मराठी भाषेतले चित्रपट का चालत नाहीत असे ओरडणारे चांगल्या चाललेल्या वेड आणि वाळवीचे शो पठाण साठी कमी केल्यावर काहीच का बोलत नाहीत ? आधीच हे चित्रपट कमी स्क्रीनवर रिलीज झाले. त्यात त्यांना प्राईम शो कमी मिळाले. पठाण मुळे त्यांचे शोज असून नसल्यासारखे आहेत. प्राईम टाईम मधे तर शोधूनही सापडत नाहीत.
गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या गडद अंधार , बांबू, पिकोलो या चित्रपटांना मोठ्या मिश्किलीने थोड्याशा स्क्रीन मिळालेल्या आहेत. मराठी चित्रपट जगवायचे म्हणून जाणार्या सिनेप्रेमींनी त्यांना आश्रय दिला तरी इतक्या कमी स्क्रीनवर तग धरण्यापलिकडे काही होऊ शकत नाही. अक्षरशः २० ते ३० हजाराचे कलेक्शन होतेय एका शो चे. तेव्हढेच शोज आहेत. काही चित्रपटांना तर स्क्रीनच मिळत नाही. अनन्या सारखा चांगल्या विषयावरचा चित्रपट कमी शोज मुळे लगेचच ओटीटीवर आला. स्क्रीन्स न मिळाल्याने धंदा नाही. धंदा नसल्याने ओटीटी वाले पण जास्त पैसे देत नाहीत. निर्मितीचा खर्च सुद्धा वसूल होत नाही.
वेड, वाळवीला वाढती गर्दी पाहता काही ठिकाणी त्यांचे स्क्रीन्स वाढवणार होते. पण पठाणने सगळ्याच स्क्रीन्स बुक केल्याने आहेत ते सुद्धा कमी झाले.
आपण महाराष्ट्रात राहतो. नेहमीच हा प्रकार घडतो तरी आपण गप्प का ? मग मराठी चित्रपट चालत नाहीत म्हणून निर्लज्जपणे आरडाओरड करायचा आपल्याला हक्क आहे का ? याचा अर्थ मराठी चित्रपट बनवूच नयेत का ?
पठाण चालल्याने बॉलीवूडला फायदा होतो म्हणणार्यांना अक्कल आहे कि नाही ? इतर सर्व चित्रपटांचा धंदा बुडवून हे इतरांचा कसा काय फायदा करतात ?
घ्या, म्हणजे चर्चा झाली नाही
घ्या, म्हणजे चर्चा झाली नाही ही चूक पण मराठी पिक्चरवाल्यांचीच का ?>> ओ टँम्पुजी, मग काय प्रेक्षकांनी बोंबलत फिरायचे का? पिक्चर तुम्ही काढला तर पब्लिसीटी तुम्हीच करणार ना? की असेल माझा हरी तर देईल ..
आम्ही फक्त पिक्चर काढणार. बघायला यायचे तर या. हा मराठी बाणा असेल तर कसे होईल?
पिक्चर तुम्ही काढला तर
पिक्चर तुम्ही काढला तर पब्लिसीटी तुम्हीच करणार ना? की असेल माझा हरी तर देईल .. >>> मी नाही काढला पिक्चर. तुम्हाला चर्चा झाली नाही म्हणायचे आहे कि पब्लिसिटी ? पिक्चरची पब्लिसिटी हा वेगळा विषय.
पिक्चर काढण्यावरून चर्चा होणे हा वेगळा. पिक्चर उतरवला हे सर्वांना माहिती आहे. तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ?
चितळेंच्या दुकानाबाहेर,
चितळेंच्या दुकानाबाहेर, बेडेकर मिसळीला तुम्ही रांगा लावून जाता ना ? कि ते तुमच्या घरी येतात सांगायला??
