टॉप टेन / ट्वेन्टी / ++ गाजलेले आयकॉनिक संवाद / सीन्स

Submitted by रघू आचार्य on 14 September, 2023 - 12:17

भारतात चित्रपट चालण्याची अनेक कारणे आहेत.

त्यामधे ७० च्या दशकात संवादफेक आणि संवाद लेखन या कारणाची भर पडली. तसेच भावनेला हात घालणारे / हाय व्होल्टेज ड्रामा असलेले काळजीपूर्वक लिहीलेले सीन्स यांचीही भर पडली. कित्येकदा असा सीन क्रमाक्रमाने नाट्य खुलवत नेतो, व्होल्टेज वाढतं तसं काळजाचे ठोके वाढू लागतात आणि यावर वरताण म्हणून एखादा खंग्री डायलॉग येतो (खंग्री शब्द माबोवरूनच उचलला आहे).

बेदरकार नजर, शांत पण करारी चेहरा, थंड डोळ्यातून धुमसणारी आग, सिगारेटचं थोटुक चघळत हात न लावता ते फूक मारून फेकण्यात दिसलेली बेफिकिरी आणि त्या सुप्रसिद्ध आवाजात येणारा हा अजरामर डायलॉग
तुम लोग मुझे वहां ढूंढ रहे थे, और मै तुम्हारा यहा पर इंतजार कर रहा था..

या संवादाच्या मागे हप्ता मागणारे, त्यांची दहशत, मधेच शशीकपूरचे नोकरी न मिळण्याचे सीन्स (ज्यामुळे प्रेक्षक आपलेच विश्व पडद्यावर दिसतेय म्हणून हरखून जातो) , त्याबद्दलचा असंतोष आणि त्या असंतोषाला वाचा फोडत नायक म्हणतो..

"रहीम चाचा, पिछले पचास सालों मे जो नही हुआ , वो अब होने जा रहा है.
अगले हप्ते फिर एक कुली हप्ता देने से इन्कार करने वाला है "

सलीम जावेद चे हे जळजळीत संवाद. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पहिलं वाक्य जिथे सोडलंय त्यावर गझलेच्या नियमाप्रमाणे पहिल्या ओळीचा कल्पनाविस्तार किंवा विरोधाभास किंवा धक्कातंत्र असायचे. ही शैली जावेदची. लाह्या फुटावेत तसे संवाद निखार्‍यांवर तडतडायचे. नाट्य फुलवायचं काम सलीमचं.

नुसते असे संवाद लिहून जमायचं नाही.
त्या डायलॉगची डिलीव्हरी करण्यासाठी बेदरकार नजर, दमदार आवाज, खर्जातला स्वर आणि श्वासावरचं कमालीचं नियंत्रण असलेला ताकदीचा अभिनेता लागायचा.

अशा संवादांसाठी अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांना पर्यायच नव्हता.

शेरोशायरी, उच्च अभिरूची असलेली भाषा आणि अमिताभ , शत्रू सारखीच संवादफेक पण काव्यात्म संवादफेक म्हणून जानी राजकुमारची लोकपियता सुद्धा बुलंदीला होती. राजकुमार कधीच क्रमांक एकला नव्हता किंवा कधीच पिछाडीलाही नव्हता. तो राजकुमारच होता. त्याच्या संवादफेकीसाठी सिनेमे गाजलेले आहेत.

"चिनाय सेठ जिनके अपने घर शीशे के होते है, वो दूसरों के घरों पर पत्थर फेका नही करते"
किंवा
अगदी हळुवार प्रेमिक बनून
" आपके पैर देखें , हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे"

संवादफेक ही कला आहे हे फिल्म इंडस्ट्रीला शिकवणारे आद्य संवादफेकर म्हणजे दिलीप कुमार.

"कौन कंबख्त बर्दाश्त करने के लिये पिता है "
https://www.youtube.com/watch?v=Lf2Gc14434U&t=408s

मराठी चित्रपटांमधे निळू फुले यांच्या संवादफेकीला तोड नाही.
त्यांचा लक्ष्मी या चित्रपटातला " मास्तर शाळा कुणाची ? पोरगं कुणाचं ? मंग पास का नापास ते कोण ठरवणार ?" हा संवाद एके काळी तुफान गाजला होता. हल्लीच्या पिढीला त्यांचा "बाई वाड्यावर या" एव्हढाच डायलॉग माहिती आहे. बेरकी नजर, ओठ घट्ट मिटून खालचे दोन्ही जबडे गोल फिरवत व्यक्त केलेला संताप आणि नंतर केलेली संवाद फेक हे अजब रसायन होतं. निळूभाऊंना तोड नाही.

