वाळवी, वेड सिनेमे का उतरवले ? त्यांचे आर्थिक नुकसान कोण भरून देणार ?

Submitted by ढंपस टंपू on 1 February, 2023 - 05:33

मराठी भाषेतले चित्रपट का चालत नाहीत असे ओरडणारे चांगल्या चाललेल्या वेड आणि वाळवीचे शो पठाण साठी कमी केल्यावर काहीच का बोलत नाहीत ? आधीच हे चित्रपट कमी स्क्रीनवर रिलीज झाले. त्यात त्यांना प्राईम शो कमी मिळाले. पठाण मुळे त्यांचे शोज असून नसल्यासारखे आहेत. प्राईम टाईम मधे तर शोधूनही सापडत नाहीत.

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या गडद अंधार , बांबू, पिकोलो या चित्रपटांना मोठ्या मिश्किलीने थोड्याशा स्क्रीन मिळालेल्या आहेत. मराठी चित्रपट जगवायचे म्हणून जाणार्‍या सिनेप्रेमींनी त्यांना आश्रय दिला तरी इतक्या कमी स्क्रीनवर तग धरण्यापलिकडे काही होऊ शकत नाही. अक्षरशः २० ते ३० हजाराचे कलेक्शन होतेय एका शो चे. तेव्हढेच शोज आहेत. काही चित्रपटांना तर स्क्रीनच मिळत नाही. अनन्या सारखा चांगल्या विषयावरचा चित्रपट कमी शोज मुळे लगेचच ओटीटीवर आला. स्क्रीन्स न मिळाल्याने धंदा नाही. धंदा नसल्याने ओटीटी वाले पण जास्त पैसे देत नाहीत. निर्मितीचा खर्च सुद्धा वसूल होत नाही.

वेड, वाळवीला वाढती गर्दी पाहता काही ठिकाणी त्यांचे स्क्रीन्स वाढवणार होते. पण पठाणने सगळ्याच स्क्रीन्स बुक केल्याने आहेत ते सुद्धा कमी झाले.

आपण महाराष्ट्रात राहतो. नेहमीच हा प्रकार घडतो तरी आपण गप्प का ? मग मराठी चित्रपट चालत नाहीत म्हणून निर्लज्जपणे आरडाओरड करायचा आपल्याला हक्क आहे का ? याचा अर्थ मराठी चित्रपट बनवूच नयेत का ?

पठाण चालल्याने बॉलीवूडला फायदा होतो म्हणणार्‍यांना अक्कल आहे कि नाही ? इतर सर्व चित्रपटांचा धंदा बुडवून हे इतरांचा कसा काय फायदा करतात ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

, तुमच्या वरच्या प्रतिसादातली दोन वाक्ये >>> छिद्रान्वेषी या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी या पोस्टची मदत होईल.

अनु यांना काय म्हणायचे आहे हे कुणालाही समजेल. त्यांच्या पोस्टची सुरूवात अशी आहे.
सगळे मराठी पिक्चर मराठी ला सपोर्ट म्हणून पाहिलेच पाहिजे' असं वाटत नाही.पण जे मराठी चांगले वाटत आहेत

<मी शेवटचा पिक्चर एकपडदा थिएटरला पाहिला (नटरंग) त्या वेळी चाळीस रूपये तिकीट होते.>
म्हणजे त्यानंतर मराठी चित्रपट थेटरला जाऊन पाहिलाच नाही?
म्हणजे वरचे सगळे प्रतिसाद ही फुकटची तोंडाची वाफ दवडणे आहे तर? Lol >>>> किती बरळता? एक एक करून तुमचा प्रतिसाद बघू.

माझे वाक्य असे आहे.
शेवटचा पिक्चर एकपडदा थिएटरला पाहिला.
यावर तुमची मल्लिनाथी अशी आहे
म्हणजे त्यानंतर मराठी चित्रपट थेटरला जाऊन पाहिलाच नाही?

तुम्हाला मुद्दाम हलकटपणा करायचा आहे कि केमिकल लोचा आहे? समजले नाही तर सभ्यपणे विचारा कि.

शेवटचा पिक्चर एकपडदा थिएटरला पाहिला
याचा अर्थ थिएटर फक्त एकपडदाच आहेत हे तुमचे ज्ञान आहे का? आधी ते अपडेट करा. मग काय कुत्सित प्रतिसाद द्यायचे ते द्या.

प्रतिसादाच्या उरलेल्या भागाचे पोस्टमार्टेम करणे गरजेचे आहे का? कारण रामायण सांगून झाले आता रामाची सीता कोण विचारताय.
तुम्ही स्वतः कडेला पोहताय. तुम्हाला या प्रश्नाच काडीचाही इंटरेस्ट नाही. फक्त टोचा मारताय. पण ते करताना आकलन अचूक नको का?

मग ते वाक्य " शेवटचा एकपडदा थेटरला पाहिलेला चित्रपट ..."असं हवं.

