सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
मला माहीत असेलेल्या मोठ्या लोकांच्या काही छोट्या गोष्टी.
१) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे.
२) लता मंगेशकर- ऊड्डाणपुल घरासमोर नको म्हणून तक्रार करणे, बाबासाहेबांची गाणी गाण्यास नकार.
३) सलमान खान, जाॅन अब्राहम ह्यांचे चाहत्यांचा मोबाईल ओढणे, धक्काबूक्की करणे.
तुम्हाला असं इतर मोठ्या लोकांच्या काळ्याबाजूबद्दल माहीतीय का?
नावाजलेल्या/मोठ्या लोकांतील दोष.
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 18 November, 2023 - 06:32
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सेलेब्रिटी बद्दल गॉसिपिंग,
सेलेब्रिटी, पब्लिक फिगर्स बद्दल गॉसिपिंग, लुज टॉक्स, स्टॅन्ड अप ह्युमर हे होतच राहणार. पण आरोप करताना त्यांची सुद्धा बाजू समजून घ्यायला हवी.
प्रसिद्ध व्यक्तींना जाहीर प्रतिक्रिया देताना त्या जपून द्याव्या लागतात. इमेज बिल्ड करणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो. त्यानंतर सातत्याने त्या प्रतिमेची काळजी घेत राहणे हा सुद्धा. त्यावरून अशा व्यक्तींबद्दल अंदाज बांधणे बंद केले तर अपेक्षाभंग होत नाही. उद्या आपलाही व्यवसाय भरभराटीला येऊन माध्यमे मुलाखती घेऊ लागली तर आपण प्रतिक्रिया देताना आपण जसे आहोत तशा थोडीच देणार ?
मोठ्या लोकांचे ही पाय मातीचेच
मोठ्या लोकांचे ही पाय मातीचेच असतात. मी फक्त त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीकडे बघते आणि आनंद घेते. मी त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि professional करियर ह्यात सरमिसळ करत नाही. अश्या गोष्टींना फार महत्व देत नाही. उदा. किशोरीताई आमोणकर फक्त गाताना नितांत सुंदर दिसतात . इतर वेळी ही सामान्य माणसेच असतात हा माझा विचार आहे. उदा. किशोरी आमोणकर फक्त गाताना मला नितांत सुंदर दिसतात . ह्यामुळे असामान्य लोकांच्या सामान्य वर्तणुकीचा मी बाऊ करत नाही.
त्यांचे खायचे नी दाखवायचे दात
त्यांचे खायचे नी दाखवायचे दात वेगवगळे असतात.
सुंदर न दिसणे हा दोष आहे?
सुंदर न दिसणे हा दोष आहे?
सेल्फी मागणे हेच त्रासदायक
सेल्फी मागणे हेच त्रासदायक होत असेल. कोणत्या ठिकाणी किती लोकांना सेल्फी देणार?
-----------------
बाकी बातमीतील घटनेवरच बोलू शकतो. आपल्याला कसा अनुभव येणार आणि पुरावा काय देणार?
मोठे लोक आणि अभिनेते/
मोठे लोक आणि अभिनेते/ सेलेब्रिटी ह्यात गल्लत झाली का?
Media आणि paps (paparazzi) चा
Media आणि paps (paparazzi) चा हल्ली अतिरेक झाला आहे. हे लोक एखाद्या वेळेचं तास तास भर शूट करत असतील आणि त्यातला बरोबर १० sec चा असा भाग उचलातात आणि दाखवत राहतात social media वर की विचारू नका..
Celebrities ही सुद्धा माणसेच असतात.. fans च्या अतिरेकी वागण्यामुळे ही त्यांना काही वेळा कठोर वागावे लागते असे वाटते.
PS.. not justifying Nana Patekar's act .
Just wnat to know other side of the coin .
