टॉप टेन / ट्वेन्टी / ++ गाजलेले आयकॉनिक संवाद / सीन्स

Submitted by रघू आचार्य on 14 September, 2023 - 12:17

भारतात चित्रपट चालण्याची अनेक कारणे आहेत.

त्यामधे ७० च्या दशकात संवादफेक आणि संवाद लेखन या कारणाची भर पडली. तसेच भावनेला हात घालणारे / हाय व्होल्टेज ड्रामा असलेले काळजीपूर्वक लिहीलेले सीन्स यांचीही भर पडली. कित्येकदा असा सीन क्रमाक्रमाने नाट्य खुलवत नेतो, व्होल्टेज वाढतं तसं काळजाचे ठोके वाढू लागतात आणि यावर वरताण म्हणून एखादा खंग्री डायलॉग येतो (खंग्री शब्द माबोवरूनच उचलला आहे).

बेदरकार नजर, शांत पण करारी चेहरा, थंड डोळ्यातून धुमसणारी आग, सिगारेटचं थोटुक चघळत हात न लावता ते फूक मारून फेकण्यात दिसलेली बेफिकिरी आणि त्या सुप्रसिद्ध आवाजात येणारा हा अजरामर डायलॉग
तुम लोग मुझे वहां ढूंढ रहे थे, और मै तुम्हारा यहा पर इंतजार कर रहा था..

या संवादाच्या मागे हप्ता मागणारे, त्यांची दहशत, मधेच शशीकपूरचे नोकरी न मिळण्याचे सीन्स (ज्यामुळे प्रेक्षक आपलेच विश्व पडद्यावर दिसतेय म्हणून हरखून जातो) , त्याबद्दलचा असंतोष आणि त्या असंतोषाला वाचा फोडत नायक म्हणतो..

"रहीम चाचा, पिछले पचास सालों मे जो नही हुआ , वो अब होने जा रहा है.
अगले हप्ते फिर एक कुली हप्ता देने से इन्कार करने वाला है "

सलीम जावेद चे हे जळजळीत संवाद. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पहिलं वाक्य जिथे सोडलंय त्यावर गझलेच्या नियमाप्रमाणे पहिल्या ओळीचा कल्पनाविस्तार किंवा विरोधाभास किंवा धक्कातंत्र असायचे. ही शैली जावेदची. लाह्या फुटावेत तसे संवाद निखार्‍यांवर तडतडायचे. नाट्य फुलवायचं काम सलीमचं.

नुसते असे संवाद लिहून जमायचं नाही.
त्या डायलॉगची डिलीव्हरी करण्यासाठी बेदरकार नजर, दमदार आवाज, खर्जातला स्वर आणि श्वासावरचं कमालीचं नियंत्रण असलेला ताकदीचा अभिनेता लागायचा.

अशा संवादांसाठी अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांना पर्यायच नव्हता.

शेरोशायरी, उच्च अभिरूची असलेली भाषा आणि अमिताभ , शत्रू सारखीच संवादफेक पण काव्यात्म संवादफेक म्हणून जानी राजकुमारची लोकपियता सुद्धा बुलंदीला होती. राजकुमार कधीच क्रमांक एकला नव्हता किंवा कधीच पिछाडीलाही नव्हता. तो राजकुमारच होता. त्याच्या संवादफेकीसाठी सिनेमे गाजलेले आहेत.

"चिनाय सेठ जिनके अपने घर शीशे के होते है, वो दूसरों के घरों पर पत्थर फेका नही करते"
किंवा
अगदी हळुवार प्रेमिक बनून
" आपके पैर देखें , हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे"

संवादफेक ही कला आहे हे फिल्म इंडस्ट्रीला शिकवणारे आद्य संवादफेकर म्हणजे दिलीप कुमार.