स्वतः अचूक लिहावं. म्हणजे वाचणार्‍याला अचूक आकलन होईल. एवढे प्रतिसाद लिहिलेत पण वाळवी आणि वेड पाहिले की नाही ते कळलंच नाही.
दोन्ही पठाणच्या खूप आधी आले. दोन्ही चित्र पटांनी चांगला धंदा केलाय म्हणजे थेटरमध्ये या चित्रपटांचे शोज मिळालेच नाहीत त्यामुळे जबरदस्तीने पठाण पाहायला ला गला असं म्हणायचीही सोय नाही.

बरं शुक्रवारी गडद अंधार आणि सरला... हे दोन आले. त्यातला कोणता पाहिला? खरं तर दोन्ही पाहायला हवे होते. नाही का?

मी शेवटचा पिक्चर एकपडदा थिएटरला पाहिला (नटरंग) त्या वेळी चाळीस रूपये तिकीट होते. नीलायम सारख्या थेटरवावाल्यांनी प्रयत्न करून ८० रूपये करून घेतले होते. त्याच वेळी मल्टीप्लेक्सला सरासरी तिकीट ३०० रूपये असायचे. >>> आकलनात लोचा आहे म्हणावे तर गळलेले वाक्य स्पष्ट करणारे आहे. ते गाळून कोट केलंय.

मग ते वाक्य " शेवटचा एकपडदा थेटरला पाहिलेला चित्रपट ..."असं हवं.>>> नीयत काय आहे त्यावर आकलन ठरते.

समजा जरी तुमचं वाक्य बरोबर असेल तरीही मुद्दे कसे काय चुकीचे असतील? तुम्ही मराठी सोडा थेटरला जाऊन कोणता पिक्चर पाहिलाय?
हा मुद्दाच होऊ शकत नाही ना.

स्मायली टाकली म्हणजे तुम्हाला हसू आले आहे कि तुमचे हसे होतंय? अनावश्यक आहे स्मायली. तुम्हाला हलकटपणा करायचा होता तो इक्स्पोज झाला.

त्यालाच नुसती वाफ दवडणं म्हणतात. अर्थात हे मध्यमवर्गीय सुशिक्षित मराठी माणसाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मराठी शाळा बंद पडतात , मराठी पुस्तके खपत नाही, मराठी चित्रपट चालत नाहीत यावर नुसती चर्चा करायची. कृती त्या उलट.
आता मी थांबतो. मला कामं आहेत. याचा अर्थ इतर कोणाला मी रिकामटेकडा म्हटला असा काढणार्‍याचे डोके मी थांबवू शकत नाही.

टंपू यांना समर्थन. स्वतः तोंडची वाफ दवडून छिद्रान्वेषी वृत्तीने जिथे तिथे नाक खुपसणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका.
तुम्ही त्यांचे एक म्हणणे मान्य केले पण टोटॅलिटीत त्यांची चूक दाखवली म्हणून थयथयाट चालू आहे. दुर्लक्ष करा.

मध्यमवर्गीय सुशिक्षित मराठी माणसाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मराठी शाळा बंद पडतात , मराठी पुस्तके खपत नाही, मराठी चित्रपट चालत नाहीत यावर नुसती चर्चा करायची. कृती त्या उलट. >> बळंचच खुसपट काढण्याचा प्रकार आहे हा. तुमची कृती काय आहे स्वतःची? तुम्ही स्वतः काय करता हे न सांगता मुद्यावर बैलण्याऐवजी गुद्यावर आला आहात. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं का एकपडदा म्हणजेच थिएटर नाही. तुम्हाला हेकेखोर पद्धतीने मी कसा हे लिहायला नालायक आहे इतकंच सांगायचे आहे. हे सांगताना स्वतःची कृती पण नको का द्यायला?

ढंपू
तुमचा मूळ हेतू साध्य झाला आहे. मराठी चित्रपटांना पडदा हवा त्या वेळी मिळत नाही ही गोष्ट लक्षात आणून देण्यात यशस्वी झाला आहात.

तुंबाड बद्दल(त्या हिंदीत पण बरेच मराठी संदर्भ असल्याने) माझी आठवण गंडली हे मान्य करते.बाकी क्लेम खरे आहेत.
(तुंबाड मराठीत आणण्याबद्दल राही यांना विचारले होते कोणीतरी, तेव्हा मुद्दाम हिंदीत आणला, मराठीत आणून इतर भाषिक ऑडियन्स कमी होतो असं त्यांनी सांगितलं होतं.नंतर मराठी डब आला ओटीटी वर.)

मराठी सिनेमाचा ज्यांना पुळका आहे त्यांनी अमेय वाघ चा जग्गू आणि ज्युलिएट सिनेमा येतोय तो थेटरात जाऊन बघा आणि हिट करा... होऊन जाऊ दे वाफ कि वाफ आणि पाणी कि पाणी...