सीन्स "

एरीअल व्ह्यू ने खाली गाव दिसतो. क्रेन खाली येते तसा गावातला बाजार , बाहेरून येणारा रस्ता हे टप्प्यात येतं. बाजाराच्या एका टोकाला कापूस पिंजारी कापूस पिंजत बसलाय. त्याचा वाद्यासारखा येणारा आवाज, कॅमेरा पुढे जातो तसा तो आवाज क्षीण होत घणाचा आवाज ऐकू येतो तसा लोहाराचा भाता दिसतो, मग विक्रेत्यांचा गोंगाट, एक जण दगडाला टाके मरत बसलाय... हळू हळू प्रत्येक जण काही न काही करत असलेला दिसतो... त्यांचे वेगवेगळे ऐकू येणारे आवाज आता एकत्र ऐकू येऊ लागतात. सुरूवातीला ते वेगवेगळे ऐकवलेले असल्याने आता गोंगाटातही त्यांचे अस्तित्व कानाला जाणवते. एक लहान मूल आईला सोडून रस्त्यावर धावतं...

आणि इतक्यात डाकू घोड्यांवरून गावात घुसतात..

हा सीन एव्हढा जबरदस्त आहे. तो क्रमाक्रमाने हायपॉईंटला नेला जातो. डाकूंच्या पुढे झुकलेले गावकरी. ठाकूरचं येणं...
त्याच्या असहाय्यते वर हसणारे डाकू आणि क्षणार्धात सीन पलटतो आणि वेग पकडतो. शोले चं हे वैशिष्ट्य या सीनमधे दिसतंच दिसतं. या सीननंतरचा गब्बरचा आयकॉनिक सीन. त्याची सर शाकाल ला सुद्धा नाही आली.

अशा डायलॉग डिलीव्हरीची आणि अशा आयकॉनिक सीन्सची टॉप टेन किंवा टॉप ट्वेन्टी किंवा कितीही अशी यादी बनवायची झाली तर तुम्ही कोणत्या संवादांना / सीन्सना प्राधान्य द्याल ?

( लिंक्स देण्याची आवश्यकता नाही. दिले तरी काहीच हरकत नाही. तितकीच मजा येईल ).

यात बहुधा अमिताभ . शत्रू, राजकुमार यांचीच वर्णी जास्त लागेल असा अंदाज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीले आहे! बारकावे पकडले आहेत बरोब्बर. भर घालेनच.

स्क्रीनप्ले, संवाद व अभिनय हे तिन्ही उच्च दर्जाचे असले व एकमेकांत चपखल बसले की सीन कायच्या काय उंचीवर जातो अशी सलीम जावेदची बरीच उदाहरणे आहेत. इतरांची तितकी नसतील पण काही आहेत - जशी रागोवच्या सुरूवातीच्या पिक्चर्स मधली किंवा विधू विनोद चोप्राची. त्याबदलही लिहायला हवे. पण सलीम-जावेद हा सध्याच्या भाषेत बोलायचे तर "विषयच वेगळा" होता. त्यांच्या पटकथेतील अमिताभ हा पूर्वी कोणी जवळपास येणार नाही आणि नंतरही नाही इतक्या उंचीवर आहे. इतर अभिनेते सोडाच खुद्द अमिताभही इतरांच्या पटकथेत त्या उंचीवर पोहोचत नाही. दिग्दर्शक यश चोप्रा असो, रमेश सिप्पी असो किंवा चंद्रा बारोट्/राज खोसला - त्या पिक्चर्स मधली अमिताभची बॉडी लँग्वेज व डॉयलॉग डिलीव्हरी हे दोघेजणच ठरवत असावेत असे वाटते - इतकी कन्सिस्टन्सी आहे त्यात.

यात बहुधा अमिताभ . शत्रू, राजकुमार यांचीच वर्णी जास्त लागेल असा अंदाज आहे. >> ऋम्या इथे लक्ष दे रे Wink

माझ्यापुरते तरी शोलेच्या कालिया सीन मधला 'जो डर गया समझो मर गया' टॉप १. त्या आधी बिल्ड अप होत जातो वगैरे आहेच. पण पहिले तीन शॉट्स नसल्यामूळे ते तिघे रिलॅक्स झाले आहेत, बाकीचे खदखदा हसताहेत पण गब्बर च्या कॅरॅक्टर ची आर्क बघता अजून काहि तरी होणार आहे ह्याची कल्पना आलेली आहे. अर्थात तो तिघांनाही मारतो ह्यात फारसे नवल नाही पण नंतरचा संवाद - विशेषतः "समझो' चा वापर 'गब्बर क्या चीज है' हे ठासवून देतो. संघर्षाची एक बाजू किती फॉर्मॅडीबल आहे हे इथे डोक्यात धाडकन बसवले जाते.

