जिप्सी मध्ये पिठलं-भाकरी खाल्ली. पिठलं मिक्सरमधून काढल्यासारखं स्मूथ होतं. पण मला चव फारशी आवडली नाही. अमृत कोकम मात्र झक्कास होतं. रच्याकने, कोपर्यावरच्या केमिस्टशेजारी आता 'मॅड ओव्हर डोनटस' चं आऊटलेट आलंय. मी आत जाऊन पाहिलं पण जवळजवळ सगळ्याच डोनट्सवर चॉकोलेट होतं त्यामुळे काही घेतलं नाही
Submitted by स्वप्ना_राज on 8 September, 2011 - 13:34
सैतान चौकी एसटी डेपोच्या शेजारी असलेल्या Sixth Sense ला लागुन एक Veg restaurant आहे. ह्या वेळी तेथे गेलो होतो. चांगले आहे. मोकळे आणि स्वच्छ उजेड... चवही छान वाटली.
शितल बुखारा, खार टेलीफोन एक्सचेंजच्या गल्लीत, मला फार आव्डते. कित्येक वर्ष जातोय पण पदार्थाच्या चवीत जराही बदल नाही. महागडे वाटते पण worth spending ONCE.
कांदिवलीचे Red India (नाव बरोबर असावे. SV Roadवर आहे) एकदम बकवास आहे. पुर्ण व्हेज असल्यामुळे गुज्जुंची बरीच गर्दी असते. Mexican, Italian, Indo-Chinese मेन्यु आहे.
बोरिवलीतील इंद्रप्रस्थ बाहेर अतिशय छान उकडलेले चणे मिळतात. मला तसे चणे फार आवडत नाहित पण येथील थोडेसे भेळीसारखे असतात. एकदा खाऊन बघण्यास हरकत नाही.
१. दादर, मुंबई २८ मधली चिकन बिर्याणी
२. Mah Jong, एस व्ही रोड, खार मध्ये Chicken Fry with Honey Chilli आणि चिकन क्ले पॉट राईस
3. Cinnabon, पाली मार्केट - Cinnamon sticks with cream. Yum!
Submitted by स्वप्ना_राज on 23 October, 2011 - 09:47
स्वप्ना_राज 'मॅड ओव्हर डोनटस' मधले डोनटस चवीला तितकेसे चांगले नाहीत so u didn't miss anything. त्यापेक्षा किती तरी पटींने चांगले डोनटस मागच्या गल्लीतील "अवन फ्रेश" मध्ये मिळतात.
हो काय? चला बरं झालं! पण "अवन फ्रेश" ची आठवण नका काढू हो सक्काळी सक्काळी तिथे ते बनाना वॉलनट मफिन्स झक्कास मिळतात.
रच्याकने, आजकाल हाय स्ट्रीट फिनिक्समध्ये फूडकोर्ट, नूडल बार सगळं रेनोव्हेशनसाठी बंद आहे. कोमलाजमध्ये सेट डोसा आणि कोर्मा ट्राय केला. सेट डोसा छान होता पण कोर्म्याची चव फार शार्प होती. मला अजिबात आवडली नाही
Submitted by स्वप्ना_राज on 4 November, 2011 - 01:22
बायांनो आणि बुवांनो, शिरोज मध्ये एक अनुभव घ्यायला जाच. अतिशय उत्कृष्ट अँबियन्स आणि अप्रतिम जेवण. शिरोज म्हणजे हार्ड रॉक कॅफे शेजारी आहे ते. हार्ड रॉक कॅफे मध्ये महाबेकार आणि बेचव खाणं मिळत असा माझा अनुभव आहे.
पंजाब ग्रिल ही फेवरेट. कोमलात कोणकोण जाऊन 'कोमला थाळी' खाऊन आलं त्यांनी हात वर करा! एकदा गेलात की पुन्हा जाणारच!
मध्यंतरी दादरच्या थमनक थाई मध्ये गेलो होतो. अतिशय उत्कृष्ट जेवण जेवले.
आभारी आहे. खरतर मी तुला विपुच
आभारी आहे.
खरतर मी तुला विपुच करणार होते.
अग खाउगल्ली वगैरे नाही जमणार सोबत वय वर्ष २ आहे. स्टेट्स आणि सम्राट हे दोन नेहमीचे ऑपश्न्स आहेत.
कुणी हिल्टन टॉवर मध्ये खाल्ल आहे का?
हिल्टन टॉवर कुठे
हिल्टन टॉवर कुठे आहे?
फाऊंटनला महेश लंच होम आहे. आयनॉक्समधे रुबी ट्युसडे आणि मोतीमहल हे दोन पर्यायही चांगले आहेत.