ज्या वेबसाईटचे नाव मायबोली
ज्या वेबसाईटचे नाव मायबोली आहे आणि जिथे मराठी भाषा दिवस साजरा करण्यासाठी स्वयंसेवक हवेत म्हणून विनंती केली जात आहे अशा ठिकाणी तुम्ही सांगताय मराठी पिक्चर बघू नका, मराठी भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा बोलणार्याला परभाषिक म्हणू नका, मराठी भाषा बोलल्याने इतर भाषेचा अपमान होतो. तर त्या मराठी दिवस साजरा करण्याला काय अर्थ आहे ? सरळ हिंदी दिवस, तेलगू दिवस, कन्नड दिवस करा साजरे. उद्या ही मागणी पण नक्कीच होईल.
मी नाही काढला पिक्चर. >>
मी नाही काढला पिक्चर. >> तुम्ही लवकरच पिक्चर काढा. तुम्हाला शुभेच्छा.
तुम्हाला चर्चा झाली नाही म्हणायचे आहे कि पब्लिसिटी ? पिक्चरची पब्लिसिटी हा वेगळा विषय>> सर मला पब्लीसिटीच म्हणायचे आहे. तुम्ही( आता हे जनरली म्हणत आहे. व्यक्तीशः तुम्ही नाही) एखादा पिक्चर काढला तर पब्लिसिटी कराल की नाही. मला तरी वाळवी नावाचा मराठी चित्रपट आहे हे माबो वर समजले. माझ्या सारखे असे कितीतरी मराठी जन असू शकतात त्यांच्या पर्यंत पिक्चर पोहोचलाच नसेल. म्हणून प्रसिध्दी महत्त्वाची आहे की नाही सांगा बरे तुम्ही. आपण सैराटचे उदाहरण घेतो, सैराटची प्रदर्शनापूर्वी प्रसिद्धी झाली होती की नाही? अर्थात कथानकात/ अभिनयात/ दिग्दर्शनात दम होता सिनेमा धोधो चालला.
चितळेंच्या दुकानाबाहेर, बेडेकर मिसळीला तुम्ही रांगा लावून जाता ना ? कि ते तुमच्या घरी येतात सांगायला??>> चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आपण रांग लावतो कारण आपल्याला त्यांची चव माहित आहे. किंवा कोणीतरी आपल्याला सांगितले आहे.
उद्या मी पोहे विकायला बसलो आणि माझे पोहे बेस्ट आहेत, लोकांना गरज असेल तर येतील खायला हा खाक्या ठेवला तर चालेल का? काही तरी पब्लीसिटी करावीच लागेल ना? नाहीतर संध्याकाळी मलाच पोहे खात बसावं लागेल. तसंच आहे पिक्चरच पण, लोकां पर्यंत किमान नाव तरी पोहचवा पिक्चरच. पिक्चर मजबूत असेल तर मराठीच काय इतर मंडळीही येतील बघायाला.
सर मला पब्लीसिटीच म्हणायचे
सर मला पब्लीसिटीच म्हणायचे आहे. >>> पब्लिसिटी करू नका असे मी म्हटलेय का ?
म्हणून प्रसिध्दी महत्त्वाची आहे की नाही सांगा बरे तुम्ही. आपण सैराटचे उदाहरण घेतो, सैराटची प्रदर्शनापूर्वी प्रसिद्धी झाली होती की नाही? >>> मास्तर , तुमचा प्रॉब्लेम काय आहे ? मी कुठल्याही प्रतिसादात पब्लिसिटी करणे गरजेचे नाही असे म्हटलेय का ? मग मी जे म्हटलेले नाही त्यावर तसे समजून वाद का घालताय ?
मी फक्त मराठी पिक्चर्सचे शोज उतरवले असे म्हटले होते. हे कितव्यांदा सांगायचे ? त्यावर धंदा आहे असा युक्तीवाद केला. मी चाललेले पिक्चर जे धंदा करत होते ते उतरवले असे सांगताना दुनियादारीचे पण उदाहरण दिले त्यावेळी तेव्हां चर्चा झाली होती आता का नाही असा मुळ प्रश्न तुम्ही विचारला होता. त्याचं ऊपांतर पब्लिसिटी करू नये मधे कसे काय झाले ? हे भारी आहे राव तुमचं. दाखवा बरं तशा अर्थाचं माझं वाक्यं.
