वाळवी, वेड सिनेमे का उतरवले ? त्यांचे आर्थिक नुकसान कोण भरून देणार ?

Submitted by ढंपस टंपू on 1 February, 2023 - 05:33

मराठी भाषेतले चित्रपट का चालत नाहीत असे ओरडणारे चांगल्या चाललेल्या वेड आणि वाळवीचे शो पठाण साठी कमी केल्यावर काहीच का बोलत नाहीत ? आधीच हे चित्रपट कमी स्क्रीनवर रिलीज झाले. त्यात त्यांना प्राईम शो कमी मिळाले. पठाण मुळे त्यांचे शोज असून नसल्यासारखे आहेत. प्राईम टाईम मधे तर शोधूनही सापडत नाहीत.

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या गडद अंधार , बांबू, पिकोलो या चित्रपटांना मोठ्या मिश्किलीने थोड्याशा स्क्रीन मिळालेल्या आहेत. मराठी चित्रपट जगवायचे म्हणून जाणार्‍या सिनेप्रेमींनी त्यांना आश्रय दिला तरी इतक्या कमी स्क्रीनवर तग धरण्यापलिकडे काही होऊ शकत नाही. अक्षरशः २० ते ३० हजाराचे कलेक्शन होतेय एका शो चे. तेव्हढेच शोज आहेत. काही चित्रपटांना तर स्क्रीनच मिळत नाही. अनन्या सारखा चांगल्या विषयावरचा चित्रपट कमी शोज मुळे लगेचच ओटीटीवर आला. स्क्रीन्स न मिळाल्याने धंदा नाही. धंदा नसल्याने ओटीटी वाले पण जास्त पैसे देत नाहीत. निर्मितीचा खर्च सुद्धा वसूल होत नाही.

वेड, वाळवीला वाढती गर्दी पाहता काही ठिकाणी त्यांचे स्क्रीन्स वाढवणार होते. पण पठाणने सगळ्याच स्क्रीन्स बुक केल्याने आहेत ते सुद्धा कमी झाले.

आपण महाराष्ट्रात राहतो. नेहमीच हा प्रकार घडतो तरी आपण गप्प का ? मग मराठी चित्रपट चालत नाहीत म्हणून निर्लज्जपणे आरडाओरड करायचा आपल्याला हक्क आहे का ? याचा अर्थ मराठी चित्रपट बनवूच नयेत का ?

पठाण चालल्याने बॉलीवूडला फायदा होतो म्हणणार्‍यांना अक्कल आहे कि नाही ? इतर सर्व चित्रपटांचा धंदा बुडवून हे इतरांचा कसा काय फायदा करतात ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कामात बिझी आहे त्यामुळे आत्ता उत्तर देऊ शकत नाही. फ्री झालो कि सर्वांना सेपरेट उत्तर मिळतील. कृपया, मी निरूत्तर झालो असा सोयीस्कर समज करून घेऊन ये.

वैयक्तिक पातळीवर केलेल्या आरोपांना उत्तर मिळणार नाही.
(मी ऋन्मेषजी नाही. ऋन्मेषजी तुम्ही गप्प बसून गैरसमज का वाढवत आहात? माझी किती बदनामी होतेय तुमच्या गप्प बसण्याने! प्लीज इथे येऊन माझ्यावर आलेले बालंट दूर करा)

पठाण आणि वाळवी मायबोलीवर वाचून किती लोकांनी पाहिला याचा सर्व्हे घ्या. ज्या पिक्चरची मायबोलीवर चर्चा नसताना ते हिट झाले ते कसे काय झाले ?
>>>>>

एक मराठी माणूस एकटा जाऊन चित्रपट बघून येतो आणि त्यावर चार ठिकाणी लेख लिहून त्याची जास्तीत जास्त माऊथ पब्लिसिटी होईल हे बघतो. आपला खारीचा वाटा ऊचलतो. त्यावर त्यालाच तुम्ही चारचौघात उलटा जाब विचारा. की तू काय मोठा तीर मारलास..
मराठी चित्रपटांबद्दल ज्याला खरेच प्रेम आणि कळवळा आहे तो असे बिलकुल करणार नाही. जर खरेच हितचिंतक असाल तर असे करू नका. अन्यथा अश्या दहशतीने उद्या कोणी आपल्याला आवडलेल्या मराठी चित्रपटाबद्दल पुढे येऊन सांगणर नाही..

मी ऋन्मेषजी नाही. ऋन्मेषजी तुम्ही गप्प बसून गैरसमज का वाढवत आहात?
>>>>

ईथे कोणी तसे बोलत नाहीये.
सस्मित यांच्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता. लोड घेऊ नका. त्यापेल्षा वाळवी आणि पठाण दोन्ही बघा.

ऋन्मेषजी तुम्ही गप्प बसून गैरसमज का वाढवत आहात? माझी किती बदनामी होतेय >>> Rofl
अरे आपण काय लिहितोय याचा अर्थ तरी कळतोय का?

