मराठी भाषेतले चित्रपट का चालत नाहीत असे ओरडणारे चांगल्या चाललेल्या वेड आणि वाळवीचे शो पठाण साठी कमी केल्यावर काहीच का बोलत नाहीत ? आधीच हे चित्रपट कमी स्क्रीनवर रिलीज झाले. त्यात त्यांना प्राईम शो कमी मिळाले. पठाण मुळे त्यांचे शोज असून नसल्यासारखे आहेत. प्राईम टाईम मधे तर शोधूनही सापडत नाहीत.
गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या गडद अंधार , बांबू, पिकोलो या चित्रपटांना मोठ्या मिश्किलीने थोड्याशा स्क्रीन मिळालेल्या आहेत. मराठी चित्रपट जगवायचे म्हणून जाणार्या सिनेप्रेमींनी त्यांना आश्रय दिला तरी इतक्या कमी स्क्रीनवर तग धरण्यापलिकडे काही होऊ शकत नाही. अक्षरशः २० ते ३० हजाराचे कलेक्शन होतेय एका शो चे. तेव्हढेच शोज आहेत. काही चित्रपटांना तर स्क्रीनच मिळत नाही. अनन्या सारखा चांगल्या विषयावरचा चित्रपट कमी शोज मुळे लगेचच ओटीटीवर आला. स्क्रीन्स न मिळाल्याने धंदा नाही. धंदा नसल्याने ओटीटी वाले पण जास्त पैसे देत नाहीत. निर्मितीचा खर्च सुद्धा वसूल होत नाही.
वेड, वाळवीला वाढती गर्दी पाहता काही ठिकाणी त्यांचे स्क्रीन्स वाढवणार होते. पण पठाणने सगळ्याच स्क्रीन्स बुक केल्याने आहेत ते सुद्धा कमी झाले.
आपण महाराष्ट्रात राहतो. नेहमीच हा प्रकार घडतो तरी आपण गप्प का ? मग मराठी चित्रपट चालत नाहीत म्हणून निर्लज्जपणे आरडाओरड करायचा आपल्याला हक्क आहे का ? याचा अर्थ मराठी चित्रपट बनवूच नयेत का ?
पठाण चालल्याने बॉलीवूडला फायदा होतो म्हणणार्यांना अक्कल आहे कि नाही ? इतर सर्व चित्रपटांचा धंदा बुडवून हे इतरांचा कसा काय फायदा करतात ?
गंदा है पर धंदा है
गंदा है पर धंदा है
उद्या जर एकाच दिवशी एकाच वेळी हॉकी आणि क्रिकेटची मॅच चालू असेल
आणि चॅनेलवाल्यांना पर्याय दिला निवडायचा. तर ते कुठल्या सामन्याचे प्रक्षेपण करतील?
आणि का?
माझ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे द्या आणि त्यात आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधा..
बॅडमिंटनच्या कोर्टवर टेनिस
बॅडमिंटनच्या कोर्टवर टेनिस खेळतात का ? उदाहरण तरी नीट द्या.
ऋन्मेष, तू पोटापाण्यासाठी काम
ऋन्मेष, तू पोटापाण्यासाठी काम कधी करतो ?????
बॅडमिंटनच्या कोर्टवर टेनिस
बॅडमिंटनच्या कोर्टवर टेनिस खेळतात का ? उदाहरण तरी नीट द्या. >> हे पण चुकलं.
ऋन्मेषजींनी पुन्हा माझा मुद्दा सिद्ध केला.
हॉकीचा खेळ थांबवून त्याच मैदानावर क्रिकेटची मॅच चालू केली तर चालेल का ? असे करत नाहीत. म्हणजेच ऋन्मेषजींनी मान्य केले.
मायबोलीने कमेन्ट्सला आणि
मायबोलीने कमेन्ट्सला आणि धाग्याला लाईक / अनलाईक करायचा ऑप्शन द्यायला हवा.
मनापासून लाईक तुमच्या धाग्याला...
ऋन्मेष, तू पोटापाण्यासाठी काम
ऋन्मेष, तू पोटापाण्यासाठी काम कधी करतो ?????
