खादाडी: दादर, माटुंगा

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:29

दादरच्या आसपासची खादाडी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मी दादरमध्ये एस के बोले रोडवर आहे, इथे पुरेपुर कोल्हापूर सोडलं तर मी नॉन व्हेज खायला कुठे जाऊ. माबोकरांपैकी कोणी आहे का जवळ्पास, मला जेवायला कंपनी द्यायला?

इंडियनच पाहिजे असं आहे का? तसं नसेल तर तमनक थाई (कॅडल रोड) चांगलं आहे. मसाला झोन (लॅक्मे च्या समोर), हिंदुजाच्या बाजूला स्टॅटस.

चैतन्य मध्ये जेवला नसलात अशी आशा आहे. बेचव, जळजळीत जेवण. पैसे पाण्यात. पुरेपुर कोल्हापुर, सिंधुदुर्ग सुध्दा नकोच. सायबिणी गोमांतक चांगलं होतं.

एक नवी इटरी आली आहे. इट ऑल फ्रेश - हाऊस ऑफ कबाब्स. दत्तात्रयच्या समोर. म्हणजे आता प्रकाश जिथे तात्पुरतं शिफ्ट झालंय तिथे जवळ आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी तिथे मालवणी चिकन घेतलं होतं. एक्दम झक्कास! ह्या आठ्वड्यात बिर्यानी पण ट्राय करणार आहोत.

मूव अ‍ॅण्ड पिक च्या फ्रॅन्कीमध्ये पूर्वीची मजा नाही आता Sad आम्ही बंद केलं खायचं.

दिनेशदा, आमच्याकडे आणलं पूर्णब्रम्ह. पण खरं सांगायचं तर ते बघून माझी पूर्ण निराशा झाली. बरेचसे पदार्थ सर्वसाधारण मराठी घरात करतात तेच आहेत. पारंपारिक पदार्थ खूप कमी दिलेत. चिकू आणि साय घातलेलं चिकूचं रायतं, रशियन सॅलड किंवा कोथिंबीर-चीज पुलाव असल्या रेसिपीज ह्या पुस्तकात बघून आश्चर्य वाटलं. ह्यापेक्षा मायबोलीवर जास्त पारंपारिक रेसिपीज मिळतील. Sad

बडे मिया मध्ये मोठ्या उत्साहाने गेलो होतो. नाम बडे और दर्शन छोटे चा प्रत्यय आला. सर्वसाधारणपणे रेस्टॉरन्टसमध्ये एक डिश मागवली तर २ लोकांना पुरेशी एव्हढी तरी असतेच असते. इथे मात्र माझी आजी म्हणायची तसं 'आडजिभेने खाल्लं तर पडजिभ बोंब मारेल' एव्हढी छोटी डिश. सल्ली बोटी मागवली तर मटन शिजलेलं नव्हतं. फिरनीही काही खास नव्हती. पुन्हा पाय ठेवायचा नाही अशी प्रतिज्ञा करून बाहेर पडले. Sad

बडे मिया बद्दल अनुमोदन, आधी बैदा रोटी, बिर्याणी वैगरे आवडायची बाकी कबाब वैगरे कितीही ऑर्डर करा कमीच अशी परिस्थीती . गेल्याच आठवड्यात फाईव स्पाईस मधे वेटींग होते म्हणून तिथे गेलो तर क्वान्टीटी खूप कमी वाटली . आता पुन्हा जाणार नाही असा कानाला खडा लावला.
फाईव स्पाईस वेटींग असेल तरी परवडेल. ग्रूप मधे जायला उत्तम.

काही अपडेट्स :

मोशे चे बरेच आउटलेटस आहेत. त्यांच्या केम्प्स कॉर्नर वरच्या क्रॉसवर्डमधल्या आउटलेटमध्ये पेस्टो चिकन सँडविच मस्त आहे. पॅलेडियमच्या तळमजल्यावरच्या रेस्टॉरंटमधील मेनकोर्समधील ग्रिल्ड चिकन म हा न.

पॅलेडियम मध्येच पंजाब ग्रिलच्या शेजारच्या रसोवर मधिल थाळी ओके ओकेच.

गुड अर्थमधिल टेस्टिंग रुम मधिल स्मोक्ड चिकन सुप, सी-स्पून ब्रॉथ आणि सगळे ज्युसेस मस्त आहेत.

महेश लंच होम मधिल क्रॅब टकाटक मसाला महाबेक्कार. नुसतीच मसाल्याची चव. प्रचंड महागडा क्रॅब सिलेक्ट केला होता त्याची चव त्या मसाल्यात गायब झाली होती. वैताग!

तसंही महेश लंच होमची चव आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. त्यापेक्षा जयहिंद उत्तम.

