मामी, आम्हीही काही वर्षांपूर्वी गेलो होतो - एकदाच. मला जाम सर्दी झाली होती आणि डोकं पण दुखत होतं तरी ठरवलेला प्रोग्राम करायचाच म्हणून गेलो होतो. तर आमच्याही टेबलाजवळ ते वाजवणारे आले. १-२ गाणी आम्ही ऐकून घेतली मग भावाने त्यांना सांगितलं की तुमचं म्युझिक छान आहे पण माझ्या बहिणीला बरं नाहीये. मग ते गेले. खरं तर मला त्यांच्याबद्दल थोडं वाईटच वाटलं. आपल्या इथे ही कल्पना नवीन आहे.
तरी नशीब त्या अवचटांशी गाठ पडली नाही. तुम्ही ते हॉटेल सुरु झाल्या झाल्या गेला होतात काय? आजकाल ते असं येऊन बिझनेस कार्डस देतील असं वाटत नाही.
Submitted by स्वप्ना_राज on 21 October, 2010 - 00:58
'थाळी मराठमोळी' मध्ये खाऊन आले. फिडबॅक लिहिण्याआधी हेही लिहायला हवं की ह्यातले बरेचसे पदार्थ आपल्या सगळ्यांच्या घरी निरनिराळ्या पध्दतीने बनवले जात असणारच त्यामुळे प्रत्येकाचं ह्याबद्दल मत वेगळं असू शकतं.
तर प्रथम त्या दिवशीचा मेनू:
तळलेला पापड, भजं, अळूवडी,मठ्ठा, पंचामृत, बीटचं दह्यातलं रायतं - मला दोन्ही वेळेला पालकच्या पानाचं भजं मिळालं ते छान होतं. मातोश्रींना एकदा बटाट्याचं भजं आलं, त्यांच्या मते बटाट्याचे काप जाड होते आणि नीट शिजले नव्हते. अळूवडी, मठ्ठा छान वाटले. पंचामृत आम्हा कोणालाच आवडलं नाही. बीट न उकडता त्याचं रायतं केल्याने ते वातड लागत होतं.
फ्लॉवर, बटाटा भाजी आणि फुलके - भाजी चांगली होती, मुख्य म्हणजे उगाच जास्त तेल नव्हतं आणि फ्लॉवरला कधीकधी एक उग्र वास येतो तो नव्हता. फुलक्यांचा रंग पाहून प्रथम मला ही बाजरीची भाकरी आहे की काय अशी शंका आली. चव चांगली होती.
ताकाची कढी, गोडी डाळीची आमटी, मूग्/चवळी आमटी, अळूची भाजी, कारल्याची रसभाजी - आमच्या घरी कढी बर्यापैकी तिख्ट करतात त्यामानाने ही कढी कमी तिखट होती, चव चांगली होती. गोडी डाळीची आमटी छान होती. तिसरी आमटी माझ्या मते सालासकट मूगाची होती पण मातोश्रींच्या मते चवळीची होती - आवडली. सगळ्यात छान होती ती अळूची पातळ भाजी. अळू हा प्रकार मला फारसा आव्डत नाही. आमच्याकडे अळूची आमटी करतात आणि ती तिखट असते. पण ही भाजी जरा गोडसर होती आणि मी चक्क २ वेळा घेतली. हे पाहून मातोश्री जवळजवळ बेशुध्द पडल्या. कारलं हा प्रकार मी माझ्या आयुष्यात प्रथम आणि शेवटचा इथे खाल्ला. त्यामुळे मी काही लिहित नाही कारण काही लोकांना कारलं आवडतं.
साधा भात, वरण आणि मसालेभात - भातात साधा भात + वरण किंवा मसालेभात - विथ साजूक तुपाची धार असा ऑप्शन होता. मी मसालेभात घेतला पण त्याला फारशी चव नव्हती.
आमरस आणि खव्याचे गुलाबजाम - आमच्याकडे आमरस आंबा पिळून करतात त्यामुळे मिक्सरमधून आंब्याच्या फोडी काढून बनवलेला आमरस मला फारसा आव्डत नाही. गुलाबजामवर वरून साखर पेरली होती (हा बहुधा त्या कारल्याच्या भाजीवरचा उतारा असावा!).