कुणी पण नवीन खेळाडू येतो आणि लागू नसलेला मुद्दा घेऊन तावातावाने वा? तुम्हाला त्यावर चर्चा करायची असेल तर वेगळा धागा काढा. इथेच चालू असेल तर स्वतंत्र मुद्दा आहे असे म्हणा. मी तसे म्हटलो आहे असे भासवून माझ्यावर आळ का घेताय ?
आपण सैराटचे उदाहरण घेतो,
आपण सैराटचे उदाहरण घेतो, सैराटची प्रदर्शनापूर्वी प्रसिद्धी झाली होती की नाही? अर्थात कथानकात/ अभिनयात/ दिग्दर्शनात दम होता सिनेमा धोधो चालला. >>> सैराट रिलीज होण्याआधी सोमि वर सैराट आणि दक्षिणेकडच्या एका पिक्चरचे पोस्टर एकत्र टाकून हे लोक बघा कशी पब्लिसिटी करतात. आपला सैराट रिलीज व्हायची वेळ आली तरी हवा केली नाही अशा अर्थाच्या पोस्टवर तुफान चर्चा झाली होती. सैराट रिलीज होण्याच्या थोडे दिवस आधी गाणे आले. मग ट्रेलर आला. ट्रेलर आल्यावर झी स्टुडीओवाल्यांकडून सोमित काही लोकांना हाताशी धरून जातीय तेढ वाढवणार्या चर्चा सुरू झाल्या. मग टीव्ही मीडीयात अजय अतुल यांच्या मुलाखती आल्या आणि नागराजच्या मुलाखती शेवटी आल्या. या क्रमाने पब्लिसिटी झाली. त्या मागे झी स्टुडीओ असल्याने शेवटच्या टप्प्यात ती झाली. तरी पण ती साऊथ किंवा हिंदीच्या तुलनेत काहीच नाही. तरीही सैराटने काय रेकॉर्ड केलं हे तुम्हीच सांगितलं. आता यावर जास्त बोलण्याची आवश्यकता आहे का ?
बालगंधर्व, कट्यारची जाहीरात एव्हढीही नव्हती.
वेडची काय पब्लिसिटी केली ? खूप कमी होती.
वाळवीची तर अजिबातच नव्हती.
या पिक्चर्सला मिळणारे कमी शो हे त्याचे कारण आहे. माऊलीच्या वेळी दणक्यात पब्लिसिटी झालेली. पण पिक्चर उतरवला. कमी शोज मुळे कमी प्रेक्षक बघतात. मग माऊथ पब्लिसिटी सुरू होते. हळूहळू शोज वाढवावे लागतात. याला खूप काळ जावा लागतो. तितका काळ पिक्चरने तग धरला की तो चालायला लागतो. एखादा बडा पिक्चर ओसरला कि शोज मिळायला लागतात. इथे वेडच्या वेळी अवतार चालू होता. अवतार गेला की पठाण आला. त्यामुळं माऊथ पब्लिसिटीचा फायदा होऊन थेटर मिळून १०० कोटीत जायला अडथळा झाला. आता पठाण कमवून जाईल तेव्हां नव्या मराठी पिचरसाठी वेडला थेटर मिळणार नाही.
हा मुद्दा आहे साहेब माझा. तुम्ही कुठे नेऊन ठेवताय.
कपिल शर्मा शो मधे एका
कपिल शर्मा शो मधे एका निर्मात्याने पोस्ट प्रोडक्शन १५% बजेट हे पब्लिसिटीसाठी राखून ठेवावे लागते असे सांगितले होते. म्हणजे १०० कोटी बजेट असेल तर त्यातले १५ कोटी पब्लिसिटीचे असतात. वेडचं संपूर्ण बजेटच १८ कोटी आहे. त्याची व्याप्ती फक्त एका राज्यापुरती आहे. कशी काय तुलना करता येईल ? मराठी पिक्चरच्या पब्लिसिटीला मर्यादा आहे. आता हे समजूनच घ्यायचं नस्सेल, आपल्याच पिक्र्सना नुसतं झोड झोड झोडायचं असेल तर तुमचा प्रॉब्लेम आहे तो. मराठी प्रेक्षक म्हणून कुणीतरी आपल्या भाषेत मेहनत घेतंय याचा कळवळा नसेल तर काय करू शकतो ?
