भाषावार प्रांतरचना करताना जर एखाद्या गावातल्या लोकसंख्येपैकी ५०% हून अधिक लोक जी भाषा बोलतात ती भाषा ज्या राज्याची त्या राज्यामधे ते गाव सामील केलं गेलंय का? की काही वेगळी पद्धत होती?
समजा मी लिहिली तीच पद्धत होती तर मग महाराष्ट्रातल्या विदर्भात आज हिंदीचा इतका बोलबाला का? इतके हिंदीभाषिक विदर्भात कसे काय? गोंदियासारखा जिल्हा तर आज पक्का हिंदीभाषिक झालाय.
विदर्भातल्या जिल्हा न्यायालयांमधे आणि नागपूरच्या उच्च न्यायालयात इंग्रजीसोबतच हिंदीतही खटला चालवता येतो पण मराठीत चालवता नाही असे मला विदर्भातल्या एका व्यक्तीने सांगितले.हे खरे आहे का?
जर विदर्भात आज हिंदी इतकी पसरली असेल तर १९५३ साली फझल अली आणि त्यांच्या सहकार्यांनी विदर्भातल्या ८ मराठी भाषिक जिल्ह्यांचे 'विदर्भ नावाचे मराठी भाषिकांचे राज्य बनवावे' हा अहवाल दिला तो कशाच्या आधारे? त्यावेळी जर आयोगाच्या निरीक्षणानुसार/अभ्यासानुसार जर हे ८ जिल्हे मराठी भाषिक होते तर १९५३ नंतर विदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषिक साधारण कोणत्या साली किंवा कोणत्या दशकात आले? ते इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंदी पट्ट्यातून मराठी भाषिक विदर्भात येण्याची कारणे कोणती? की हे हिंदीभाषिक विदर्भात १९५३ च्या आधीपासूनच विदर्भात मोठ्या संख्येने होते?
नेमकं काय चुकलं? फजल अली आयोगाने चुकीचा अहवाल दिला होता असं म्हणण्याला काही पुरावे आहेत का? फजल अली आयोग चुकला नसेल तर मग विदर्भात चिंता करावी इतका हिंदीचा वापर का केला जातो? १९५३ पासून आज २०२० पर्यंत शाळांमधून मराठीतून शिक्षण देऊनही महाराष्ट्रातल्या विदर्भात हिंदीचा इतका प्रसार कोण करतंय?
हा व्हिडिओ बघा.
एका मराठी वृत्तवाहिनीचा वार्ताहर देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीला हिंदीतून प्रश्न का विचारत असेल? याचाच अर्थ विदर्भात हिंदी भरपूर बोलली जाते असा अर्थ लावावा का?
@Hemant 33भाषिक balance
@Hemant 33
भाषिक balance बिघडेल,सांस्कृतिक balance बिघडेल एवढे स्थलांतर देश साठी अत्यंत धोकादायक आहे
सहमत आहे.
@shraddhaहिंदी सुद्धा एक
@shraddha
हिंदी सुद्धा एक भारतीय भाषाच आहे ना? मग एवढा आकस का?
मराठीसुद्धा भारतीय भाषाच आहे ना? मग मराठीबद्दल इतका आकस का?
@राहुल बावणकुळेतुमच्या
@राहुल बावणकुळे
तुमच्या पूर्वीच्या धाग्यांचा इतिहास बघता एक सल्ला द्यावासा वाटतो की आपण ज्या विषयावर लिहीणार आहोत, त्यावर पुरेसा अभ्यास करावा. तुमचे जे मराठी भाषेशी संबंधित धागे काढत असता, ते बरेचदा अर्धवट माहितीच्या आधारे असतात.
ज्या विभागात धागा काढला आहे त्या विभागाचं नावच मुळात "माहिती हवी आहे" असे आहे. याचाच अर्थ ज्या विषयातील माहिती कमी आहे ती मिळवणे,तशी चर्चा होणे या उद्देशानेच कोणीही धागा काढेल ना? आधीच सगळी परिपूर्ण माहिती असेल तर कोणी या विभागात धागा का काढेल?
मी फजल अली आयोगाबद्दल लिहिलेलं आहे.आंजावरुन जी माहिती विषयसंबंधाने गरजेची आहे तिचा संदर्भ दिला असूनही माझे आधीचे धागे तपासून उतावळेपणाने त्यावरुन स्वत:ला हवा तो निष्कर्ष काढणे हे समजले नव्हते.