>>>>
मी पोटापाण्यापुरतेच काम करतो
बाकी वेळ ईथे पडीक असतो
तरी गेले दोन महिने फार बिजी होतो. धागे चेक करा.. काहीच नाहीयेत.. ते तर आता पठाण आला आणि जान फुंकली
हॉकीचा खेळ थांबवून त्याच
हॉकीचा खेळ थांबवून त्याच मैदानावर क्रिकेटची मॅच चालू केली तर चालेल का ? असे करत नाहीत.
>>>>
माझेच उदाहरण बरोबर आहे.
ईथे वेडचे शूटींग थांबवून पठाणचे शूटींग सुरू केले नाहीये. तर एकाचे प्रक्षेपण थांबवून दुसऱ्याचे सुरू केले आहे. चॅनेलवाले हे नक्कीच करतील कारण क्रिकेटला टीआरपी जास्त आहे हॉकीपेक्षा.
बाकी हॉकीची मॅचही क्रिकेटसाठी थांबवली असती जर सेम मैदान दोन्ही खेळांना चालले असते तर. गल्ली क्रिकेटमध्ये फूटबॉल खेळणाऱ्या पोरांना हाकलून आम्ही गोलपोस्टच्या समोरच स्टंप ठोकायचो
प्रश्न गंभीर आहे... पठाण
प्रश्न गंभीर आहे... पठाण मध्ये दीपिका जॉन बरोबर शाखा ऐवजी स्वप्नील ला घेतले असते तर हा प्रश्न सुटला असता... वाळवी थोडा आधी रिलीज केला असता मग...
छान आहे आयड्या...
छान आहे आयड्या... स्वप्निलनेही केले असते सिक्स पॅक्स .. वीएफएक्सनेच तर करायचे असतात..
जॉन ऐवजी सुबोध भावे किंवा अंकुश चौधरी आणि दिपिका ऐवजी सई ताम्हाणकर किंवा सोनाली ज्युनिअर कुलकर्णी ..
मग तर प्रश्नच सुटला असता.. आता जे पठाण हजार करोड कमावणार आहे ते सगळे महाराष्ट्रातच राहिले अस्स्ते..
ईथे वेडचे शूटींग थांबवून
ईथे वेडचे शूटींग थांबवून पठाणचे शूटींग सुरू केले नाहीये. तर एकाचे प्रक्षेपण थांबवून दुसऱ्याचे सुरू केले आहे >>> सर, तुम्ही शाळेत लॉजिक विषय ऑप्शनला टाकला होता का अशी शंका वाटावी असे लिहीताय. मैदानावरचा खेळ आणि खेळाचे प्रक्षेपण असे तुमचे उदाहरण होते. हॉकीच्या मैदानावर हॉकीची मॅच चालली असा करेक्ट विषय थेटरला लागू होतो. मैदान म्हणजे थेटर. खेळ म्हणजे सिनेमा.
शूटींग म्हणजे निर्मिती प्रक्रिया. तुमच्या या लॉजिकप्रमाणे खेळाडूंच्या आया प्रसूतीवॉर्डात असतानाच खेळ थांबवलाय का ? केमिकल लोच्या असेल तर तो नीट करून घ्या म्हणजे तुम्हाला इतर ठिकाणीही लाभच होईल. कळावे लोभ असावा.
छान आहे आयड्या...
छान आहे आयड्या... स्वप्निलनेही केले असते सिक्स पॅक्स .. >>> तुम्हाला सिक्स पॅकशिवाय हिरो आवडत नाही का ? स्वप्निल जोशी आवडत नाही का ? सई ताम्हणकर आवडत नाही का ?
