नावाजलेल्या/मोठ्या लोकांतील दोष.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 18 November, 2023 - 06:32

सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
मला माहीत असेलेल्या मोठ्या लोकांच्या काही छोट्या गोष्टी.
१) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे.
२) लता मंगेशकर- ऊड्डाणपुल घरासमोर नको म्हणून तक्रार करणे, बाबासाहेबांची गाणी गाण्यास नकार.
३) सलमान खान, जाॅन अब्राहम ह्यांचे चाहत्यांचा मोबाईल ओढणे, धक्काबूक्की करणे.
तुम्हाला असं इतर मोठ्या लोकांच्या काळ्याबाजूबद्दल माहीतीय का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेलिब्रिटीच काय कुणाच्याही वैयक्तिक बाबीत लक्ष घालू नये, त्यावरून कुणाला जज करू नये.

पण लोक जेव्हा आपल्या पोझिशनचा गैर फायदा घेतात किंवा चांगले कार्य करतात , आपले क्षेत्र सोडून इतर बाबतीत पब्लिक स्टेटमेंट्स करतात अथवा एक भूमिका घेतात तेव्हा त्यावर टीका टिप्पणी होणारच.

या व्यतिरिक्त त्यांचे किंवा कुणाचेही वैयक्तिक दोष काढून गॉसिप करणे मला इष्ट वाटत नाही.

जिओ टॉलस्टॉय आणि ड्युओ फॉल्सटॉय अशा दोन्ही सरांनी धाग्यावर पायधूळ झाडली असल्याने पामरांनी आता श्रावकधर्माचे पालन करावे.

त्यांनी त्यांचे स्पर्धक संपवलेच आहेत.
हाच मानवी स्वभाव आहे
>>>>>

हो, क्रिकेटमध्ये सुद्धा हेच बघण्यात आले आहे.
मागे माझा यावर एका धागा/लेख सुद्धा होता.
पण त्या त्या खेळाडूंचे चाहते असलेल्यांना हे पटत नाही Happy

त्यापेक्षा त्या व्यक्तीची त्याच्या क्षेत्रातली कामगिरी बघावी आणि कौतुक करावे, त्यात कुचराई झाली तर ताशेरे ओढावेत पण तो कलाकार चांगला आहे म्हणून त्याने माणूस म्हणून सुद्धा चांगलेच असले पाहिजे हा अट्टाहास सोडून द्यावा.>>>>

अगदी मनापासुन सहमत..

बाकी इथे लताचा उल्लेख येणार वाटले होतेच.

लताने स्वतःचे स्थान स्वत:च्या गुणवत्तेवर मिळवले आणि वर्षानुवर्षे ती गुणवत्ता तशीच कायम राखत टिकवले. ते ती असे हातचे जाऊ देईल? तिला काहीच फु़कट मिळाले नव्हते. मेल डोमिनेटेड इन्डस्ट्रीमध्ये कुठल्याही पुरुषाचा आधार न घेता असे स्थान त्या काळी निर्माण करणे तिला किती कठिण गेले असणार.. वर घरच्या चार तोंडात घास घालायचे टेंशन. असो.

सुमन कल्याणपुरकडे लताचा आवाज होता पण ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु शकली नाही. लता डोमिनेट करत असलेल्या क्षेत्रात स्वतचे पाय रोवायचे तर लतापेक्षा वेगळ्या स्टाईलने गायला हवे हे आपण सुरवातीलाच ओळखले असेआशाने एका मुलाखतीत म्हटल्याचे स्मरते. आरडी तिच्या आयुष्यात ओपी नंतर आला. त्यामुळे आरडीच्या साथीने ती वर आली हे बरोबर नाही.

त्यापेक्षा त्या व्यक्तीची त्याच्या क्षेत्रातली कामगिरी बघावी आणि कौतुक करावे, त्यात कुचराई झाली तर ताशेरे ओढावेत पण तो कलाकार चांगला आहे म्हणून त्याने माणूस म्हणून सुद्धा चांगलेच असले पाहिजे हा अट्टाहास सोडून द्यावा....... +१.

पण हेच कलाकार लोक आपल्या खाजगी आयुष्यातल्या गोष्टी स्वतःच सांगतात, आम्ही कसं स्ट्रगल केलं ,आमच्यावर कसा अन्याय झाला वगैरे खरं खोटं सांगतात तेव्हा आपण त्याने इम्प्रेस होतोच ना? त्यांच्या क्षेत्रातला जो माणूस आता हयात नाही, आपली बाजू मांडू शकणार नाही, त्याच्याबद्दल वावगं बोलतात.
या लोकांनी जी एं सारखं आपलं खाजगी आयुष्यच काय खाजगी ओळखही लपवून ठेवली तर हे प्रश्नच येणार नाहीत. पण त्यांनाही ही प्रसिद्धी हवीच असते.

