खादाडी: दादर, माटुंगा

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:29

दादरच्या आसपासची खादाडी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
नॅशनल हॉस्पीटल च्या समोर च्या गल्लीत थोड पुढे आल्यावर प्रसाद बेकरी आहे डाव्या हातावर. तीथे बाकी बेकरी आयट्म्स तर चांगले मिळतातच पण गोड आवडणार्‍यानी तीथले चॉकलेट बॉल्स ट्राय करावेत

आमचं अभक्ष्यासाठीच फेवरेट हॉटेल म्हणजे दादरच " सायबिनी" तिथे पण रांग लावावी लागते पण मित्राची ओळख असल्यामुळे आम्ही १० जण नेहमि ठरलेल्या जागेवरच बसतो.. चिकन तंदुरि, भरलं पापलेट( आत्त कोलंबी भरुन फ्राय केलेलं) आणि गरम गरम सागुती वडे, लुसलुशीत भाकर्या... मस्तचे बेत... त्यांच्या तंदुरीबरोबर जे सॅलॅड देतात ते सुध्दा एकदम यमम्मी, सर्विस पण छान.. Happy

शिवाजी पार्कच आईस्क्रिम आणि वेज फ्रँकि, नॉनवेज फ्रँकी पण खुपच छान.. Happy

सायबिणी तर अगदी ऑस्स्स्समच. माझी बर्थ डे पार्टी केली होती आम्ही तिथे. सुपर्ब आहे जेवण तिथलं.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.

पुढे परेलला "राजनंदा" म्हणुन एक हॉटेल आहे.. स्टेशनपासुन १० मिनिटांवर... नॉनवेज जेवण एकदम सुंदर.. कोलांबी फ्राय तर ऑसम.. Happy तोंडाल पाणी सुटले...
लोअर परेलला आमच्या घराजवळच "सर्वोदय" वेज साठी अप्रतिम.. थोडं छोटं आहे पण सगळ्याची चव एकदम छान.. आम्च्या वेज पार्टी तिथेच... सर्वोताम म्हणजे; " पनीर बुर्जी, पनिर तवा, मटार नूडल्स, वेज बिर्यानी, मरशुम फ्रायड राईस.." Happy
समोर "बावला मस्जिदजवळ"... एक फालुदावाला आणि एक कुल्फीवाल बसतो.. तो पण मस्तच...
अणि सगळ्या फेवरेट म्हणजे "जिलेटो"... मस्त वरायटी... Happy

रुपालीला ईतर कुठेही ईतकं भरभरुन बोलताना पाहीलं नाही. Happy

भ्रमा, खादाडीवर भरपुर बोलु शकते रे मी, कारण अजुनतरि मला काहिच वर्ज्य नाहिय... Wink

आजच्या HT मधे वरळी नाक्यावरचे कॅफे सिटी बंद झाल्याची बातमी वाचली.. आता खिमा पाव साठी दुसरं हॉटेल शोधावं लागणार. बहुदा आणि दोन चार वर्षात उरले सुरले इराणी सुद्धा बंद होतील बहुतेक Sad

होम शेफ हे खूप चवदार आहे.tomato,sandwich हे मराठीत कसे लिहायचे?किंवा लिहूच नयेत मराठीतच लिहावे.ईंग्रजीत तरी पुरणपोळीचा ळ आणि ण कुठे लिहता येतो?म्हणून मराठीत लिहावे.असो!होम शेफ चान आहे.तसेच सितलादेवी देवळाच्या समोर मोगल लेन मध्ये एक आयसी स्पायसी म्हणून छोटेसे hotel आहे.बरे थाई आणि चायनीज पदार्थ मिळतात.रामाश्रय च्या बाजूला एक दुकान आहे तेथे मंगळूरी पद्धतीची लोणची आणि पापड आणि उत्क्रुष्ट मसाले मिळतात.

संजय मोने, Happy

टोमॅटो = TomETo
सँडविच = sEMDavich

जिथे तुम्ही प्रतिसाद टाईप करता तिथे वर '?' असलेल्या चौकोनावर क्लिक केल्यावर तुम्हाला लेखनसहाय्य मिळेल.