मोठ्या लोकांचे ही पाय मातीचेच असतात. मी फक्त त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीकडे बघते आणि आनंद घेते.... या वाक्याला +१२३४५६७
“ ऐवी मायबाप प्रेक्षक
“ ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना” - तसंही नानाची ही गेल्या १०-१२ वर्षात ‘घडवलेली’ इमेज आहे. अमिताभच्या ‘प्रेमळ आजोबा’ इमेज इतकीच “ऑथेंटिक” आहे.
मी लहान होतो तेव्हाच नानाचा
मी लहान होतो तेव्हाच नानाचा हा थिल्लरपणा फक्त चेहरा पाहून ओळखला होता. एक ना एक दिवस भांडं फुटणारच होतं.
असा एक धागा आहे - https://www
असा एक धागा आहे - https://www.maayboli.com/node/68187
>>>>>>>मी फक्त त्यांच्या
>>>>>>>मी फक्त त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीकडे बघते आणि आनंद घेते. मी त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि professional करियर ह्यात सरमिसळ करत नाही. अश्या गोष्टींना फार महत्व देत नाही.
+१००
<< १) सचिन तेंडूलकर ह्यांची
<< १) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे. >>
------ मायकल शुमाकर कडून मिळालेली फेरारी भेट मधे मिळालेली होती. कस्टम/ टॅक्सचे पैसे देणे जमत नव्हते तर भेट स्विकारायची नव्हती. भारत सरकार कडे भिकेची झोळी का पसरायची?
आता सचिन तेंडुलकरकडून विनंती अर्ज आला होता तर लगोलग अर्थ मंत्र्यांनी सकारात्कम निर्णय घेतला... लोकांना कळाल्यावर प्रचंड टिका झाली, आणि मग उशिरा शहाणपण जागे आले.... मला टॅक्स ब्रेक नको.
हे एकच प्रकरण नाही आहे. अनेक आहेत. संसदेमधे मांडल्या गेलेल्या कॅग ( comptroller and Auditor General) अहवालांत तेंडुलकर तसेच गावस्कर यांना आयकर खात्याने दिलेल्या झुकत्या मापाबद्दल मुद्दे आले होते. उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? खेळातून आहे का अभिनय/ कला? प्रत्येक उत्पनासाठी वेगळे नियम वेगळे आहेत.
खेळाडू, कलाकार, मॉडेल या प्रत्येक व्यावसाया साठी टॅक्स रेट वेगळा असतो/ आहे आणि कुठले उत्पन्न कुठे दाखवायला हवे हे अर्थ सल्लागारांची फौज बाळागणार्या खे़ळाडूला माहित असायला हवे.
https://timesofindia.indiatimes.com/tax-exemptions-of-tendulkar-gavaskar...
आयकर खात्या कडून झुकते माप सामान्यांना मिळत नाही.
चॅरिटी नाही केली तरी चालेल, योग्य टॅक्स भरा.
<< >>>>>>>मी फक्त त्यांच्या
<< >>>>>>>मी फक्त त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीकडे बघते आणि आनंद घेते. मी त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि professional करियर ह्यात सरमिसळ करत नाही. अश्या गोष्टींना फार महत्व देत नाही.
+१००
Submitted by सामो on 18 November, 2023 - 14:01 >>
-------- इतरांच्या खासगी आयुष्यात डोकावणे मलाही मान्य नाही.
पण एखादी व्यक्ती ( व्यक्ती त्याच्या क्षेत्रात कितीही मोठी असेल ) टॅक्स चुकवत असेल, अनेक वर्षे टॅक्स चुकवत असेल, तर अशी कर बुडवेगिरी हा वैयक्तिक आयुष्याचा भाग नसतो.
आपल्या उत्पन्नावर योग्य कर भरणे याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.
सोशल मिडिया मुळे निराधार
सोशल मिडिया मुळे निराधार आरोपांचे पीक आले आहे. पंडित नेहरु, विजयालक्ष्मी पंडित, आणि नमो पर्यंत गलिच्छ आरोप केले जातात आणि एक नॅरेटिव्ह बनते.... इतर वाचन शून्य.... त्यामुळे व्हॉट्स अॅप विद्यापीठ जे सांगते त्यावर विश्वास..... भयानक प्रकार आहे...... तुम्ही एखाद्याला मान का देता याची मीमांसा करा आणि त्या आदराशी संलग्न गोष्टींवर टीका करा..... गॉड टू हॅज फीट ऑप क्ले!!!!
