आज सकाळी काळबादेवी भागात गेले होते. तिथे एका ठेल्यावर कोळशाची शेगडी ठेऊन एकजण भले मोठे पापड (बहुतेक पोह्याचे होते) भाजत होता. लगेच जाऊन बघितलं तर तो मसाला पापड विकत होता. एका कागदी प्लेटमध्ये भाजलेला पापड घेऊन मध्येच दाबून त्याचे मोठेमोठे तुकडे केले, त्यावर बटाटा, कोथिंबीर पसरली. मग काकडी, टोमॅटोचे तुकडे. त्यावर हिरवी आणि लाल चटणी. मग शेव आणि डाळ. एकदम हटके आणि सही प्रकरण होतं. रू. २० ला एक मसाला पापड. दोन खाल्ले की पोट भरलंच समजा.
आहा! हे नाव ऐकलं होतं. मी त्याला मसाला पापड द्या असं सांगितलं. (तरीच तो हे कोण बावळट? अशा नजरेनं माझ्याकडे बघत होता). काळबादेवीत बर्यापैकी नवनवीन प्रकार दिसले.
एका ठिकाणी उकडलेले बटाटे लाल मसाल्यात घोळून एकावर एक रचून ठेवले होते. शेजारी दहिवड्याचे वडे होते. बाकी भजी, बव असे ओळखीचे प्रकारही होते. त्या बटाट्यांचं काय प्रयोजन?
बित्तु, तुझ्याबरोबर एक काळबादेवी गटग करायला हवं की.
माधवबागेला उतरायच. माधवबागेच्या मागील बाजूस भुलेश्वर मार्केट आहे. तिथे अशा पारंपारिक खाण्या-पिण्याची रेलचेल तर असते. ऑथेंटिक गुज्जू थाळी अप्रतिम मिळते. तिथे भाजी मार्केटपण पाहण्यासारखे आहे. अनंत प्रकार!
ब्रास मार्केट (मोठमोठ्या समया, लामणदिवे, मूर्त्या इ.)
आता नवरात्रीच्या जरा आधी जा तिथे. ... खरच धमाल असते!
ओह ते खिचीया काय? मी तसे इंडिअन ग्रोसरीतून आणते बरेचदा पण मी मावेत करते आणि मला (कदाचीत त्यामुळे) त्यांची टेस्ट आवडली नाही..मग एकदा तळून पाहिले तर एकदम यम्मी.....;)
मामीचा रमझान
जल्ला खादाडी धागे वर आणून माशाच्या चर्चा...कीबोर्ड ओला झाला माझा
सीपीके (फिनिक्स) मधील मेन्युकार्ड बदलले आहे. पिझ्झा, पास्ता प्रकारात बरेच ऑप्शन्स दाखल झाले आहेत. मी मात्र त्यांच्या चिकन पिकाटाची चाहती. आधीच्या मेन्युत चिकन पिकाटासोबत स्पॅगेटी आपसूक येत असे. आता मात्र या स्पॅगेटीऐवजी इतर काही ऑप्शन्स मागवू शकता उदा. मॅश्ड पोटॅटो. मला ती स्पॅगेटीच आवडते म्हणून तीच (पिकाटा टिनी) ऑर्डर केली.
माझ्या एका कर्मदरीद्री मित्राने दिल्ली दरबारमध्ये फ्राईड राईस मागवला. तो ऑर्डर घेणाराही वेडा बनला. आम्ही त्याला समजावले पण त्याला फ्राईड राईस खायचाच मुड होता म्हणे
>>
दिल गया गधीपर तो परी भी क्या चीज हय
(मूळ पोस्ट २००९ ची आहे)
Submitted by बाळू जोशी. on 11 October, 2012 - 01:58
परवा गोमंतक ला भेट दिली.. पाऊण तास भर उन्हात वेटींग.. पण आत गेल्यावर पापलेट फ्राय थाळी खाल्ल्यावर बाहेर आल्यावर आपोआप मनात अन्नदाता सुखी भवः असं आले... नंतर समोरच्याच ठेल्यावर मीठा पान.. बड्डे मस्त साजरा झाला..