अंधेरी पश्चिमला एखादे असे कोणते मालवणी नोन वेज होटल असेल तर सांगा जिथे जाऊन मी आस्वाद घेऊ शकतोa_166.jpg

अरे माझे भारतातले संपुर्ण आयुष्य दादरमधे गेले होते.. त्यामुळे या सगळ्या जागेंची नावे वाचुन एकदम नोस्टाल्जिक झाले..

स्वप्ना राज... .. विसावाचा मालक.. म्हणजे ३ भाउ.. त्यातला सर्वात धाकटा उमेश माझा मित्र होता व विसावाला लागुनच असलेल्या प्रमोद क्लॉथ मर्चंटचा मालक प्रमोद(पम्या) माझा शेजारी व जानी दोस्तच होता. आम्ही तिघे मिळुन विसावात बसुन गप्पा मारत मारत असंख्य वेळा इडली सांबार किंवा वडा सांबार खाल्ला असेल... अर्थातच फुकट...

कोणि अजुन कोहिनुर थिएटरसमोरच्या लस्सिच्या दुकानाचे नाव इथे लिहीले की नाही? त्याच्याकडे जशी लस्सी मिळते तशी लस्सी या अलम दुनियेत तुम्हाला कुठे मिळणार नाही... त्या लस्सिवर टाकलेली ती दह्यावरची साय्(त्याला काय म्हणतात?) लस्सी पिताना कधी संपुच नये असे वाटायचे. अजुनही भारतात गेलो की ती लस्सी प्यायल्याशिवाय चैन पडत नाही .. विशेष म्हणजे अजुनही तशीच चव आहे.. तसेच विसावात पण जाउन येतो. तसेच पणशिकरांचे पियुषही प्यायला विसरत नाही..सही..

दिनेश.. छबिलदास समोरच्या श्रिकृष्ण बटाटेवड्यावाल्याचा दर्जा घसरला हे वाचुन अत्यंत वाइट वाटले.. वर्तमानपत्रावर.. तळलेल्या मिरच्यांबरोबर मिळणारा त्यांचा बटाटेवडा.. माझ्या लहानपणी सर्व मुंबईत प्रसिद्ध होता.. (त्याच्या बाजुलाच एका चांभाराचे दुकान होते.. त्याची मला खुप दया यायची). मनुस्विनी.. मलाही दादर स्टेशन समोरचा कामतचा डोसा व इडली सांबार आवडतो.. गेल्या भारतवारीमधे कळले की आता कामत्,विसावा वगैरे सगळे घरपोच डिलिव्हरीही करतात.. पण उडपिच्या दुकानात.. गल्ल्यावरच्या मालकाला त्याच्या गल्ल्यातल्या पेल्यातल्या चिल्लरमधे हात टाकुन त्या चिल्लरशी चाळा करताना पाहात व त्या मालकाला "दत्ता....खाली उपाशी रे...." (म्हणजे दत्ताच्या फोटोफ्रेम खाली असलेला गिर्‍हाइक अजुन त्याच्या प्लेटची वाट पाहात आहे रे.. लवकर प्लेट आण...असा संकेत!)असा त्याच्या वेटरला दिलेला दम ऐकत इडली सांबार खाण्यातली मजा.. घरी ऑर्डर करुन खाण्यात नाही.. हे मात्र खर..:)

(आणि हो.. मनुस्विनी..अगरवाल क्लासला मीही जायचो.. नोस्टाल्जिक.. नोस्टाल्जिक... :((त्यावेळेला लक्ष्मण्,परेरा,कारखानिस,धिरसिंग इत्यादि होते.. तुमच्यावेळेपर्यंत ते होते का?)

काय खादाडी चाल्लियं... एकदम झक्कास :p

कोणि अजुन कोहिनुर थिएटरसमोरच्या लस्सिच्या दुकानाचे नाव इथे लिहीले की नाही? >> कोहिनुर जमिनदोस्त झालं... त्या जागी 'नक्षत्र' उभं राहिल आहे... पण लस्सी आणि लस्सी देणार्‍याचे पोट अजूनही तस्सेच आहे :d

सेना भवनच्या मागिल गल्लीत मासाहारी लोकांसाठी 'सिंधुदुर्ग' आहे... पण गोमंतकची मजा काही औरच...