रेव्यू +१
रेव्यू +१
“ मायकल शुमाकर कडून मिळालेली
“ मायकल शुमाकर कडून मिळालेली फेरारी भेट मधे मिळालेली होती. कस्टम/ टॅक्सचे पैसे देणे जमत नव्हते तर भेट स्विकारायची नव्हती. भारत सरकार कडे भिकेची झोळी का पसरायची?” - रितसर अर्ज करून प्रश्न विचारणं नियमबाह्य नाहीये. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची जवाबदारी ज्या खात्याची आहे, त्यांनी त्यावर त्यांच्या नियमांच्या चौकटीत निर्णय घेतला आहे. ह्यात गैर काही नाहीये.
“ लोकांना कळाल्यावर प्रचंड टिका झाली, आणि मग उशिरा शहाणपण जागे आले.... मला टॅक्स ब्रेक नको.” - नियमात राहून टॅक्स ब्रेक मिळत असताना जनमानसाचा आदर करणं - असं करण्याची कुठलीही सक्ती नसताना - हा मनाचा मोठेपणाच आहे.
नेते प्रामाणिक असावेत असं
नेते प्रामाणिक असावेत असं वाटतं.
"नेते प्रामाणिक असावेत असं
"नेते प्रामाणिक असावेत असं वाटतं." Politics is a last resort of the scoundrels ह्या सॅम्युअल जॉन्सनच्या मताशी मी १००% सहमत आहे
हे इंटरेस्टिंग आगे.
हे इंटरेस्टिंग आगे.
श्री तेंडुलकर आयकर खात्याला सांगतात की त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मॉडेलिंग / अभिनय करून मिळालेली फी आहे.
ते व्यावसायिक क्रिकेटपटू नाहीत, त्यामुळे क्रिकेट खेळून मिळालेलं उत्पन्न ते ' इतर स्रोताखाली दाखवतात.
आता हे लॉजिक पुढे न्यायचं तर साहेबांचा मुख्य व्यवसाय मॉडेलिंग, अभिनय आहे. क्रिकेट ते आवड म्हणून खेळतात.
२. साहेबांच्या मालकीची अनेक घरं आहेत. एकापेक्षा जास्त घर असलेल्या व्यक्तीला तो राहत नसलेलं घर सोडून इतर घरे भाड्याने दिली आहेत असे गृहीत धरून त्यावर कर भरावा लागतो. साहेबांना एका घरासाठी काही केल्या भाडेकरूच मिळेना. म्हणून त्यांनी त्या घरासाठी आयकर भरला नाही.
<<“ मायकल शुमाकर कडून
<<“ मायकल शुमाकर कडून मिळालेली फेरारी भेट मधे मिळालेली होती. कस्टम/ टॅक्सचे पैसे देणे जमत नव्हते तर भेट स्विकारायची नव्हती. भारत सरकार कडे भिकेची झोळी का पसरायची?” - रितसर अर्ज करून प्रश्न विचारणं नियमबाह्य नाहीये. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची जवाबदारी ज्या खात्याची आहे, त्यांनी त्यावर त्यांच्या नियमांच्या चौकटीत निर्णय घेतला आहे. ह्यात गैर काही नाहीये.
“ लोकांना कळाल्यावर प्रचंड टिका झाली, आणि मग उशिरा शहाणपण जागे आले.... मला टॅक्स ब्रेक नको.” - नियमात राहून टॅक्स ब्रेक मिळत असताना जनमानसाचा आदर करणं - असं करण्याची कुठलीही सक्ती नसताना - हा मनाचा मोठेपणाच आहे.
