नावाजलेल्या/मोठ्या लोकांतील दोष.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 18 November, 2023 - 06:32

सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
मला माहीत असेलेल्या मोठ्या लोकांच्या काही छोट्या गोष्टी.
१) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे.
२) लता मंगेशकर- ऊड्डाणपुल घरासमोर नको म्हणून तक्रार करणे, बाबासाहेबांची गाणी गाण्यास नकार.
३) सलमान खान, जाॅन अब्राहम ह्यांचे चाहत्यांचा मोबाईल ओढणे, धक्काबूक्की करणे.
तुम्हाला असं इतर मोठ्या लोकांच्या काळ्याबाजूबद्दल माहीतीय का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा आणि चर्चा.
नियमात राहून टॅक्स ब्रेक मिळत असताना जनमानसाचा आदर करणं - असं करण्याची कुठलीही सक्ती नसताना - हा मनाचा मोठेपणाच आहे.>>>> हे नाही पटत. हा मनाचा मोठेपणा नाही तर फ्युचर एंडोर्समेंट / पब्लिक ईमेज धुळीत जाऊ नये या साठी घेतलेला पवित्रा आहे. जो बुंद से गयी वो हौद से नही आती!

ऋन्मेष चे स्टेटमेंट मनावर घेण्याची गरज नाही, कारण मुळात काहीच माहित नसताना केलेली ती कॉमेंट आहे, आणि पुरावा लिन्क्स त्याने स्कीप केल्या आहेत!
दिग्गज लोक जेंव्हा टॅक्स चुकवायची/ केलेल्या अपराधा पासून सुटण्याची/दंड न होण्याची धडपड करतात तेंव्हा & मुर्ख फॅन्स त्यांची भलावण करतात तेंव्हा प्रचंड डोक्यात जाते. (सलमान खान १ गुंड आहे अनेक गुन्हे केलेले आहेत & भारतातल्या न्याय व्यवस्थे ला तो कस्पटा समान लेखतो)

लता मंगेशकरांबाबत आदर असला तरी त्यांच्या भरातल्या काळात त्यांनी सुमन कल्यान्पूर ह्या गुणी गायिके च्या करीयर चा सत्यानाश केला होता असे वाचले, बहिणी ला ही कंपूगिरी करून गाणी मिळू नयेत असेच पाहिले. आरडी चा वरदहस्त लाभल्या मुळे आशा भोसलेंना वर येता आले असे ही १ जुन्या मुलाखतीत ऐकले.

ईथे दोषारोप करताना ते खरे आहेत की खोटे याचीही खातरजमा करा.
यासाठी खालील धागा चेक करू शकता.

सेलेब्रेटींविषयी पसरवली जाणारी खरी खोटी माहिती.
https://www.maayboli.com/node/80329

ईथे दोषारोप करताना ते खरे आहेत की खोटे याचीही खातरजमा करा.
Submitted by ऋन्मेऽऽष on 21 November, 2023 - 09:48

माझे उदाहरण घेऊ नका यात. मी याबाबतीत वेगळाच आहे. मला पैसे पैसे करणे आवडत नाही आणि पैशाचे गणित काही समजत नाही. पैसे कसे कमवावे त्याचा मी विचार कधी करत नाही किंवा पैसे कसे वाचवावे त्याची मला अक्कल नाही. यावरून मी घरी रोज शिव्या खातो.. जो टॅक्स जसा जायचा तसा जाऊ देतो. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला हेच मला पुरेसे असते. त्यामुळे मी काही तुलनेला आदर्श केस नाही. मला मी काय करतो हे विचारू नका. कारण मी बावळट आहे. मी काहीच करत नाही Happy

दुसरी गोष्ट म्हणजे मला सचिन टॅक्स प्रकरण डिटेल मध्ये माहित नाही. कधी ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. कारण तो विषय आवडीचा नाही. तसेच मला त्यातले काही कळत नाही. तुम्ही लिंक दिल्या तरी त्या मी स्किप करणार. सांगायचा मुद्दा हा की टॅक्स वाचायला धडपड करणारे माझ्या आजूबाजूला मी हजारो बघतो. मी नोकरी करतो तर माझा पगारातूनच कटतो,

बाई दवे,
सचिनने किती रुपयांचा टॅक्स बुडवला हे एवढेच कोणी सांगू शकेल का?
Submitted by ऋन्मेऽऽष on 20 November, 2023 - 16:50

चर्चा सेलेब्रिटी वर करा. माझ्यावर नको.
Submitted by ऋन्मेऽऽष on 21 November, 2023 - 03:34

ही केस पण त्या केस सारखीच आहे असे वाटेल. पण सूक्ष्मात फरक आहे.

