खादाडी: दादर, माटुंगा

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:29

दादरच्या आसपासची खादाडी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी कधी म्हणजे काय? फिरतं हॉटेल आहे की काय? फूटपाथच्या उजव्या बाजूला म्हणजे डायरेक रस्त्यावरच की.. Wink

ग्लोबल फ्युजन , लिंक स्क्वेअर मॉल ,बॅन्ड्रा लिंकींग रोड
इथला बुफे - पॅन एशिअन स्प्रेड इतका मोठा आणि चांगला आहे की पुरेपुर पैसा वसुल, स्टार्टर मधे नॉन व्हेज / व्हेज भरपुर व्हरायटी.

विकडेज/ विकेण्ड /दुपार /रात्र वेगवेगळे रेट्स आहेत. साधारण ७०० ते ९०० च्या दरम्यान, १० वर्षाखालील मुलाना ५०% ऑफ, एकंदरीत स्प्रेड बघता व्हॅल्यु फॉर मनी.

फोर्ट भागात अजुनही टीकुन असलेले अस्सल गोमांतक भोजनालय म्हणजे प्रदीप गोमांतक. माशांची अस्स्सल चव चाखायची असेल तर जवळपास असलेले महेश किंवा अपुर्व लंच होम टाळा आणि इकडे जा. मात्र चकाचक अ‍ॅम्बिअन्स / धुवट स्वच्छता हवे असेल तर ते मात्र ईथे नाही मिळणार. डी एन रोड वरुन सिटि बँकेपासुन जो रस्ता जातो (gunbow street) त्या रस्त्यावर आयडिअल कॉर्नर ( पारसी फुड जॉईंट) समोर ही छोटेखानी खानावळ आहे. स्वस्त आणि मस्त .रविवारी बंद

अमरसन्स-प्रेमसन्स च्या शेजारीच एक छोटसं फास्टफुड सेंटर आहे. त्याच्याकडे व्हेज सँडविच वगैरे मस्तच असतं. पण त्यातही खास म्हणजे त्याची पाणीपुरी, शेवपुरी वगैरे. एकदम चविष्ट, चटपटीत. पाणीपुरीच्या (रु. ७०)पुर्‍यांचा आकारही इतरत्र मिळणार्‍या पुर्‍यांपेक्षा मोठाच असतो. शेवपुरीत (रु. ७०) तो एक त्याची खास चटणी घालतो अन त्यामुळेच ती अतिशय झक्कास लागते.

पाटिल, प्रदीप की प्रताप?
तिथे प्रताप नावाचे रेस्टॉरंट आहे. तिथले पदार्थ चांगले वाटले पण सर्व्हीस अतिशय स्लो आहे.

पाटील, फोर्ट-गोमांतकात पापलेट खाऊन मला अन्न-विषबाधा झाली होती. २ दिवस हास्पिटलात होतो. लई वर्सं झाली त्याला! पण चव बाकी अस्सल होती. Happy

मामी ग्रिल्ड व्हेज सँडविच जबरी असते तिथले. पण त्या फास्टफूड्सेंटर मधे अशक्य गर्दी असते.. वॉटरमेलन स्लश पण सही असतो तिथला.

बित्तु- चविष्ट असेल खास करुन मासे तर आम्ही विष पण पचवु , jokes apart, मी वर लिहल्याप्रमाणे स्वच्छतेची जरा बोंब आहेच तेथे.

लोक्स, दादरला टायटन शोरुमसमोर बहुतेक नेहमीचा हुरडेवाला बसायला लागला आहे असं दिसतंय. दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी बसमधून जाताना त्याला ओझरता पाहिला. ह्या विकांताला जाऊन खात्री करून घेईन. Happy

काल गिरगावात गेलो होतो, खोताच्या वाडीच्या दोनेक लेन पुढे समर्थ भोजनालय आहे, अगदी टीपीकल भोजनालय म्हणजे भिंतीला समांतर बाकडी आणी त्यामधुन लगबग करणारा एकमेव वाढपी. चव मात्र जिभेवर रेंगाळणारी. तिसर्‍या , मोरी , हलवा, सुरमई, कोळंबी, मांदेली, पापलेट जे काय उपल्ब्ध असेल ते उत्तम , चिकन /मटन नाही खाल्ले पण चांगलेच असावे. गुरुवार बंद, इतर दिवशी रांगेत उभ रहायच्या तयारीने जा.
समर्थ भोजनालय
Building No 22/ B, Rele Building, Krantiveer Rajguru Marg, Girgaon

हेच ते @ बित्तु, बाकी ते त्या लेखातले कोर्ट कचेरीचे प्रकरण अजुन चालुच असावे, त्या भोजनालया बाहेरच त्या बिल्डींग मालकाने ही खानावळ अनधिकृतरीत्या चालवली जात असल्याचा बोर्ड लावलाय Wink
त्याच लेखात उल्लेखलेल्या प्रदिप गोमंतक बद्दल मी वर लिहलेय . यात आणि एक उल्लेखलेली जागा म्ह़णजे 'ग्रँट हाऊस कँटीन' अर्थात पोलिस कँटिन , इथला खिमा म्हणजे ... तोंडाला पाणी, त्याबद्दलचा पुंलंचा अभिप्राय त्या रेस्टॉरंटमधे फ्रेम करुन लावलाय

