भाषावार प्रांतरचना करताना जर एखाद्या गावातल्या लोकसंख्येपैकी ५०% हून अधिक लोक जी भाषा बोलतात ती भाषा ज्या राज्याची त्या राज्यामधे ते गाव सामील केलं गेलंय का? की काही वेगळी पद्धत होती?
समजा मी लिहिली तीच पद्धत होती तर मग महाराष्ट्रातल्या विदर्भात आज हिंदीचा इतका बोलबाला का? इतके हिंदीभाषिक विदर्भात कसे काय? गोंदियासारखा जिल्हा तर आज पक्का हिंदीभाषिक झालाय.
विदर्भातल्या जिल्हा न्यायालयांमधे आणि नागपूरच्या उच्च न्यायालयात इंग्रजीसोबतच हिंदीतही खटला चालवता येतो पण मराठीत चालवता नाही असे मला विदर्भातल्या एका व्यक्तीने सांगितले.हे खरे आहे का?
जर विदर्भात आज हिंदी इतकी पसरली असेल तर १९५३ साली फझल अली आणि त्यांच्या सहकार्यांनी विदर्भातल्या ८ मराठी भाषिक जिल्ह्यांचे 'विदर्भ नावाचे मराठी भाषिकांचे राज्य बनवावे' हा अहवाल दिला तो कशाच्या आधारे? त्यावेळी जर आयोगाच्या निरीक्षणानुसार/अभ्यासानुसार जर हे ८ जिल्हे मराठी भाषिक होते तर १९५३ नंतर विदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषिक साधारण कोणत्या साली किंवा कोणत्या दशकात आले? ते इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंदी पट्ट्यातून मराठी भाषिक विदर्भात येण्याची कारणे कोणती? की हे हिंदीभाषिक विदर्भात १९५३ च्या आधीपासूनच विदर्भात मोठ्या संख्येने होते?
नेमकं काय चुकलं? फजल अली आयोगाने चुकीचा अहवाल दिला होता असं म्हणण्याला काही पुरावे आहेत का? फजल अली आयोग चुकला नसेल तर मग विदर्भात चिंता करावी इतका हिंदीचा वापर का केला जातो? १९५३ पासून आज २०२० पर्यंत शाळांमधून मराठीतून शिक्षण देऊनही महाराष्ट्रातल्या विदर्भात हिंदीचा इतका प्रसार कोण करतंय?
हा व्हिडिओ बघा.
एका मराठी वृत्तवाहिनीचा वार्ताहर देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीला हिंदीतून प्रश्न का विचारत असेल? याचाच अर्थ विदर्भात हिंदी भरपूर बोलली जाते असा अर्थ लावावा का?
मराठी काय अन हिंदी काय अन
मराठी काय अन हिंदी काय अन इंग्लिश काय
मराठी म्हणजे कौसल्या
हिंदी म्हणजे सुमित्रा
आणि इंग्लिश म्हणजे कैकयी
( तिने जगाच्या सर्व भाषांना वनवासात ढकलले आहे आणि तिथून त्या भाषा परत येण्याची शक्यता शून्य आहे)
Pages