पुन्हा त्याच त्याच पोस्ट
पुन्हा तीच तीच चर्चा

मी सचिनच्या टॅक्स बद्दल विचारताच मला मी काय करतो हे मानव यांनी विचारले. त्यामुळे मी माझ्या बद्दल सांगितले.

असो,
करा चर्चा माझ्यावर...
माझे काही ऑब्जेक्शन नाही Happy

(आता म्हणू नका.. छे .छे.. आम्हाला काही कामे नाहीत का Happy )

मी सचिनच्या टॅक्स बद्दल विचारताच !>>>
हे बदलून
मी
"जे लोक सचिनला नावे ठेवतात, तेसुद्धा कुठला नियम लावून टॅक्स वाचता येईल काही बघतच असतात" असा बेधुंद आरोप केल्यावर ....

असे कर कृपया वरच्या पोस्ट मध्ये.
वाटल्यास माझी ती पोस्ट परत वाच.

चला तसा बदल करतो Happy
---------------------------------

पुन्हा त्याच त्याच पोस्ट
पुन्हा तीच तीच चर्चा

मी "जे लोक सचिनला नावे ठेवतात, तेसुद्धा कुठला नियम लावून टॅक्स वाचता येईल काही बघतच असतात" असा बेधुंद आरोप केल्यावर .... मला मी काय करतो हे मानव यांनी विचारले. त्यामुळे मी माझ्या बद्दल सांगितले.

असो,
करा चर्चा माझ्यावर...
माझे काही ऑब्जेक्शन नाही Happy

(आता म्हणू नका.. छे .छे.. आम्हाला काही कामे नाहीत का Happy )

अरे हेमाशेपो लिहून तू पुन्हा स्वतः बद्दलच बोलत बसलायस. इग्नोर कर आणि लिहू नकोस काही. सोप्पय की. किती मी मी करायचे? कंटाळा नाही का येत? बस्स कर ना Sad

अहो इग्नोर केले तर लोकं मुद्दाम जास्त बोलतात.
आता बोला माझ्यावर म्हटले तर बघा कोणी बोलणार नाही.

असो,
चला तरी आता पुन्हा इग्नोर करून बघतो Happy

अहो इग्नोर केले तर लोकं मुद्दाम जास्त बोलतात. >> काव्यात्मक न्याय म्हणतात तो हाच असावा Happy Happy Happy

के आर के चं कौतुक यासाठी कि त्याला जेव्हां इग्नोर करतात तेव्हां तो इग्नोर करणार्‍यांनी जे म्हटलेलंच नाही ते कोट करून त्याला उकसवत नाही. खेळ औट घटकेचा असतो. मर्यादेच्या बाहेर कशाचंही अजीर्ण होतं ते त्याला समजतं.

तो फक्त परीक्षण करतो कारण त्याने सिनेमा बनवलेला आहे. त्यातली थोडी का होईना माहिती आहे.

@ धागा, पुन्हा विषयावर येऊया...

सेलेब्रिटी हे पर्सनल आयुष्यात काय गोंधळ घालतात यावर चर्चा करण्यात रस ठेऊ नये.
उदाहरणार्थ, एखाद्याने आपल्या मुलाचे नाव काय ठेवले, कोणाचा घटस्फोट झाला, कोणाचे कोणाशी लफडे आहे, कोणाचा मुलगा कुठल्या प्रकरणात पकडला गेला, कोण किती दारू पिते आणि मारामाऱ्या करते, किती दान करते, किंबहुना करत नाही, कुठल्या राजकीय पक्षाला किंवा विचारधारेला समर्थन करतात, आपल्याच पिक्चर मध्ये आपल्याच मुलांना काम दिले, पाकिस्तानी कलाकार किंवा खेळाडूशी लग्न केले.. वगैरे वगैरे.... आपल्याला काय त्याचे?
हल्ली तर अश्या चर्चा गॉसिप पुरते न राहता ट्रोलिंग लेवलला जातात..