पण
मी नागपूरचा असून
यावरुन विदर्भातल्या हिंदीबाहुल्याची बाजू घेण्याचे आणि धागाविषयात यालाच आक्षेप घेतला असल्याने होणार्या चिडचिडीचे कारणही समजले.पण चर्चेमधे भावनिक होऊन असे चिडत जाऊ नका हा माझाही तुम्हाला सल्ला आहे.
असो!
तुम्ही विदर्भाचेच असल्याने आणि तुम्ही विदर्भाच्या भाषिक प्रवासाबद्दल दिलेली माहिती उपयुक्त आहे. _/\_
ही अशी अनुभविक माहिती आंजावर मिळत नाही. त्यासाठीच माहिती हवी आहे या विभागात म्हणजे जिथे धागाकर्त्याकडे काही कारणाने अपुरी माहिती असणे गृहित धरले आहे त्या विभागात धागा काढावा लागतो.
मग असताना १९५६ पूर्वीपासून
मग असताना १९५६ पूर्वीपासून नागपूरला हिंदीभाषिक प्रदेशाची राजधानी का बनवलं? >>>
केअशु, भाषावार प्रांतरचना हीच नंतर झालीं ना. आधी नव्हती. प्रांत रचना ही भाषावारच असावी की
उपलब्ध असणारे विविध रिसोर्सेस बघुन असावी हा एक चर्चेचा मुद्दा आहे. तेव्हा मध्य प्रांताची राजधानी केल्याने जनता सोसत राहिली वगैरे हे तुमचे वैयक्तीक मत आहे.
इतर महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात हिंदी जास्त का बोलली जाते या प्रश्नाला दिलेले उत्तर पूरक आहे.
आणि तिथे हिंदी सुद्धा बोलल्या जाते याचा अर्थ लोकांनी मराठी बोलणे सोडले असे नाही. अमराठी लोक सुद्धा मराठी बोलतात हे आधी सांगितलेच आहे.
आणि देशभरात भाषावार प्रांत रचना करणे ठीक नव्हते असे मानणारे बरेच लोक अजून आहेत.
@DJआपण नागपुरहुन आलोय हे
@DJ
आपण नागपुरहुन आलोय हे कुणाला कळु नये म्हणुन हिंदीचं पांघरुण घेऊन भाव खावासा वाटतो आणि दुसरं कारण असंही सांगितलं की त्यांना असं वाटतं की त्यांच्या मराठीला बाकी ठिकाणाचे लोक हसतील म्हणुन ते हिंदीत बोलतात.
हसले तर हसले. सगळ्यांनाच पुणेरी मराठी कशी सरावाची असेल? कमीतकमी मराठी आहे हे काय कमी आहे? वर्हाडी वळणाची असली तर काय हरकत आहे? हिंदीतून बोलण्यापेक्षा वर्हाडी वळणाच्या मराठीतून बोललेले अधिक चांगले. : )
@कटप्पा
@कटप्पा
मराठी मिश्रित हिंदी बोलणे हा धेडगुजरी कारभार कशासाठी? मराठी इतकी कमकुवत आहे का? हिंदीच्या कुबड्या का?
२०११ च्या जनगणना अहवालातून
२०११ च्या जनगणना अहवालातून Mother tongue is the language spoken in childhood by the person‟s mother to the person. As per 2001 Census, Marathi is the main language of the District and is the mother tongue of 70.1 per cent of the District population. In rural areas Marathi speakers account for 84.0 per cent whereas in urban areas 62.4 per cent. Hindi is the second largest language spoken in the District. It accounts for 15.8 per cent of the total population. The proportion of Hindi speakers is higher in urban areas (20.3 per cent) than the rural areas (7.9 per cent). The third largest language spoken in the District is Urdu, its percentage to the total population is 4.3 and mainly spoken in urban areas by 6.6 per cent of the population, whereas it is 0.3 per cent in rural areas. The speakers of the other languages in small number are mainly concentrated in urban areas and their proportion in rural areas is very less (except Gondi). It is found that during the last decade proportion of Marathi speaking persons has decreased from 73.1 per cent to 70.1 per cent while Hindi speakers proportion has increased from 14.0 per cent to 15.8 per cent.