Submitted by फेरफटका on 18 November, 2023 - 23:01 >>
------- तेंडुलकरला गाडी भेट (Gift ) मधे मिळाली होती, तो पुरस्कार नव्हता. त्यामुळे त्याने त्या भेट वस्तूवर ( २.५ कोटी रुपये एव्हढी रक्कम असावी - अंदाज) कर भरणे अपेक्षित होते. भेट मिळालेल्या वस्तू वर कस्टम्स duty माफ करण्यासाठी अर्ज करण्यात गैर काही नाही. अर्थमंत्र्यांनी घेतलेला करमाफीचा निर्णय हा नियमाच्या चौकटीत बसणारा नव्हता तसा पायंडा नव्हता आणि एका श्रीमंत/ कोट्याधिशाने अर्ज केला होता म्हणून लोकांची ओरड होती. अर्थात लोकांची ओरड नियमांत बसणारी आहे.
टॅक्स ब्रेक नियमांत बसणारा नव्हता म्हणून काही सतर्क लोक या निर्णयाविरुद्ध PIL दाखल करणार होते... म्हणून माघार घ्यावी लागली. कोर्टा कडून निर्णय विरोधांत गेला असता तर टॅक्स भरावाच लागणार होता.
https://m.rediff.com/money/2002/sep/23dalal.htm
Gift/ award या मधे फरक आहे हे समजण्यासाठी एक उदाहरण. १९८५ मधे रवी शास्त्रीला ऑडी मिळाली होती, तो Champion of Champions या पुरस्काराचा ( award ) भाग होता. त्या गाडीला कस्टम्स करातून सुटका मिळाली होती. :smile:
सचिन तेंडूलकरांनी रिटायर्ड
सचिन तेंडूलकरांनी रिटायर्ड व्हायलाही नकार दिला होता. शेवची बीसीसीआय ने रिटायर्नेंट तारीख डिक्लेर करून काढलं.
प्राप्तीकर वाचवण्यासाठी
प्राप्तीकर वाचवण्यासाठी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेऊन (अमिताभ, अक्षय कुमार) देशप्रेमाचे गोडवे गाणारे सर्वात जास्त डोक्यात जातात. चिन्मय-तन्मयला हे पाटणार नाही कारण शिक्षण घेऊन पडदेशात स्थायिक होणे हेच ह्यांना आयुष्याचे उद्दिष्ट वाटते.
यामुळे स्टार झाकोळतो. चमकत
यामुळे स्टार झाकोळतो. चमकत नाही. एक सीएचं फी प्रकरण आहेच.
<< प्राप्तीकर वाचवण्यासाठी
<< प्राप्तीकर वाचवण्यासाठी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेऊन (अमिताभ, अक्षय कुमार) देशप्रेमाचे गोडवे गाणारे सर्वात जास्त डोक्यात जातात. चिन्मय-तन्मयला हे पाटणार नाही कारण शिक्षण घेऊन पडदेशात स्थायिक होणे हेच ह्यांना आयुष्याचे उद्दिष्ट वाटते. >>
------- अमिताभच्या बाबतीत दुसर्या देशाच्या नागरिकत्वाचा मुद्दा नव्हता ( असे वाटते), अगदी असलाच तर NRI status वापरले असण्याचा असेल. आर्थिक वर्षातले १८१ दिवस देशाबाहेर राहिले असल्यास टॅक्सच्या दृष्टीकोनातून NRI म्हणवता येते.
पनामा पेपर्स मधे नाव आले होते, त्याचे नक्की काय झाले माहित नाही.
KBC चा अँकर म्हणजे (टॅक्स साठी) कलाकार असतो का हा कोटी रुपयांचा प्रश्न. वाचविलेल्या टॅक्सच्या पैशातून आता वारेमाप वाढलेल्या पेट्रोलचा खर्च आरामांत निघत असेल.
सेलिब्रिटी बाबत अफवा सुद्धा
सेलिब्रिटी बाबत अफवा सुद्धा खूप असतात.