लोणावळ्याच्या क्लाउड ९ मध्ये दाल खिचडी खाली ती फारच उत्कृष्ट होती. सोबतीला प्रचंड पाउस आणि खिडक्यांतून आत घुसणारे ढग होते. Happy

पॅलेडियममधिल एशिया ७ बंद झालं. लेकीला तिथली नॉनव्हेज सुशी प्लॅटर किती आवडायची. १० दिवसांपूर्वीच जाऊन आलो आणि आता परवा गेलो तर बंद! Sad

काय सांगतेस काय मामी? एशिया ७ बंद झालं? आत्ता तर नवा शेफ आणून त्यांनी मेन्यू चेन्ज केला होता. Sad

कार्टर रोड वरचं Corniche ब्रन्च साठी मस्तच. तिथलं लन्डनर (ह्याच्यासोबत बेकन एक्स्ट्रा मागून घ्या) आणि बर्लिनर ट्राय करायलाच हवं.

मेनलॅन्ड चायना, सोबो सेन्ट्रल मध्ये चिकन तैपेई

आयरिश हाऊस - ऑनिअन रिंग्ज

चिलिज, पवई - स्पायसी चिकन सॅलड, parmesan crusted chicken

टेस्टींग रुम - फिश अ‍ॅन्ड चिप्स, आलापेनो चिकन रेसोटो

बांद्र्याचं कॅन्डीज (रेक्लेमेशन जवळ आहे ते छोटं आहे) मस्त आहे. खूप छान व्हरायटी असते तिथे.

खाबुगिरी अपडेटस :

मोशेचं स्मोक्ड सामन सँडविच मस्त असतं. पण त्यांच्याकडची कोणतीही मॉकटेल्स अतिच गोड असतात.

मोशेकडचेच विकायला ठेवलेले जॅम्स अतिशय विविध कॉम्बोमध्ये असतात आणि मस्तच असतात. जरा जास्त गोड वाटले पण आपण कमी लावायचे ब्रेडला. हाकानाका.

त्यांची कॉम्बो पाहिली कीच लक्षात येईलः

“I’m all mixed up”

Indulge in the mysterious combination of freshly picked fruits bottled up with adventure. Spread them or simply eat a spoonful, these varied concoctions are all natural and preservative free.

Orange & Saffron Jam - हा मी आणलाय.
Apple & Cinnamon Jam
Sweet Chilli Jam
Watermelon & Rose Jam
Papaya & Cinnamon Jam
Strawberry Jam
Indian Gooseberry Jam
Pear & Vanilla Jam
Pear & Ginger Jam
Green Apple & Kiwi Jam
Orange & Apricot Jam - हा मी आणलाय.
Pineapple Orange Jam
Forest Honey
Kumquat Preserve

फूडहॉलमधे हनी रोस्टेड वॉलनट्स, हनी रोस्टेड काजू / बदाम / मिक्स नटस असे मस्त प्रकार मिळू लागले आहेत. भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा.

आजच हॉलिडे इन, साकिनाका इथे ओण्णम निमित्त केरळी साद्य जेऊन आले. छान होतं जेवण. बराच मोठा स्प्रेड होता. नॉनव्हेजमध्ये मटन बिर्याणी महान होती. व्हेज प्रकारातले सगळे केरळी प्रकार अतिशय चविष्ट होते. दोन प्रकारची पायसम होती. मज्जा आली.

परवाच अंधेरीला रस्त्यावरून जात असताना 'द बनाना लीफ' या रेस्टॉरंटमध्ये ओण्णम साद्य मिळेल असं वाचलं होतं. इच्छुकांनी थोडी सर्चासर्ची केली तर अजूनही मिळत आहे का किंवा कसे हे कळेल आणि त्यानुसार योग्य ती अ‍ॅक्शन घेता येईल.

तर ते एशिया ७ चं प्रकरण इथेच संपलं नाही. त्याचा एक भाग २ निर्माण झाला - आपोआपच. काय झालं की दिवाळीच्या सुटीत भटकंतीवरून परत येत असताना गुडगावातल्या अँबियन्स मॉलमध्ये गेलो. तर तेथे एशिया ७ जिवंत आणि लाथा मारत होतं की! झालं म्हणजे तिथे सुशी खाण्यावाचून पर्याय उरलाच नाही. गेलो तिथे तर तो शेफ जातीनं आमच्या टेबलापाशी हजर! कारण मुंबईचाच शेफ आता दिल्लीला गेला होता आणि मुंबईची नेहमीची गिर्‍हाईकं इथेही उपटलीत म्हटल्यावर त्यालाही आनंद झाला (म्हणे).

तर त्याने दिलेल्या अपडेटनुसार पॅलेडियमचं स्वतःचं एशियन रेस्टॉरंट आहे म्हणून त्यांनी एशिया७ ला त्यांची मुदत संपल्यावर गाशा गुंडाळायला लावला. आता एशिया ७ एकतर वांद्रे किंवा मग वाशी या ठिकाणी जागा बघत आहे. आमेन!

