हर्पेन - इटलीचा लोहपुरुष

Submitted by आशुचँप on 12 September, 2022 - 07:23

आपला मायबोलीकर हर्पेन उर्फ हर्षद पेंडसे येत्या 17 सप्टेंबर रोजी इटली मधील आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेत आहे. आतापर्यंत लडाख मॅरेथॉन, हिमालयन ट्रेक्स, चादर ट्रेक आणि चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा असे अनेक आव्हानात्मक साहसी उपक्रम यशस्वी रित्या पार पडणारा हर्पेन हे आव्हान देखील यशस्वी पूर्ण करेल यात शंकाच नाही.
माझ्या माहितीनुसार मायबोलीवर पूर्ण आयर्नमॅन करणारा तो पहिलाच आहे ( सिम्बा उर्फ अतुल यांनी हाफ आयर्न मॅन केली आहे आणि तेही लवकरच पूर्ण करतील, त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा).
फक्त धावपळ नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारा हर्षद वेगळेच रसायन आहे. त्याने मागे खारदुंग ला चेलेंज (लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची) मध्ये भाग घेण्याचे ठरवले होते त्यावेळी मेळघाटातील मैत्री या संस्थेला निधी जमवण्यासाठी मदत म्हणून ही स्पर्धा समर्पित केली होती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
यामुळे या उपक्रमाला नुसत्या तोंडी शुभेच्छा देण्यापेक्षा आम्ही मायबोलीकर मित्र मंडळी वेगळ्या प्रकारे त्याला शुभेच्छा देणार आहोत.
येत्या रविवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता किमान 5 किमी अंतर धावून त्याला सक्रिय पाठिंबा देणार आहोत.
आणि जास्तीत जास्त मायबोलीकरांनीही त्यात सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.
त्यादिवशी प्रत्येकाने काहीतरी झेपणेबल अॅक्टीव्हीटी करावी किंवा आधी केली नसेल तर यानिमित्ताने सुरुवात करावी असा विचार करुन ही लिंक बनवली आहे. ५ किमी धावता येत नसेल तर ५ किमी चाला किंवा १०किमी सायकलिंग करा किंवा ५० दोरीवरच्या उड्या मारा, अगदीच ६० वर्षांचे असाल तर जिन्याच्या ५० पाय-या चढा-उतरा. सगळे वेगळ्या ठिकाणी असलो तरी मोटो एकच असल्याने एक सकारात्मक ऊर्जा हर्पेनपर्यंत आपण नक्की पोहोचवू शकू. शिवाय नविन काहीतरी सुरु करायला हे मोठ्ठं निमित्तही आहेच.

https://www.strava.com/clubs/330771/group_events/1243680?_branch_match_i...

इथे तुम्ही तुमचा सहभाग नोंदवू शकता

https://apps.apple.com/in/app/strava-run-ride-hike/id426826309

सफरचंदी लोकांसाठी ही लिंक

https://www.ironman.com/im-emilia-romagna-athletes

ही स्पर्धेची वेबसाईट
इथं त्याला ट्रॅक करू शकता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा हर्पेन! आयर्नमॅन होण्यास हार्दिक शुभेच्छा!
आशुचॅंप तुमची ५ किमी धावून शुभेच्छा देण्याची कल्पनाही फार आवडली.

हर्पेन ह्यांना पुन्हा शुभेच्छा.
पाठिंबा देण्यासाठीचा उपक्रम छान आहे. नक्की भाग घेईन.

माझा आधीचा प्रतिसाद गायबला....
हर्पेन ला अनेक अनेक शुभेच्छा...
उपक्रमात नाव नोंदविले आहे, बहुधा ५ किमी जमेल.... १८ तारीख सकाळी वेळ ७ची ( भारतीय प्रमाण वेळेनुसना) आहे ना??

शुभेच्छा, हर्पेन. वर उल्लेखलेले app वापरत नाही, पण माझ्या ऍक्टिव्ह शुभेच्छा नक्की देईन.

तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा माझ्या करता फार महत्वाच्या आहेत, मी स्वतः इथे कळवणारच होतो पण गणेश उत्सवाची गडबड सुरू होती म्हणून थांबलो होतो.

हेम आणि आशु चे विशेष आभार.

इटलीला आलेल्या वादळामुळे आज शनिवारी होणारी स्पर्धा एक दिवसाने पुढे धकलावी लागली आहे
काल रात्री हर्षद शी बोलणे झाले त्यावेळी तो आशा करत होता की उद्या सगळं सुरळीत व्हावं
त्याप्रमाणे आजचे अपडेट्स आहेत
उद्या म्हणजे रविवारी सकाळी स्पर्धेला सुरुवात होईल

Following conversations with the Head of Police, Civil Protection, local authorities and our stakeholders, we have received the necessary clearance to proceed as planned with IRONMAN Italy Emilia-Romagna and IRONMAN 70.3 Italy Emilia-Romagna triathlons tomorrow (Sunday, September 18).
There has been minimal disruption to the course, and the team are busy on the ground clearing any debris so it’s clear for tomorrow morning.
The race village and registration are now open and close at 23:00 today.
The bike check-in will start at 20:00 today.
All athletes will receive an update by e-mail shortly with further information.

हर्पेन यांना खूप शुभेच्छा!
(मी त्यांच्या उखाणे धाग्यावर नंतर कधीतरी आयर्नमॅन स्पर्धेचे उखाणे लिहीण्याची अ‍ॅक्टीव्हीटी करेन.) Happy

हर्पेन

लै च भारी
खूप खूप शुभेच्छा !

हर्पेन यांना शुभेच्छा. मी काल जिम मधे 10 min each Trade mill, cycling, cross trainer आणि 5 min each stair climber and rowing machine केले. आज पावसामुळे बाहेर जाता आले नाही

Pages