किंवा आहे ते वाढवून चढवून सांगितले जाते.
मागे इथेच मायबोलीवर काही लोक पाहिली आहेत जे शाहरूखने पाकिस्तानला अमुक प्रमुख कोटींची मदत केली पण भारताला नाही म्हणून नावे ठेवत होती. ती अफवा आहे हे सांगूनही त्यांना पटत नव्हते.
व्यसने तर सामान्य लोक सुद्धा करतात.
इथे मायबोलीवरच दारू कशी प्यावी याचे धागे निघतात.
पण तेच व्यसन सेलिब्रिटींनी केले किंवा त्यांच्या जाहिराती केल्या की हे लोकं असेच असतात म्हणून नावे ठेवली जातात.
जे लोक सचिनला नावे ठेवतात, तेसुद्धा कुठला नियम लावून टॅक्स वाचता येईल काही बघतच असतात.
अजून लिहायचे आहे पण
चला झोप आली
जे लोक सचिनला नावे ठेवतात,
जे लोक सचिनला नावे ठेवतात, तेसुद्धा कुठला नियम लावून टॅक्स वाचता येईल काही बघतच असतात. >> म्हणजे सचिनने टॅक्स चुकवला असे आडवळणाने सुचवताय का ? हे वाक्य गाळून फक्त क्रिकेटच्या काँट्रीब्यूशनवर लिहा. नाहीतर पाहुण्याच्या काठीने विंचू मारायचा प्रकार वाटतोय हा.
जे लोक सचिनला नावे ठेवतात,
जे लोक सचिनला नावे ठेवतात, तेसुद्धा कुठला नियम लावून टॅक्स वाचता येईल काही बघतच असतात.>>>
कुठले कुठले (तुला न लागू होणारे) नियम लावून टॅक्स वाचवतोस तू ?
<< जे लोक सचिनला नावे ठेवतात,
<< जे लोक सचिनला नावे ठेवतात, तेसुद्धा कुठला नियम लावून टॅक्स वाचता येईल काही बघतच असतात. >>
------ ऋन्मेऽऽष , तेंडुलकर ( सोबत गावस्कर पण आहेत) यांच्या बाबतीत CAGच्या अहवालांत उल्लेख आहे, आणि सरकारने हा अहवाल संसदेत सादर केला होता.
https://timesofindia.indiatimes.com/tax-exemptions-of-tendulkar-gavaskar...
भरत यांनी काही आयकर प्रकरणाच्या लिंक पण दिलेल्या आहेत. अफवा किंवा WA मधिल बातमीच्या आधारावर लिहीलेले नव्हते.
नियम लावून टॅक्स वाचवत असतील तर कुणालाच हरकत असायचे कारण नाही.
<< जे लोक सचिनला नावे ठेवतात,
<< जे लोक सचिनला नावे ठेवतात, तेसुद्धा कुठला नियम लावून टॅक्स वाचता येईल काही बघतच असतात.>>>
कुठले कुठले (तुला न लागू होणारे) नियम लावून टॅक्स वाचवतोस तू ? >>
------- लागू न होणारे नियम आणि पुढे वाचवणे आले आहे....
मस्त गुगली, मानव.
जे लोक सचिनला नावे ठेवतात,
जे लोक सचिनला नावे ठेवतात, तेसुद्धा कुठला नियम लावून टॅक्स वाचता येईल काही बघतच असतात >> ज्या अर्थी असे ठाम विधान केलेले आहे त्या अर्थी आक्षेप घेणारे लोक असे गैरवर्तन करतात याची संपूर्ण माहिती सदर पोस्टकर्त्याकडे आहे असा समज होत आहे. आणि त्या साठी ही पोस्ट पुन्हा वाचण्याची अजिबात गरज नाही. जे लोक ... ते सुद्धा अशी वाक्याची रचना असेल तर सदर लेखकाची पूर्ण खात्री झालेली आहे असाच त्याचा अर्थ निघतो. त्यांची नावे जाहीर करावीत.
Pages