आपला मायबोलीकर हर्पेन उर्फ हर्षद पेंडसे येत्या 17 सप्टेंबर रोजी इटली मधील आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेत आहे. आतापर्यंत लडाख मॅरेथॉन, हिमालयन ट्रेक्स, चादर ट्रेक आणि चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा असे अनेक आव्हानात्मक साहसी उपक्रम यशस्वी रित्या पार पडणारा हर्पेन हे आव्हान देखील यशस्वी पूर्ण करेल यात शंकाच नाही.
माझ्या माहितीनुसार मायबोलीवर पूर्ण आयर्नमॅन करणारा तो पहिलाच आहे ( सिम्बा उर्फ अतुल यांनी हाफ आयर्न मॅन केली आहे आणि तेही लवकरच पूर्ण करतील, त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा).
फक्त धावपळ नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारा हर्षद वेगळेच रसायन आहे. त्याने मागे खारदुंग ला चेलेंज (लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची) मध्ये भाग घेण्याचे ठरवले होते त्यावेळी मेळघाटातील मैत्री या संस्थेला निधी जमवण्यासाठी मदत म्हणून ही स्पर्धा समर्पित केली होती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
यामुळे या उपक्रमाला नुसत्या तोंडी शुभेच्छा देण्यापेक्षा आम्ही मायबोलीकर मित्र मंडळी वेगळ्या प्रकारे त्याला शुभेच्छा देणार आहोत.
येत्या रविवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता किमान 5 किमी अंतर धावून त्याला सक्रिय पाठिंबा देणार आहोत.
आणि जास्तीत जास्त मायबोलीकरांनीही त्यात सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.
त्यादिवशी प्रत्येकाने काहीतरी झेपणेबल अॅक्टीव्हीटी करावी किंवा आधी केली नसेल तर यानिमित्ताने सुरुवात करावी असा विचार करुन ही लिंक बनवली आहे. ५ किमी धावता येत नसेल तर ५ किमी चाला किंवा १०किमी सायकलिंग करा किंवा ५० दोरीवरच्या उड्या मारा, अगदीच ६० वर्षांचे असाल तर जिन्याच्या ५० पाय-या चढा-उतरा. सगळे वेगळ्या ठिकाणी असलो तरी मोटो एकच असल्याने एक सकारात्मक ऊर्जा हर्पेनपर्यंत आपण नक्की पोहोचवू शकू. शिवाय नविन काहीतरी सुरु करायला हे मोठ्ठं निमित्तही आहेच.
https://www.strava.com/clubs/330771/group_events/1243680?_branch_match_i...
इथे तुम्ही तुमचा सहभाग नोंदवू शकता
https://apps.apple.com/in/app/strava-run-ride-hike/id426826309
सफरचंदी लोकांसाठी ही लिंक
https://www.ironman.com/im-emilia-romagna-athletes
ही स्पर्धेची वेबसाईट
इथं त्याला ट्रॅक करू शकता
हार्दिक अभिनंदन, हर्पेन .
हार्दिक अभिनंदन, हर्पेन .
अरे व्वा!!! अभिनंदन हर्पेन.
अरे व्वा!!!
अभिनंदन हर्पेन.
अभिनंदन हर्पेन !!!
अभिनंदन हर्पेन !!!
खुप खुप अभिनन्दन. लय भरि
खुप खुप अभिनन्दन. लय भारि
मनापासून धन्यवाद मंडळी.
मनापासून धन्यवाद मंडळी.
मायबोलीकरांच्या शुभेच्छा नेहेमीची मोलाच्या असतात.
मला लागलेला वेळ १४ तास ३४ मिनिटे २० सेकंद इतका होता.
https://www.ironman.com/im-emilia-romagna-results
ह्या पानावर जरा स्थिरावले असता माझे नाव टंकून निकाल अधिक तपशीलानिशी बघता येईल.
हार्दिक अभिनंदन, हर्पेन!!
हार्दिक अभिनंदन, हर्पेन!!
We r proud of u Harpen!
We r proud of u Harpen!
माबोवर एक खास लेख लिहा लवकर
माबोवर एक खास लेख लिहा लवकर
हर्पेन, जबरदस्त!माझ्याकडुन
हर्पेन, जबरदस्त!माझ्याकडुन मनापासुन सलाम व अभिनंदन! तुला तर माझ्या ( जुन्या मायबोलीवरच्या) ऑलिंपिक्सच्या सुरस कथा माहीतच आहेत. त्यात तुझ्या या स्फुर्तिदायक कामगीरीच्या कथेची भर घालायला आवडेल!
हर्पेन एक यशस्वी आर्यमन झाले.
हर्पेन एक यशस्वी आर्यमन झाले....
खूप खूप अभिनंदन....
आम्ही भाग्यशाली आहोत तुमच्यासारखे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आम्हाला लाभले.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
वृतांत लिहायचा आहे.
अभिनंदन हर्पेन
अभिनंदन हर्पेन
हर्पेन
हर्पेन
खूप खूप खूप अभिनंदन !
ग्रेटच !
कीप इट अप !
पुन्हा एकदा सर्वांचे आभार
पुन्हा एकदा सर्वांचे आभार
वृत्तांत लिहायला सुरु केले आहे.
https://www.maayboli.com/node/82537
Pages