थाळीची बेसिक किंमत - २६५ रुपये. ह्यावर व्हॅट वगैरे नंतर.
सिटींग अरेन्जमेन्ट - खालच्या मजल्यावर ५ टेबलं. त्यातली २ शेजारी शेजारी २ लोक बसू शकतील एव्हढीच. वर किती टेबलं आहेत ह्याचा अंदाज नाही. जागा थोडी कमी असल्याने गर्दी वाटू शकते.
सर्व्हिस - तत्पर स्टाफ. पुन्हा पुन्हा वाढायला येत होते.
एकूण मत - घरगुती जेवण कधी बाहेर खावंसं वाटलं तर तृप्तीला चांगला पर्याय वाटतो.
मामी, मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं कारण प्रत्येकाच्या घरी हेच पदार्थ बनवण्याची पध्दत तशीच त्या व्यक्तीची आवडनिवड वेगळी असू शकते. उदाहरणच घ्यायचं झालं तर आमच्याकडे तिखट अळू करतात ते मला आवडत नाही पण इथली गोडसर भाजी फार आवडली. कोणाच्या घरी अशी गोडसर भाजी करत असतील तर त्याला/तिला थाळीतली भाजी खास नाही असं वाटू शकेल.
टीप: माझा ह्या हॉटेलशी 'एक खाणारी" ह्यापलीकडे काही संबंध नाही. पण अगदी जाऊच नये इतपत वाईट हे जेवण नक्कीच नव्हतं. कधी कधी आपल्याला बाहेर खायचं असतं पण जेवण फार जड होऊ नये असं वाटत असतं. अश्या वेळेस एकदा तरी ही थाळी ट्राय करायला हरकत नाही असंच मला वाटतं.
दादर पूर्वेला दादासाहेब फाळके रोड वर अरोमा हॉटेल आहे. तिथे अरोमा स्पेशल डिश चांगली असते. ३५० ला आहे पण ४ जणांना आरामात पुरते. उपलब्ध असल्यास सुरमई कोळीवाडा डीप फ्राय पण चांगली मिळते.
तसेच करिष्मा हॉटेल मध्ये फिश प्लाटर( १००० :P) मस्त मिळते.
मराठमोळी थाळी चा खाद्यानुभव मी सुद्धा आज घेतला. चव चांगली पण मेनूमधे फार काही कल्पनाशक्ती नव्हती. सर्वसामान्यपणे बनवले जाणारे मराठी पदार्थच होते. दिवा महाराष्ट्राचा' मधे वेगळा अनुभव येतो त्यामानाने. पण अर्थातच तिथले दरही तसे आहेत. अॅम्बियन्स ठीकठाकच.
>>चव चांगली पण मेनूमधे फार काही कल्पनाशक्ती नव्हती. सर्वसामान्यपणे बनवले जाणारे मराठी पदार्थच होते.
अनुमोदन, निरनिराळ्या महाराष्ट्रीयन कम्युनिटीजची खासियत असलेले पदार्थ - उदा.चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचं वालाचं बिरडं - थाळीत समाविष्ट केले तर बाकीच्या हॉटेलात मिळणार्या थाळीपेक्षा वेगळी वाटेल.
मुंबई २८ ची सुप्रसिध्द चांदिच्या थाळीतली मेजवानी चाखली.
मी गेले त्यावेळचा मेन्यु : छोटुले समोसे, फ्लॉवरची भजी, ताक, मुगाची उसळ, पालकाची बेसन लावलेली भाजी, वांग्या-बटाट्याची भाजी, गुजराती गोड आमटी, कढी, चपाती, मसालेभात, वरण-भात, रबडी, राघवदास लाडू, पापड.
काय चांगलं वाटलं:
१. रिझनेबल
२. तेल, मीठाचा कमी वापर
३. प्रत्येक पदार्थाची चव वेगळी
४. गरमगरम आणून वाढतात.
५. भजी, मुगाची उसळ, रबडी अतिशय चविष्ट होते.