मूकुंद,
दादर मलाही खूप आवडायचे खादाडी साठी. पण इतक्या वर्षात नावेच विसरली मी बहुतेक ठिकाणांची.
अग्ररवाल क्लास म्हणजे फक्त एक बहाणा होता. तो सुटला की महाभोज, कामत, रामनायक, दत्तातय असे करत असायचू आळूनपाळून. सरांची नावे विसरले बर्‍याच. पण हँडसम सर होते दोन तीन. त्यातले केमीस्ट्री शिकवायचे. पंजाबी होते.(हँडसम होते म्हणून'च' लक्षात. ).

मुकुंद, तुम्हाला आठवले का नक्की कोण ते?
दुसरे एक रुईय्य शिकवणारे मराठी सर.. छे नाव आठवतच नाही. ते मस्त शिकवायचे. बरेच जोक्स मारायचे. इतर वेळी कायम मराठीतच बोलायचे.

दादरमध्ये माझे पप्पा जन्मले,वाढले. दोन आत्या पैकी एक दादरला एक गिरगाव नी काका पार्ल्याला. लहानपणी पप्पांचे आवडती ठि़काणं हीच(दादर्,गिरगाव व पार्ला ह्या क्रमाने) खाण्यासाठी जरी पुढे आम्ही चेंबूरला मूव झालो तरी. दादरला गेलो की पणशिकरांचा पियुष अगदी प्यायचोच मग आत्येकडे कितीही हादडून निघालो असू. भारतात आता गेलेच पाहीजे. चार वर्षे होतील आता.

गोमंतकमध्ये पप्पांच्या ओळखीने आम्हाला लाईन न लावता मिळायचे बसायला. Happy
एकेक तळलेली तुकडी काय मस्त असायची. चार लहान मुले (आम्ही भावंडे) मासे इतके खातात बघून एक वेटर जो ओळखीचा होता तो न सांगता तेवढ्या तळलेल्या(पापलेट) तुकड्या आणून द्यायचा.

फिनिक्समधे नूडल बार मधला चायनीज बफे ट्राय केला मागच्या विकेन्डला. अपेटायझर्स मस्तच होते, मेन कोर्समधल्या चिकनच्या डिशेस चांगल्या होत्या पण फिशची डिश चांगली नव्हती. हनी नूडल्स व्हॅनिला आईसक्रीम सोबत आणि चॉकेलेट मूज मस्तच्.....विकडेजला ३१५ आणि विकेन्ड्ला ३५०...पैसा वसूल

मुकुंद, विसावामध्ये गर्दी असायची का हो तेव्हा? आता तर कायम असते. गप्पा मारत मारत खाणं आता तरी शक्य दिसत नाही. Sad

कोणी टाईम्स नाऊवरचा "फूडी" चा आजचा एपिसोड पाहिला का? मुंबईतल्या खाण्याच्या चांगल्या जागांवर होता. मी सुरुवातीपासून पाहिला नाही. पण फोर्टमधले मॉडर्न हिंदू हॉटेल नावाच्या ठिकाणची थाळी दाखवली. तसंच पॅराडाईज म्हणून कोलाब्याला कुठे एक हॉटेल आहे. तिथले चिकन रोल, चिकन लॉली आणि चिकन क्रंची हे पदार्थ तसंच पारसी पध्दतीचे सल्ली बोटी, धानसाक आणि ब्राऊन राईस हे पदार्थ तिथे छान मिळतात म्हणे. कोणाला माहित आहे का हे हॉटेल कोलाब्याला कुठे आहे ते?

माझे आई-वडील दर मे मध्ये कोकणात जायचे. नोकरी चालू झाल्यावर मला त्यांच्याबरोबर जाणे शक्य नसल्याने दादर- माहिम- माटुंगा मधील सर्व हॉटेल चाखली आहेत. सर्वात हॉरिबल जेवण न. चि. केळकर रोड्वरील "क्रिस्टल पंजाब" मधले होते. दही सोडुन काहीच चांगले नव्हते.

प्रकाश्(सेना भवन जवळ) मधली दही मिसळ, बटाटा पुरी+ दही चटणी, थालीपीठ छान असते.