हेरा फेरी नि अंगूर चे संवाद पण इथे चपखल बसतील.

यात बहुधा अमिताभ . शत्रू, राजकुमार यांचीच वर्णी जास्त लागेल असा अंदाज आहे. >> ऋम्या इथे लक्ष दे रे Wink
>>>

शाहरूखच्या सीन चा स्वतंत्र धागा आहे मायबोलीवर..
अमिताभ शत्रू राजा कपूर कुमार खन्ना बच्चन आणि इतर खान मिळून सुद्धा बरोबरी करू शकणार नाहीत म्हणून बाकीचे एका धाग्यात आहेत Happy

तुमचे आवडते शाहरूख चे सीन
https://www.maayboli.com/node/74858

गुंडा चा तो
मेरा नाम है बुल्ला
रखता हू खुल्ला!
हा नेत्रदीपक डायलॉग आहे. त्याविषयी स्पष्टीकरण देताना ह्या दिव्य कलाकृतीचे दिग्गज दिग्दर्शक कांती शाह म्हणतात की त्यावेळेस भारतात खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहत होते ( नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांनी त्याची सुरवात करुन दिली होती) आणि ह्या चित्रपटातील अविस्मरणीय खलनायक बुल्ला ह्याच खुल्या अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करत होते!
धन्य आहेत ते द्रष्टे दिग्दर्शक!

"चलो डॉन, नीचे पुलिस तुम्हारा इंतजार कर रही है"
"करने दो, डॉन का इंताजार ग्यारा मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है"
"..."
"ये तुम जानती हो के यह रिवाल्वर खाली है, मैं जानता हूं कि यह रिवाल्वर खाली है लेकिन पुलिस नहीं जानती के यह रिवाल्वर खाली है"

हम अन्ग्रेजो के जमाने के जेलर है!

(ह्या वाक्यावरुन शोले नक्की कुठल्या काळात घडतो याचा अंदाज करायचा प्रयत्न केला होता!)

"अभी बोल, दूध का फटेला हिस्सा कौन है?"
"अरे मैं हूं रे"
"काजू का निचला हिस्सा कौन है?"
"ए मैं हूं रे"
"काला बैंगन कौन है?"
"ए मैं हूं रे"
"क्यूं, बैटरी निकल गई तो पेजर बंद पड़ गया?"
"..."
"चल हटा सावन की घटा खा खुजा बत्ती बुझाके सो जा निंटकले पिंटुकले मंटी पे खड़ेली आंटी बजा रही है बार बार घंटी कुल्ला घुमाके पश्चिमको पलटले भोत हो गया फुटले वटले शाणा बन चल मेरेको बाहर तक छोड़ के आ"
"बुन्नू बेटे, ये कहांसे सीखा?"
"पिक्चर में देखा था पा
और सुन बे, बुन्नू वो खंबा नहीं जिसे तुझ जैसा कुत्ता टांग उठाके गीला कर दे"

"ए तुम लोग घबरानेका नै क्या,पहली बार पप्पू पेजरको कोई भारी आदमी पड़ेला है, सोचना पड़ेगा"

टर्राटर्रा नि फर्राफर्रा. अक्षरश: सात-आठ वेळा रिवाइंड करून ऐकला होता. असा मोनोलॉग जगाच्या इतिहासात झाला नाही.

९० च्या दशकात संजय दत्तचा तेजा हा चित्रपट आला होता. त्यातील अमरीश पुरीच्या काही संवादाने जरा गंमत आणली होती. उदा. संजय दत्त मोठा होऊन काही स्वप्न बाळगतो तेव्हा त्याला टोमणा:
"बचपन मे हर छिपकली का बच्चा सोचता है, की बडा हो के वो मगरमछ बनेगा".

मस्त धागा र.आ.
हेराफेरी डायलॉग आम्ही खूप वापरायचो- एये राजू, शाम बोलताय नाम नहीं लेनेका,
मराठी मानूस जागा झाला Lol
अक्षय कु: कोई १ लव्ज भी नहीं बोलेगा. बाबूरावः कोउनसा लव्ज? Rofl

पाहुणा: धनंजय माने इथेच राहतात का?

अमिताभ शत्रू राजा कपूर कुमार खन्ना बच्चन आणि इतर खान मिळून सुद्धा बरोबरी करू शकणार नाहीत म्हणून बाकीचे एका धाग्यात आहेत>>> मुर्ख कॉमेंट

घातक :- ये मजदूर का हाथ है कातीया, आणि त्या प्रसंगातील सगळे संवाद
घातक:- घर मे घुस के मारुंगा , सातो के सात मारुंगा, एक साथ मारुंगा आणि त्या प्रसंगातील सगळे संवाद
सरकार:- क्लायमॅक्स मध्ये अभिषेक मेन villain ला म्हणतो
तुझे मारने के लिये मेरा यहा होना जरुरी नही था ,पर तुझे मरते हुए देखनें का मजा मै खोना नही चाहता था.

