आलं होतं. पण काँग्रेसने या गोष्टीचं कधी राजकारण केलं नाही. उलट संघ -भाजपवाले आयटी सेल आणि त्यापूर्वी कुजबूज आघाडीद्वारे गांधी, नेहरू, अगदी शाहू महाराज आणि डॉ आंबेडकरांबद्दल खोट्यानाट्या विकृत गोष्टी पसरवत.

मोदीच्या एका मंत्र्याने सोनिया गांधींबद्दल अतिशय विकृत कमेंट्स भर सभेत केल्या आहेत.

योगी९००+१.
सचिनने करचोरी केली म्हणून काही आम्ही त्याच्या शतकांसाठी टाळ्या वाजवणे थांबवले नाही. पण याचा अर्थ त्याने करचोरी केली किंवा तसा प्रयत्न केला याकडे दुर्लक्ष करावं, आपल्याला काय त्याचं असं म्हणावं, असा होत नाही.

उदयजी,
तुम्ही माझे डोळे उघडलेत. कदाचित माझ्याकडून चुकून त्या प्रतिसादात या ओळी वाचल्या गेल्या असाव्यात.

दुसरी गोष्ट म्हणजे मला सचिन टॅक्स प्रकरण डिटेल मध्ये माहित नाही. कधी ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. कारण तो विषय आवडीचा नाही. तसेच मला त्यातले काही कळत नाही. तुम्ही लिंक दिल्या तरी त्या मी स्किप करणार.

ज्या अर्थी तुम्ही तसे काही नाही म्हणत आहात त्या अर्थी मला भास झाला असेल. क्षमा असावी.

रघू आचार्य - मी आपल्या लाडक्या सेलेब्रिटीचे चाच प्रतिसाद लिहीलेला आहे. त्याने लिंक उघडण्याचे कष्ट घेतले नाही, तशी अवशक्ता त्यांना नाही ( माझा आग्रह नाही). पण या सेलेब्रिटीला आयते उत्तर हवे आहे ( हा प्रॉब्लेम आहे), "टॅक्स नक्की किती रुपयाचा बुडविला ? "....

दुटप्पीपणाची नोंद ठेवण्यासाठी ते जोडले होते.

<त्या व्यक्तीची त्याच्या क्षेत्रातली कामगिरी बघावी आणि कौतुक करावे, त्यात कुचराई झाली तर ताशेरे ओढावेत> महेश काळेने एका गाण्याची शब्दशः वाट लावली. त्यावरून त्याच्यावर टीका झाली तर तिथेही ऑब्जेक्शन माय लॉर्ड आहेच.
तात्पर्य काय, कुठूनही माझी वाद घालायची खुमखुमी जिरली पाहिजे. इथे मी सचिनने काही टॅक्स चोरी केली नाही असं म्हटलं असतं तर बरोबर त्याच्या उलट प्रतिसाद आले असते.
आणि हे असलं करणार्‍याला वाद घालायला गिर्‍हाईके नेमाने मिळत जातात. काही तर आपला खिसा कापून घ्यायला रोज नवा शर्ट घालून नव्या उत्साहाने हजर होतात. त्यांना वाटतं , आपण कसे याचे मुद्दे चुकीचे सिद्ध केले, याच्या कोलांट्या उड्या दाखवल्या. पण मूळ उद्देश वाद घालणं , खेळवणं हाच आहे, हे जणू कळतच नाही.

उदय ओके
भरत - खरं तर सहानुभूती वाटते. कुणीतरी पुढा़कार घेऊन इलाज करावा अशी प्रामाणिक तळमळ वाटते. अशा आजारी व्यक्तीचा वापर स्कोर सेटलमेंट साठी होऊ नये , अन्यथा आजार बळावत जातो असे सतत वाटते. पण या गोष्टी आपल्या हातात नाहीत याचे वैषम्य आहे.

पण मूळ उद्देश वाद घालणं , खेळवणं हाच आहे, हे जणू कळतच नाही.>> हा खेळ वर्षानुवर्षे खेळवला जातो आहे.
काय आनंद मिळतो कुणास ठाऊक.

रघू आचार्य, सहमत.
भरल्या घरात छान कुटुंबात राहणार्‍या माणसाला आपल्या लहानसहान सुद्धा वैयक्तिक गोष्टी सोशल मीडियावर टाकायची सातत्याने गरज भासणे हेही काळजीचे कारण आहे.

; "समलैंगिक सावरकर आणि गोडसे ">> ह्या दाव्याला कोणताही समकालीन, ज्याला primary source म्हणतात असा पुरावा नाही.
एखाद्याने कुठल्याही पुराव्याशिवाय एखाद्या पुस्तकात असे विधान केले असेल आणि त्याचाच संदर्भ चार लोक देत असतील तर तो पुरावा होऊ शकत नाही.

तुमच्यावर काही बोलायचे नाही, पण हे वाक्य पुन्हा वाचा, हास्यास्पद वाटत नाहीये का? गोडसे किंवा सावरकर सोडा, इतर कुणाची लैंगिकता documented आहे का?

हायला म्हणजे कोणीही कोणाच्याही लैंगिकतेबद्दल काय वाट्टेल ते बोलले तरी कोणी आक्षेप घेण्याचे काम नाही म्हणा की, कारण लैंगिकता कुठे डॉक्युमेंट केलेली असते नाही का ? चार लोक कुजबुजत असली की आपण सुध्दा कुजबुज करून हातभार लावायचा होय ना ?