कोहिनूरच्या सिग्नल जवळील पुरोहितचा बटाटा चिवडा मला सर्वात आवडतो. मुख्य म्हणजे तो किंचीत ब्राऊन तळलेला असतो आणि अजिबात गोड नसतो. तसेच त्यांचाचकडे पांढरे साखर लावले पेढे मिळतात. फार पुर्वी त्याच सिग्नलला पुरोहितच्या समोरच्या कॉर्नरला एक उसाचा रसवालाही होता. त्याच सिग्नलला रात्री कपिलची पावभाजीची गाडी लागायची. खडा पावभाजी पहिली तिथेच खाल्ली होती.

आस्वादची झुणका-भाकर पण छान असते. त्याबरोबर ठेचा आणि वांगपण देतात.

गोमांतक, सायबिण, सिंधुदुर्ग (सर्वात बकवास) ही तशी गोमांतकिय मांसाहारासाठी फेमस असली तरी त्यात फक्त भरपुर खोबरे असते असे मला वाटते. नाऱळाचा रस आणि योग्य वाटलेला मसाल मलातरी अभावानेच आढळला. याकरीता पुर्वी वांद्र्याचे "हायवे गोमांतक" मला जास्त आवडायचे. त्यांची बांगड्याची/ कर्लीची उडद-मेथी , तिसर्‍याचे किंवा मोरीचे सुके, कुर्ल्या अप्रतिमच होत्या. नंतर कळले पोतनीसांची आई की सासू स्वत:च्या सुपरव्हिजन्मध्ये ती वाटण (ओला मसाला) करुन घ्यायच्या. तसेच गोरेगावचे सत्कारही खास आहे. पहिल्या मजल्यावर असल्याने ही खानावळ गोरेगाव ईस्टला मालाड साईड्च्या ब्रिजवरुन उतरताना दिसते. खानावळीकडे जाणार्‍या जिन्याच्या बाजुला मात्र फार लक्ष देऊ नये. घाण असते/ वाटते. पण वर मिळणार्‍या जेवणासाठी हे मी सहन करु शकतो. काहीना नाही आवडत. They dont realise what they are missing, माझी बायको त्यातलीच एक. परत फुले, लाईट्स, पडदे असले डेकोरेशन नाही. फक्त जेवण!!!!

दादर कबुतरखान्याच्या गोरेगावला जाणार्‍या २०१ स्टॉप्च्या ठिकाणी वसंत्ची वडापावची गाडी दुपारनंतर लागायची. (अजुन आहे की नाही कोण जाणे) टिपीकल मराठी माणुस होता पण वडापव आणि समोसा पाव तर सहीच!!!

वर कोणीतरी संदेश बद्दल लिहीले आहे. पुर्वी तिथे छोले पुरी, छोले समोसा, कचोरी वगैरे बसून खाण्याची सोयही होती. लस्सीही फार छान मिळायची. आता फक्त कोहिनूर सिनेमा समोरचीच. कैलास प्रेमी क्षमा करा; पण ती लस्सी खावी लागते पिता येत नाही.

नेहमी बसमधुन जातना माहिमच्या दर्ग्याजवळील शिगकबाबच्या ठेल्यावरुन येणार्‍या वासाने नसलेली भुकपण चाळवायची. ते बड्याचे (बीफचे) असतात, त्यात काहीही असेल, किती घाण असते आजुबाजुला वगैरे बरेच अडथ़ळे होते. पण शेवटी रहावले नाही. ईदच्या दिवशी त्याच्यावर ताव मारला. विचार हाच की ईद असल्याने खप आहे त्यामुळे कमीतकमी शिळे नसतील. बरोबर एक पाव (नान सारखा) देतात पण आम्ही त्याला त्यापेक्षा एक्स्ट्रा कबाब द्यायला सांगितला. नाही दिला..... तिथेच आसपास एक बेकरी आहे. भारतात गेलो की नाव आणि लोकेशन पाहिन, पण तेथे मिळणारे मावा सँडविच खासच.

बरेच काही सांगण्यासारखे आहे पण बिझी आहे. मात्र हा BB पाहिल्यावर रहावले नाही. परत....

mbhure, तुम्ही म्हणता ते बरोबर. सिंधुदुर्ग एकदम बकवास आहे. ३-४ वर्षापूर्वी आम्ही तिथे थाळी घेतली होती. ती तर खास नव्हतीच आणि मेन्यूवर "खरवस" वाचून हॉटेलातला खरवस कसा असतो पाहूया म्हणून मागवला तर नुस्ती सुकी वडी आली. जरासुध्दा गुळाचं पाणी नाही. गोड पण नव्हता. परत कधी पायरी नाही चढलो.

