कथाशंभरी - प्रार्थना - भास्कराचार्य

Submitted by भास्कराचार्य on 3 September, 2022 - 12:54

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......

"इतक्यात तिसरीही आली?!" ती चकित होऊन उद्वेगाने म्हणाली.

"माझी जुळी बहीण आहे ती." दुसरी खिन्नतेने म्हणाली.

"म्हणजे दोघींबद्दलही कळतं का त्यांना?" पहिलीने इवलुसा प्रश्न विचारला.

"हो! आता सगळंच कळतं आधीच ताई!" तिसरी शांतपणे म्हणाली.

"काय तरी बाई एकेक नवीन! आमच्या वेळी असलं काही नव्हतं!" पहिली उद्गारली.

"पण मग तुला कसं इकडे आणलं?"

"माझ्या नशिबात दूध होतं गं बाई!"

"आता आपण काय करूया?"

"प्रार्थना करूया. आईच्या मागचं हे दुष्टचक्र तरी सुटू दे!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशिबात दूध होतं हे वाक्य इतक्या वाईट अर्थाने क्वचितच वाचले असेल!>>अगदी

परिणामकारक झालेय.

फारच वाईट.
कथा अतिशय कमी शब्दात खूपच परिणामकारक.

Pages