कारण यांचाच दुनियादारी सुपरहीट झाला होता. त्याचे शोज त्या वेळी अशाच कुठल्या तरी बॉलीवूडच्या पिक्चरसाठी उतरवले होते. तेव्हां मनसेने दम दिला. मग आपोआप पुन्हा शोज थेटरला लागले. फुल्ल झाले. तुमचा तो बॉलीवूडचा ब्रॅण्डवाला हिरो असतानाही दुनियादारी हिट झाला. खोटं वाटत असेल तर शाहरूखानला जाऊन विचारा. पिक्चर चांगला असेल तर कुणालाही घ्या चालतो. हिरो पिक्चरच्या वेळी जॅकी श्रॉफला कोण ओळखत होतं ? झाला कि नाही सुपरहीट ? ते पण एकाच वेळी ९५% थेटरात रिलीज करण्याची पद्धत नसताना.
फूल और कांटेच्या वेळी अजय देवगणचे सिक्स पॅक होते का ? का राजबिंडा चेहरा होता ? पिक्चर चांगला होता म्हणून चालला.
जे गल्लाभरू पिक्चर असतात त्यांनाच ९५% थेटरात सगळे शो बुक करावे लागतात. त्यासाठी महागडे स्टार्स घ्यावे लागतात. कॉण्ट्रोवर्सी करून एकाच आठवड्यात बिंग फुटायच्या आत पब्लिकला खेचून आणावं लागतं. नाहीतर एकदा का बिंग फुटलं की मग धंदा होणार नाही.
सामान्य ज्ञान फार वीक आहे तुमचं.
जॉन ऐवजी सुबोध भावे >>>
जॉन ऐवजी सुबोध भावे >>> सुबोध भावे ने बालगंधर्व, कट्यार सारखे जे पिक्चर बनवलेत ते शाहरूखला घेऊन चालवून दाखवा. दीपिकाला पण घ्या. अशा पिक्चरला दर्जेदार पब्लिक जात असतं. थिल्लर पब्लिकसाठी पठाण सारखे मूवीज बनवावे लागतात.
सुबोध भावे ने बालगंधर्व,
सुबोध भावे ने बालगंधर्व, कट्यार सारखे जे पिक्चर बनवलेत ते शाहरूखला घेऊन चालवून दाखवा. दीपिकाला पण घ्या. अशा पिक्चरला दर्जेदार पब्लिक जात असतं. थिल्लर पब्लिकसाठी पठाण सारखे मूवीज बनवावे लागतात. >>>>>>>
त्यांना पठाण सिनेमाच्या वेळी स्टेज वर नाचणाऱ्या पब्लिक चे कौतुक असते !
स्टेज वर नाचणाऱ्याना कथा , दिग्दर्शन , अभिनय कशाशी खातात हे कळत असेल का ?
पण वाळवी , वेड सिनेमे थियेटर मध्ये गर्दी खेचत असताना जबरदस्तीने उतरवले गेल्याचे दुःख दाखवायला ऋन्मेश कडे वेळ आहे कुठंय ?
तो तर पठाण चे यश साजरे करण्यात मश्गूल आहे .
या बाबत दक्षिणी लोकं खरेच शहाणे !
त्यांचे कित्तेक पिक्चर हिंदीत डब करण्याचे देखील ते कष्ट घेत नाही , आणि आपण हिंदी साठी मराठी सिनेमे उतरवले तरी गप्प असतो .
म्हणून राईट वींग वाल्यांची बॉलीवूड विरोधातली बॉयकॉट मोहीम योग्य वाटते .
पण वाळवी , वेड सिनेमे थियेटर
पण वाळवी , वेड सिनेमे थियेटर मध्ये गर्दी खेचत असताना जबरदस्तीने उतरवले गेल्याचे दुःख दाखवायला ऋन्मेश कडे वेळ आहे कुठंय
>>>
मायबोलीवर वाळवीची शून्य चर्चा होती.
मी बघून आलो. धागा काढला. चर्चा घडवली. ती वाचून अजून चार लोकं बघून आली असतील. थेट फायदा.
मी केवळ वाईट वाटून घेत नाही. तर हातभार लावतो.
तुम्हीही या त्या धाग्यावर .. वर काढा त्याला
दाखवून द्या तुमचे वाळवी प्रेम केवळ पठाणला विरोध म्हणून अचानक आले नाहीये..
