हर्पेन - इटलीचा लोहपुरुष

Submitted by आशुचँप on 12 September, 2022 - 07:23

आपला मायबोलीकर हर्पेन उर्फ हर्षद पेंडसे येत्या 17 सप्टेंबर रोजी इटली मधील आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेत आहे. आतापर्यंत लडाख मॅरेथॉन, हिमालयन ट्रेक्स, चादर ट्रेक आणि चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा असे अनेक आव्हानात्मक साहसी उपक्रम यशस्वी रित्या पार पडणारा हर्पेन हे आव्हान देखील यशस्वी पूर्ण करेल यात शंकाच नाही.
माझ्या माहितीनुसार मायबोलीवर पूर्ण आयर्नमॅन करणारा तो पहिलाच आहे ( सिम्बा उर्फ अतुल यांनी हाफ आयर्न मॅन केली आहे आणि तेही लवकरच पूर्ण करतील, त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा).
फक्त धावपळ नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारा हर्षद वेगळेच रसायन आहे. त्याने मागे खारदुंग ला चेलेंज (लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची) मध्ये भाग घेण्याचे ठरवले होते त्यावेळी मेळघाटातील मैत्री या संस्थेला निधी जमवण्यासाठी मदत म्हणून ही स्पर्धा समर्पित केली होती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
यामुळे या उपक्रमाला नुसत्या तोंडी शुभेच्छा देण्यापेक्षा आम्ही मायबोलीकर मित्र मंडळी वेगळ्या प्रकारे त्याला शुभेच्छा देणार आहोत.
येत्या रविवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता किमान 5 किमी अंतर धावून त्याला सक्रिय पाठिंबा देणार आहोत.
आणि जास्तीत जास्त मायबोलीकरांनीही त्यात सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.
त्यादिवशी प्रत्येकाने काहीतरी झेपणेबल अॅक्टीव्हीटी करावी किंवा आधी केली नसेल तर यानिमित्ताने सुरुवात करावी असा विचार करुन ही लिंक बनवली आहे. ५ किमी धावता येत नसेल तर ५ किमी चाला किंवा १०किमी सायकलिंग करा किंवा ५० दोरीवरच्या उड्या मारा, अगदीच ६० वर्षांचे असाल तर जिन्याच्या ५० पाय-या चढा-उतरा. सगळे वेगळ्या ठिकाणी असलो तरी मोटो एकच असल्याने एक सकारात्मक ऊर्जा हर्पेनपर्यंत आपण नक्की पोहोचवू शकू. शिवाय नविन काहीतरी सुरु करायला हे मोठ्ठं निमित्तही आहेच.

https://www.strava.com/clubs/330771/group_events/1243680?_branch_match_i...

इथे तुम्ही तुमचा सहभाग नोंदवू शकता

https://apps.apple.com/in/app/strava-run-ride-hike/id426826309

सफरचंदी लोकांसाठी ही लिंक

https://www.ironman.com/im-emilia-romagna-athletes

ही स्पर्धेची वेबसाईट
इथं त्याला ट्रॅक करू शकता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही, आता सुरू झालीय
हर्षद ने कट ऑफ वेळेच्या बरेच आधी स्विमिंग कोर्स पूर्ण केला
आता सायकल कोर्स सुरू आहे
वेबसाईट थोडी गंडली आहे त्यामुळे नक्की कुठं आहे कळत नाहीये पण कोर्स पूर्ण होताच अपडेट्स देईन इथं

अशा रितीने हर्षदने दुसरा टप्पाही यशस्वीरित्या पार केला आहे. १८० किमी चा सायकल कोर्स त्याने २३.८१ च्या अव्हरेज स्पीडने ७.३३ तासात पूर्ण केला.

आता फक्त फुल मॅरेथॉन राहीली.

गो गो गो हर्षद....भारी चाललायस

गो हर्पेन! भारीच!
काल धावुन आलो पण अ‍ॅप चालू करायचं राहिलं. आत्ता पाऊस आहे, संध्याकाळी पाऊस थांबला तर परत धावुन येईल. नाहीतर मग ट्रेडमिल वरच धावेन.

मी 5 किमी चालेन हर्पेन ना शुभेच्छा म्हणून Happy
ते app Strava माझ्या मोबाईलवर चालत नाहीय..
पण मी चालेन Wink

Submitted by धनवन्ती on 12 September, 2022 - 18:14.
.
.
केले... Happy Happy

१८० किलोमीटर सायकल.. भारी..>>>

त्याआधीचे ३.८ किमी चे ओपन वॉटर स्विमींग आणि सायकलींग झाल्यावर फुल मॅरेथॉन (४२ किमी) विसरु नका. हे एकसलग करायचे आहे. म्हणजे स्विमिंग सुरु होताच टायमर सुरु होतो तो रनिंग संपल्यावर. मग मध्ये विश्रांती, वॉशरुम, फुड ब्रेक, कपडे बदलणे वगैरे सगळ त्यातच

आणि अशा रीतीने हर्षद ने यशस्वीपणे लोहपुरुष अर्थात आयर्नमन किताब मिळवला आहे

खूप खूप अभिनंदन मित्रा
खूपच भारी

अरे वा, अभिनंदन, फार कौतुकास्पद कामगिरी.

आशुचाम्प धन्यवाद बातमीसाठी.

एकूण 14 तास 34 मिनिटे वेळ लागला
ब्रेक्स पकडून>>>>>>>>

३.८ किमी ओपन वाॅटर स्विमिंग
१८० किमी सायकलिंग
४२ किमी मॅरेथॉन
जबरदस्त कामगिरी
आयर्न मॅन हर्पेन ह्यांचा विजय असो ____/\____

खूप खूप भारी!! मस्त बातमी. अभिनंदन हर्पेन!!!

मधेमधे updates दिल्याबद्दल आशुचँप thnx

क्या बात है, आर्यनमॅन हर्पेनदा, दंडवत स्विकारा _/\_
आशुचँप, अपडेट्स बद्दल धन्यवाद..
आता वृत्तांताची वाट पाहणे आलं.
शनिवार/रविवार जमणार नसल्याने, शुक्रवारी ९ किमी walk/run केलं Happy

Ironman harpen ह्यांचे खूप अभिनंदन.

धन्यवाद आशुचाम्प इथे अपडेट्स दिल्याबद्दल

खूप खूप अभिनंदन हर्पेन.... वृत्तांताची वाट बघत आहे
आशुचँप धन्यवाद अपडेट्स देत राहिल्याबद्दल

आयर्नमॅन करावी हा नुसता विचार करणंच भारी आहे. ती पूर्ण करणं तर त्याहूनही भारी.
खूप अभिनंदन. नीट व्यवस्थित आराम करुन डिटेल्ड व्रुत्तांत लिहा.
मी शनिवारी ८ के केले. करायचे २१ होते पण घसा खवखवत होता आणि प्री ताप लक्षणं वाटत असल्याने गपचुप घरी परतले.

Pages