पण तसं पाहिलं तर पॅलेडियममध्ये एशिया७ च्या जागी मेनलँड चायना येतंय. त्यांच्याशी पॅलेडियमचे इंटरेस्ट क्लॅश होत नाहीत वाटतं!

मामे, गुडगावात आली होतीस तर एक फोन तरी करायचा होतास. मीही आलो असतो एशिया ७ मध्ये. Happy
त्याआधी UnderDogs मध्ये जाणं आवश्यक Wink

ओहो, तरी म्हटलं असं कसं एशिया७ गायब झालं. कारण त्यांनी नुकताच नवा शेफ आणला होता. बान्द्राला आलं तर बरंच होईल.

आता राजधानीचं रसोवरा पण बंद झालं. सेराफिना रेनोव्हेशन साठी बंद. मेनलॅन्ड चायना अजून यायचंय.

रच्याकने, बंगलो ९ मध्ये काही दिवसांपूर्वी गेलो होतो तर निराशा पदरी आली. एक पिझ्झा आणायला किती तो वेळ. परत पायरी चढ्णार नाही.

मामी, https://www.zomato.com/mumbai/tertulia-dadar-shivaji-park ट्राय केलंस का? झक्कास आहे.

मामी, tertulia ला जाऊन आलीस की नाही?

ओह कलकत्ता, फ्राईड फिश आणि कोशा मांगशो (कधीही मटन न खाणारी मी ह्या डिशची पूर्ण पंखा)

टॅको बेल - चलुपा आणि टॉप्ड नॅचॉज......यम्म्म

होकी पोकी आईसक्रीम - एन्जल अ‍ॅपल पाय आईसक्रीम

Byblos, high street pheonix, आधी कोमलाज होतं तिथे....मेन्यू वेगळा आहे. पण किंमतीच्या मानाने क्कांटीटी कमी वाटली. Shawarma आणि Leek & Parmesan Crème brûlée झक्कास.

नाही. कोमला चेन्नईमधेही नाहीये. भारतातून त्यांनी गाशा गुंडाळला आहे. सिंगापूरमध्ये अजून आहे का ते माहित नाही.

ओह मामी, मी त्यांची थाळी खूप मिस करणार आहे. Sad रच्याकने लोक्स, मुंबईत बर्गर किंगने दुसरी शाखा हाय स्ट्रीट फिनिक्स मध्ये उघडली आहे. Happy

मी मरीन लाइन्सच्या फाइव स्पाइस मध्ये गेले होते. गाजावाजा केला गेला होता त्यापेक्षा फ़ुसक निघाले. चव काही ख़ास वाटली नाही. त्यामानाने दर थोड़े चढ़े वाटले .

रच्याकने , आम्ही लॉन्ग ड्राईव्ह्ला म्हणून शनिवारी रात्रि १ - १:३० वाजता फिनिक्स मॉल , वरळी नाका , हिन्दुजा हॉस्पिटल वगैरे एरियात फिरत होतो .
इथे कुठे नाईट फूड्ची सोय आहे का?
काहितरी चमचमित स्ट्रीट फूड हवं होतं पण दूकान , टपर्या बन्द होत्या .
शेवटी परत येताना , मालाड ला एका दूकानात आईसक्रीम मिळालं , तेव्ह्ढच समाधान .

स्वस्ति, यावेळेला दादर स्टेशन - सुविधाजवळ फन्डू पावभाजी/ तवा पुलाव, बैदापावची गाडी असते आणि मग त्यावर विजयनगर - फुलमार्केटला चॉकलेट टी प्यायचा. (चॉकलेट हा चहाचा रंग, फ्लेवर नव्हे! Wink )

सोबो सेन्ट्रल मधल्या मेनलॅन्ड चायना मध्ये खाल्लेलं चिकन तैपेई आवडलं होतं. म्हणून फिनिक्समधल्या मेनलॅन्ड चायना मध्ये मोठ्या उत्साहाने गेलो. फार लिमिटेड मेनू वाटला. pad thai चांगलं होतं पण साबुदाण्याच्या खिचडीला लाजवेल एव्हढं दाण्याचं कूट होतं त्यात. khao soi तर एव्हढी पिवळी दिसत होती की पुलंच्या पुस्तकातला 'केत़की पिवळी पडली' चा उल्लेख आठवला. कोकोनट मिल्क नुस्तं ओतलं होतं त्यात. कैच्या कैच. परत जाणार नाही आता. Sad

ओह्ह हा धागा खूप कामाचा आहे, निवडक दहात.

फुलमार्केटला चॉकलेट टी प्यायचा.
>>>>>
हा भाई असतो का अजून. कॉलेजात असताना स्टडीनाईटला एकदा मध्यरात्र उलटून गेल्यावर आम्ही तीन मित्रांनी चहाच्या शोधात दिड तास पायपीट केल्यावर हा चॉकलेट टी प्यायचा योग आलेला. आता चव आठवत नाही नेमकी, पण तेव्हा अमृततुल्य लागली असावी एवढे नक्की!

Pages