"कौन कंबख्त बर्दाश्त करने के लिये पिता है "
https://www.youtube.com/watch?v=Lf2Gc14434U&t=408s

मराठी चित्रपटांमधे निळू फुले यांच्या संवादफेकीला तोड नाही.
त्यांचा लक्ष्मी या चित्रपटातला " मास्तर शाळा कुणाची ? पोरगं कुणाचं ? मंग पास का नापास ते कोण ठरवणार ?" हा संवाद एके काळी तुफान गाजला होता. हल्लीच्या पिढीला त्यांचा "बाई वाड्यावर या" एव्हढाच डायलॉग माहिती आहे. बेरकी नजर, ओठ घट्ट मिटून खालचे दोन्ही जबडे गोल फिरवत व्यक्त केलेला संताप आणि नंतर केलेली संवाद फेक हे अजब रसायन होतं. निळूभाऊंना तोड नाही.

सीन्स "

एरीअल व्ह्यू ने खाली गाव दिसतो. क्रेन खाली येते तसा गावातला बाजार , बाहेरून येणारा रस्ता हे टप्प्यात येतं. बाजाराच्या एका टोकाला कापूस पिंजारी कापूस पिंजत बसलाय. त्याचा वाद्यासारखा येणारा आवाज, कॅमेरा पुढे जातो तसा तो आवाज क्षीण होत घणाचा आवाज ऐकू येतो तसा लोहाराचा भाता दिसतो, मग विक्रेत्यांचा गोंगाट, एक जण दगडाला टाके मरत बसलाय... हळू हळू प्रत्येक जण काही न काही करत असलेला दिसतो... त्यांचे वेगवेगळे ऐकू येणारे आवाज आता एकत्र ऐकू येऊ लागतात. सुरूवातीला ते वेगवेगळे ऐकवलेले असल्याने आता गोंगाटातही त्यांचे अस्तित्व कानाला जाणवते. एक लहान मूल आईला सोडून रस्त्यावर धावतं...

आणि इतक्यात डाकू घोड्यांवरून गावात घुसतात..

हा सीन एव्हढा जबरदस्त आहे. तो क्रमाक्रमाने हायपॉईंटला नेला जातो. डाकूंच्या पुढे झुकलेले गावकरी. ठाकूरचं येणं...
त्याच्या असहाय्यते वर हसणारे डाकू आणि क्षणार्धात सीन पलटतो आणि वेग पकडतो. शोले चं हे वैशिष्ट्य या सीनमधे दिसतंच दिसतं. या सीननंतरचा गब्बरचा आयकॉनिक सीन. त्याची सर शाकाल ला सुद्धा नाही आली.

अशा डायलॉग डिलीव्हरीची आणि अशा आयकॉनिक सीन्सची टॉप टेन किंवा टॉप ट्वेन्टी किंवा कितीही अशी यादी बनवायची झाली तर तुम्ही कोणत्या संवादांना / सीन्सना प्राधान्य द्याल ?

( लिंक्स देण्याची आवश्यकता नाही. दिले तरी काहीच हरकत नाही. तितकीच मजा येईल ).

यात बहुधा अमिताभ . शत्रू, राजकुमार यांचीच वर्णी जास्त लागेल असा अंदाज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाई, आप तो सिरियस हो गए (लगे रहो मुन्नाभाई)
हा डायलॉग घरी अनेक सिच्युएशन्सना वापरला जातो Lol

हूं ना नहीं, है ना (चु.चु. जुना) - हा सुद्धा घरी हॅशटॅगसारखा वापरला जातो. Biggrin

यात बच्चन्साहेब आणि दिलिप कुमार यान्चा शक्ती कसा नाही?

दिकु: इन लोगों के साथ किसी ऐसी राह पे ना चले जाना, जहां से चाहो तब भी वापस ना आ सको...
बच्चनः मैं इस बार वापस आने के लिये नहीं जा रहा

दिकु: इस वक्त मैं तुम्हारे सामने एक बाप की हैसियत से नहीं, बल्की एक पुलिस अफसर की हैसियत से खडा हूं.
बच्चनः कौन सी नयी बात है!

नारंग चा वकीलः अब कानूनन आप मिस्टर विजय को एक मिनट भी यहां नहि रख सकते.
दिकु: कानूनन मैं क्या कर सकता हूं, और क्या नहीं, ये जानने के लिये मुझे के डी नारंग या उनके वकील कि जरुरत कभी नही पडेगि!