पठाण आल्यामुळे खरे तर वाळवी
पठाण आल्यामुळे खरे तर वाळवी आणि वेड ला फायदाच झालाय... ज्यांना बघायचा होता त्यांनी आधीच बघून घेतला होता.... आता उतरणार म्हणून ज्यांना बघायचा नव्हता त्यांनी देखील पटापट तिकिट काढून बघितला...
काय उपयोग आहे खरं ह्या
काय उपयोग आहे खरं ह्या विषयावर बोलून? म्हणजे पॉप्युलर पिकचर करता दुसरे कमी डिमांड असलेले पिकचर काढून घेतले हा काही अन्याय वगैरे नाही झालाय मराठी सिनेमावर किंवा त्या सिनेमांच्या प्रेक्षकांवर. थियटर हे मालकांनी त्यांना फायदा व्हावा म्हणून उघडलय.
अर्थात फक्त वेंट करायचं असेल इथे तर ठीक आहे.
थियटर हे मालकांनी त्यांना
थियटर हे मालकांनी त्यांना फायदा व्हावा म्हणून उघडलय.
अर्थात फक्त वेंट करायचं असेल इथे तर ठीक आहे. >>> तुमचा मुद्दा मान्य नाही झाला तर वाफ काढणे का ?
थियेटर मालकांनी फायदा व्हावा म्हणून उघडलेय ना ? मग चाललेले पिक्चर उतरवून जो रिलीज झालेला नाही त्याची रिस्क कशी काय घेतात ? गांधी गोडसेला पण थिएटर्स दिले आहेत. याच्या आधी दुनियादारीच्या वेळी दम दिल्यावर पुन्हा रिलीज केल्यावर तो पिक्चर धो धो चाललाच ना ? कुठे तोटा झाला ? तुमचा मुद्दा काय आहे नेमका ?
आणि जर पठाण किंवा असे तुमच्या मते लै डिमांड असलेले पिक्चर येतात तेव्हां साऊथ इंडीयात दक्षिणी भाषेतले पिक्चर काढून का रिलीज करत नाहीत ? फायदा तर तिकडं पण व्हायला पाहीजे ना ? लिहीलंय हे आधी. तुमची व्हेंट काढण्याच्या नादात दुर्लक्ष झालं.
जर मराठी प्रेक्षकांनी चालू मराठी पिक्चर काढायला विरोध दर्शवला नाही तर ही दादागिरी चालूच राहील. पठाणने पाच दिवसात कमवायचे ते दहा दिवसात कमवेल. पण चालू पिक्चर काढून तिथे घुसखोरी कशाला ?
साऊथवाल्यांनी त्यांच्या भाषेतल्या चित्रपटांना ते हास्यास्पद असताना पण धंदा दिला. मराठी प्रेक्षक हिंदीला डोक्यावर घेऊन नाचतो. आता मोठ्या संख्येने दर्जेदार मराठी पिक्चर बनतात. मराठी प्रेक्षकांनी ठरवलं तर थेटर मालकांची हिंमत नाही होणार मराठी पिक्चर उतरवून हिंदी लावायची.
पण वाळवी , वेड सिनेमे थियेटर
पण वाळवी , वेड सिनेमे थियेटर मध्ये गर्दी खेचत असताना जबरदस्तीने उतरवले गेल्याचे दुःख दाखवायला ऋन्मेश कडे वेळ आहे कुठंय ? >>>एव्हढे वाक्य सोडले तर तुमच्या पोस्टला अनुमोदन. व्यक्तीचा उल्लेख करू नका. प्रवृत्तीवर बोला. व्यक्तीला जबाबदार धरल्याने विषय पाहीजे तसा भरकटवण्यासाठी तुम्ही मदत करता.
मायबोलीवर वाळवीची शून्य चर्चा होती.
मी बघून आलो. धागा काढला. चर्चा घडवली. ती वाचून अजून चार लोकं बघून आली असतील. थेट फायदा. >>> पठाण आणि वाळवी मायबोलीवर वाचून किती लोकांनी पाहिला याचा सर्व्हे घ्या. ज्या पिक्चरची मायबोलीवर चर्चा नसताना ते हिट झाले ते कसे काय झाले ?