पण तेच कोणी गाडीखाली माणसे चिरडली, लैंगिक शोषण केले, हत्यारे बाळगली, देशद्रोह केला, तरुणाईला बिघडवत आहेत... असले काही असेल तर मात्र त्यावर निषेध ते कारवाई, आपल्याला शक्य ते करावे.

जे लोक सेलेब्रिटींच्या गाडीखाली माणसे चिरडली, लैंगिक शोषण केले, हत्यारे बाळगली, देशद्रोह केला असे आरोप करतात ते स्वतःच आपापल्या गाडीखाली लोकांना चिरडताना, लैंगिक शोषण करताना, देशद्रोह करताना , हत्यारे बाळगताना पाहिलेले आहेत.

तेच लोक ट्रोल्स असतात.

के र के
म्हणजे खान च ना
>>>
हो, कमाल खान बहुधा. मधल्या र चे गणित माहीत नाही.
एस आर के च्या धर्तीवर बनवले असावे.

चुक
के आर के च्या धर्तीवर एस आर के बनवले

सुमन कल्याणपूरना मुळात लतासारखी करियर करायची होती का? त्यांची कुवत लताइतकी होती का?

मुबारक बेगमने मात्र माझी काही गाणी हिट झाल्यावर मला गाणी मिळू नयेत यासाठी संगीतकारांवर दबाव यायचा असे नाव न घेता सांगितले. तोही असूयेचा भाग जास्त वाटतो. तिचा आवाज काही विशिष्ट पद्धतीच्याच गाण्यात खुलून यायचा. हमारी याद आएगी लता गाणार होती, ती ठरलेल्या तारखांना रेकॉर्डिंगला आली नाही म्हणून दिग्दर्शक केदार शर्मांनी संगीतकार स्नेहल भाटकरांना दुसर्‍या कोणाकडून तरी गाऊन घे असं सांगितल्यावर ते गाणं मुबारकला मिळालं. पण जणू ते तिच्यासाठीच बनलं होतं.

रेकॉर्डिंगच्या तारखा / वेळा चुकण्यावरून आठवलं. ईटीव्ही मराठी (आता कलर्स) वर रविवारी सकाळी कलाकारांच्या मुलाखतीचा एक दीड तासाचा कार्यक्रम असे. आधी मधुराणी गोखले आणि मग कविता पौडवाल मुलाखती घेत. यात एकदा मीना खडीकर आणि उषा मंगेशकर आल्या होत्या. त्यांनी सांगितले की आम्ही दीदीच्या प्रत्येक रेकॉर्डिंगला जायचो (हे अर्थात ती गानसम्राज्ञी झाल्यावरचं असणार ). रेकॉर्डिंग स्टुडियोत बसायचो. टेक ऐकायचो आणि आमचं समाधान झालं नाही तर आणखी एकदा घ्या म्हणून एक बोट वर करायचो. असे एकामागून एक अनेक टेक व्हायचे. पण आम्हांला पर्फेक्शन हवं होतं.
हे मला खटकलं. गाण्याबाबतचा शेवटचा निर्णय संगीत दिग्दर्शकाचा असला पाहिजे. त्यावेळी वाद्यवृंदासह एकत्र रेकॉर्डिंग असल्याने कोणाचीही चूक झाली तरी अख्खं गाणं पुन्हा रेकॉर्ड करावं लागे. लताच्या अनेक गाण्यांचं रेकॉर्डिंग असं तासन् तास झाल्याच्या ही लताच्याच आठवणी आहेत.
अनेक तुलनेने नवे संगीत दिग्दर्शक लता आशा एव ढ्या मोठ्या गायिका असूनही आमचं गाणं गाताना/ शिकताना किती नम्रतेने वागत असं सांगत. तर अशा वेळी या दोघींनी गाण्याला ओके देणं मला खटकलं.
आता हे असे टेक पे टेक घेण्यात निर्मात्याचा खर्च वाढणार. लताला तिच्या पुढच्या रेकॉर्डिंगला उशीर होणार.
रफी एकदा एका रेकॉर्डिंगला वेळेवर पोचला नाही , त्याने फोन करून कळवलंही नाही, म्हणून ओ पी नय्यरने काही वर्षे त्याच्यासोबत काम करणं सोडलं.
ओपी, नौशाद, सज्जाद हुसैन अशा संगीतकारांनी आपला अधिकार या बहिणींना खचितच दिला नसता.

