वाळवी, वेड सिनेमे का उतरवले ? त्यांचे आर्थिक नुकसान कोण भरून देणार ?

Submitted by ढंपस टंपू on 1 February, 2023 - 05:33

मराठी भाषेतले चित्रपट का चालत नाहीत असे ओरडणारे चांगल्या चाललेल्या वेड आणि वाळवीचे शो पठाण साठी कमी केल्यावर काहीच का बोलत नाहीत ? आधीच हे चित्रपट कमी स्क्रीनवर रिलीज झाले. त्यात त्यांना प्राईम शो कमी मिळाले. पठाण मुळे त्यांचे शोज असून नसल्यासारखे आहेत. प्राईम टाईम मधे तर शोधूनही सापडत नाहीत.

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या गडद अंधार , बांबू, पिकोलो या चित्रपटांना मोठ्या मिश्किलीने थोड्याशा स्क्रीन मिळालेल्या आहेत. मराठी चित्रपट जगवायचे म्हणून जाणार्‍या सिनेप्रेमींनी त्यांना आश्रय दिला तरी इतक्या कमी स्क्रीनवर तग धरण्यापलिकडे काही होऊ शकत नाही. अक्षरशः २० ते ३० हजाराचे कलेक्शन होतेय एका शो चे. तेव्हढेच शोज आहेत. काही चित्रपटांना तर स्क्रीनच मिळत नाही. अनन्या सारखा चांगल्या विषयावरचा चित्रपट कमी शोज मुळे लगेचच ओटीटीवर आला. स्क्रीन्स न मिळाल्याने धंदा नाही. धंदा नसल्याने ओटीटी वाले पण जास्त पैसे देत नाहीत. निर्मितीचा खर्च सुद्धा वसूल होत नाही.

वेड, वाळवीला वाढती गर्दी पाहता काही ठिकाणी त्यांचे स्क्रीन्स वाढवणार होते. पण पठाणने सगळ्याच स्क्रीन्स बुक केल्याने आहेत ते सुद्धा कमी झाले.

आपण महाराष्ट्रात राहतो. नेहमीच हा प्रकार घडतो तरी आपण गप्प का ? मग मराठी चित्रपट चालत नाहीत म्हणून निर्लज्जपणे आरडाओरड करायचा आपल्याला हक्क आहे का ? याचा अर्थ मराठी चित्रपट बनवूच नयेत का ?

पठाण चालल्याने बॉलीवूडला फायदा होतो म्हणणार्‍यांना अक्कल आहे कि नाही ? इतर सर्व चित्रपटांचा धंदा बुडवून हे इतरांचा कसा काय फायदा करतात ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसऱ्या कोणीतरी स्वप्निल जोशीला घेऊन पठाण करा असे म्हटले होते.
>>>दुसऱ्या कोणीतरी? नाचिज ने कहा था ऋन्मेशमियाँ !! नाचिज ने....

हो च्रप्स आपण म्हटलेले
सगंळी मायबोली पठाणमय झाली आहे. त्यामुळे कोणी कुठे काय म्हटले कन्फ्यूजायला झाले आहे Happy

@ रीया,
पाहिला का पठाण?

मी बोललेलो ना कि फ्री झाल्यावर येऊन उत्तरं देतो म्हणून. पण आता कित्ती काम वाढवलंय माझं ! बघूनच टेनशन आलं.
कुठून सुरूवात करू ? अजिबात पेशन्स नाहीत जुन्या लोकांना.
कुठे नेऊन ठेवलाय धागा माझा

दुनियादारी चे शो उतरले तेव्हा ओरड झाल्यावरच ते पुन्हा लावले होते ना ? मग आत्ता वेड वाळवी चे शो काढून घेतल्याची चर्चा दिसलीच नाही इतर ठिकाणी. >>> घ्या, म्हणजे चर्चा झाली नाही ही चूक पण मराठी पिक्चरवाल्यांचीच का ? गेल्या वेळी मनसेने इंटरेस्ट घेतला होता. या वेळी नाही घेतला. आता भाजपची चित्रपट सेना जास्त मजबूत झालीय आरोह वेलणकरांची. त्यांचे आणि पठाणचे सेटींग झालेय. इथे मराठी प्रेक्षक, मीडीया यांनी मराठी पिक्चर्सची बाजू घ्यायला पाहीजे. साऊथकडून शिका.

