आपला मायबोलीकर हर्पेन उर्फ हर्षद पेंडसे येत्या 17 सप्टेंबर रोजी इटली मधील आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेत आहे. आतापर्यंत लडाख मॅरेथॉन, हिमालयन ट्रेक्स, चादर ट्रेक आणि चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा असे अनेक आव्हानात्मक साहसी उपक्रम यशस्वी रित्या पार पडणारा हर्पेन हे आव्हान देखील यशस्वी पूर्ण करेल यात शंकाच नाही.
माझ्या माहितीनुसार मायबोलीवर पूर्ण आयर्नमॅन करणारा तो पहिलाच आहे ( सिम्बा उर्फ अतुल यांनी हाफ आयर्न मॅन केली आहे आणि तेही लवकरच पूर्ण करतील, त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा).
फक्त धावपळ नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारा हर्षद वेगळेच रसायन आहे. त्याने मागे खारदुंग ला चेलेंज (लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची) मध्ये भाग घेण्याचे ठरवले होते त्यावेळी मेळघाटातील मैत्री या संस्थेला निधी जमवण्यासाठी मदत म्हणून ही स्पर्धा समर्पित केली होती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
यामुळे या उपक्रमाला नुसत्या तोंडी शुभेच्छा देण्यापेक्षा आम्ही मायबोलीकर मित्र मंडळी वेगळ्या प्रकारे त्याला शुभेच्छा देणार आहोत.
येत्या रविवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता किमान 5 किमी अंतर धावून त्याला सक्रिय पाठिंबा देणार आहोत.
आणि जास्तीत जास्त मायबोलीकरांनीही त्यात सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.
त्यादिवशी प्रत्येकाने काहीतरी झेपणेबल अॅक्टीव्हीटी करावी किंवा आधी केली नसेल तर यानिमित्ताने सुरुवात करावी असा विचार करुन ही लिंक बनवली आहे. ५ किमी धावता येत नसेल तर ५ किमी चाला किंवा १०किमी सायकलिंग करा किंवा ५० दोरीवरच्या उड्या मारा, अगदीच ६० वर्षांचे असाल तर जिन्याच्या ५० पाय-या चढा-उतरा. सगळे वेगळ्या ठिकाणी असलो तरी मोटो एकच असल्याने एक सकारात्मक ऊर्जा हर्पेनपर्यंत आपण नक्की पोहोचवू शकू. शिवाय नविन काहीतरी सुरु करायला हे मोठ्ठं निमित्तही आहेच.
https://www.strava.com/clubs/330771/group_events/1243680?_branch_match_i...
इथे तुम्ही तुमचा सहभाग नोंदवू शकता
https://apps.apple.com/in/app/strava-run-ride-hike/id426826309
सफरचंदी लोकांसाठी ही लिंक
https://www.ironman.com/im-emilia-romagna-athletes
ही स्पर्धेची वेबसाईट
इथं त्याला ट्रॅक करू शकता
अरे वाह, जबर्रदस्त !!
अरे वाह, जबर्रदस्त !!
तुम्ही तर काय थांबतच नाही..
ईथवर पोहोचणे हिच एक अचिव्हमेंट आहे.. तरी ईटलीचा किल्ला सर करून तुम्ही मायबोलीचा झेंडा युरोपात फडकवावा यासाठी शुभेच्छा !
वाह वा हर्पेन. अभिमान वाटतो
वाह वा हर्पेन. अभिमान वाटतो तुमचा. तुम्हाला शुभेच्छा.
येत्या रविवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता किमान 5 किमी अंतर धावून त्याला सक्रिय पाठिंबा देणार आहोत. >>> मस्तच.
त्यादिवशी प्रत्येकाने काहीतरी झेपणेबल अॅक्टीव्हीटी करावी >>> सहभाग नोंदवत नाही पण प्रयत्न करेन काहीतरी त्यावेळी, चालणं किंवा जिने चढ उतर.
खुप खुप शुभेच्छा हर्पेन!!
खुप खुप शुभेच्छा हर्पेन!!
@आशु - ते हार्पेन च हर्पेन करता का प्लीज
वा हर्पेन ! कौतुकास्पद.
वा हर्पेन ! कौतुकास्पद.
तुम्हाला शुभेच्छा !
अरे वा!! खूप खूप शुभेच्छा!!
अरे वा!! खूप खूप शुभेच्छा!!
शुभेच्छा देण्याची आयडिया आवडली.
वाह वा हर्पेन. अभिमान वाटतो
वाह वा हर्पेन. अभिमान वाटतो तुमचा. तुम्हाला शुभेच्छा.
येत्या रविवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता किमान 5 किमी अंतर धावून त्याला सक्रिय पाठिंबा देणार आहोत. >>> मस्तच.
त्यादिवशी प्रत्येकाने काहीतरी झेपणेबल अॅक्टीव्हीटी करावी >>> मी सहभाग नोंदवला आहे. फार नाही पण दिवसभरात मिळून ३ किमी करीन.