मुलाखतीत सांगितलेलं किती खरं आणि किती आपलीच मिजास कशी चालते ते दाखवायला... कोण जाणे. हृदयनाथ, उषा इत्यादी मंगेशकरांच्या मुलाखती उबग आणणार्‍या ऐकल्या आहेत. त्यावर आपले बोटचेप्या मुलाखतकारांना तुम्हाला आम्हाला जे खटकतं ते खटकत नाही. आणि गुलूगुलू गप्पा मारत बसतात. पीआर फंडा आहे. दुसरं काही नाही.
बाकी या जगात _केवळ_ गुणवत्तेवर _दीर्घकाळ_ सामुहीक प्रकल्प इ. चालत नाहीत. त्याबरोबर इतर स्किल्स नसतील तर फक्त गुणवत्ता पुरेशी नाही. गुणवत्ता थोडी कमी आणि सातत्य असेल तर मात्र व्यक्ती योजने पुढे जाऊ शकते.

<< बाकी या जगात _केवळ_ गुणवत्तेवर _दीर्घकाळ_ सामुहीक प्रकल्प इ. चालत नाहीत. त्याबरोबर इतर स्किल्स नसतील तर फक्त गुणवत्ता पुरेशी नाही. गुणवत्ता थोडी कमी आणि सातत्य असेल तर मात्र व्यक्ती योजने पुढे जाऊ शकते. >>

------- सहमत....

आपल्याकडे conventional गुणवत्ता जास्त पूजली जाते. Unconventional गुणवत्तेचे बहुधा रिझल्ट आल्याशिवाय लोकांना मूल्यमापन करता येतं नाही. किंवा ते येऊनही सुरुवातीला लक किंवा फलूकचे शिक्के मारले जातात.
याचे क्रिकेटमधील उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तकी खेळापलीकडे जाऊन यश मिळवणारा महेंद्रसिंग धोनी.

कलाकार असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातली नावाजलेली व्यक्ती असो शेवटी ती 'माणूस' आहे. त्यांनी विशिष्ट पद्धतीने वागलं बोललं पाहिजे हे आपण मनात धरून ठेवतो, आणि ते तसे वागले नाहीत की आपण त्यांना नावे ठेवतो. थोडक्यात आपल्याला हवं तसं ते वागले नाहीत की आपल्यासाठी ते नालायक ठरतात. मिडिया एक मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथे मोहरीच्या दाण्याएवढ्या बातम्या पर्वता सारख्या करून सांगितल्या जातात. कधी कधी विपर्यास पण. मुलाखतीत लोक काय सांगतात ते खरं कि खोटं याची शहानिशा पण शहाण्या माणसाने करू नये. कारण ते करून हाती लागतो फक्त मनस्ताप कारण आपण जशी अपेक्षा ठेवतो तसे काही घडत नाही.

त्यापेक्षा त्या व्यक्तीची त्याच्या क्षेत्रातली कामगिरी बघावी आणि कौतुक करावे, त्यात कुचराई झाली तर ताशेरे ओढावेत पण तो कलाकार चांगला आहे म्हणून त्याने माणूस म्हणून सुद्धा चांगलेच असले पाहिजे हा अट्टाहास सोडून द्यावा.

स्पर्धा निर्माण करेल आणि आपल्याला मागे ढकलले .
पुढे जावून आपल्या अस्तित्वाला च धोका निर्माण निर्माण करेल अशा व्यक्ती ना सर्वं मार्ग अवलंबून संपवले जाते.
अगदी राजकारण पासून सर्व च क्षेत्रात हे चालू आहे.

त्याला कला क्षेत्र पण अपवाद नाही.
त्या मुळे लता दीदी असू किंवा बाकी कोणी त्यांनी त्यांचे स्पर्धक संपवले च आहेत.
हाच मानवी स्वभाव आहे

Pages