मूळ मुद्दा हा आहे की हॉटेल ला फक्त एकाच डिश चा ऑप्शन सकाळ संध्याकाळ ठेवून नंतर 'लोकांना बघा हीच डिश (म्हणजे त्यातला पदार्थ) कसा आवडला, किती आवडीने खातायत, लोक हॉटेलमध्ये जमलेत बघा' म्हणून खुश होणं खरं यश नाही.
मराठी चित्रपट निर्मात्यांनी वेळोवेळी याबद्दल आवाज उठवला आहे.पण परिणाम होत नाही.अगदी कधीकधी झी सारखं मोठं बॅनर असेल प्रायोजक तर त्या पुण्याईने नेहमीपेक्षा किंचित जास्त शो मिळतात.बाकी अनेक मराठी पिक्चर 'आले..आले..वीकेंड ला बघू..अरे दुपारी 2 चा एकच शो आहे.सगळे बिझी आहेत.उद्या बघू..अरे सामान आणायचंय.. पुढच्या वीकेंड ला बघू...अरे हे काय गेला पण, आता जाऊदे ओटीटी वरच बघू' असं माझं तरी होतं.
त्यातल्या त्यात कंतारा आणि वाळवी पटकन बघून घेतले.

अभिरुची सिटीप्राईड ला वेड चा शो दिसत होता. पण तिकीट काढायला गेल्यावर कॅन्सल झाला कारण पठाण. पब्लिकने पठाणचे पोस्टर्स फाडले आणि शो कॅन्सल करायला लावले.

हॉटेल ला फक्त एकाच डिश चा ऑप्शन सकाळ संध्याकाळ ठेवून नंतर 'लोकांना बघा हीच डिश (म्हणजे त्यातला पदार्थ) कसा आवडला, किती आवडीने खातायत, लोक हॉटेलमध्ये जमलेत बघा' म्हणून खुश होणं खरं यश नाही.
>>>

जर ती डिश खास नसेल तर लोकं का जातील ती खायला? ते देखील बक्कळ पैसे खर्च करून? प्रत्येक विकेंडला कुठला तरी पिक्चर बघायलाच हवा हे ॲडीक्शन आहे का लोकांना? मी स्वत: शाहरूखचे गेले चार चित्रपट पाहिले नाहीत. पठाणबद्दल जेव्हा ईथेच कौतुक वाचले तेव्हाच गेलो. मला वाटते कोणाला एवढे पडले नसावे की पठाण कसाही असला तरी जायलाच हवे. आणि हे असे असते तर शाहरूखचे आधीचे चित्रपट अपयशी ठरलेच नसते. कितीही मोठे बॅनर का असेना फालतू पिक्चरना पब्लिक ईथे थारा देत नाही. उगाच का गेले वर्षभर बॉयकॉट ट्रेंडने बॉलीवूड हादरली आहे. कारण ते मुळातच लोकांना आवडेल ते देण्यात अपयशी ठरत होते. पण पठाण लोकांना आवडत आहे म्हणून आता विकेंडनंतरही जोर ओसरला नाहीये.

मी टाईम प्लीज घेतली आहे. पण आता माझं काम किती वाढलं आहे? एकटा कुणाला पुरा पडणार? थोडं काम हलकं करून जातो.
३० डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ एक वर्ष होत नाही. २ दिवसात ते संपलं.
वेड च्या पुढे अवतार २.० होता. रितेश देशमुख हिंदीत असून कमी शोज होते. पण फुल्ल चालल्याने अवतारचे सकाळचे शोज कमी करून वेडचे वाढवले. तरी प्राईम टाईम नव्हता.
प्राईम टाईम साठी प्रयत्नांना यश येतंय असं वाटत असतानाच वेडचे शोज पठाण ला दिले.
माऊलीच्या वेळी सुद्धा ४५ कोटींचा धंदा झाला आणि सलमान खान चा कुठला तरी रिलीज झाला होता. माऊली मधे सलमानने गेस्ट अपिअरन्स दिल्याने रीतेश ला काही बोलता आले नाही.
पठाण मधे पण सलमान खान आहे. वेड मधे पुन्हा गेस्ट आहे. परत तेच झाले. आता प्राईम शोज मिळाले तरी हवा राहिली नाही. आता त्या जोशात धंदा होणार नाही. आता लोक ओटीटी वर कधी येतो हे बघतील.
पठाणचे सकाळचे शोज रिकामेच होते. ते वाळवीला दिल्याने काय फायदा होणार?
सकाळी सकाळी office goers, विद्यार्थी, गृहिणी, हातावर पोट असलेले यातले कोण जाईल?

रून्मेषजी, तुम्ही वाळवीचा धागा पिक्चर रिलीज व्हायच्या आधी काढला कि नंतर? बघायच्या आधी काढला कि नंतर?
पठाणचा धागा रिलीजच्या आधी काढला कि नंतर? बघायच्या आधी काढला कि नंतर?
वेडचा धागा कुठेय?
कट्यार, लोकमान्य, बॉलगंधर्व, सैराटचे तुमचे धागे कुठे आहेत?
या प्रश्नाचे खरे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही.