सुधारणेला वाव :
१. वेटर्सची स्वच्छता, ट्रेनिंग खुपच कमी पडलय. एकजण आमच्या समोरच आरशात बघून स्वतःच्या केसावर पाणी लावून ते चापूनचोपून बसवत होता. (मला बाहेर गेल्यावर माझं स्वच्छतेचं इंद्रियं बंद करून ठेवता येतं म्हणून निभावतं)
२. जागा अतिशय कमी.
३. हात धुण्याच्या जागेपाशी कचरा वगैरे. तिथेच पाणी पिण्याचे ग्लास, ताक अशा गोष्टी ठेवलेल्या.
४. सर्व्हिस अति हळू. गिर्हाईकाकडे लक्ष द्यायला हवं ही वृत्तीच नाही. दोन्-तीन जण आजूबाजूला घुटमळत होते पण काही हवं तर आम्हाला त्यांना बोलावून सांगायला लागत होतं. सांगितल्यावर देखिल तत्परता कमीच.
५. त्यांची आपापसात बोलणी सुरू होती जे अतिशय वैतागवाणं होतं. वरच्या मजल्यावर एक टाय लावलेला इसम, जो मॅनेजर असावा, मोबाईलवर अखंड बोलत होता.
६. राघवदार लाडू हॉरीबल होता. कच्चा वाटला.
७. आमटी अति गोड आणि फारच गुज्जु वाटली. आपल्या पध्दतीची करायला हवी होती.
८. कार्डानं पेमेंट केलं तर त्या प्रोसेसला तब्बल २० मिनिटं लावून दाखवली.
९. फारच रस्त्यावर वाटतं.
१०. त्यांना डिटेलमध्ये फीडबॅक द्यायचा विचार होता पण कोणाला त्याबद्दल काही पडल्याच वाटलं नाही.
फास्टफूडसाठी खाऊगल्ली बेस्टे... पिझ्झासाठी jazz by the bay.. गुजराथी थाळीसाठी सम्राट, पंचवटी, नरीमन पॉइंटला येणार असशील तर स्टेटस आहे, चायनीज किंवा सिझलर्ससाठी रेलिश आहे, पंजाबीसाठी अन्सा आहे.
मामी, आम्हीही काही
मामी, आम्हीही काही वर्षांपूर्वी गेलो होतो - एकदाच. मला जाम सर्दी झाली होती आणि डोकं पण दुखत होतं तरी ठरवलेला प्रोग्राम करायचाच म्हणून गेलो होतो. तर आमच्याही टेबलाजवळ ते वाजवणारे आले. १-२ गाणी आम्ही ऐकून घेतली मग भावाने त्यांना सांगितलं की तुमचं म्युझिक छान आहे पण माझ्या बहिणीला बरं नाहीये. मग ते गेले. खरं तर मला त्यांच्याबद्दल थोडं वाईटच वाटलं. आपल्या इथे ही कल्पना नवीन आहे.
तरी नशीब त्या अवचटांशी गाठ पडली नाही. तुम्ही ते हॉटेल सुरु झाल्या झाल्या गेला होतात काय? आजकाल ते असं येऊन बिझनेस कार्डस देतील असं वाटत नाही.
चल गं... सुरू होऊन बक्कळ दिवस
चल गं... सुरू होऊन बक्कळ दिवस झाले होते.
दादर , मुंबई २८
दादर , मुंबई २८
दादरला मारुती मन्दीराशेजारचा
दादरला मारुती मन्दीराशेजारचा सौराष्ट्र मधे पन समोसा, जिलेबी छान मिळते....
बालमोहनचा वडा तर आल-टाईम फेमस
प्रकाश कडील साबुदाना वडा, आस्वादमधली मिसळ, पणशीकरान्कडील पियुष, सामन्त ब्रदर्सकडील श्रीखन्ड, हाजीअलीच सरदार पावभाजीवाला, तर अफलातून....
दादर मुंबई २८ मध्ये अक्षय
दादर मुंबई २८ मध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मराठी थाळी सुरु करण्यात येणार आहे असं पेपरात वाचलं.
स्वप्ना, हातच्या काकणाला आरसा
स्वप्ना, हातच्या काकणाला आरसा कशाला?
दादर मुंबई २८ ची जाहिरात मी
दादर मुंबई २८ ची जाहिरात मी पण पाहिली पेपरात... आता धाड टाकायलाच हवी.