हर्पेनना अनेक शुभेच्छा! त्या
हर्पेनना अनेक शुभेच्छा! त्या निमित्ताने मायबोली गटग होणार तर!
सहभाग नोंदवत नाही! पण रविवारी काहीतरी जरूर करेन चालणे इ..!
ग्रेट! खुप शुभेच्छा हर्पेन!!
ग्रेट! खुप शुभेच्छा हर्पेन!!
१) शुभेच्छा देण्याची आयडिया
१) शुभेच्छा देण्याची आयडिया आवडली.
२) हर्पेन त्या स्पर्धेत सहभागी होत आहे हेसुद्धा अभिमानास्पद.
३) अगदी १७/१८ शनिवार रविवारी नाही करणार काही अचाट 'सक्रिय पाठिंबा देण्यासाठी' पण थोडे पुढे मागे करू म्हणतो. टोपी आणि रुमाल टाकून ठेवतो.
हर्पेनला खूप शुभेच्छा!
हर्पेनला खूप शुभेच्छा!
१७ सप्टेंबरला नक्कीच सहभागी होईन!
हर्पेन खूप खूप शुभेच्छा!!
हर्पेन खूप खूप शुभेच्छा!!
त्यादिवशी प्रत्येकाने काहीतरी झेपणेबल अॅक्टीव्हीटी करावी - नक्कीच.
अरे वां!! खूप शुभेच्छा !!
अरे वां!! खूप शुभेच्छा !!
हर्पेन तुम्हाला या मोहिमेसाठी
हर्पेन तुम्हाला या मोहिमेसाठी खूप खूप शुभेच्छा. आशुचॅम्प यांची शुभेच्छा देण्याची कल्पनाही छानच आहे. मी नक्की सहभागी होईन
हर्पेन ला शुभेच्छा!!
हर्पेन ला शुभेच्छा!!
हर्पेन यांना खूप खूप शुभेच्छा
हर्पेन यांना खूप खूप शुभेच्छा!!
खूप खूप शुभेच्छा!
खूप खूप शुभेच्छा!
खूप खूप शुभेच्छा हर्पेन!!
खूप खूप शुभेच्छा हर्पेन!!
अरे वा!! वा!!!!!! आशुचँपजी
अरे वा!! वा!!!!!! आशुचँपजी खूप खूप धन्यवाद हा धागा केल्याबद्दल!!! अगदी माझ्या मनातलं तुम्ही साकार केलंत!!!!! आणि कन्सेप्ट छानच आणली सहभागाची! पण मी हर्पेनजींना शुभेच्छा वगैरे देणार नाही, कारण त्यांना त्याची काहीच गरज नाही!
मी 5 किमी चालेन हर्पेन ना
मी 5 किमी चालेन हर्पेन ना शुभेच्छा म्हणून
ते app Strava माझ्या मोबाईलवर चालत नाहीय..
पण मी चालेन
वा वा! हर्पेन आमच्याकून लई
वा वा! हर्पेन आमच्याकून लई लई शुभेच्छा!
हर्पेन त्या स्पर्धेत सहभागी
हर्पेन त्या स्पर्धेत सहभागी होत आहेत हे अभिमानास्पद.
शुभेच्छा देण्याची आयडिया देखील मस्त..!
अरे मस्त बातमी... अभिनंदन
अरे मस्त बातमी... अभिनंदन हर्पेन!!!
मी 5 तास नेटफ्लिक्स बघून पाठिंबा देईन म्हणतो...
अरे वा! मस्त हर्पेन. खूप खूप
अरे वा! मस्त हर्पेन. खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप शुभेच्छा !
खूप खूप शुभेच्छा !
खूप कौतुक आणि शुभेच्छा !
खूप कौतुक आणि शुभेच्छा !
हर्पेन, शुभेच्छा!
हर्पेन, शुभेच्छा!
मन:पूर्वक कौतुक आणि शुभेच्छा,
मन:पूर्वक कौतुक आणि शुभेच्छा, हर्षद!
आशिष, कल्पना आवडली. अवश्य प्रयत्न करते.
वा वा हर्पेन. खूप शुभेच्छा.
वा वा हर्पेन. खूप शुभेच्छा.
शुभेच्छा देण्याची आयडिया भारी आहे. 18ला काहीतरी करेन नक्की आणि नंतर जेवायला इटालियन पास्ता करेन.
खूप खूप शुभेच्छा harpen
खूप खूप शुभेच्छा harpen
हर्पेन यांना आयर्नमॅन
हर्पेन यांना आयर्नमॅन होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
शनिवारी/रविवारी सकाळी सकाळी चालणे+ पक्षीनिरीक्षण (हाही हर्पेन यांचा एक छंद आहेच) करून मी त्यांना सक्रिय शुभेच्छा देईन
हे नाहीच जमलं तर वरची पास्ता/ नूडल्सची कल्पनाही चांगलीच आहे!
Pages