मुंबई २८ ची थाळी बंद झाली आहे. मात्र त्यांचं दुसरं रेस्टॉरंट रॉक्स!!! कालच तिथे डिनर केलं. प्रॉन्स गोवन स्टाईल करी, रावस मालवणी करी आणि गरमगरम भात. अंतरात्मा तृप्त. चुकवू नका. स्वप्ना, वाचतेयस ना?
नवर्यानं मागवलेलं सरसों का साग आणि मकई की रोटी ही अतिशय चविष्ट होतं.
दादर पुर्वेला 'पंजाबी तडका'
दादर पुर्वेला 'पंजाबी तडका' मधिल शाकाहारी पर्याय फारसे चांगले नाहीत.
चर्चगेटला अॅम्बेसेडर मधे 'लजीज कुंभ' हा भाजीचा प्रकार अप्रतिम होता. डेझर्ट मधे बनाना केक मस्त होता.
आज सकाळी काळबादेवी भागात गेले
आज सकाळी काळबादेवी भागात गेले होते. तिथे एका ठेल्यावर कोळशाची शेगडी ठेऊन एकजण भले मोठे पापड (बहुतेक पोह्याचे होते) भाजत होता. लगेच जाऊन बघितलं तर तो मसाला पापड विकत होता. एका कागदी प्लेटमध्ये भाजलेला पापड घेऊन मध्येच दाबून त्याचे मोठेमोठे तुकडे केले, त्यावर बटाटा, कोथिंबीर पसरली. मग काकडी, टोमॅटोचे तुकडे. त्यावर हिरवी आणि लाल चटणी. मग शेव आणि डाळ. एकदम हटके आणि सही प्रकरण होतं. रू. २० ला एक मसाला पापड. दोन खाल्ले की पोट भरलंच समजा.
मामी, तो माझाही आवडता खाऊ
मामी, तो माझाही आवडता खाऊ आहे. मी प्रिन्सेस स्ट्रीटला जातो तेव्हा नेहमी खातो.
त्या पापडाला खिचिया पापड असे म्हणतात.
आहा! हे नाव ऐकलं होतं. मी
आहा! हे नाव ऐकलं होतं. मी त्याला मसाला पापड द्या असं सांगितलं. (तरीच तो हे कोण बावळट? अशा नजरेनं माझ्याकडे बघत होता). काळबादेवीत बर्यापैकी नवनवीन प्रकार दिसले.
एका ठिकाणी उकडलेले बटाटे लाल मसाल्यात घोळून एकावर एक रचून ठेवले होते. शेजारी दहिवड्याचे वडे होते. बाकी भजी, बव असे ओळखीचे प्रकारही होते. त्या बटाट्यांचं काय प्रयोजन?
बित्तु, तुझ्याबरोबर एक काळबादेवी गटग करायला हवं की.
जरूर मामी! माधवबागेला
जरूर मामी!
माधवबागेला उतरायच. माधवबागेच्या मागील बाजूस भुलेश्वर मार्केट आहे. तिथे अशा पारंपारिक खाण्या-पिण्याची रेलचेल तर असते. ऑथेंटिक गुज्जू थाळी अप्रतिम मिळते. तिथे भाजी मार्केटपण पाहण्यासारखे आहे. अनंत प्रकार!
ब्रास मार्केट (मोठमोठ्या समया, लामणदिवे, मूर्त्या इ.)
आता नवरात्रीच्या जरा आधी जा तिथे. ... खरच धमाल असते!
(सिंधी पाणीपुरी मी प्रथम भुलेश्वरलाच खाल्ली होती)
तो तांदळाचा पापड ना ? सिंधी
तो तांदळाचा पापड ना ?
सिंधी लोकांचा पण असा प्रकार असतो.
( हरे राम सिनेमात एक सिंधी माणूस असे पापड विकताना दाखवलाय !)