चित्रपटातील अजरामर संवाद !!
https://www.maayboli.com/node/51641
स्वतःच्या धाग्याची जाहिरात करायची सोडून रुनम्या दुसऱ्यांचे धागे सजेस्ट करतोय आश्चर्य आहे.

@ फारएण्ड ,
स्क्रीनप्ले, संवाद व अभिनय हे तिन्ही उच्च दर्जाचे असले व एकमेकांत चपखल बसले की सीन कायच्या काय उंचीवर जातो अशी सलीम जावेदची बरीच उदाहरणे आहेत. >> करेक्ट.

पण सलीम-जावेद हा सध्याच्या भाषेत बोलायचे तर "विषयच वेगळा" होता. त्यांच्या पटकथेतील अमिताभ हा पूर्वी कोणी जवळपास येणार नाही आणि नंतरही नाही इतक्या उंचीवर आहे. इतर अभिनेते सोडाच खुद्द अमिताभही इतरांच्या पटकथेत त्या उंचीवर पोहोचत नाही. दिग्दर्शक यश चोप्रा असो, रमेश सिप्पी असो किंवा चंद्रा बारोट्/राज खोसला - त्या पिक्चर्स मधली अमिताभची बॉडी लँग्वेज व डॉयलॉग डिलीव्हरी हे दोघेजणच ठरवत असावेत असे वाटते - इतकी कन्सिस्टन्सी आहे त्यात. >>> हे खूप भारी आहे.
सलीम जावेदवाला अमिताभ हाच न्हाव्याच्या दुकानात पोस्टरमधून बघत असायचा. त्याच्या त्या इमेजमुळे बच्चनचा पिक्चर हा इतरांपेक्षा वेगळा वाटायचा. अमर अकबर अँथनी मधे अमिताभच्या जागेवर दुसरा कुणी असता तरी तो चालला असताच, पण सिनेमा यादों कि बारात प्रमाणे विसरला गेला असता. अमर अकबर अँथनीतला आरशासमोरचा सीन किंवा विनोद खन्ना कडून झालेली धुलाई याची चौका चौकात चर्चा असायची आणि ती ही प्रत्येक रन ला...

अमिताभ सलीम जावेद च्या कचाट्यातून सुटला आणि तो सगळ्याच क्षेत्रात सुटला. कॉमेडी सहीत सब कुछ बच्चन !

विशेषतः "समझो' चा वापर 'गब्बर क्या चीज है' हे ठासवून देतो. संघर्षाची एक बाजू किती फॉर्मॅडीबल आहे हे इथे डोक्यात धाडकन बसवले जाते. >> मस्त , असामी.
शेंडे नक्षत्र >> गुंडा अजून पाहिलेला नाही Lol
अँकी >> डॉन मधले पण संवाद खूपच गाजलेले आहेत.

टर्राटर्रा आणि फर्राफर्रा >> सर्च देऊन पाहिला Lol
त्याच्यावर एक मजेशीर क्लिप आहे. पाहिली असेलच. नसेल पाहिली तर जरूर बघा.

मानव, आशु २९, साधा माणूस, वावे , रमड ...छान भर घालत आहात. घातक, घायल वरून आठवलं. एके काळी सनीचे सगळेच संवाद प्रचंड गाजलेत.

सर तर एकदम कलीयुगातले कपडे नेसून आले Lol
पाकिस्तान टीम हरल्यावर इंझमाम उल हक वेषांतर करूनही पकडला जायचा तो किस्सा आठवला. Lol

ओंकारा - सरत घोडों पे लगाते है कठोर, शेरों पे नही।
अजय देवगणची सिंपल डिलिव्हरी, पण त्या आधी आलेले सुखविंदरच्या आवाजातले धमधम धडम धडाईय्या रें ने वातावरण केले आहे. ओमी भैय्याचा करारी, क्रूर, मानी स्वभाव त्या सीनने प्रभावीपणे दाखवला आहे.
https://youtu.be/n596YcF8wfA?si=FTjt8t50576rILsJ
(पुढे सिनेमा सैफने खाल्ला असला तरी मला हा ओपनिंगचा सीनच पहिला आठवतो.)

सनीचे सगळेच संवाद प्रचंड गाजलेत. >>> अगदी अगदी. विशेषकरून -
" ये ढाई किलो का हात जब पडता है, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है "

Pages