आर आर आर, बाहुबली वर पण धागे काढले होते का ?
वेड वर धागा काढला होता का ?
पठाण, किंवा इतर वेळी इतर बिग
पठाण, किंवा इतर वेळी इतर बिग बॅनर चे पिक्चर लोकांना खुर्चीत बांधून कोंबले जातात.(म्हणजे मला कोणी बळजबरी करत नाही पिक्चर पाहिलाच पाहिजे.पण सुट्टी असेल आणि बघायचा असेल त्यावेळी वाळवी ला दुपारी दीड चा एक शो आणि पठाण(किंवा कोणीही बिग बजेट चित्रपट) चे दर 45 मिनिटाला दिवसातून 10 शो असं असेल तर मी 'माझ्या सोयीच्या वेळेत आहे म्हणून' नाईलाजाने बिग बजेट चित्रपट बघेन.
मल्टिप्लेक्स ला 4 किंवा 5 स्क्रीन असतात.त्यातली एक अगदी लहान वाली असेल तरी चालेल, ती वाळवी/तुंबाड/त्या त्या वेळी चांगल्या चाललेल्या मराठी किंवा हिंदी छोट्या बजेट च्या स्क्रीन ला दिवसात 3 शो चांगल्या सोयीच्या वेळी ठेवायला मिळावी.पठाण/हिंदुस्थान के ठग/इतर कोणी आला म्हणून मला चॉईस नाहीच असं होऊ नये.हल्ली खरंतर प्रार्थना करते की लॉंग विकेन्ड्स ना बिग बजेट टिपिकल चित्रपट रिलीज होऊ नये.नाहीतर बाकी सगळे उतरतात.)
'80℅ लोकांना हाच पदार्थ आवडतो' ठरवताना 80% लोकांना किमान त्या डिश चे सॅम्पल दिसेल इतका वेळ उपलब्ध असेल इतकी तरी सोय व्हावी.
टम्पूजी, त्याच्या उदाहरणात
टम्पूजी, त्याच्या उदाहरणात मैदान = थेटर नाहीये तर tv channel = थेटर आहे.
दोन्ही सेम नव्हे.
एवढंच लिहायचं होतं.
त्याच्या उदाहरणात मैदान =
त्याच्या उदाहरणात मैदान = थेटर नाहीये तर tv channel = थेटर आहे. >>> उदाहरण सटीक नाही.
टीव्ही घरोघरी मॅचेस दाखवतो. मैदानात प्रेक्षक येतात म्हणून मैदान आणि खेळ हेच बरोबर. उदाहरण खेळाचं दिलं म्हणून त्याचं लग्न मैदानाशीच लावायला पाहीजे. फारतर
पिक्चर = थिएटर
खेळ = मैदान
आणि प्रक्षेपण म्हणून
टीव्ही / ओटीटी राईट्स म्हणा.
लॉजिक लेफ्ट मायबोली...
लॉजिक लेफ्ट मायबोली...
मोगल आक्रमक औरंगजेबच्या
मोगल आक्रमक औरंगजेबच्या दरबारातील कित्तेक मराठी सरदार चवऱ्या ढाळून महाराष्ट्राभर त्याचे राज्य वाढवण्यास मदत करत होते , ते त्यांना अयोग्य वाटत नव्हते !
आणि आता मराठी सिनेमा थियेटर मधून काढून
पठाण ला स्क्रीन देणे कित्तेक मराठी लोकांना अयोग्य वाटत नाही .
काळात चारपाचशे वर्षांचा फरक पडला आहे , पण बऱ्याच लोकांची मानसिक गुलामगिरी तशीच आहे .
मला तर पठाण सारुक च्या दरबारात ऋन्मेश दादा चावऱ्या ढाळताना दिसायला लागले आहे
टीव्ही हे सुद्धा प्रक्षेपण,
टीव्ही हे सुद्धा प्रक्षेपण, थिएटर हे सुद्धा प्रक्षेपण, तसेच मैदानाभोवती सामना लाईव्ह बघायला जे स्टेडीयम उभारतात ते देखील यातच आले.