यात एकदा मीना खडीकर आणि उषा मंगेशकर आल्या होत्या. त्यांनी सांगितले की आम्ही दीदीच्या प्रत्येक रेकॉर्डिंगला जायचो (हे अर्थात ती गानसम्राज्ञी झाल्यावरचं असणार ). रेकॉर्डिंग स्टुडियोत बसायचो. टेक ऐकायचो आणि आमचं समाधान झालं नाही तर आणखी एकदा घ्या म्हणून एक बोट वर करायचो. असे एकामागून एक अनेक टेक व्हायचे. पण आम्हांला पर्फेक्शन हवं होतं.>>>>>>>

या बहिणी सुरवातीपासुनच सोबत जात असाव्यात. उषा मंगेशकरांनी सांगितलेला एक किस्सा आठवला. आयेगा आनेवाला.. गाण्याने लताला नाव मिळवुन दिले. त्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा त्यांनी सांगितलेला. रेकॉर्डिंग सम्ध्याकाळी सातला होते. ह्या बहिणी वेळेत पोचल्या, रेकॉर्डिग सुरु झाले. पण संगितकाराच्या पसंतीला गायलेले गाणे उतरेना. दुरुन आवाज येतोय असे गाण्यात दाखवायचे होते. त्यासाठी लताला दुरुन गात गात माईकजवळ यायचे होते. प्रत्येक टेकला लताला लांब जाऊन चालत यावे लागत होते. रात्रभर टेक घेऊन शेवटी पहाटे पाच वाजता टेक फायनल झाला. तोवर कोणीही ना जेवले ना झोपले. लता गाऊन दमली त्यापेक्षा चालुन जास्त दमली.

इतरही गायक व संगीतकारही पर्फेक्षनच्या बाबतीत सजग असत. रेकॉर्डिन्गच्या वेळेस सगळ्यांना आवडलेले गाणेही केवळ गायकाचे समाधान न झाल्याने परत एकदा रेकॉर्ड केल्याचे किस्से ऐकलेले आहे. विविध भारतीवर तंत्रज्ञ/कलाकारांच्या मुलाखती पुनर्प्रसारीत करतात त्यात असले किस्से भरपुर ऐकायला मिळतात.

फक्त कुजबुज पुरते मर्यादित नाहीये हे. 1975 साली छापून आलंय, सावरकरच्या मृत्यूपश्चात 10 वर्षाच्या आत. खोटे असेल तर काय कारवाई केली गेली त्या पुस्तकावर/ लेखकावर? अजूनही ते पुस्तक उपलब्ध आहे ना?

आरोप न नाकारणे म्हणजे आरोप मान्य करणे नाही का?

मी तर सावरकर गोडसेचे अभिनंदन करेन, taboo समजली जाणारी गोष्ट लपून का होईना करायला विशिष्ट प्रकारचा दम लागतो.

असो हेमाशेपो

>>हे असलं करणार्‍याला वाद घालायला गिर्‍हाईके नेमाने मिळत जातात. काही तर आपला खिसा कापून घ्यायला रोज नवा शर्ट घालून नव्या उत्साहाने हजर होतात. त्यांना वाटतं , आपण कसे याचे मुद्दे चुकीचे सिद्ध केले, याच्या कोलांट्या उड्या दाखवल्या. पण मूळ उद्देश वाद घालणं , खेळवणं हाच आहे, हे जणू कळतच नाही. <<
भरत., आपला मुद्दा अगदी बरोबर आहे.
पण जो फसून वाद घालतो तो आणि जो मेहेनतीने 'दांभिकपणा, मी मी करणं' मुद्देसूदपणे सगळ्यांसमोर मांडतो तो; यांत फरक आहे.
या दुसर्‍या कामासाठी मला रघू आचार्य यांचं कायम कौतुक वाटत आलं आहे.
आणि जे पहिल्या कॅटेगरीमधले असतात त्यांच्या प्रतिसादाने असलं करणारा खूष होतो कारण त्यातच त्याचं समाधान आहे.
पण मुद्देसुद मांडणीचा एक वचक रहातोच. कोलांट्या उड्या अधोरेखित केल्या की त्याचाही एक संदर्भ जमत रहातो. अशा मुद्देसूद प्रतिसादाने खरं तर दुखतं, पण दाखवता येत नाही. हसण्यावारी नेणं किंवा उसन्या सहजपणाचा आव आणला जातो पण तरीही झालेली चिडचिड प्रतिसादातून कळतेच..
त्यामुळे 'चिकित्सक + मुद्देसूद' प्रतिसाद हवेत असं मला वाटतं.

उषा मंगेशकरचा जन्म १९३५ चा. आएगा आनेवाला १९४९चं. तो लताच्या संघर्षाचा काळ. रेल्वे थर्ड क्लासने प्रवास करून मग खूप अंतर चालून स्टुडिओत पोचता येई.‌ त्या काळात बहिणी सोबत? लताच्या आठवणींत तरी तसं वाचलं नाही.
मास्टर विनायक गेल्यावर मुंबैतील सुरुवातीच्या काळात लता एकाच बहिणीला घेऊन मुंबैत राहत होती, असंही वाचलं आहे. बाकीचे कुटुंबीय आजोळी.

Pages