(मामी चा रमझान चाल्लाय क्क्काय ? इफ्तारला असले मसाला बटाटा आयटम असतात, म्हणून विचारलं
)
बित्तु, धन्स. दिनेशदा .......
बित्तु, धन्स.
दिनेशदा .......
सुक्या मासळीची प्रिपरेशन करून
सुक्या मासळीची प्रिपरेशन करून खिलवणारं एखादं रेस्टॉरंट आहे काय आपल्या साम्राज्यात?
मामी,ठाण्यातल्या चरई भागात एक
मामी,ठाण्यातल्या चरई भागात एक आगरी रेस्टॉरंट आहे, त्याच्याकडे सुक्या मासळीचे पदार्थ मिळतात. फकस्त आगरी तिखट खायची आणि पचवायची तयारी हवी.
मामी मालवणी खायच असेल तर
मामी मालवणी खायच असेल तर शिवसेनाभवन कडच चैतन्य ट्राय करुन पाहील का? पण तिथे सुक्या गोलम्याचा फक्त किशमुर मिळतो. पण बाकीचे पदार्थ सुद्धा अप्रतीम असतात.
इथे मेन्यु आणि इतर माहिती आहे.
http://www.zomato.com/mumbai/restaurants/south/dadar/chaitanya-37064
त्यांची जगा मात्र छोटी आहे. होम डिलीव्हरी घेता येइल
हा त्यांचा रिव्हु.
http://www.finelychopped.net/2012/02/mumbais-malvani-marvel-chaitanya-da...
मामे, आता सुकट घरीच कर
मामे, आता सुकट घरीच कर
फिशलँडला फोन केला का?
इंद्राला विपु करून बघ. कदाचित त्याला माहीत असेल.
ओह ते खिचीया काय? मी तसे
ओह ते खिचीया काय? मी तसे इंडिअन ग्रोसरीतून आणते बरेचदा पण मी मावेत करते आणि मला (कदाचीत त्यामुळे) त्यांची टेस्ट आवडली नाही..मग एकदा तळून पाहिले तर एकदम यम्मी.....;)
मामीचा रमझान
जल्ला खादाडी धागे वर आणून माशाच्या चर्चा...कीबोर्ड ओला झाला माझा
मामी, ते खिचिया पापड
मामी, ते खिचिया पापड माटुंग्याला मिळतात विकत. आम्ही घरी आणून नुसते तळून खाल्ले होते तर मस्त वाटले.
बित्तु, धन्स रे. अजून फोनलं
बित्तु, धन्स रे. अजून फोनलं नाही. करते. लेकीच्या परीक्षेत बुडालेय.
मी रमझान आणि श्रावण एकदमच केला. दिवसा उपासाचे सात्विक पदार्थ आणि सूर्य मावळल्यावर बिर्याणी आदी सामिष पदार्थ. असे दोन्ही महिने कडकडीत पाळले.
मामी, ते खिचिया पापड
मामी, ते खिचिया पापड माटुंग्याला मिळतात विकत. >>> अगं कुठे ते पण सांग ना. वरच्या सरंजामासकट मिळतो का कुठे जवळपास? की काळबादेवीलाच जायला लागणार?
गुजराती दुकानात पन मिळतात.
गुजराती दुकानात पन मिळतात. उकडीच्या तांदूळाचे(खीचु) बनवतात गुजरती.
आजकाल कोणी खादाडी करायला जात
आजकाल कोणी खादाडी करायला जात नाही का करून इथे लिहित नाही?
नुकताच बॅस्किन रॉबिन्समध्ये लिची फ्लेवर ट्राय केला. मस्त! अल्फान्सो पण छान होता.
सीपीके (फिनिक्स) मधील
सीपीके (फिनिक्स) मधील मेन्युकार्ड बदलले आहे. पिझ्झा, पास्ता प्रकारात बरेच ऑप्शन्स दाखल झाले आहेत. मी मात्र त्यांच्या चिकन पिकाटाची चाहती. आधीच्या मेन्युत चिकन पिकाटासोबत स्पॅगेटी आपसूक येत असे. आता मात्र या स्पॅगेटीऐवजी इतर काही ऑप्शन्स मागवू शकता उदा. मॅश्ड पोटॅटो. मला ती स्पॅगेटीच आवडते म्हणून तीच (पिकाटा टिनी) ऑर्डर केली.