बघा सोपे करून सांगतो. हॉकीला मैदान दिले. पण स्टेडीयमच नाही दिले. ना तिचे कुठे प्रक्षेपण केले. तर ते चालेल का हॉकीवाल्यांना? नाही. कारण त्याने खेळाचा प्रसारच होणार नाही. मग पैसा कुठून येणार..
बाकी हा व्यवसाय आहे. मेंटेलिटी थिएटरमालकांची हिच राहणार की पठाण जास्त स्क्रीनला लावा. आणि जास्त पैसे कमवा. आता यात काही स्क्रीन रिकाम्या राहिल्या तरी मोठ्या क्लायंटलाच फेवर दिला जाणार. गंदा है असे वाटेल पण यही धंदा है.
पण याचा अर्थ असा नाही की मी याचे समर्थन करतोय. हे मी फक्त नेमक्या परीस्थितीचे आकलन करत आहे.
काहीतरी कायदा नियम हवा ज्याने ईतरांनाही संधी मिळेल या मताचा मी देखील आहे. पण तसा कायदा करणे सरकारचे काम. ईथे पठाणच्या निर्मात्यांना किंवा तो बघणाऱ्या प्रेक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात ऊभे करण्यात काही हशील नाही. फक्त मनाचे समाधान होईल ईतकेच.
ज्या मराठी चित्रपटांचे शो
ज्या मराठी चित्रपटांचे शो थांबवले गेले त्यांच्या निर्माता दिग्दर्शक यांनी याविरुद्ध ओरड केल्याचे दिसले नाही. . मराठी वृत्तपत्रात किंवा वृत वाहिन्यांवर काहीच चर्चा दिसली नाही. त्यांनाच काही पडले नसेल, कमावले ते पुष्कळ आहे असे वाटत असेल तर मग आंदोलन प्रेक्षकांनी करायचे का?
ऋन्मेष, तु चंपस झंपु आहेस
ऋन्मेष, तु चंपस झंपु आहेस
झंपू की टंपू
झंपू की टंपू
चित्रपट गेले खड्ड्यात. इथे
चित्रपट गेले खड्ड्यात. इथे धाग्यांचे तुंबाडचे खोत झालेत. त्यांच्यासाठी जागा सोडा. ( हे माझ्या धाग्यासाठी नाही )
ऋन्मेष, तु चंपस झंपु आहेस
ऋन्मेष, तु चंपस झंपु आहेस
नवीन Submitted by सस्मित on 2 February, 2023 - 00:04 >>>>>>> स ह म त
टंपू व फुरोगामी - तुमचे
टंपू व फुरोगामी - तुमचे प्रतिसाद आवडले व विचार पटले. मलाही पठाण सारख्या चित्रपटाचे अतिकौतूक चाललेले पटत नाही. फार थोड्या ठिकाणी थेटरे पुर्ण भरली गेलीत व त्याची पब्लिसिटी केली गेली आहे. एकाच वेळी अनेक थेटरात व जास्तीचे शो लावून मिळवलेला गल्ला दाखवून चित्रपटाने ५०० करोड मिळवले असे सांगत आहेत. मिळवलेले ५०० करोड ही sales amount आहे. त्यातून फायदा किती ? खरे म्हणजे किती ठिकाणी थेटर पुर्णपणे बुक झाली ? थेटर मालक, वितरक यांना किती फायदा झाला? याची माहीती कधीच मिळणार नाही. शाहरूख व निर्मात्यांनी चित्रपट रिलिज व्ह्यायच्या आधीच चित्रपटाचे हक्क विकून कमवून घेतले आहे. त्यांना १००० करोड चा धंदा जरी झाला तरी त्यातून अजून जास्त काही मिळणार नाही. जर पठाणच्या वेळी वितरक नुकसानीत गेले असतील तर शाहरूखची पत नक्की घसरेल व पुढच्या चित्रपटाच्या रिलिजच्या वेळी हे दिसून येईल.
Pages