बच्चनः मुझे अपनी, या किसी और की हिफाजत के लिये कानून की जरुरत कभी नही पडेगी!

"Those marks are not made by the defendant's Buick Skylark, they are made by Pontiac Tempest"
Submitted by अँकी नं.१ on 17 September, 2023 -

हा एक अप्रतिम चित्रपट होता

tomei.JPG

"Those marks are not made by the defendant's Buick Skylark, they are made by Pontiac Tempest" >>> फार जबरी डॉयलॉग आहे तो. पहिल्यांदा पाहताना सॉलिड इम्पॅक्ट आहे. हा पिक्चर तिकडे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटणारे पिक्चर्स आहेत तेथेही टाकायला हवा. मात्र मरिसा टोमेई चा रोल टोटल अतरंगी आहे Happy तसेच जो पेशी आणि तो न्यायाधीश यांचे सीन्स सुद्धा.

Those marks are not made by the defendant's Buick Skylark, they are made by Pontiac Tempest>>>
हो, पण ही गोष्ट फक्त मरिसा टॉमीसारख्या कार एक्स्पर्टच्या लक्षात यायला हवी होती (कोर्टाच्या ऑफिशियल एक्स्पर्टच्या पण लक्षात येत नाही). ती गाड्यांची काहीही माहिती नसलेल्या वकिलाच्या लक्षात फोटोकडे फक्त नजर टाकून येते, हे एक लूपहोल आहे.

जो सारख्या लेपर्सन ला फार तर एक टायर घसपटलेला आहे, एवढंच लक्षात येऊ शकतं. त्याला ऍन्टी स्किड रियर डिफरंशियल, तो दोनपैकी कुठल्या गाडीला किती साली जोडला वगैरे माहित असायची सुतराम शक्यता नाही. त्यावर त्या दोघांचं आधी काही बोलणंही झालेलं नाही. पण तरी तो अंतर्ज्ञानाने मधले सगळे डॉट्स जोडतो, आणि दोन्ही गाड्या वेगळ्या आहेत हे ओळखतो, आणि तिला फक्त कन्फर्म करायला बोलावून घेतो!
तो फोटो तिच्याकडेच राहिला असता, आणि तो पाहताना तिची ट्युब पेटून तिने कोर्टात ड्रामाटिक एन्ट्री मारली असती, तर ते लॉजिकल झालं असतं. पण रुसवाफुगव्याचा ड्रामा दाखवण्याच्या नादात रायटर्सनी लॉजिक पासून ब्रेक घेतला.

"उसे लिक्विड ऑक्सिजनमे डाल दो , ऑक्सिजन उसे मरने नहीं देगा और लिक्विड उसे जीने नहीं देगा "

"शामसे कहना छेनू आया था "

"कुणीतरी रुसलय जनु , हह "

"फॅन चालू कर, एसी इज ऑन सर, फिर इधर घुमा ना "

>>>>>फॅन चालू कर, एसी इज ऑन सर, फिर इधर घुमा ना "
या प्रसंगाला, खूप हसते दर वेळेस. आमीरचं टायमिंग, आवाजातल चढ उतार परफेक्ट असतात.

ती गाड्यांची काहीही माहिती नसलेल्या वकिलाच्या लक्षात फोटोकडे फक्त नजर टाकून येते, हे एक लूपहोल आहे
>>
विनी नी लिसा च्या वडिलांच्या गॅरेज मधे मेकॅनिक म्हणून काम केल्याचा रेफरन्स आहे सिनेमात

नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार, जिओ, एअरटेल, लायन्सगेट प्ले, झी5 कुठेच नाहीये हा सिनेमा... :-/

शामसे कहना छेनू आया था " > हा 'मेरे अपने' मधला संवाद ना? शत्रुघ्न सिन्हा?
Submitted by भरत. on 22 September, 2023 - 17:37