सिंधुदुर्ग बद्दलच्या मताला दुजोरा,तरीही बरेचदा तीथे नाइलाज म्हणुन जातो कारण बरोबर असलेल्याना तीथे जायचे असते.तीथे सुके माशांचे पॅकेट्स ही मीळतात, त्यातुन आम्ही घेतलेले सोडे शिजता शिजत नव्हते.
हायवे गोमांतक अजुनही चांगले आहे. त्याशिवाय वरळी नाक्यावरचे फिश लँड (भारत बोर्डींग) आणि आदर्श नगर खरूडे मार्केट ( सेंचुरी बाजार च्या समोर पण थोड मागच्या गल्लीत) येथील मातृछाया या दोन जागा मत्स्याहारीं साठी स्वर्ग (तेव्हढ स्वच्छतेचे सोडा ). फिश लँड मधे एसी सेक्शन आहे तर मातृछायात नाहिये.
मला पुर्वी गोखले रोड दादर वरच्या सचिन मधे कोंबडि वडे छान मिळायचे सध्या ची परिस्थीती माहित नाहि.
सेनापती बापटांच्या पुतळ्या च्या सर्कल वर अजुनही येक इराणी उरलाय , त्याच्या़कडे सकाळी हाफ फ्राय, ब्रुन मस्का, पानी कम असा ब्रेकफास्ट करुन माझा दिवस चालु व्हायचा

वरळीला जपानी लोकांचं टेंपल आहे त्यासमोर सिटी बेकरी फेमस आहे - चहात बुडवून खायचे टोस्ट, खारी बिस्किटं आणि जिरा बिस्किटं, फक्त ताजी बांधून देताहेत ना पहा. बांधून ठेवलेले पुडे घेऊ नका. कधीही संध्याकाळी इथे गर्दीच असते.

विकेन्ड्ला वरळीच्या एट्रिया मॉलमध्ये वरच्या फूडकोर्टवर एक चायनिज रेस्टॉरन्ट आहे तिथे गेलो होतो - मला वाटतं चायना सिटी असं काहीतरी नाव आहे. चिकन पॉट राईस छान होता पण chicken satay एकदम बेकार. त्याच्याबरोबरच्या पिनट सॉसला चवच नव्हती.

डिनर झाल्यावर गोड काय खायचं ह्यावर खल झाला. मला काहीतरी नवं हवं होतं म्हणून न्युझीलंडच्या आईसक्रिमचं दुकान आहे त्यासमोर एक crepe ची गाडी आहे तिथे गेले. Nutella Fancy म्हणजे crepe वर Nutella sauce, cream वगैरे घालून शेवटी व्हॅनिला आईसक्रीमचे दोन गोळे ठेऊन बंद केलं आणि त्याचे सहा छोटे रोल करून दिले. अल्टिमेट होतं. आता कॅलरीजचा भाग सोडून द्या. किंमत ९५ रुपये. Happy

सर्वात बेक्कर हॉटेल. चर्चगेट स्टेशनजवळच्जं शिव सागर. साले पाव भाजीला ऐंशी रूपये घेतात.

--------------
नंदिनी
--------------

मला दादरच जिप्सी (मराठमोळ्या जेवणावाल) फार आवडत.

चहा प्यायचा असेल झक्कास तर ग्रांट रोड ला खेतवाडी कडे जातांना एक जुना ईराणी आहे.ब्रून ब्रेड आणि पानी कम चहा!मेट्रो समोरच्या गल्लेत कयानी कडे दुपारी जिंजर बिस्कीट्स मिळतात.तसेच पुढे येउन डावीकडे फ्लायओवर कडे जांताना पारसी डेअरी ची कुल्फी.पण जर चूकुन उजवीकडे गेलात आणि जर दुपारचे २-२|| वाजले असतील तर तसेच आगे बढो आणि सिंधू रत्न ऑर सिंधू सागर मध्ये सिंधी जेवण जेवावे.अप्रतिम.तसेच गल्लीगल्लीतून पुढे मुंबादेवी कडे जातांना एका दुकानात फक्त पापड मिळतात.त्यात "डायबेटीष- होय!असंच लिहिल आहे-तर डायबेटीष और बडपेश्रर्-हेही असंच लिहिलेल॑ आहे-असे दोन रोगांवरचे पापड मिळतात.तिथून जरा उजवी डावी करत सी.पी. टैंक गाठले की उत्तम पूरी भाजी आजही १२ रूपयात मिळते.