हाय कोर्टासमोर एक वैभव म्हणून
हाय कोर्टासमोर एक वैभव म्हणून उडपी हॉटेल आहे... तिथेही चांगले फूड मिळते.
काळाघोडा परिसरात र्हिदम
काळाघोडा परिसरात र्हिदम हाऊसच्या बाजूला चेतना रेष्टारंट आहे. एकदम टॉप आहे!
हो... चेतना चांगलं आहे.
हो... चेतना चांगलं आहे.
जिप्सी मध्ये पिठलं-भाकरी
जिप्सी मध्ये पिठलं-भाकरी खाल्ली. पिठलं मिक्सरमधून काढल्यासारखं स्मूथ होतं. पण मला चव फारशी आवडली नाही. अमृत कोकम मात्र झक्कास होतं. रच्याकने, कोपर्यावरच्या केमिस्टशेजारी आता 'मॅड ओव्हर डोनटस' चं आऊटलेट आलंय. मी आत जाऊन पाहिलं पण जवळजवळ सगळ्याच डोनट्सवर चॉकोलेट होतं त्यामुळे काही घेतलं नाही
सैतान चौकी एसटी डेपोच्या
सैतान चौकी एसटी डेपोच्या शेजारी असलेल्या Sixth Sense ला लागुन एक Veg restaurant आहे. ह्या वेळी तेथे गेलो होतो. चांगले आहे. मोकळे आणि स्वच्छ उजेड... चवही छान वाटली.
शितल बुखारा, खार टेलीफोन एक्सचेंजच्या गल्लीत, मला फार आव्डते. कित्येक वर्ष जातोय पण पदार्थाच्या चवीत जराही बदल नाही. महागडे वाटते पण worth spending ONCE.
कांदिवलीचे Red India (नाव बरोबर असावे. SV Roadवर आहे) एकदम बकवास आहे. पुर्ण व्हेज असल्यामुळे गुज्जुंची बरीच गर्दी असते. Mexican, Italian, Indo-Chinese मेन्यु आहे.
बोरिवलीतील इंद्रप्रस्थ बाहेर अतिशय छान उकडलेले चणे मिळतात. मला तसे चणे फार आवडत नाहित पण येथील थोडेसे भेळीसारखे असतात. एकदा खाऊन बघण्यास हरकत नाही.
स्वप्ना, मग तू दिवा
स्वप्ना, मग तू दिवा महाराष्ट्रातल्या पिठल्याला स्मूदीच म्हणशील. पैसे जास्त आणि आव असा की बघा, या तळागाळातल्या पदार्थाला आम्ही किती वर आणलंय.
>>या तळागाळातल्या पदार्थाला
>>या तळागाळातल्या पदार्थाला आम्ही किती वर आणलंय.>>
मंजू :-p
>>स्वप्ना, मग तू दिवा
>>स्वप्ना, मग तू दिवा महाराष्ट्रातल्या पिठल्याला स्मूदीच म्हणशील
तिथे नाही बुवा जाणार कधी..
गेल्या काही दिवसात मुंबईत
गेल्या काही दिवसात मुंबईत खाल्लेले छान पदार्थः
१. दादर, मुंबई २८ मधली चिकन बिर्याणी
२. Mah Jong, एस व्ही रोड, खार मध्ये Chicken Fry with Honey Chilli आणि चिकन क्ले पॉट राईस
3. Cinnabon, पाली मार्केट - Cinnamon sticks with cream. Yum!
स्वप्ना_राज 'मॅड ओव्हर डोनटस'
स्वप्ना_राज 'मॅड ओव्हर डोनटस' मधले डोनटस चवीला तितकेसे चांगले नाहीत so u didn't miss anything. त्यापेक्षा किती तरी पटींने चांगले डोनटस मागच्या गल्लीतील "अवन फ्रेश" मध्ये मिळतात.
हो काय? चला बरं झालं! पण "अवन
हो काय? चला बरं झालं! पण "अवन फ्रेश" ची आठवण नका काढू हो सक्काळी सक्काळी
तिथे ते बनाना वॉलनट मफिन्स झक्कास मिळतात.
रच्याकने, आजकाल हाय स्ट्रीट फिनिक्समध्ये फूडकोर्ट, नूडल बार सगळं रेनोव्हेशनसाठी बंद आहे.