>>

हो.
https://youtu.be/aQuOrBl4cgE?si=LAD7OSY-GyyjU5ZS
"शाम कहा है? आए तो कह देना छेनू आया था"

रो मत पुष्पा!
ये दुनियावाले न तो खुद चैन से जिते है, ना दुसरो को चैन से जिने देते है
आय हेट टियर्स. ये आंसु पोछ दो
_________________
सुनो आरती, ये जो फूलों की बेलें नज़र आती है ना, दरस्ल ये बेलें नहीं हैं, अरबी में आयतें लिखीं हैं. इसे दिन के वक़्त देखना चाहिये, बिल्कुल साफ़ नज़र आती हैं.
दिन के वक़्त ये सारा पानी से भरा रहता है. दिन के वक़्त जब ये...
____________________
हां लेकिन बीच में अमावस आ जाती है. वैसे तो अमावस पन्द्रह दिन की होती है, लेकिन इस बार बहुत लम्बी थी

" कब से कर रहे हो ये सब ?"
"बस यूं समझिये कि होश सांभालते ही अपने पैरों पर खडे हो गये "

******

मुझे तो सारे पोलिस वालों कि सूरते एक जैसी दिखती है "

*******

"जो डर गया समझो मर गया "

" गब्बर के जुल्म से एकही आदमी तुम्हें बचा सकता है ,
और वो है खुद गब्बर "

****************

"लोहा गर्म है , मार दो हथौडा "

****************

" जानते हो दुनिया का सबसे बडा बोझ क्या है ?
बाप के कंधे पे बेटे का जनाजा "

***************

आचार्य, नुसतं ‘शोले’ लिहिलं तरी चालेल. ‘चल धन्नो’, ‘पूरे पचास हज़ार’ सारखी छोटी छोटी वाक्यसुद्धा अतिप्रसिद्ध आहेत.

दाल चावल खाया कर वाघले. बिर्याणी तेरे बस की बात नही - जॉन डे

पता है डुकी बना कैसा आदमी है? वो ऐसा आदमी है जीसका अपने बिवी के साथ भी नाजायज संबंध हो - गुलाल

बाजार मे सब्जी तरकारी लेने जाओ तो शकरगंदी ओर शलगम जरूर लेके आना. शलगम और घोष्त खाणे का बडा मन कर रहा है - चायना गेट

काही मालिकांमधील गाजलेले संवाद:
आंटी मत कहो ना! (हम पांच) (माझ्या जवळपास वय असलेल्या कुणी मला काका म्हटले की 'काका मत कहो ना' असे म्हणावेसे वाटते)
हेलो! हाऊ आर? खाना खाके जाना हां. (खिचडी व इन्सन्ट खिचडी)
जयश्री, चाय ला रही हो? या बाहरसे मंगवाऊ? (खिचडी व इन्सन्ट खिचडी)

फेफ Lol

आंटी मत कहो ना! > हा संवाद मूळचा गुलदस्ता कि गुलछडी या दूरदर्शन मालिकेतला आहे. त्यातली ज्जोशिज्जी म्हणणारी अभिनेत्री (अरूणा संगल) हा डायलॉग मस्त म्हणायची. किंचित बोबडे उच्चार होते पण कानाला गोड लागायचे.

"छब्बीस जुलै की रात आप कहां थे और क्या कर रहे थे?" ( शत्रुघ्न सिन्हा. सिनेमा - बेरहम.) >>> भगवानने, मुझे अपनी मॉं की कोखसे बाहर निकालकर दुनियामें लाया था और मै सबसे अपरीचित होनेसे 'किऽऽआऊं किऽऽआऊं' कर रहा था.

@ललिता-प्रीति >>> तुमचे खूप खूप आभार. एखाद्या चित्रपटात माझा केवळ जन्मदिवसच नव्हे तर जन्मवेळ असलेला संवाद आहे, मला मुळीच माहिती नव्हते.

दाल चावल खाया कर वाघले. बिर्याणी तेरे बस की बात नही
>>
गिलौरी खाया करो गुलाफाम, जुबां काबू मे रहेगी
-- मकबूल

Pages