मराठी ऑडियन्सला मराठी पिकचर बघता यावे ह्या हेतूनी सिनेमा हॉल उघडला तरच हे शक्य आहे. पैसे कमवायला उघडला तर अर्थातच ज्याला डिमांड आहे ते पिकचर ते लावायला बघतील आणि त्या बद्द्ल तुम्ही अन मी वाफ सोडल्याव्यतिरिक्त काय करु शकतो? >>>> यांचं फिरून फिरून भोपळे चौकच चालू आहे. मराठी पिक्चर चांगला चालू असताना उतरवला याला पद्धतशीर फाटा मारतात हे. चांगला चालू आहे म्हणजे डिमांड आहे, धंदा आहे तर पैसे कमवून देत नाही का ? तुमचा आक्षेप काय आहे हे एकदा नक्की करा बुवा !
पैसे कमवायचेत कि मराठी पिक्चर नको ? पैसे कमवायचेत तर चाललेला मराठी पिक्चर पैसे कमावून देत नाही का ? कि तो फ्री असतो ?

मी पठाणला सकाळच्या सव्वानऊच्या शो ला गेलो. ते ही सहकुटुंब.
मी वाळवीला रात्री साडेदहाच्या शो ला गेलो. ते ही एकटाच. >>> मराठी चित्रपटाबाबत तुम्ही असंवेदनशील आणि बेफिकीर आहात का ? परभाषिकांचे चित्रपट बघायला चार चार तिकीटं आणि मराठी बघायला एकच तिकीट ? का असं ?

मी त्यावरच पुढे म्हटले की मग जॉन जागी सुबोध आणि दिपिकाजागी सई किंवा सोकु ज्युनिअर घ्या म्हणजे पुर्ण मराठीच स्टारकास्ट होईल. >>>> ब्रह्मास्त्र मधे शाहरूख खान नसताना चालला कि नाही ? तो कुणामुळे चालला ? सैराट मधे शाहरूख खान होता का ? शाहरूख सोडा, सलमान, आमीर, ऋत्विक, रणवीर, रणबीर, अजय देवगण, अक्षयकुमार यांच्यापैकी तरी कुणी होता का ? हे पण सोडा. मराठीतला तरी कुणी सुपरस्टार होता का ?
मग का चालला हा पिक्चर ?

कांतारा साऊथच्या बाहेर का चालला ? शाहरूख खान मुळे ?
के जी एक का चालला ? शाहरूख खान मुळे ?
या प्रश्नांची उत्तरे द्या तरच मी तुमच्याशी चर्चा करीन.

परभाषिकांचे चित्रपट बघायला चार चार तिकीटं आणि मराठी बघायला एकच तिकीट ?
>>> परभाषिक ? हिंदी हैं हम वतन है हिंदोस्तां हमारा...

@ रीया. हो.
माझेही त्या काळात चित्रपट बघणे थांबलेलेच. थिएटर काय टीव्हीवरही बघणे व्हायचे नाही. आता ओटीटीवर येईल तेव्हाच बघ. यात तो शाहरूख तुलनेत कमी आहे जो वर्षानुवर्षे आवडत आलाय. पण तरी शाहरूखसाठी म्हणून मला आनंद झाला. हे यश तो डिझर्व्ह करत होता.

परभाषिकांचे चित्रपट बघायला चार चार तिकीटं आणि मराठी बघायला एकच तिकीट ?
>>> परभाषिक ? हिंदी हैं हम वतन है हिंदोस्तां हमारा..
>>>>

अगदी अगदी झाले...
मराठीचा अभिमान असणे, आणि जिव्हाळा असणे आपल्या जागी योग्य आहे.
पण त्यासाठी ईतरांचा दुस्वास का?
आपल्या विचारात हा मोठठा फरक आहे.
माझे मराठी प्रेम मला माहीत आहे. तुमचेही असेल. पण तुमची अशी अपेक्षा आहे की मी माझे मराठी प्रेम दाखवताना ईतर कोणावर प्रेम करू नये.
आज गावस्कर, तेंडुकलर, मंगेशकर यांच्यावर सारे जग प्रेम करते. ते असा संकुचित विचार नाही करत तर आपण का करावा? त्यांना हे परभाषिक आहेत याने काही फरक पडत नाही तर आपण का शाहरूखला परभाषिक समजावे?