त्यांना ही प्रसिद्धी हवीच असते हे ही अगदी खरं. त्यामुळे गॉसिप खर्‍याखोट्या वावड्या इज पार्ट अँड पार्सल. सुक्या बरोबर ओलं (का ओल्याबरोबर सुकं) वगैरे झालं तर निसर्ग नियमच... जग फेअर नाहीच, त्यामुळे त्यांच्या बाबतीत जरा पेंड्युलम जरा जास्तच झोका घेणार हे ही काही प्रवाहाच्या फार दूरचं नाही.

या लोकांनी जी एं सारखं आपलं खाजगी आयुष्यच काय खाजगी ओळखही लपवून ठेवली तर हे प्रश्नच येणार नाहीत. पण त्यांनाही ही प्रसिद्धी हवीच असते.
>>>>

का लपवावी??
लोकांनी खाजगी आयुष्यावरून ट्रोल करू नये म्हणून आपल्या कलेचे श्रेय आपल्याला मिळू न देणे हा कसला न्याय आणि कसली अपेक्षा?
आणि लगेच प्रसिद्धीची हाव हा आरोप कश्याला?

तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो.
एखादी व्यक्ती स्वतःचं आख्खं कुटुंब सोशल मिडीयावर टाकेल, एखाद्या व्यक्तीला कुटुंबाचा सोडा, स्वतःचाही खाजगीपणा जपावासा वाटेल..
खाजगी स्वभावाच्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीवर प्रसिद्धीच्या हव्यासाचा आरोप केला तर चालेल का..?
ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे.
हां, आता प्रसिद्धीलोलूप व्यक्तीने त्याच्या प्रसिद्धीच्या आवडीचा किंवा मी मी करण्याच्या सवयीचा इतरांना त्रास होणार नाही एवढी मात्र काळजी घ्यावी.. अशी आशा सर्वसामान्य व्यक्तींची असू शकेल.

कलाकाराची फक्त कलाकृती पहावी असं म्हणणारे त्या कलाकारांच्या मुलाखती पाहणार नाहीत का? आत्मचरित्र वाचणार नाहीत का?

कलाकार, साहित्यिक, खेळाडू,राजकारणी, उद्योगपती यांची प्रसिद्धी त्यांच्या त्या त्या क्षेत्रातल्या योगदानामुळे असतेच.

पण तरीही
१. हे लोक इतर अनेक क्षेत्रांबद्दल आपली मतं मांडतात. का ?
२. जाहीरपणे मदतकार्याला फंडींग करतात. ते का ?
३. या गोष्टींचा वापर करून पीआर एजन्सीज त्यांची एक गुडी गुडी इमेज बनवतात. का ?

कारण याचा उपयोग त्यांच्या व्यवसायासाठी ब्रॅण्डींगसाठी होतो म्हणून. त्यामुळे ही इमेज जपणे हे सुद्धा काम असते. तिला तडा जाऊ नये असे वर्तन करणे, काही गोष्टी लपवणे हा ही. पण जर अशा काही गोष्टी उघड झाल्या आणि त्या इमेजला तडा गेला तर सामान्य लोकांना धक्का बसतो. त्याला तुम्ही ट्रोलिंग म्हणा, मॉरल पोलिसिंग म्हणा किंवा काहीही म्हणा.

अक्षयकुमारने शेतकर्‍यांसाठी ९० लाख रूपयांची देणगी दिली. त्याच्या पीआर ने कदाचित त्याला सल्ला दिला असेल कि टॅक्स वाचवण्यासाठी तू देणगी देणारच आहेस तर तिचा इव्हेंट करूयात. अर्थात ती देणगी त्याच्या जाहीरातदाराने परस्पर दिलेली होती. त्यांचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर असल्याने त्याच्या या इमेजचा फायदा प्रॉडक्टला होईल असा त्यांचा अंदाज. थोडक्यात शुद्ध हेतूनेच ही कामं केली जातात असे काही नाही. त्यात व्यावसायिक भाग असतो. याची माहिती नसल्याने जेव्हां हे उघड होते तेव्हां लोक संतापतात. कारण त्यांच्या भावनेशी खेळ होतो.

का लपवावी?? ... हा कसला न्याय आणि कसली अपेक्षा?
आणि लगेच प्रसिद्धीची हाव हा आरोप कश्याला? >> तिय्या जमला हा - फक्त पापण्यांची मिटमिट करून बघायला कोणी नाही एव्हढेच Wink

If you get public recognition for donating money, it’s not charity – it’s philanthropy. And if you demand recognition, it’s not even charity – it’s a business deal.