@कटप्पातमिळ चालते हिंदी नाही
@कटप्पा
तमिळ चालते हिंदी नाही हा भेदभाव कशाला?
तमिळमुळे मराठीचं काही नुकसान होतंय का? हिंदीमुळे सगळी अहिंदी भाषिक भारतीय राज्यं त्रासली आहेत.म्हणून टू लँग्वेज पॉलिसीमार्फत हिंदी विरोध जोर धरु लागलाय.
हसले तर हसले.>> अगदी अगदी...
हसले तर हसले.>> अगदी अगदी... मीही याच मताचा आहे. ते त्या टीम मेटचं मत होतं पण मराठी ही शेवटी मराठी. मग ती कोकणातली असो, पश्चिम महाराष्ट्र्रातली असो वा उत्तर महाराष्ट्रातील असो वा मराठवाड्यातली असो वा खानदेशातील असो वा वर्हाडातील असो काय फरक पडतो..? प्रत्येक ठिकाणच्या भाषेला तिची स्वतःची ओळख आहे.. ती जपावी.
उगीच कोणी एका ठरावीक ठिकाणचा आहे म्हणुन त्याची मराठी भाषा प्रमाण मानणे सुद्धा वेडेपणाचे ठरु शकते. कारण तो त्या ठिकाणचा आहे म्हणुन त्याची भाषा प्रमाण आहे असं म्हणावं तर त्या ठरावीक ठिकाणाच्या ठरावीक शहरातलीच भाषा कशी शुद्ध सांगणारे पण भेटतील.. बरे त्या ठरावीक शहरातील भाषा शुद्ध मराठी ठरवायला गेले तर मग एका ठरावीक पेठेचीच कशी उच्च हे बेंबीच्या देठापासुन ओरडुन सांगणारेही भेटतील.. बरे त्या ठरावीक पेठेतली भाषा शुद्ध मानायला जावे तर मग लगेच रहिवाशांच्या मूळ स्थानाकडे गाडी वळुन मग ते कसे कोकणातले, देशावरचे, कर्हाडी, वर्हाडी अशी भांडणे लागुन मग सगळाच आनंदी आनंद होऊ शकतो..
म्हणुन आपण ज्या ठिकाणाचे प्रतिनिधित्व करतो ती मराठी न लाजता ठामपणे अस्खलीत बोलण्यात आजिबात लाजु नये या मताचा मी आहे.
स्वतःला माहिती नसताना , असंच
स्वतःला माहिती नसताना , असंच का आणि तसंच का अशा जजमेंटल प्रश्नांच्या आणि कमेंट्सच्या फैरी झाडण्याच्या तुमच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटतं.
राहुल बावनकुळे आणि मानव यांचे प्रतिसाद आवडले.
@च्रप्स
@च्रप्स
आता मुंबईचे उदाहरण घ्या.. मुंबईत बाहेरून किती लोक आले आहेत.. मुंबई मध्ये हिंदीनेच बोलणे सुरू करावे लागते..
विदर्भ असो किंवा मुंबई; मराठीला डावलून हिंदीप्राबल्य हे मराठीभाषिक म्हणून तुम्हाला हे योग्य वाटते का? निदान मला तरी वाटत नाही. जे खटकले ते सांगायला हवे ना? की परिस्थिती बदलू शकत नाही/बदलायला अवघड आहे म्हणून त्याबद्दल व्यक्तही व्हायचे नाही?
@नविना
@नविना
मराठीभाषिक महाराष्ट्राच्या विदर्भात हिंदीबाहुल्य असणे हा सुद्धा प्रश्नच आहे. मराठीबद्दल पुरेशी आपुलकी असली की असे प्रश्न महत्त्वाचे वाटतात.
विदर्भातल्या लोकांना तिथल्या हिंदीबाहूल्याबद्दल आक्षेप घेतल्यावर राग येण्याचे कारण काय असावे बरे? बरं इतकीच आपुलकी होती हिंदीबद्दल तर महाराष्ट्रात का सामील करावे लागले? बरं सामील झाल्यावर तरी मनापासून मराठीचा पूर्णपणे स्विकार करावा तर ते सुद्धा नाही. महाराष्ट्रात राहणार आणि हिंदीतच बोलणार यामुळे महाराष्ट्राचे भाषिक नुकसान होतेय हे कसे लक्षात येत नाही?