परभाषिक ? >>> एखादा मराठी मनुष्य दुसर्‍या भाषिक माणसाला काय म्हणेल ? समभाषिक ?
हिंदी हैं हम वतन है हिंदोस्तां हमारा..>> म्हणजे तुम्हाला असे म्हणायचेय का कि मराठी या भूमीची भाषा नाही ?
मची अशी अपेक्षा आहे की मी माझे मराठी प्रेम दाखवताना ईतर कोणावर प्रेम करू नये. >>>> मी मराठीवर प्रेम करायचे नाही का ? का ?

हीच गोष्ट तुम्ही हिंदी भाषिक, दाक्षिणात्य भाषिकांना सांगाल का मराठीवर प्रेम करा. मराठी शिका. ते ऐटीत सांगतात कि हिंदीत बोला. पण डामच्यांनो, आम्ही जन्मतः हीच भाषा शिकलो आहे , तुमच्या सोयीसाठी आम्हाला एक भाषा जास्त शिकावी लागते. तुम्ही कधी कष्ट घेणार ?

हिंदी हैं हम वतन है हिंदोस्तां हमारा >> तुम्हाला कर म्हणायचे असेल की हिंदी हीच वतनाची भाषा आहे तर त्यावर वेगळा धागा काढा. तुमचे तसे म्हणणे असेल तर तोंडावर पडण्याची दाट शक्यता आहे. मातृभाषेत बोलणे, शिक्षण घेणे, मनोरंजन करणे, करवून घेणे, विचार करणे यामुळे दुसर्‍या भाषेवर कसा काय अन्याय होतो ? यात भाषेवर प्रेम दाखवण्याचा काय संबंध आहे ?
जी भाषा मी इथे वाढल्याने शिकलो, माझ्या आसपासचे सगळे बोलतात, जी भाषा माझ्या राज्याची प्रथम भाषा आहे त्या भाषेचं प्रेम असणे हे तुमच्या दृष्टीने गुन्हा आहे कि काय ?

एखादा मराठी मनुष्य दुसर्‍या भाषिक माणसाला काय म्हणेल ? समभाषिक ?
>>>>>>>>>>

छे हो. शब्दावर आक्षेप नाही. मुळात ते म्हणायचेच का हा मुद्दा आहे ! एखाद्या कलाकारावर प्रेम करताना तो समभाषिक आहे की परभाषिक हा बिचार डोक्यातच कसा येतो हा मुद्दा आहे.

खाद्या कलाकारावर प्रेम करताना तो समभाषिक आहे की परभाषिक हा बिचार डोक्यातच कसा येतो हा मुद्दा आहे. >>> शाहरूख खान पुरूष आहे असे म्हटले तर तुम्ही त्याच्यावर पण आक्षेप घेताल का ?

हिंदी हीच वतनाची भाषा आहे
>>>>

हिंदी हीच नाही. पण हिंदी ही सुद्धा आहे. मराठी तामीळ तेलगू बंगाली कन्नड या सर्व भारतीयच भाषा आहे. भाषेवरून भेद म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेला तडा.

आणि हिंदी आम्हा मुंबईकरांसाठी तरी परभाषा नाही. दिवसभरात हिंदी मराठी दोन्ही तितकेच बोलतो मी.

उद्या माझ्या गावचा माणूस जाऊन त्याच्याशी तासनतास मराठीत चर्चा करू शकेल का ? नाही ना ? म्हणजे तो दुसरी भाषा बोलतो ही वस्तुस्थिती आहेच ना ? कायच्या काय फालतू आक्षेप घेता राव तुम्ही. मला किती आनंद झाला होता कि आल्या आल्या विचारवंताशी भेट झाली.

मी आजवर मराठी व्यतिरीक्त हिंदी, गुजराती, आणि उर्दू अश्या तीन विविध भाषिक मुलींच्या गहिऱ्या प्रेमात पडलो आहे. प्रेमाला फक्त प्रेमाचीच भाषा कळते.