ajai, मला वाटतं पोर्तुगीज चर्चंसमोर (दादर पश्चिम) पण अजून एक इराणी उरला आहे. मी कधी गेले नाहीये पण तिथे.

monez, कयानीकडे चिकन पॅटिस पण सुरेख मिळतात, मावा केक आणि पिवळंधम्मक वरून लालचुटूक चेरी लावलेलं कस्टर्ड!

सेनाभवनसमोरचं पूर्वाश्रमीचं चंन्द्र्गुप्त म्हणजे आत्ताचं इंडस किचनमध्ये गेलो होतो. आता तिथे इंडियनच्या जोडीला परत चायनीज मेनू आहे. चिकन पॉट राईस ट्राय केला. पूर्वीचीच मस्त चव आहे Happy

स्वप्ना.. तेव्हाही गर्दी असायची विसावात...पण सध्या असते तेवढी नसेल.

मनुस्विनी.. अग मी अगरवालला फक्त गणित व भौतिकशास्त्रासाठी(फिजिक्स!) गेलो होतो. कात्रे, कारखानिस, लक्ष्मण्,धिरसिंग व परेराशिवाय अजुन कोणी आठवत नाही.. आता मी मुलगा असल्याने ते हँडसम होते का नाही यात मला काहीच स्वारस्य नव्हते.. Happy पण तुझ्या अगरवाल क्लासच्या उल्लेखाने माझे बारावीतले दिवस आठवले..

आणि नंदिनी... दादरच्या खादाडित तु एकदम चर्चगेटला कशी काय पोहोचलीस??:) पण आता तु चर्चगेटचा उल्लेख केलाच आहेस म्हणुन सांगतो... मी अकरावी व बारावीला चर्चगेटच्या जय हिंद कॉलेजला होतो. तेहा स्टेशन समोरच ए रोडला असलेल्या सत्कारमधे आम्ही सगळे मित्रमैत्रिणि वडा सांबार किंवा इडली सांबार खायला नियमित जात असु. सत्कार रेस्टॉरंट अजुन आहे का तिथे? तिथुन खाउन झाले की आमच्या कॉलेजच्या उजवीकडे मोठा रस्ता क्रॉस करुन गेल्यावर.. एकाच मिनिटावर असलेल्या.. समुद्राच्या कट्ट्यावर.. पावसाळ्यात.. लाटांचे त्या कट्ट्यावर होत असणारे थैमान बघत आम्ही बसत असु... तसच चर्चगेटला.. ब्रेबॉर्न स्टेडिअमच्या बाजुलाच.. एक रुस्तम नावाचा आइस्क्रिमवाला होता.. त्याच्याकडे केसर पिस्ता चे आइस्क्रिम सँडविच मिळायचे... काय जबरी टेस्ट होती त्याच्या त्या आइस्क्रिमची! तोही आहे का अजुन तिथे?

खरोखर सिंधुदुर्ग एकदम बकवास आहे. २ वर्षांपुर्वी गेलेलो वर्तमानपत्रातिल रिव्य्हु वाचुन. चवच नाहि त्या जेवणाला.

गेल्या आठवड्यातच ती नक्षत्र समोरचि लस्सी पिली. इतक्या वर्षात पहिल्यांदाच नाहि आवडली.

एक रुस्तम नावाचा आइस्क्रिमवाला होता.. >>>> मला सुद्धा कॉलेजचे दिवस आठवले. खुप छान होते ते आईसक्रिम सँडविच Happy
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

त्रुप्ति कोणालाच आवड्त नाहि का? त्यांचा पुलाव / थालिपिठ तर खासच.

तृप्ती मध्ये मी पुर्वी जायचो पण नंतर तिथे बराच वेळ बाहेर उभे राहावे लागायचे. मग पाऊले आपोआप शिवाजी मंदीर समोरील फुटपाथकडे वळायची. Happy
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

Pages