@मानव पृथ्वीकरमध्य प्रांताची
@मानव पृथ्वीकर
मध्य प्रांताची राजधानी केल्याने जनता सोसत राहिली वगैरे हे तुमचे वैयक्तीक मत आहे.
सोसत राहिली असे म्हणालो कारण फजल अली आयोगाच्या अहवालानुसार १९५३ साली नागपूर हा मराठीभाषिक जिल्हा होता. नागपुरात हिंदी बोलणारे जे मराठी लोक होते ते सुद्धा ती हिंदीभाषिक राज्याची राजधानी असल्याने म्हणजेच शासकीय कामे अडून राहू नयेत म्हणून मनाविरुद्ध हिंदीचा जुलूम सोसत होते असाच तर अर्थ होतो ना? म्हणून तर मध्यप्रदेशातून मराठीभाषिक विदर्भ वेगळा करावा अशी मागणी त्याकाळी झाली होती ना? अन्याय होत नव्हता तर तर मग श्रीहरी अणे आणि बियाणी आंदोलन कशासाठी करत होते?
@भरतIt is found that during
@भरत
It is found that during the last decade proportion of Marathi speaking persons has decreased from 73.1 per cent to 70.1 per cent while Hindi speakers proportion has increased from 14.0 per cent to 15.8 per cent.
आंदोलन वेगळ्या विदर्भासाठी
आंदोलन वेगळ्या विदर्भासाठी होतं ना? हे मराठी लोकं सारखं आपलं मराठी- मराठी करुन वात आणतात त्यामुळे आम्हाला त्या तुमच्या महाराष्ट्रापासून वेगळं करा आणि आमच्या इच्छेप्रमाणे जगू द्या. ते तेव्हाच यशस्वी झालं असतं तर आपल्याला केअशुंच्या धाग्यापासून मुक्ती मिळाली असती. पण ते होणे न्हवते. आता भोआकफ.
@अमितव
@अमितव
मी वाचायला या म्हणून आमंत्रण दिलेलं नाही. स्वत:च आलायत. बरं आलायतं ते आलायत वर धाग्याबद्दल हेटकमेंट लिहिण्यात तुमचा अमूल्य वेळही वाया घालवलात. : )
भाषिक जुलूम असा काही तेव्हा
भाषिक जुलूम असा काही तेव्हा नव्हता. इंग्रजी अमलाखाली असलेला प्रदेश (ब्रिटिश इंडिया) हा वेडा वाकडा पसरलेला होता. मध्येच संस्थांनी अंमल होता. त्यामुळे ब्रिटिश प्रॉविंसेस आणि रेसिडेन्सीज ह्या बहुभाषिक होत्या. खुद्द बॉम्बे रेसिडेन्सीमध्ये गुजराती, मराठी, कन्नड, कोंकणी, एकेकाळी सिंधी आणि अर्थात उर्दू इतक्या भाषकांची बहुसंख्या असणारे प्रदेश होते.
मागणी झाली ती सर्वत्र पसरलेले मराठीभाषिक प्रदेश सलगता पाहून एकत्र आणावेत अशी झाली. निझामीतला मराठवाडा हा मोठा प्रांत आणि मध्यप्रांतातला विदर्भ हे तुकडे बॉम्बे रेसिडेन्सीतल्या मराठी भाषिक प्रदेशाला जोडून संयुक्त महाराष्ट्र करावा अशी ती मागणी होती. मराठवाड्याची राजधानी हैदराबाद होती आणि मध्यप्रांताची नागपूर.
DJ यांचा एक नागपूरचा कलीग आणि
DJ यांचा एक नागपूरचा कलीग आणि इथले एखाद दुसऱ्याचे प्रतिसाद यावरूनही अख्ख्या विदर्भीयांबद्दल निष्कर्ष काढत आहात, आणि व्यवस्थित दिलेल्या प्रतिसादांवरूनही जजमेंटल होऊन निष्कर्ष काढत आहात.
माहिती हवी आहे सारखा निष्कर्ष थोपवायचे आहे असा ग्रुप हवा.