ठाण्यातल्या चरई भागात एक आगरी
ठाण्यातल्या चरई भागात एक आगरी रेस्टॉरंट आहे,
>>
नाव सांगा राव ऐन येळंला लै पंचाइत हुतीय. कुनाला इचारायची चोरी. म्हंत्यात नाव काय हय?
माझ्या एका कर्मदरीद्री
माझ्या एका कर्मदरीद्री मित्राने दिल्ली दरबारमध्ये फ्राईड राईस मागवला. तो ऑर्डर घेणाराही वेडा बनला. आम्ही त्याला समजावले पण त्याला फ्राईड राईस खायचाच मुड होता म्हणे
>>
दिल गया गधीपर तो परी भी क्या चीज हय
(मूळ पोस्ट २००९ ची आहे)
अंधेरी स्टेशनच्या बाहेर
अंधेरी स्टेशनच्या बाहेर मेरवान्स केक शॉप आणि पारसी डेअरी फार्म आहे तिथे काय चांगलं मिळतं ते कोणी सांगेल का?
परवा गोमंतक ला भेट दिली..
परवा गोमंतक ला भेट दिली.. पाऊण तास भर उन्हात वेटींग.. पण आत गेल्यावर पापलेट फ्राय थाळी खाल्ल्यावर बाहेर आल्यावर आपोआप मनात अन्नदाता सुखी भवः असं आले...
नंतर समोरच्याच ठेल्यावर मीठा पान.. बड्डे मस्त साजरा झाला.. 
अंधेरी स्टेशनच्या बाहेर
अंधेरी स्टेशनच्या बाहेर मेरवान्स केक शॉप आणि पारसी डेअरी फार्म आहे तिथे काय चांगलं मिळतं ते कोणी सांगेल का?
मेरवान्स मध्ये नावा प्रमाणेच केक :-).प्लम केक, मावा केक, अल्मंड केक अप्रतीम्...स्मुदि पण छान मिळते...
मस्का खारी पण मस्त्..
धन्यवाद वैशाली
धन्यवाद वैशाली
कफ परेडला world trade centre
कफ परेडला world trade centre मधले VILLAGE RESTAURANT छान वाटले. फक्त चाट आयटम्स इतके खास वाटले नाहीत. नॉन व्हेज चांगले होते.
स्वप्ना.. तुझ्याच हुकुमावरुन
स्वप्ना..:-)
तुझ्याच हुकुमावरुन मी तुला धन्यवाद म्हणत नाही..तू ही म्हणु नकूस्..फक्त केक खातान माझी आठवण काढ
नाव सांगा राव ऐन येळंला लै
नाव सांगा राव ऐन येळंला लै पंचाइत हुतीय. >> बाजो, एदलजी रोडवर दैनीक चायनीज खूप फेमस आहे. त्याच्या दोन इमारती बाजूलाच आहे ते. नाव बघून सांगतो.
मुंबई २८ ची थाळी बंद झाली
मुंबई २८ ची थाळी बंद झाली आहे. मात्र त्यांचं दुसरं रेस्टॉरंट रॉक्स!!! कालच तिथे डिनर केलं. प्रॉन्स गोवन स्टाईल करी, रावस मालवणी करी आणि गरमगरम भात. अंतरात्मा तृप्त. चुकवू नका. स्वप्ना, वाचतेयस ना?
नवर्यानं मागवलेलं सरसों का साग आणि मकई की रोटी ही अतिशय चविष्ट होतं.
मात्र त्यांचं दुसरं रेस्टॉरंट
मात्र त्यांचं दुसरं रेस्टॉरंट रॉक्स!
>> ते कुठाय?
शेजारीच.
शेजारीच.
Pages