हल्लीच्या जमान्यात पब्लिसिटी म्हणजे आणखी काय करतात ? मल्टीप्लेक्सला गेलं तरी कोणकोणते पिक्चर चालू आहेत हे कळतं. सोमिवर ट्रेलर आलेले असतात. आपल्यापर्यंत पोह्चेल एव्हढी काळजी घेतलेलीच असते. बुक माय शो वर जरी गेलं तरी कोनकोणते पिक्चर चालू आहेत हे समजतं. क्लिक केलं की पिक्चर बद्दल जुजबी माहिती मिळते. त्यावरून ठरवता येतंच की.
पठाण काय आख्खा दाखवला होता का तिकीटं काढण्याआधी ? कि शमशेरा, ब्रह्मास्त्र बघून हा पिक्चर बघायचा निर्णय घेतला ? कि झिरो, फॅन पाहून निर्णय घेतला ?
वेडची जोडी अनेक मराठी रि
वेडची जोडी अनेक मराठी रि अलिटी शोजमध्ये आली होती. मराठी / हिंदी बिग बॉस, आता होऊ दे धिंगाणा, चला हवा येऊ द्या. , कपिल शर्मा इ.
याउलट पठाण साठी यु ट्यूबर गाणं आणि टीझर रिलीज करण्यापुढे काही केलं नाही.
सैराट पब्लिसिटीच्या वेळची
सैराट पब्लिसिटीच्या वेळची नागराज मंजुळेची पोस्ट.
https://www.facebook.com/photo/?fbid=10201727225578111&set=a.1182367735078
वाळवी मलाही इथे ऋन्मेष च्या
वाळवी मलाही इथे ऋन्मेष च्या धाग्यामुळे समजला...
आणि पठाण मला बॉयकॉट गॅंग ने
आणि पठाण मला बॉयकॉट गॅंग ने फडफड केली त्यामुळे समजला कि असा एक चित्रपट पण येतोय... पठाण ची काहीही पब्लिसिटी नव्हती...
Pathaan saves Rs 15-20 crore
Pathaan saves Rs 15-20 crore with no publicity before release, is this the new way forward for films?
https://www.indiatoday.in/amp/movies/bollywood/story/pathaan-saves-rs-15...
वाळवी मलाही इथे ऋन्मेष च्या
वाळवी मलाही इथे ऋन्मेष च्या धाग्यामुळे समजला...
नवीन Submitted by च्रप्स on 6 February, 2023 - 00:23
>>>>
मी बघायच्या आधी वा माझ्या धाग्याआधी चिकवावर देखील वाळवीची एकही पोस्ट नव्हती. हा दोष मायबोलीकरांना नाही, गैरसमज नसावा. तर चित्रपटाचे पुरेसे प्रमोशन झाले नसावे. काँट्रोवर्सी करून का होईना ते व्हायला हवे.
पठाणची तर गोष्टच वेगळी आहे. शाहरूख याबाबतीत पक्का मुरलेला आहे. त्याने बॉयकॉट गॅंगचाच सुरेख वापर केला.
मला नाही वाटत त्यात शाहरुख चे
मला नाही वाटत त्यात शाहरुख चे क्रेडिट आहे.. त्याने मुद्दाम बॉयकॉट करावा म्हणून अशी बिकिनी ठेवली वगैरे.. ते कोणाच्या डोक्यातही नसेल...
बिकिनी नसली असती तर आणखी
बिकिनी नसली असती तर आणखी दुसरे कारण काढले असते. पठाण ट्रेलर आणि गाणे येण्याच्या खूप आधीपासून बॉयकॉट म्हणून केकाटणे चालू होते.
वेडच्या वेळी रीतेश, जेनेलिया
वेडच्या वेळी रीतेश, जेनेलिया हे इंडीयन आयडॉल, कपिल शर्मा शो मधे गेले होते हे बरोबर आहे. पण जे जात नाहीत त्यामुळे त्यांचे पिक्चर्स पडतात हे म्हणणे बरोबर नाही. या शोज मधे जाऊन पण बहुतेक पिक्चर्स आपटतात. अक्षयकुमारचे ओळीने चार पिक्चर आपटलेत.
