खादाडी: दादर, माटुंगा

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:29

दादरच्या आसपासची खादाडी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक्स, दादरला रानडे रोडवर टायटनच्या शोरुमच्यासमोर हुरडेवाला बसायला लागला आहे. काल संध्याकाळीच त्याच्याकडून घेतला.

दादरच्या रानडे रोडवरच्या सर्वोदयमध्ये बेळगावी मसूर (१८० रुपये १ किलो) आणि बेळगावी हिरवे वाटाणे (पाव किलो ३५ रुपये) आले आहेत. Happy

धन्यवाद स्वप्ना.

बेळगावी मसूर (१८० रुपये १ किलो) आणि बेळगावी हिरवे वाटाणे (पाव किलो ३५ रुपये) >> पण हे असले भाव? बब्बो!

मागच्या रविवारी फोर्ट भागात चक्कर झाली. प्रताप लंच होम- जन्मभूमी मार्ग -फोर्ट ला इतक्या वर्षात जायचे राहुन गेले होते ते काम पुरे केले. इथला मांसाहारी खास करुन माशांचा मेनू भरपूर मोठा आणि मस्त आहे. चव बाजुच्या महेश लंच होम आणि अपूर्वा च्या तोडीची किंवा कांकणभर सरस.

मी दादरमध्ये एस के बोले रोडवर आहे, इथे पुरेपुर कोल्हापूर सोडलं तर मी नॉन व्हेज खायला कुठे जाऊ. माबोकरांपैकी कोणी आहे का जवळ्पास, मला जेवायला कंपनी द्यायला?

एस के बोले रोडवर चैतन्य नावाचे एक रेस्टॉरंट आहे नाव ऐकले आहे पण कधी योग आला नाही. मामी म्हणतात त्याप्रमाणे जय हिंद बेस्टच.

वेल जेवली असशील एव्हाना... पण सुचवायचंच झालं तर सेनाभवन जवळचं सायबिणी उत्तम होतं... कोलंबी भरलेलं फ्राय पापलेट खासियत आहे त्यांची.

आज झालं जेवून. आता सोमवार मंगळ्वार बुधवार पुढचा शुक्रवार बरेच दिवस शिल्लक आहेत माझे इथे. कोणी येणारे का इथे जेवायला तर मला कंपनी मिळेल. .

नरेश माने - चैतन्यच नावच शोधत होते. आता चैतन्य शोधते. धन्स.

मामी येतेयस का जेवायला इथे? स्वप्ना_राज?

स्वप्नसुंदरी - मला कंपनी मिळूच दे, हेच खाणात पहिलं. एका दगडात दोन पक्षी, नव्हे एका डिशात दोन मासे.

जिप्सी च्या जवळ मिळणारी ' पिक अ‍ॅन्ड मूव्ह' ची चिकन फ्रॅकी ऑल टाईम फेवेरेट. शिवाजी पार्क ला गेल्यावर फ्रॅकी खाणे मस्ट आहे. Happy

सामी, आज घरी जाताना खाणार पिक अ‍ॅन्ड मूव्ह' ची चिकन फ्रॅकी. जेवायच्या वेळी घरी जाणार ना म्हणून. सोबत कलिग आहे पण ती वेजिटेरियन. त्यामुळे फ्रॅन्कीसारखे फिंगर फूड बरे.

तू ये बुधवारी आपण जाउ जेवायला.

किर्ती कॉलेजच्या अशोक वडापाववाल्याकडे काय खायच? वडापाव का चुरापाव का भजीपाव? आणि पार्सल मिळतं का?

किर्ती कॉलेजच्या अशोक वडापाववाल्याकडे काय खायच? वडापाव का चुरापाव का भजीपाव? आणि पार्सल मिळतं का?>>>>>>>> काहिहि खा सगळच बेस्ट . पार्सलपण मिळतं.

कालच गेलेले... पणशीकराशेजारच्या तांबे उपहारगृहात. नवर्‍याच्या कलिगने छोटेखानी पार्टी दिली. त्याला काहीतरी खिलवायचं होतं म्हटलं हेवी नको आणि विसावा वै. नेहमीच जातो जरा वेगळं...
तिथे मिसळ, कोथीम्बीर वडी आणि खरवस ट्राय केलं. अप्रतिम!! खरवस तर ऑल टाईम फेवरेट आहेच. पणशीरांकडे पियुष मात्र नाही पिता आलं Sad

फ्रँकी ट्राय करायचीये... बघुया आता कधी फेरी होतेय ते!