मामी, मंजूडी - खाऊन आलात तर
मामी, मंजूडी - खाऊन आलात तर इथे नक्की पोस्टा.
ही थाळी चांदीच्या ताट-वाटीत
ही थाळी चांदीच्या ताट-वाटीत मिळणार आहे म्हणे!
अरे व्वा! जे कोणी जाणारं असेल
अरे व्वा! जे कोणी जाणारं असेल त्यांनी प्रचि नक्कीच टाका इथे...
मी मागे गेले होते तेव्हा तिथे
मी मागे गेले होते तेव्हा तिथे मराठी काहिच नव्हते
कुणी गेलं तर लिहा म्हणजे परत जायला
'थाळी मराठमोळी' मध्ये खाऊन
'थाळी मराठमोळी' मध्ये खाऊन आले.
फिडबॅक लिहिण्याआधी हेही लिहायला हवं की ह्यातले बरेचसे पदार्थ आपल्या सगळ्यांच्या घरी निरनिराळ्या पध्दतीने बनवले जात असणारच त्यामुळे प्रत्येकाचं ह्याबद्दल मत वेगळं असू शकतं.
तर प्रथम त्या दिवशीचा मेनू:
तळलेला पापड, भजं, अळूवडी,मठ्ठा, पंचामृत, बीटचं दह्यातलं रायतं - मला दोन्ही वेळेला पालकच्या पानाचं भजं मिळालं ते छान होतं. मातोश्रींना एकदा बटाट्याचं भजं आलं, त्यांच्या मते बटाट्याचे काप जाड होते आणि नीट शिजले नव्हते. अळूवडी, मठ्ठा छान वाटले. पंचामृत आम्हा कोणालाच आवडलं नाही. बीट न उकडता त्याचं रायतं केल्याने ते वातड लागत होतं.
फ्लॉवर, बटाटा भाजी आणि फुलके - भाजी चांगली होती, मुख्य म्हणजे उगाच जास्त तेल नव्हतं आणि फ्लॉवरला कधीकधी एक उग्र वास येतो तो नव्हता. फुलक्यांचा रंग पाहून प्रथम मला ही बाजरीची भाकरी आहे की काय अशी शंका आली. चव चांगली होती.
ताकाची कढी, गोडी डाळीची आमटी, मूग्/चवळी आमटी, अळूची भाजी, कारल्याची रसभाजी - आमच्या घरी कढी बर्यापैकी तिख्ट करतात त्यामानाने ही कढी कमी तिखट होती, चव चांगली होती. गोडी डाळीची आमटी छान होती. तिसरी आमटी माझ्या मते सालासकट मूगाची होती पण मातोश्रींच्या मते चवळीची होती - आवडली. सगळ्यात छान होती ती अळूची पातळ भाजी. अळू हा प्रकार मला फारसा आव्डत नाही. आमच्याकडे अळूची आमटी करतात आणि ती तिखट असते. पण ही भाजी जरा गोडसर होती आणि मी चक्क २ वेळा घेतली. हे पाहून मातोश्री जवळजवळ बेशुध्द पडल्या.
कारलं हा प्रकार मी माझ्या आयुष्यात प्रथम आणि शेवटचा इथे खाल्ला. त्यामुळे मी काही लिहित नाही कारण काही लोकांना कारलं आवडतं.
साधा भात, वरण आणि मसालेभात - भातात साधा भात + वरण किंवा मसालेभात - विथ साजूक तुपाची धार असा ऑप्शन होता. मी मसालेभात घेतला पण त्याला फारशी चव नव्हती.
आमरस आणि खव्याचे गुलाबजाम - आमच्याकडे आमरस आंबा पिळून करतात त्यामुळे मिक्सरमधून आंब्याच्या फोडी काढून बनवलेला आमरस मला फारसा आव्डत नाही. गुलाबजामवर वरून साखर पेरली होती (हा बहुधा त्या कारल्याच्या भाजीवरचा उतारा असावा!).
थाळीची बेसिक किंमत - २६५ रुपये. ह्यावर व्हॅट वगैरे नंतर.