कलाकाराची फक्त कलाकृती पहावी असं म्हणणारे त्या कलाकारांच्या मुलाखती पाहणार नाहीत का? आत्मचरित्र वाचणार नाहीत का?
>>>>>>>

आवडीच्या कलाकाराबद्दल अधिकाअधिक जाणून घेणे वेगळे..
आणि एखाद्या कलाकाराच्या कलेव्यतिरिक्त इतर बाबी जाणून त्यावरून टीका करणे वेगळे...
कौतुक करत असाल तर काही हरकत नाही.

त्यामुळे हा मुद्दा काही पटला नाही.

मागे देखील एका धाग्यात कलाकार अमुकतमुक वागला तर ट्रोलिंग होणारच असे समर्थन होत होते.
आम्ही कौतुक करतो तर आम्हाला टीका करायचा देखील अधिकार आहे भले ती पातळी सोडून का असेना असा सूर होता..

असो,
सोशल मीडियावर वावरणारी जनता कुठेही कोणाबद्दलही काहीही पोस्ट करू शकते म्हणून या सुविधेचा फायदा घ्यायला स्वतःला स्वयंघोषित न्यायाधीश समजू लागली आहे. त्यांचे मतपरिवर्तन करणे अवघड Happy

आणि इमेज उजळवण्यासाठी केलेली चॅरिटी तर अजून वेगळी
जशी मनुष्य आणि काळवीट हत्यारा चालवतो बिईंग ह्युमन वगैरे

आणि एखाद्या कलाकाराच्या कलेव्यतिरिक्त इतर बाबी जाणून त्यावरून टीका करणे वेगळे...
कौतुक करत असाल तर काही हरकत नाही.

त्यामुळे हा मुद्दा काही पटला नाही. >> इथे मराठी मंडळामधे येणारे कलाकार लोकल देशी लोकांच्या घरी राहतात. घरी राहताना ते त्यांचे २४ तास कलाप्रदर्शन करत नाहीत. एक माणूस म्हणून राहतात. त्यावर "इतर" बाबी जाणून घ्यायची इच्छा नसतानाही कळतात नि त्यावर "कलाकार नसलेली मंडळी तसे वागले तर जी टीका होईल" ती (नंतरच्या पार्ट्यांमधे वगैरे ) केली जाते. आता हे कसे जस्टीफाय करशील हे जाणून घ्यायची इच्छा आहे .

काही काही लोकांबद्दल लोकांच्या फारशा अपेक्षाच नसतात. म्हणजे त्याने वाईट वागलं तरी त्याच्याकडून अपेक्षाच नाहीत.
पण जर का त्याने काही चांगलं केलं तर मग मात्र गोपिकाबेस नाचू लागतो.

फूटपाथवर गाडी चालवणार्‍यापासून ते दंबूक जाळणार्‍यापर्यंत ही अशीच कॅटेगरी आहे. दुसर्‍याच्या बाबतीत तर महिलावर्ग म्हणायचा "बिच्चारा ! बिना आईचा आहे." हे सन्माननीय अपवाद बाजूलाच ठेवूयात.

म्युन्शिपालिटीत उंदीर मारायच्या नोकरीत राहून बायडेन ने काय केले पाहिजे या तात्विक मतांच्या पिंका टाकताना जे निरीक्षण, अभ्यास लागतो त्यात आपल्याकडे निष्णात असे काही जण आहेत. यातल्या तिसर्‍या आणि नवीन साहेबांनी सध्या पुलंनाच हायजॅक केलेले आहे.

इथे मराठी मंडळामधे येणारे कलाकार लोकल देशी लोकांच्या घरी राहतात.
>>>>>>>

असामी, ही केस एकदमच वेगळी आहे.
एखादा कलाकार आपल्या घरी येऊन राहणे यातून आपल्याला त्याबद्दल समजणे आणि आपण एखाद्या सेलेब्रेटीबद्दल न्यूज, पेज थ्री वगैरे माध्यमातून जाणून घेणे यात मूलभूतच फरक आहे.
घरीच कश्याला, उद्या आमच्या सोसायटीच्या पूजेला एखादा कलाकार पाहुणा म्हणून आला आणि त्याने काही गैरवर्तन केले ज्याचा आम्हाला त्रास झाला तरी मी त्यावर टिका करेनच. ती त्याच्या आमच्यासोबत केलेल्या गैरवर्तनावर असेल. कुठल्या खाजगी बाबीवर नसेल.

बाई दवे,
कधी तुमच्याकडे स्वप्निल जोशी किंवा सई ताम्हणकर आली तर त्यांना माझा नमस्कार सांगा Happy

ती त्याच्या आमच्यासोबत केलेल्या गैरवर्तनावर असेल. कुठल्या खाजगी बाबीवर नसेल. >>>>तुमच्यासोबत केलेलं गैरवर्तन हे खासगी असेल का सार्वजनिक?

Pages