कोमलाजमध्ये सेट डोसा आणि कोर्मा ट्राय केला. सेट डोसा छान होता पण कोर्म्याची चव फार शार्प होती. मला अजिबात आवडली नाही 
बायांनो आणि बुवांनो, शिरोज
बायांनो आणि बुवांनो, शिरोज मध्ये एक अनुभव घ्यायला जाच. अतिशय उत्कृष्ट अँबियन्स आणि अप्रतिम जेवण. शिरोज म्हणजे हार्ड रॉक कॅफे शेजारी आहे ते. हार्ड रॉक कॅफे मध्ये महाबेकार आणि बेचव खाणं मिळत असा माझा अनुभव आहे.
पंजाब ग्रिल ही फेवरेट. कोमलात कोणकोण जाऊन 'कोमला थाळी' खाऊन आलं त्यांनी हात वर करा! एकदा गेलात की पुन्हा जाणारच!
मध्यंतरी दादरच्या थमनक थाई मध्ये गेलो होतो. अतिशय उत्कृष्ट जेवण जेवले.
>>कोमलात कोणकोण जाऊन 'कोमला
>>कोमलात कोणकोण जाऊन 'कोमला थाळी' खाऊन आलं त्यांनी हात वर करा!
मी, मी
२ वेळा खाल्लेय
शिरोज मध्ये काय डिशेस ट्राय केल्यात ते सांगा ना.
वरळीला कल्पनासमोरचं विव्हा
वरळीला कल्पनासमोरचं विव्हा पश्चिम रेस्टॉरंट बंद झालय. ते दुसरीकडे कुठे स्थलांतरीत झालय का?
थमनक थाई यम्मी. पैसे
थमनक थाई
यम्मी. पैसे वसुल.
दादर मुंबई २८ सुरवातीला गेले होते नंतर नाही. परत जायला हवे.
ह्यावेळी आमच गोमांतक मधे भांडण झाल. हातात खुप पिशव्या, आणि मुलगी इतक असुन ६माणसांच टेबल शेअर करायला सांगत होते. वर उर्मटपणा. काहि न खाता बाहेर आलो
"अवन फ्रेश" ची आठवण नका काढू
"अवन फ्रेश" ची आठवण नका काढू हो सक्काळी सक्काळी >>>>>>>
थमनक थाई आवडलं का? आता जातोच आम्ही.
>>वरळीला कल्पनासमोरचं विव्हा
>>वरळीला कल्पनासमोरचं विव्हा पश्चिम रेस्टॉरंट बंद झालय
मला वाटतं ते बंदच झालं.
विवा पश्चिम बंद पडलं ते
विवा पश्चिम बंद पडलं ते चांगलं झालं. नंतर नंतर ते इतकं बेचव खाणं देत होते.
भ्यांsssss आमच्या खूप
भ्यांsssss
आमच्या खूप रोमांचक आठवणी आहेत त्या हॉटेलाच्या.
शिवाजीपार्कच्या शूश्रूषा
शिवाजीपार्कच्या शूश्रूषा समोरच्या अपूर्वात मागच्या आठवड्यात चायनीज खाल्लं. चव बिघडल्यासारखी वाटली
मला त्यांच्या चायनीज डिशेस खूप आवडायच्या.
अग शेफ बदलले की हाटेलाची मजाच
अग शेफ बदलले की हाटेलाची मजाच जाते. एकेकाळी समर पार्कातलं चायनीज फारच छान असे. आता गंडलय.
तसंच असणार मामी
तसंच असणार मामी
१८ ते २० नोव्हेंबर माहिम
१८ ते २० नोव्हेंबर माहिम कॉजवेवर मनसेतर्फे कोळी महोत्सव आहे. खास कोळी खाद्यपदार्थ आहेत हे सांगायला नकोच
चर्चगेटजवळच्या रेलिशमध्ये
चर्चगेटजवळच्या रेलिशमध्ये जेवले काही दिवसांपुर्वी... अप्रतिम आहे. मला आतून शंका होती की मला थाई पदार्थ आवडातील का? पण इथले पदार्थ खुप छान होते.
वरळीचं गॉसिप्सही बंद झालं
वरळीचं गॉसिप्सही बंद झालं
सिझलर्स कुठे खावे आता माणसाने ?
रेसकोर्सच्या आतमध्ये (हाजीअली
रेसकोर्सच्या आतमध्ये (हाजीअली जवळ) एक गॅलॉप्स नावाचे रेष्टारंट होते. अजून आहे का? फारच छान माहौल होता आतमध्ये! बरेच दिवस झाले गेलो नाही तिथे.
बाबु, सिझलर्स करता योको आणि
बाबु, सिझलर्स करता योको आणि फक्त योको रे!
मामी, सिझलर्ससाठी नरीमन
मामी, सिझलर्ससाठी नरीमन पॉईन्टला 'रेलिश'ला ये... मेकर चेंबर ५ मधे, एकदम झक्कास!!!
Pages