मराठी पिक्चरवाले चल हवा येऊ द्या मधे जातात. तो शो महाराष्ट्रात बघितला जातो. तितके प्रमोशन पुरेसे असते.
पण या शो मधे गेलेले सुद्धा सगळेच पिक्चर हिट होतात असेही नाही.
याउलट या शोज मधे न जाता सुद्धा पठाण हिट झाला.
पठाण हिट झाला कारण वादग्रस्त वक्तव्ये, धमक्या यामुळे न्यूजपेपर पासून ते न्यूज चॅनेल्स मधे त्याचे जे प्रमोशन झाले त्याला तोडच नाही. या प्रमोशनला सपोर्टिंग जास्तीत जास्त खेळ बुक झाल्यामुळे पठाण हिट झाला. तुम्ही थिएटरला जाता आणि तुम्हाला हवा तो पिक्चर उपलब्ध नसेल तर तुम्ही पठाणच्या तिकिटा काढता हे नेहमी घडते. थेटरमधून परत येऊन अडचणीच्या वेळेचा आपला पिक्चर बघायला मुद्दाम कुणीच जाणार नाही. हा मुद्दा आहे.
पूर्वी मराठी पिक्चर्सला डेडीकेटेड अशी थिएटर्स मुंबई पुण्यात असायची. इतर शहरात तर मराठी पिक्चर रिलीज व्हायला अडचण नसायची. ही एकपडदा थिएटर्स आर्थिक तंगी मुळे बंद आहेत. याउलट मल्टीप्लेक्सला पहिली पाच वर्षे करमाफी, ती नंतर वाढवून दिली. या थिएटर्सनी करमाफी असताना मनोरंजन टॅक्स गोळा करून फायदा कमावला. एकपडदा थिएटर्सवाल्यांना भाडे घेता येत होतं. मल्टीप्लेक्स वाले चेनने चालवतात आणि त्यांची असोसिएशन असल्याने ते स्वतःच प्रॉडक्शन हाऊसला अटी घालतात.
त्यांना पिक्चरचा धंदा झाला तर शेअर हवा असतो. हा शेअर द्यायचा तर तिकीटाचे दर वाढवावे लागतात. ते हिंदीतले काही प्रॉडक्शनवाले वाढवून द्यायला तयार असतात. एव्हढी महाग तिकीटे खरेदी करण्यासाठी काहीतरी कॉन्ट्र्व्हर्सी घडवून आणावी लागते. ब्रह्मास्त्रच्या वेळीही आलिया भट्टवरून बॉयकॉट ग्यांगने वक्तव्ये केली. नंतर ते थंड झाले. हा सुद्धा चोप्रांचा पिक्चर होता. त्याच्या आधी रणवीरा भरपूर प्रमोशन करून सुद्धा आपटला.
मराठी पिक्चरवाल्यांना जास्त तिकीट ठेवून चालत नाही. कारण आपली महाग तिकीटे कोण घेणार ही भीती मराठी इंडस्ट्रीत असते. पिक्चर चालला तरी तो उतरवला गेला तर चाळीस ते पंचेचाळीस कोटीपर्यंतच धंदा होतो. मग आपोआपच प्रॉडक्शन कॉस्ट २० कोटीच्या आत ठेवून पिक्चर बनवावा लागतो. इतक्या कमी बजेट मधे पिक्चर बनवला तर त्याची तिकीटे महागड्या दराने कशी विकणार ? त्यामुळे मल्टीप्लेक्स वाल्यांना हिस्सा देणे अवघड असते.
त्यामुळे मल्टीप्लेक्स वाले मराठी पिक्चर्सना चालत असले तरी थिएटर द्यायला टाळाटाळ करतात. उगीच मनसे वाल्यांनी खळ्ळं खट्याक करायला नको म्हणून आणि सरकारने डंडा उगारू नये म्हणून अडचणीचे शोज देतात.
माझा हा मुद्दा आहे. प्रमोशन करत नाहीत म्हणून मराठी पिक्चर आम्ही बघत नाही या म्हणण्यात दम नाही.