सिटीलाईट मार्केट समोर राम पंजाब बार आहे, टिपिकल बार अस्ल्याने बाकी खाणे नेहमीचेच कारण ईथे जाणारे बहुतेक फक्त पीण्यासाठिच जातात. ईथला खास चखणा म्हणजे बटाटेवडे. लिंबाच्या आकारचे छोटे छोटे वडे ( एका प्लेट मधे आठ) अतिशय चविष्ठ आणि तिथली स्पेशॅलीटी.
IMG-20130330-00957.jpg

मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी या बीबी वरुन मुंबईतल्या पुर्वी रात्रि उशिरा (अगदी पहाटे पर्यंत ) खात्रीने खायला मीळेल अशा जागा आठवल्या. हल्ली रात्रीचे फिरणे होत नसल्याने या जागा रात्री उशिरा उघड्या असतात की नाही याची कल्पना नाही.( बहुतेक जागा हल्ली १ वाजाय्च्या आधी बंद होतात असे ऐकुन आहे)
१. भगवती पाव भाजी - राम लेन, ईराणी वाडी कांदिवली (प) इथे रात्री तवा पुलाव, पावभाजीसाठी वेटींग असायचे
२.अमर ज्युस सेंटर ईर्ला/कुपर हॉस्पीटल
३.अंधेरी ( प) स्टेहन लगतची गल्ली जिथे दिवसभर चपलांचे आणि कप्ड्याचे स्टॉल्स असतात.
४. दादर टीटी मिलन समोरचे ज्युस सेंटर
५. दिल्ली दरबार -कामाठीपुरा - ईंजीनिरींग कॉलेजच्या दिवसात पहाटे जर भुक लागली तर हमखास इथे जायचो, तीथे भरपुर मिळणारा रायता हे खास अ‍ॅट्रॅक्शन
६.दादर स्टेशन पश्चिमे बाहेर मिळणारा चॉकलेट चहा.

विकांताला फिनिक्स्मध्ये गेले होते. बिग बझारच्या बाहेर मस्त पाणीपुरी खाल्ली. खुसखुशीत पुर्‍या आणि झक्कास पाणी. एका प्लेटीला ५० म्हणजे भाव महाग आहे पण त्याचं काही वाटू नये अशी चव होती. बहुतेक स्टॉलवर जास्त गर्दी नसेल म्हणून तब्येतीने बनवून दिली असेल कदाचित.

टीजीआयएफ वाल्यांनी मेन्यूचा पार कचरा केलाय. सगळ्या चांगल्या डिशेस २ कोर्स लंच आणि डिनरमध्ये दडपल्या आहेत. हा मेन्यू फक्त सोम-शुक्र असतो. विकांताचा मेन्यू खास नाही. एशिया ७ मध्ये अप्रतिम Pad Thai Noodles खाल्ल्या. पैसा वसूल.

थाळी मराठमोळी जाऊन तिथे 6th Street Yogurt आलं आहे. Crepes वगैरे मेन्यूमध्ये दिसल्या. अजून ट्राय केलं नाही. कोणी केल्यास इथे लिहाल का?

नमस्कार सर्वांना,
११ एप्रिल (गुढीपाडवा) रोजी सासु बाईंची साठी आहे.. तरी सर्व फॅमिली ला (६ वयस्क आणि २ मुलं) यांना बाहेर डिनर करायचा आहे.
तरी दादर आणि माटुंगा भागात मराठमोळ जेवण आणि चांगल हॉटेल सुचवा ना.. गुढीपाडवा असल्याने गर्दी जिथे नसेल असं सुचवा..(नाहीतर कुठे आणलय असे भाव नको)
(संपुर्ण धागा वाचुन काढला आहे )

राखी, या भागात मराठमोळं जेवण हवं तर गोवा पोर्तुगिजात जावं लागेल. तसं आस्वाद वगैरे मध्येही मिळेल पण अँबियन्स अगदी खास प्रसंगाकरता नाहीये. तब्येतीत जेवायचं असेल तर तिथे जाऊन फायदा नाही.

पण हा धागा वाचताना असं लक्षात आल की गोवा पोर्तुगाज चांगले नाही म्हणुन.. आताच कलिग ने लोअर परेल च ग्रेप्वाईन म्हणुन आहे तो पर्याय दिला आहे कुणी गेले आहे का कधी??

गो.पो. पेक्षा आस्वाद बेस्टच... तसेच जिप्सी आणि पो.चर्च कडे जाणार्‍या रस्त्यावर प्रकाश आहेच.

इंद्रा अरे त्यांना गुढीपाडव्याचं जेवण जेवायचंय. गोपो चवीला आणि अँबियन्सला चांगलंय.

Pages