ओ भरतजी
दुनियादारी उतरवला होता हे मान्य आहे की नाही? मनसे ने खळ्ळं खट्याकचा इशारा दिल्यानंतर पुन्हा आला कि नाही? चालला कि नाही? तुम्ही बायपास काढून एक ते एक लिंकने अंग शेकत बसा. मुद्दा काय तुमच्या लिंका काय.
मराठी पिक्चर सुद्धा चालतात. त्यांना थेटर मिळत नाहीत. असे म्हटले कि एक म्हणतो जो चालेल त्यालाच थेटर देतात. हा धंदा आहे.
म्हणून हे पिक्चर चालत असताना दुपारी २ चे शो सुद्धा पठाणला दिले म्हटले तर तिसरा म्हणतो " कोण म्हणतो शो ज नाहीत??"
अरे भावा पण जरा विचार कर ना. इतके कमी शो मिळून पण धंदा आहेच ना? मग प्राईम शो का देत नाहीत?

जरा प्रत्येक पिक्चर ची महाराष्ट्रातली थेटर आणि शोज ची संख्या पण टाका.
मुद्दा मराठी पिक्चर का धंदा करत नाही म्हणून गळे काढणाऱ्या चा आहे.
एकीकडे पठाण सारख्या पिक्चरला सगळी थेटरं दिली तर त्याचं समर्थन पण करायचं आणि मराठी पिक्चर का चालत नाही म्हणून पण ओरडायचे. हे कसं चालणार?

वेडचा धागा कुठेय?
कट्यार, लोकमान्य, बॉलगंधर्व, सैराटचे तुमचे धागे कुठे आहेत?
>>>>>

सैराटचा धागा आहे.
वरच्या लिस्टमधील ईतर चित्रपट तेव्हा थिएटरला पाहिले नसल्याने त्यांचे धागे नाहीत. पण ईतर कैक मराठी चित्रपटांचे आहेत. ईतकेच नाही तर त्यांना नावे ठेवणाऱ्यांची मते खोडलीही आहेत.

आपण एक काम करूया. मायबोलीवर आजवर मराठी चित्रपटांवर किती धागे आले याची एका धाग्यात लिस्ट करूया. जेणेकरून सारे धागे एकत्र राहतील. आणि तिथे तुम्हाला आढळेल की सर्वाधिक धागे माझेच आहेत. मी नाही तर माझे कामच बोलेल Happy

मराठी पिक्चर का चालत नाही असा आरडाओरडा करायचा असेल तर त्यांना थेटर मिळत नाही यावर बोला. डबल ढोलकी दाखवली कि मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून काय फायदा नाय.
हा मुद्दा आहे.
साऊथचे लोक प्रत्येक साऊथचा पिक्चर बघत नाहीत. पण आपला सोडून हिंदी डोक्यावर घेऊन नाचत नाहीत.
मी पठाण पाहिलेला नाही. पण बहुतेक गाजलेले काही न चाललेले पाहिले आहेत. फॅंड्री थेटरात जाऊन सहकुटुंब पाहिला आहे.
सस्मित तुम्ही स्वतः पाहता का? प्रश्न विचारण्याचा उद्देश मला समजला नाही. तुम्ही संभाषणात भाग घेत नाही. मुद्दा मांडत नाही. मत मांडत नाही. सापळा लावायचा तर फक्त वाघाला का? उंदराला पण लावा.

ऋन्मेषजी तुम्ही गप्प बसून गैरसमज का वाढवत आहात? माझी किती बदनामी होतेय >>> Rofl
अरे आपण काय लिहितोय याचा अर्थ तरी कळतोय का?

Submitted by सामना on 2 February, 2023 - 03:57 >>>>>>>>>> हा हा हा हा हा हा

अजनबी, ते लिंबूटिंबू आहेत. दुर्लक्ष करा.
रून्मेषजी तुमच्या आरोपांना सविस्तर उत्तर फ्री झालो कि लगेच.

ज्या मराठी चित्रपटांचे शो थांबवले गेले त्यांच्या निर्माता दिग्दर्शक यांनी याविरुद्ध ओरड केल्याचे दिसले नाही. . मराठी वृत्तपत्रात किंवा वृत वाहिन्यांवर काहीच चर्चा दिसली नाही. त्यांनाच काही पडले नसेल>>>> कितिहि ओरडले तरि त्यांना विचारतो कोण?

कितिहि ओरडले तरि त्यांना विचारतो कोण?>> दुनियादारी चे शो उतरले तेव्हा ओरड झाल्यावरच ते पुन्हा लावले होते ना ? मग आत्ता वेड वाळवी चे शो काढून घेतल्याची चर्चा दिसलीच नाही इतर ठिकाणी.

पठाण'च्या शर्यतीत मराठी सिनेमांनी टिकवलं आपलं स्थान; 'वाळवी'चे शो तिप्पटीनं वाढवले >> आता हे पठाणचं नुकसान कोण भरून देणार?

Pages