महाराष्ट्राची लोकसंख्या १२
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. यातल्या एक कोटी लोकसंख्येने दरवर्षी दोन मराठी सिनेमे पहायचे ठरवले तरी मराठी चित्रपटसृष्टीचे आर्थिक गणित बदलून जाईल. जर पैसा मिळू लागला तर मराठी पिक्चर्स पण मल्टीप्लेक्स वाल्यांना हिस्सा देऊ शकतात. लोकाश्रय मिळाला नाही तर कुठलीच इंडस्ट्री तग धरणार नाही.
साऊथ मधे, पश्चिम बंगाल मधे हिंदी लोकांना समजत नाही. बहुतेकांना बोलताही येत नाही. त्यामुळे तिथे प्रादेशिक पिक्चर्स चालतात. साऊथ मधे चार भाषेच्या इंडस्ट्रीने आपसात चांगले सामंजस्य ठेवून एका राज्यातले पिक्चर दुसर्या राज्यात ड्ब करून रिलीज करण्याची पद्धत आणली. त्यांचे आपसात रीमेक सुद्धा होतात. हिंदीतले डब हा अलिकडचा अॅडेड बिझिनेस आहे. त्या आधीच चार राज्यांच्या आपसातल्या व्यवहारामुळे त्यांना मोठी बाजारपेठ मिळाली. त्यामुळे तिथे पहिल्या आठवड्यात हजार हजार रूपयांना सुद्धा तिकीटं खपतात. त्या मानाने बंगाली इंडस्ट्री एकाच राज्यावर अवलंबून आहे. पण हिंदी मोठ्या संख्येने न समजणारे असल्याने बंगाली इंडस्ट्री पण टिकून आहे आणि बंगाल्यांचे बॉलीवूड मधे वर्चस्व सुद्धा आहे.
मराठीची बाजारपेठ हिंदी, इंग्रजी मधे विभागली गेली आहे. उरले तर मराठी असा क्रम आहे. मराठी पब्लिक उदासीन आहे. आणि मराठीत पिक्चर न बघण्याचे कारण देते.
मराठी लोक स्वतःहून हिंदी बोलतात, शिकतात. यामुळे फक्त मराठी पिक्चरच नाही तर हॉटेल व्यवसाय. टायर पंक्चरचा व्यवसाय हे सुद्धा इतर भाषिइक सहज करतात. भाषेची अडचण येत नसल्याने त्यांना इथे धंदा करणे सुलभ जाते. दक्षिणी मनुष्य इतर राज्यात गेल्यावरच हिंदी शिकतो. तो ही महाराष्ट्रात येऊन मराठीत न बोलता हिंदी शिकतो किंवा तोडके मोडके इंग्रजी बोलतो.
आपल्या भाषेला प्राधान्य देणे हा दुसर्या भाषेवर अन्याय आहे असे समजणे हा खुळचटपणा आहे. त्यामागे अर्थकारण आहे.
मल्टीप्लेक्सला रिलीज करणे
मल्टीप्लेक्सला रिलीज करणे म्हणजे सरकारी आहे असे मराठी वाले समजतात असे कोण तरी बोललंय >>> मल्टीप्लेक्स वाले सगळे अमराठी आहेत. सिटी प्राईड वाले सोडले तर. त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून करसवलती उपटल्या आहेत. त्या बदल्यात मराठी पिक्चरला शो द्यायचे कबूल केलेले आहे. दुसर्या राज्यातून इथे येऊन धंदा करताना इथल्या राज्य सरकारकडून सवलतींची अपेक्षा ठेवणे हे चालते का ?
त्या बदल्यात इथल्या सरकारने घालून दिलेल्या अटींचे पालन नको का करायला ?