सिटींग अरेन्जमेन्ट - खालच्या मजल्यावर ५ टेबलं. त्यातली २ शेजारी शेजारी २ लोक बसू शकतील एव्हढीच. वर किती टेबलं आहेत ह्याचा अंदाज नाही. जागा थोडी कमी असल्याने गर्दी वाटू शकते.
सर्व्हिस - तत्पर स्टाफ. पुन्हा पुन्हा वाढायला येत होते.
एकूण मत - घरगुती जेवण कधी बाहेर खावंसं वाटलं तर तृप्तीला चांगला पर्याय वाटतो.
वा छान. नॉनव्हेजही आहे का?
वा छान. नॉनव्हेजही आहे का?
मामी, मला नाही वाटत मेन्यु
मामी, मला नाही वाटत
मेन्यु वगैरे काही नव्हता. त्यामुळे शाकाहारी का निमिषाहारी हा पर्याय नसावा.
मग मी घाई करणार नाही
मग मी घाई करणार नाही जाण्याची. नाहीतरी तुझ्या रीव्हूवरून काही खासम खास वाटत नाहीये.
मामी, मी आधी म्हटल्याप्रमाणे
मामी, मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं कारण प्रत्येकाच्या घरी हेच पदार्थ बनवण्याची पध्दत तशीच त्या व्यक्तीची आवडनिवड वेगळी असू शकते. उदाहरणच घ्यायचं झालं तर आमच्याकडे तिखट अळू करतात ते मला आवडत नाही पण इथली गोडसर भाजी फार आवडली. कोणाच्या घरी अशी गोडसर भाजी करत असतील तर त्याला/तिला थाळीतली भाजी खास नाही असं वाटू शकेल.
टीप: माझा ह्या हॉटेलशी 'एक खाणारी" ह्यापलीकडे काही संबंध नाही. पण अगदी जाऊच नये इतपत वाईट हे जेवण नक्कीच नव्हतं. कधी कधी आपल्याला बाहेर खायचं असतं पण जेवण फार जड होऊ नये असं वाटत असतं. अश्या वेळेस एकदा तरी ही थाळी ट्राय करायला हरकत नाही असंच मला वाटतं.
अच्छा. धन्स स्वप्ना.
अच्छा. धन्स स्वप्ना.
पण स्वप्ना, किंमत रुपये २६५/-
पण स्वप्ना, किंमत रुपये २६५/- असेल तर मी आस्वाद, तृप्ती, दत्तात्रय, प्रकाश हीच हॉटेलं पसंत करेन
दादर पूर्वेला दादासाहेब फाळके
दादर पूर्वेला दादासाहेब फाळके रोड वर अरोमा हॉटेल आहे. तिथे अरोमा स्पेशल डिश चांगली असते. ३५० ला आहे पण ४ जणांना आरामात पुरते. उपलब्ध असल्यास सुरमई कोळीवाडा डीप फ्राय पण चांगली मिळते.
तसेच करिष्मा हॉटेल मध्ये फिश प्लाटर( १००० :P) मस्त मिळते.
मराठमोळी थाळी चा खाद्यानुभव
मराठमोळी थाळी चा खाद्यानुभव मी सुद्धा आज घेतला. चव चांगली पण मेनूमधे फार काही कल्पनाशक्ती नव्हती. सर्वसामान्यपणे बनवले जाणारे मराठी पदार्थच होते. दिवा महाराष्ट्राचा' मधे वेगळा अनुभव येतो त्यामानाने. पण अर्थातच तिथले दरही तसे आहेत. अॅम्बियन्स ठीकठाकच.
दत्त बोर्डिंग मधे कोणी जात
दत्त बोर्डिंग मधे कोणी जात नाही का?
आराम आता बन्द पडले आहे.
आराम आता बन्द पडले आहे.
हो ना, गुजराती थाळी मिळायचं
हो ना, गुजराती थाळी मिळायचं एक चांगलं ठिकाण गेलं.
आता हॉटेल प्रिशा म्हणून एका हॉटेलची अॅड येते लोकसत्तात. हा पहा त्याचा रिव्ह्यू - http://www.timeoutmumbai.net/food/eating_out_details.asp?code=262&source=5
>>चव चांगली पण मेनूमधे फार
>>चव चांगली पण मेनूमधे फार काही कल्पनाशक्ती नव्हती. सर्वसामान्यपणे बनवले जाणारे मराठी पदार्थच होते.