मराठी सिनेमाचा ज्यांना पुळका आहे त्यांनी अमेय वाघ चा जग्गू आणि ज्युलिएट सिनेमा येतोय तो थेटरात जाऊन बघा आणि हिट करा... होऊन जाऊ दे वाफ कि वाफ आणि पाणी कि पाणी...

>>> नक्किच

मराठी सिनेमाचा ज्यांना पुळका आहे त्यांनी अमेय वाघ चा जग्गू आणि ज्युलिएट सिनेमा येतोय तो थेटरात जाऊन बघा आणि हिट करा... होऊन जाऊ दे वाफ कि वाफ आणि पाणी कि पाणी... >>>> तुम्हाला हिंदीचा पुळका आलाय का ? मग शमशेरा, लालसिंग चढ्ढा, उंचाई का पडू दिले ? अजून वेळ गेलेली नाही. गांधी गोडसे हिट करून दाखवा.

मला हिंदीचा पुळका नाहीय... मराठीचा पुळका आहे म्हणून मी जग्गू आणि ज्युलिएट थेटर मध्ये बघणार आहे... सगळ्यांनी बघा.. मराठीतील कतरीना वैदेही परशुरामी आहे त्यात..

यांचं फिरून फिरून भोपळे चौकच चालू आहे. मराठी पिक्चर चांगला चालू असताना उतरवला याला पद्धतशीर फाटा मारतात हे. चांगला चालू आहे म्हणजे डिमांड आहे, धंदा आहे तर पैसे कमवून देत नाही का ? तुमचा आक्षेप काय आहे हे एकदा नक्की करा बुवा !>>>>>>> अहो भौ, आक्षेप काहीच नाही. पण पिकचर चांगला चालू होता हे तुम्हाला कळतय तर थेटरमालकालाही कळत असेलच ना? माझं म्हणणं इतकच आहे की मालकाला त्याच्या फायद्याची पडलेली असते आणि पठानला अर्थातच जास्त रिस्पॉन्स आणि तोही जास्त दिवस रिस्पॉन्स असणार, म्हणूनच तर त्यानी मराठी पिकचर काढून पठान लावला ना? आता त्यात आपण शंख करुन काय मिळणार असं म्हणत होतो. आपल्याला बघायचे असतील मराठी पिकचर तर जाऊ शकतो म्हणून लगेच बघून घ्यायचा.

आपल्याला बघायचे असतील मराठी पिकचर तर जाऊ शकतो म्हणून लगेच बघून घ्यायचा.
>>>

हो ना.. +786
वेळेत न बघणाऱ्यांमुळेच तर पिक्चरचा धंदा कमी होतो आणि पिक्चर थिएटरमधून ऊतरवला जातो.
वर उलट्या बोंबा बघणाऱ्यांनाच.. की तुम्ही पिक्चर बघून आलात पण थांबवता आला नाही. रिकामटेकड्यासारखे धागे काढत बसलात. हेच जर त्यावेळेत थिएटरसमोर निदर्शने केली असती तर पाचव्या आठवड्यात आम्हीही पाहिला असता.. धिस ईज टू मच Lol शाहरूखनंतर मला काही आवडत असेल तर ती मायबोली

बुवा कोणाला एक्सप्लेनेशन देताय- हे लोक चित्रपट बघायला जात नाहीत आणि चित्रपट उतरला कि म्हणतात आम्हाला बघायचा होता...
उतरवला नाही तर वाट बघतात कधी उतरतोय म्हणजे नंतर वाफ सोडायला तयार...

रिकामटेकड्यासारखे धागे काढत बसलात >>> हे चुकीचं आहे असं तुम्हाला म्हणायचे आहे का ऋन्मेष?
( बाई द बाबा, हिंदीत ऋ हे अक्षर नाही).

हेमंत सरांनी केलेल्या अभूतपूर्व धुलाईनंतर ढंपस टंपू यांनी अतिशय सुरेख, सुंदर. संयमित आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊन उताणे पाडल्याने आता होत असलेला थयथयाट प्रेक्षणीय आहे. सर्वांनी मनोरंनरूपी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये.

शाब्बास टंपू. आता फक्त हेमंतसरांवरच पैसे लावण्याची गरज नाही. अजून एक ताज्या दमाचा लॉबी रेसचा घोडा आला आहे. आता या थयथयाटाला उत्तर देऊन फसू नका.

हेमंत सरांनी केलेल्या अभूतपूर्व धुलाईनंतर ढंपस टंपू यांनी अतिशय सुरेख, सुंदर. संयमित आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊन उताणे पाडल्याने आता होत असलेला थयथयाट प्रेक्षणीय आहे. सर्वांनी मनोरंनरूपी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये.>>>>> मला हेमंत सर कुठेच दिसले नाहीत. Uhoh म्हणजे हेमंत या आय डी ने त्यांचा आय डी बदललाय काय ?

अहो मीच विचारतेय की हेमंत यांनी त्यांचा आय डी बदलला का? कारण वर कुठे हेमंत हे नाव दिसत नाहीये. Uhoh

Pages