आधी माहिती करून घ्या हो मग बोला की. मराठी पिक्चर काढणारे बावळट आहेत म्हणून शोज मागतात का ? त्या पेक्षा एक पडदा वाले बरे होते. त्यांना या सवलती मिळत नाहीत त्यामुळे ते बंद पडले आहेत. मी शेवटचा पिक्चर एकपडदा थिएटरला पाहिला (नटरंग) त्या वेळी चाळीस रूपये तिकीट होते. नीलायम सारख्या थेटरवावाल्यांनी प्रयत्न करून ८० रूपये करून घेतले होते. त्याच वेळी मल्टीप्लेक्सला सरासरी तिकीट ३०० रूपये असायचे. त्यातला काही हिस्सा त्यांनाच मिळतो. मनोरंजन कर सुद्धा ते जमा करत नाहीत. सरकारने पहिल्या पाच वर्षासाठी दिलेल्या सुविधा नंतर पण वाढवल्या होत्या. असा असमान कारभार असल्यावर एकपडदा कसे टिकतील स्पर्धेत ?
मी बघायच्या आधी वा माझ्या
मी बघायच्या आधी वा माझ्या धाग्याआधी चिकवावर देखील वाळवीची एकही पोस्ट नव्हती. >> हे साहेब अशी विधाने करत आहेत म्हणून मी फक्त सांगतोय कि ज्या पिक्चरचे धागे या साहेबांनी काढलेले नाहीत ते पण चालले होते. त्यामुळं मायबोलीवर धागे काढल्याने पिक्च्र चालले हे जादा आहे. मी तसे स्टेटमेण्ट केले की इतर कुणीतरी येऊन त्यावर भलतेच अर्थ काढून दोषारोप करत सुटतात. कमाल आहे मायबोलीकरांची. कुणाला उत्तर दिलेय, कॉन्टेस्ट काय हे न बघताच नुसते हुं !
माफ करा न राहवून या धाग्यावर
माफ करा न राहवून या धाग्यावर पुन्हा येतोय.
भाषिक अर्थकारण या टंपूजींच्या म्हणण्याशी सहमत आहे. इतर भाषिक त्यांच्या राज्यात भाषिक आडमुठेपणा करतात पण महाराष्ट्रात सर्वांना उदारमतवाद हवा असतो हे पण मान्य आहे. मराठी सिनेमाने कात टाकावी याच्याशी कोण असहमत असेल ?
पण मराठी चित्रपटसृष्टी एकसंध नाही यावर भाष्य नाही केले. विशिष्ट कंपू आहे जे मालिकेत पण असतात, जाहीरात उद्योगात पण असतात आणि चित्रपट उद्योगात पण आहेत. मालिकात मिळणारे उत्पन्न चित्रपटात लावायचे आणि भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट संघाच्या जोरावर थिएटर मालकांना रिलीज करायला लावायचे. फक्त आपल्याच कंपूच्या चित्रपटांचे प्रमोशन केले जाते. इतर दर्जेदार, सकस, प्रयोगशील मराठी सिनेमाचे प्रमोशन ही मंडळी करत नाहीत. सोशल मीडीयात कुणी त्यांना डिवचले की मग जिवावर आल्याप्रमाणे थोडेफार प्रमोशन करतात.
हिंदी सिनेमा हा जसा मूठभरांचा वरचष्मा असलेला उद्योग आहे तोच प्रकार मराठीत पण आहे. त्यामुळे कदाचित प्रेक्षक उदासीन असतील / असावेत.
त्यामुळं मायबोलीवर धागे
त्यामुळं मायबोलीवर धागे काढल्याने पिक्च्र चालले हे जादा आहे.
>>>
माझ्यामुळेच असे कुठे म्हटलेय.
अश्या गोष्टी हातभार लावतात असे म्हटले आहे. मी माझा वाटा उचलला असे म्हटले आहे. हे चूक की बरोबर ते सांगा.
मुद्दाम बॉयकॉट करावा म्हणून
मुद्दाम बॉयकॉट करावा म्हणून अशी बिकिनी ठेवली वगैरे.. ते कोणाच्या डोक्यातही नसेल.
>>>>
तुम्ही बिकीनीचे बोलत आहात.
चित्रपटाचे नाव पठाण ठेवणे हाच मास्टरस्ट्रोक आहे.
आजही भोळ्याभाबड्या लोकांना अमेरीकेतल्या एअरपोर्टवर शाहरूखचे कपडे ऊतरवले वगैरे खरे वाटते
अर्रे डोळा लाल झाला होता ना?