अनुमोदन, निरनिराळ्या महाराष्ट्रीयन कम्युनिटीजची खासियत असलेले पदार्थ - उदा.चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचं वालाचं बिरडं - थाळीत समाविष्ट केले तर बाकीच्या हॉटेलात मिळणार्या थाळीपेक्षा वेगळी वाटेल.
सीकेपी पदार्थ - व्हेज,
सीकेपी पदार्थ - व्हेज, नॉन्व्हेज मिळणारं चिंबोरी होतं आस्वादच्या जरा पुढे. मी कधी गेले नाही पण बहिण सांगायची छान होतं. पण तेही बंद झालं.
परेल डेपो समोरचं जयहिंद रीनोव्हेट केलं आहे. तिथे आताआताच लागोपाठ दोनवेळा सुरमई करी आणि भात खाऊन आले. फारच छान होतं.
यस, इटस् टेम्टिंग...
यस, इटस् टेम्टिंग...
मुंबई २८ ची सुप्रसिध्द
मुंबई २८ ची सुप्रसिध्द चांदिच्या थाळीतली मेजवानी चाखली.
मी गेले त्यावेळचा मेन्यु : छोटुले समोसे, फ्लॉवरची भजी, ताक, मुगाची उसळ, पालकाची बेसन लावलेली भाजी, वांग्या-बटाट्याची भाजी, गुजराती गोड आमटी, कढी, चपाती, मसालेभात, वरण-भात, रबडी, राघवदास लाडू, पापड.
काय चांगलं वाटलं:
१. रिझनेबल
२. तेल, मीठाचा कमी वापर
३. प्रत्येक पदार्थाची चव वेगळी
४. गरमगरम आणून वाढतात.
५. भजी, मुगाची उसळ, रबडी अतिशय चविष्ट होते.
सुधारणेला वाव :
१. वेटर्सची स्वच्छता, ट्रेनिंग खुपच कमी पडलय. एकजण आमच्या समोरच आरशात बघून स्वतःच्या केसावर पाणी लावून ते चापूनचोपून बसवत होता. (मला बाहेर गेल्यावर माझं स्वच्छतेचं इंद्रियं बंद करून ठेवता येतं म्हणून निभावतं)
२. जागा अतिशय कमी.
३. हात धुण्याच्या जागेपाशी कचरा वगैरे. तिथेच पाणी पिण्याचे ग्लास, ताक अशा गोष्टी ठेवलेल्या.
४. सर्व्हिस अति हळू. गिर्हाईकाकडे लक्ष द्यायला हवं ही वृत्तीच नाही. दोन्-तीन जण आजूबाजूला घुटमळत होते पण काही हवं तर आम्हाला त्यांना बोलावून सांगायला लागत होतं. सांगितल्यावर देखिल तत्परता कमीच.
५. त्यांची आपापसात बोलणी सुरू होती जे अतिशय वैतागवाणं होतं. वरच्या मजल्यावर एक टाय लावलेला इसम, जो मॅनेजर असावा, मोबाईलवर अखंड बोलत होता.
६. राघवदार लाडू हॉरीबल होता. कच्चा वाटला.
७. आमटी अति गोड आणि फारच गुज्जु वाटली. आपल्या पध्दतीची करायला हवी होती.
८. कार्डानं पेमेंट केलं तर त्या प्रोसेसला तब्बल २० मिनिटं लावून दाखवली.
९. फारच रस्त्यावर वाटतं.
१०. त्यांना डिटेलमध्ये फीडबॅक द्यायचा विचार होता पण कोणाला त्याबद्दल काही पडल्याच वाटलं नाही.
पुन्हा जाईनच असं नाही.
लोणी आणी थालीपीठ खाण्यासाठी
लोणी आणी थालीपीठ खाण्यासाठी तांबे आरोग्य भुवनला जरुर भेट द्या.
चर्चगेटला...चांगल हॉटेल
चर्चगेटला...चांगल हॉटेल सांगा..
दुपारच्या जेवणा साठी...प्रश्न फारच बाळबोध आहे..
पर्याय हवे आहेत...
फास्टफूडसाठी खाऊगल्ली

Pages