हिंदी हीच नाही. पण हिंदी ही सुद्धा आहे. मराठी तामीळ तेलगू बंगाली कन्नड या सर्व भारतीयच भाषा आहे. भाषेवरून भेद म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेला तडा. >>>>> मराठी ही माझी भाषा आहे. यावरून भेद कस्सा काय झाला ? उद्या तुम्ही म्हणाल की नवरा नायको मधे लिंगावरून भेद म्हणजे लैंगिक एकात्मतेला तडा. तर लोक दगडं मारतील. विचार करून बोलत जा ना भाऊ.

मी आजवर मराठी व्यतिरीक्त हिंदी, गुजराती, आणि उर्दू अश्या तीन विविध भाषिक मुलींच्या गहिऱ्या प्रेमात पडलो आहे. प्रेमाला फक्त प्रेमाचीच भाषा कळते. >> घंटा. लग्न झाले असेल तर तुमच्या पत्नीला उपयोग होईल या माहितीचा.

उद्या माझ्या गावचा माणूस जाऊन त्याच्याशी तासनतास मराठीत चर्चा करू शकेल का ?
>>>

शाहरूखशी का?
तासनतास कसा भेटेल शाहरूख.. खरेच भेटला तर गप्पा नाही झाल्यात तरी चालेल.. त्याचे भेटणेच सुखद अनुभव असेल.. Happy

आणि हिंदी आम्हा मुंबईकरांसाठी तरी परभाषा नाही. दिवसभरात हिंदी मराठी दोन्ही तितकेच बोलतो मी. >>> म्हणजे मुंबई महाराष्ट्रातून काढली कि काय ? महाराष्ट्राची भाषा माहिती आहे ना कुठली आहे ती ? शाहरूखखान तुमच्याशी मराठी या भारतीय भाषेतून बोलतो का ?
कॉमन सेन्स आहे राव. आपण जिथे भाजी भाकरी कमवायला जातो तिथली भाषा आली पाहीजे. साऊथ मधे झक मारत तुम्हाला तिथली भाषा शिकावी लागते. उद्या तुम्ही कामानिमित्त परदेशात गेलात तर इथोपियाची भाषा शिकाल की त्यांना हिंदी मराठी शिका म्हणाल ? लॉजिक वापरा की.

तासनतास कसा भेटेल शाहरूख.. >>> का ? त्याला नैसर्गिक विधीला जायला पण वेळ नसतो का ? तिकडे बसून बोला पाठीला पाठ लावून.

तासनतास कसा भेटेल शाहरूख. >>>> तुम्ही त्याला सांगा कि मी तुला एक करोड रूपये देतो, दोन तास गप्पा मार. तर काम सोडून पळत येईल तो.

मी आजवर मराठी व्यतिरीक्त हिंदी, गुजराती, आणि उर्दू अश्या तीन विविध भाषिक मुलींच्या गहिऱ्या प्रेमात पडलो आहे. प्रेमाला फक्त प्रेमाचीच भाषा कळते. >> घंटा.

>>>

अविश्वास.... ?

एका गुजराती मुलीच्या प्रेमाबद्दल लिहून झालेय.
लिंक देतो थांबा...

आणि ईतरही मुलींबद्दल लिहितो. वाचा पण नक्की.. नाहीतर डोंगर कथेसारखा पोपट व्हायचा.. आग्रहाखातर लिहायचो आण्क् आह्रह करणारेच मग वाचायला तयार नाहीत Happy

आलो मटण खाऊन.. लिंक नंतर देतो गुज्जू प्रेमकथेची Happy

अविश्वास.. .. ? >>>> म्हणजे मी कधी अविश्वास दाखवला. मी म्हटले माझ्या दृष्टीने या माहितीचा उपयोग घंटा आहे. तुमच्या पत्नीला सांगा जाऊन. तुमची कोण गर्लफ्रेंड, ती कुठल्या भाषेत बोलते. मराठी न बोलणारी असेल तरी तिला समभाषिक म्हणायचे का ? ती तुमच्या लिंगापैकी नसेल तरी तिला समलैंगिक म्हणायचे का हा तुमचा प्रश्न आहे. मला त्यात इंटरेस्ट नाही. कसं ?

तुम्ही मैत्रीण हा शब्द वापरला. मित्र नाही. यावरून लैंगिक एकात्मतेला धोका निर्माण नाही का झाला ?
( लॉजिक साठी लिहीले आहे. लॉजिक सोडून बोलणार असाल तर वेगळा धागा काढा).

Pages