अशोक वडापाववाल्याकडे भजीपाव मिळत नाही आता. Sad

ड्रीमगर्ल - तांबे कुठे आहे?

सामी - मूव अ‍ॅण्ड पिक कडे वेज फ्रॅन्की खाली. चिकन फ्रॅन्की पुन्हा केव्हा तरी.

पणशीकराशेजारच्या तांबे उपहारगृहात. >>> हे पणशीकर वेगळे आणि रानडे रोडचे पणशीकर वेगळे.

वेल, सुविधा दुकानासमोर तांबे उपहार गृह आहे. लागू बंधुंच्या दुकानाच्याखाली. प्लाझाकडून कबुतर खान्याकडे जायच्या रस्त्यावर. तू दादरला नक्की कुठे जातेस ते सांग, म्हणजे मी तुला कुठे काय खा ते सांगू शकेन.

वेल अग वेज फ्रॅन्की कसली खातेस? खायची तर चिकन फ्रॅन्की च.
वडापाव का चुरापाव का भजीपाव? > वडापाव मधे पण चुरा टाकून मिळतो. पार्सल नेऊ नये. शक्यतो तिथेच खाल्लेला चांगला.:-)

मी पोर्तुगीज चर्चच्या जवळ आहे. शिवरंजनी अगरबत्ती / म्युझिकच्या बाजूच्या गल्लीत.

ह्या दोन पणशीकर तर वेगळेच शिवाय गिरगावचे पणशीकरसुद्धा वेगळे. गिरगाववाले आता पार्ला आणि घाटकोपर मध्ये सुद्धा आहेत.

सामी ह्या दोन तीन दिवसात जाईन चिफ्रॅ खायला. तू कधी येणारेस? वडापावचं पार्सल नेलं होतं घरी जाईस्तोवर ओले झाले. पण चटणीने मजा आली.

अग्गं मग काय परवा इथे तिथे जेऊ कुठे विचारत बसली होतीस... पो.च.च्या बरोब्बर समोरच सिंधूदुर्ग की मालवण किनारा कायसंसं हॉटेल आहे तिथे अप्रतिम मांसाहारी जेवण मिळतं (म्हणे!).

मंजूडी माझ्या यायच्या जायच्या वेळेला माकि नेहमी बंद दिसतं आणि माझ्याकडे रिव्यु नव्हता कसं आहे. शिवाय कंपनी नाही ग. तुम्ही कोण कधी येताय ते सांगा मग मी जाउ शकेन.

उद्या कुणी दादरला जाणार असाल तर ...

आहार आणि आरोग्य यांचा समतोल साधत रूचीपालट आणि रूचीवैविध्याला चालना देतानाच आरोग्याचे तंत्र सांभाळणाऱ्या तब्बल १२० पाककृतींची माहिती देणारे 'पूर्णब्रह्म' हे पुस्तक 'लोकसत्ता'तर्फे प्रकाशित होत आहे. विशेष म्हणजे या सर्व पाककृती वैद्य खडीवाले यांनी सिद्ध केल्या आहेत. या पुस्तकाइतकाच त्याचा प्रकाशनसोहळादेखील वाचकांसाठी उपयुक्त ठरणार असून त्यात वाचकांच्या आहारविषयक शंकांचे निरसन थेट वैद्य खडीवाले हेच करणार आहेत.
बुधवार २३ एप्रिल रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात दुपारी चार वाजता प्रकाशन समारंभ होणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने प्रवेश, या नियमानुसार या कार्यक्रमात वाचकांना सहभागी होता येणार आहे.
गोल्ड विनर प्रस्तुत, 'पितांबरी'द्वारा सहप्रायोजित आणि ड्रिम व्हेकेशन्सने पुरस्कृत केलेले 'पूर्णब्रह्म' हे मासिकाच्या आकारातील 'लोकसत्ता'चे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीच्या पंगतीला पूर्णत्व देणारे मानाचे पान ठरणार आहे!

हे पणशीकर वेगळे आणि रानडे रोडचे पणशीकर वेगळे. >> असं आहे होय!!
मला दादरला मांसाहारी फक्त सायबिणीच आवडलं...

Pages