उनाड कविता

Submitted by मुक्ता.... on 2 May, 2021 - 05:09

कधी कधी मनात इतकं असतं, इतकं असतं की शब्द बद्ध करणं सोप्प नसतं! अशा वेळेला काय करायचं. आपलं कविपण विसरून जायचं. कवितेला मनमुक्त भटकू द्यायचं. कुठे? आयुष्याच्या वाटेवर. मुक्त मुशाफिरी करायला. म्हणजे होईल असं की कविता पुन्हा येईल आणि ती येईल अशी की बस्स!

कशी बशी सुचत नसते ना, आतून काही यावं लागतं,व्हावं लागतं तेव्हाच
मनातून , आत्म्यातून, ते लहरीपण स्वतःला जाणवतं . शरीराशी असलेली फारकत, फकिरपण कवितेलाच माहिती हो

किती शोधल्या, किती शोधल्या,
किती जागा अंतरातल्या...
अन त्या बेफिकीर...
पायवाटेवर उनाड फकीर,
आयुष्य शोधत निघालेल्या...
घेऊन
जीवन गीतातल्या अंतऱ्याला....

आणि मग यांना म्हणजे या कवितांना शोधायचं म्हणजे...:)

अंधारात लपल्या,उजेडात हरवल्या
गेल्या कुठे त्या ओळीं?
क्षितिजाच्या अमूर्त रंगात मिसळल्या
ओल्या एका सांजवेळी!

मुक्ता....
© रोहिणी बेडेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users