मराठी भाषकांची टक्केवारी
मराठी भाषकांची टक्केवारी घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे mmrda मध्ये आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात रोजगारासाठी
उत्तरेकडून हिंदीभाषकांचे झालेले स्थलांतर. मुंबईतला मराठी टक्का खूपच घसरल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्राचा सरासरी मराठी टक्का घसरण्यावर झाला आहे.
प्रमाण मराठीच्या जाचाला
प्रमाण मराठीच्या जाचाला घाबरून डीजेंच्या नागपुरी लोकांनी मराठी ऐवजी हिंदीत बोलणे पत्करले असावे.
तो भाग हिंदी बहुल प्रदेशाला लागून आहे, त्यामुळे हिंदीचा प्रभाव अधिक असण्यात इतके नवल वाटण्यासारखे आणि वाईट वाटण्यासारखे काय आहे ?
धुळे नंदुरबार कडची एक बोलीभाषा आहे ती गुजरातीसारखी आहे. भाषेच्या सीमा या काही आखीव रेखीव नसतात.
उत्तरेकडून हिंदीभाषकांचे
उत्तरेकडून हिंदीभाषकांचे झालेले स्थलांतर. मुंबईतला मराठी टक्का खूपच घसरल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्राचा सरासरी मराठी टक्का घसरण्यावर झाला आहे.
बरोबर आहे.
मुंबई मध्ये मराठी लोकांची संख्या स्थिर आहे फक्त हिंदी भाषिक वाढल्या मुळे टक्के वारी कमी दिसते
पण एक भाषिक ग्रुप म्हणून मराठी. भाषा असलेली लोक अजुन पण बाकी लोकांपेक्षा जास्त च आहे.
भरत यांनी दिलेली आकडेवारी
भरत यांनी दिलेली आकडेवारी नागपूर जिल्ह्याची आहे असे वाटते, पूर्ण महाराष्ट्राची नाही.
विदर्भात हिंदीचे प्राबल्य आहे
विदर्भात हिंदीचे प्राबल्य आहे हा निष्कर्ष कसा काढला ते सांगणार का
मराठीसुद्धा भारतीय भाषाच आहे
मराठीसुद्धा भारतीय भाषाच आहे ना? मग मराठीबद्दल इतका आकस का>> कुणी दाखवला आकस?
धागा तुम्ही काढायला हिंदीवर राग दाखवायला..
विसरलात का?
आणि हो विदर्भाला महाराष्ट्रात यायचेच नव्हते. त्यामुळेच नागपूर करार झाला. इतिहास वाचा थोडा. वेळ मिळाला तर.
विदर्भातील लोकांना
विदर्भातील लोकांना महाराष्ट्रात मध्ये यायचे नव्हते की आरएसएस समर्थक,bjp वाले मारवाडी लोकांना मनमानी करायला वेगळा विदर्भ हवा आहे हे तपासून पहावे लागेल.
तुम्ही मोडकेतोडके हिंदी
तुम्ही मोडकेतोडके हिंदी बोलल्यावर समोरचे हसतात का?
तेच मोडकेतोडके मराठी बोलले तर समोरच्या मराठी माणसाचा अभिमान उफाळून येतो.. आधी तो हसतो.. मग दुरुस्ती करायला लागतो..
बाहेर कशाला.. इथेही आहेत असे महाभाग...
Rss आणि भारतीय जनता पार्टी ला
Rss आणि भारतीय जनता पार्टी ला देशाचे वैविध्य नकोच आहे .
म्हणूनच 1 देश 1 भाषा
1 देश 1 प्रवेश परीक्षा
1 देश 1 रेशन कार्ड असली नाटक चालू असतात.
पण हे लोक स्वीकारणार नाहीत
झाली comedy सुरू.
झाली comedy सुरू.
नाही देश स्वतंत्र झाला तेव्हा
देश स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेस सत्तेवर होती नाही तर असल्या bjp च्या अर्धवट विचार मुळे देश तेव्हाच अनेक भागात विभागला असता.
भाषे वर आधारित राज्य निर्माण झाली म्हणून भारत एक राहिला.
अजुन पण एक भाषा एक देश असे ऐकले तरी अनेक राज्य अस्वस्थ होतात .
भाषे वर आधारित राज्य निर्माण
भाषे वर आधारित राज्य निर्माण झाली म्हणून भारत एक राहिला.>> भाषावार प्रांतरचनेस मुख्य विरोध कुणाचा होता हे माहित आहे का?
Pages