अर्रे डोळा लाल झाला होता ना? इतका वेळ कसा मिळतो कायम इकडे हुंदडायला?
जिकडे बघावे तिकडे पिचकार्या!
ऐयरपोर्ट जवळ कोणते हॉटेल..ह्या गंध नसलेल्या टॉपिक वर ही पिचकारी टाकायलाच हवी का?
हे खरंच सीक आहे.
जरा ऑफिस काम आणि फॅमिली कडे लक्ष दे (हो, लोकांनी ४ आठवडे वेड लागलेला असून ही त्यांच्या प्रायोरिटीज असल्याने तो पाहिला नसेल तर त्यांचा तो अक्षम्य गुन्हा आहे असे लॉजिक असलेल्या ला असे अधिकार वाणीने बोलू शकते ना )
आशू माझ्यावर चर्चा करायला
आशू माझ्यावर चर्चा करायला वेगळा धागा आहे
आता एक मिटींग आहे
नंतर लिंक देतो त्या धाग्याची
ढंम्पस यांची मराठी थिएटर
ढंम्पस यांची मराठी थिएटर बद्दलची पोस्ट पटली.
'सगळे मराठी पिक्चर मराठी ला सपोर्ट म्हणून पाहिलेच पाहिजे' असं वाटत नाही.पण जे मराठी चांगले वाटत आहेत ट्रेलर, रिव्ह्यू वरून ते नक्की थिएटरमध्ये पहा.ओटीटी वर किंवा युट्युब वर पायरेटेड कॉपी येईपर्यंत वाट पाहू नका.इतकं केलं तरी पुरेसं असावं.
नटरंग,वाळवी, सविता दामोदर परांजपे,गुलाबजाम,तुंबाड थिएटरमध्ये पाहिले.आवडले. एकदा काय झालं,तो सविताभाभी वाला पिक्चर हे अतिशय बोअर झाले.अर्थात ट्रेलर वरून बोअर होतील असं माहीती झालं नाही त्यामुळे पाहिले गेले.नो रिग्रेटस.
सरला एक कोटी या शनिवार पर्यंत राहिला तर नक्की बघायचाय.
रिकामा न्हावी मोदीला तुंबड्या
रिकामा न्हावी मोरीला तुंबड्या लावी
सस्मितजी, हे ऋन्मेष सरांचे
रिकामा न्हावी मोदीला तुंबड्या लावी
नवीन Submitted by सस्मित on 6 February, 2023 - 10:31 >>> सस्मितजी, हे ऋन्मेष सरांचे बुलींग नाही का? ( तुम्ही म्हणाल ते मान्य आहे).
अनु, तुमच्या वरच्या
अनु, तुमच्या वरच्या प्रतिसादातली दोन वाक्ये
१ पण जे मराठी चांगले वाटत आहेत ट्रेलर, रिव्ह्यू वरून ते नक्की थिएटरमध्ये पहा.ओटीटी वर किंवा युट्युब वर पायरेटेड कॉपी येईपर्यंत वाट पाहू नका
२सरला एक कोटी या शनिवार पर्यंत राहिला तर नक्की बघायचाय.
<मी शेवटचा पिक्चर एकपडदा
<मी शेवटचा पिक्चर एकपडदा थिएटरला पाहिला (नटरंग) त्या वेळी चाळीस रूपये तिकीट होते.>
म्हणजे त्यानंतर मराठी चित्रपट थेटरला जाऊन पाहिलाच नाही?
म्हणजे वरचे सगळे प्रतिसाद ही फुकटची तोंडाची वाफ दवडणे आहे तर?
पठाण फक्त कन्ट्रोव्हर्सीमुळे आणि लोकांना जबरदस्तीने पाहायला लावल्यामुळे चालतोय हे लॉजिक महान आहे.
आधीच्या प्रतिसादांत स्वतःच मांडलेल्या मुद्द्यांच्या बरोबर उलट पुढच्या प्रतिसादांत लिहि ल्यासारखं वाटतंय. एवढे लांबलचक तडफडयुक्त प्रतिसाद वाचवत नाहीत. नुस ती नजर टाकली. त्यात पुन्हा मागे जाऊन शोधणंं कोण करेल?
Pages