मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले. >>> रेको बद्दल धन्यवाद विक्रम!

हास्यरसिक, हास्यसरपंच, हास्यतलाठी, हास्यपाटील हे निमित्त फक्त. >>> Lol हास्यप्रधानसेवक असे अ‍ॅड करणार होतो पण त्याची फोड द्व्यर्थी होऊ शकते. इथे द्व्यर्थी म्हणजे फक्त दोन अर्थांनी. हास्याचे पंप्र हा एक अर्थ. जो प्रामुख्याने हसतो असा सेवक हा दुसरा Happy करमणूकप्रधान चित्रपट म्हणतात तसे.

फारेण्ड Lol
हास्यप्रधानसेवक यावरून झालेल्या कोट्या उच्च प्रतीच्या आहेत.

हास्यप्रधान + सेवक या शब्दाने जाम हसू आलं. आणि सेवक या शब्दाचा हपाने लक्षात आणून दिलेला अर्थ आणखी मजेशीर आहे.

"लाइक आणि सब्स्क्राइब"
>>>> काल इथले recommondation वाचून बुक माय शो वर चेक केलं तर आमच्या पिंची एरिया मध्ये एका पण थिएटर ला हा पिक्चर नाही Sad

फुलवन्ती बघितला!
वरच्या सगळ्याच विषेश करुन सावलीच्या रिव्ह्युशी अगदी सहमत, प्रा.मा चे मधेच गावठि,मधेच शुद्ध उच्चार याने फार रसभन्ग होतो..
फुलवन्ती सिरियल मुळ कादबरिवर तन्तोतत आधारित होती बहुधा, त्यात अरुण गोविल खरोखर प्रगाढ पन्डित वाटतो, तो जेव्हा फुलवन्ती चॅलेन्ज देत तेव्हा ती कुठे चुकली हे पुर्ण जाणून असतो कारण त्याचा स्वतःचा पण तालासुराचा अभ्यास असतो..हे तो तिला शर्त हरल्यावर कुठे चुकलिस हे निट दाखवुन ही देतो.
इथे गश्मिर साहेब बोलुन बसलो, तोन्डातुन निघुन गेल म्हणतायत विषेश करुन पखवाज वाजवायला.. पारन्गत नसताना अस चॅलेन्ज कस कोण घेइल त्याने शास्त्रीजी इमेज प्रगाढ पन्डित,अभ्यासु अजिबात वाटत नाही..मान्गलेच्या ओव्हर अ‍ॅक्तिगला वाव मिळावा म्हणून मुळ कॅरेक्टरलाच धक्का पोहोचवलात?? धन्य!!
गश्मिरच्या अ‍ॅक्टिन्गचे कोणतेही कन्गोरे दिसत नाहित...तेवढा वावच त्याला दिलेला नाही.
बाकि वातावरण निर्मितीसाठी १० नर्तिका मागे, फुलवन्तीचा आखा तान्डा, हास्यजत्रेतले कलाकार (तिच अ‍ॅक्तिन्ग इथेहि करतात) पन्डितजिची वेद शास्त्र युक्त घर दाखवाय्ची रेलचेल पुर्ण खोटीच वाटते..त्याने मुव्ही भव्य दिव्य वैगरे न होता कुणाला दुखवायचा म्हणून फक्त सर्वसमावेशक होतो.
स्नेहल तरडे ने चान्गल काम केल आहे..

बघितला फुलवंती, नोप! अजिबात जमलेला नाही.
गश्मीर आणि प्राजक्ता - नुसतेच दिसायला रेखीव . बाकी अभिनय, एक्प्रेशन्स इ. पाहिले तर एक दगड अन दुसरा धोंडा . तो गश्मीर अजिबात विद्वान वगैरे वाटत नाही. मंद वाटतो बर्‍याचदा. कारण वेडगळासारखा कुठेतरी भलतीकडेच बघत असतो बर्‍याच सीन्स मधे. त्याच्या कॅरेक्टरबद्दल काडीचा रिस्पेक्ट निर्माण होत नाही. त्याच्या त्या पैजेला, इतर वागण्याला काहीच लॉजिक नाही. त्यात त्याच्या पखवाज शिकण्यावरून अकारण विनोद केलेत. त्यामुळे तो अजूनच मठ्ठ वाटायला लागतो. प्राजक्ता गोग्गोड हसण्याव्यतिरिक्त काहीही भाव चेहर्‍यावर दाखवायला असमर्थ दिसते. त्यामुळे इतका मह्त्त्वाचा मुकाबला हरल्यावर ही यडपटासारखी हसतीय काय? असे वाटते. तिथे मेकर्स ना तिची चलबिचल, गोंधळ, घालमेल काहीही दाखवता आलेले नाही. अचानक पात्रे त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वाशी फटकून का वागतात काही कळत नाही. मधेच काही कॉमेडीचे विनाकारण प्रयत्न. एकूण कथाच धड कन्व्हे करायला जमलेली नाही. आं ? हे काय ?कसं झालं ? हा विचार प्रेक्षकांनी करायचा.
काळाचे काही भान ठेवलेले दिसत नाही. पेशवीण बाई, इतर घरंदाज बायका बघावे तेव्हा दरबारात, घरासमोरच्या व्हरांड्यात , ओट्यावर वगैरे बसून येणार्‍या जाणर्‍या पुरुषांशी वगैरे खुशाल बोलताना, वाद, हास्यविनोद सहजच करताना दिसतात. अर्थात सिनेमाचा दर्जा बघता ही अपेक्षा फार झाली,
भाषेचाही कुणी काही विचारच केला नसावा, सगळे बह्तेक वेळ आधुनिक , शुद्ध मराठी, आणि मधेच एखादा रँडम शब्द "असंल " "कुनी" वगैरे कृत्रिम पणे बोलतात. ती आधुनिक भाषा सतत खटकते कानांना. नृत्ये पण २-३ तुकडे वगळता काही खास नाहीत, तीही मला मॉडर्नच वाटली.
भन्सालीचा प्रभाव दिसतो सगळीकडे पण तो म्हणजे वॉट्सॅप आंटीज नी भन्सालीची सिनेमा बघून तश्शीच रील करण्याचा प्रयत्न करावा इतपत लेवल चा. कारण भन्सालीही इतिहास वगैरे गुंडाळून ठेवत असला तरी स्टोरीटेलिंग, खटकेबाज सीन्स इ. मुळे त्याचे सिनेमे खिळवून ठेवतात प्रेक्षकांना. इथे सगळाच आनंद आहे.

अनुमोदन! सगळी पात्रं वेडगळ दिसतात!
पेशवेच स्वत: टिनपाट दिसतात आणि मसनदीऐवजी पायरीवर किंवा पारावर बसल्यासारखे बसतात. कोणीही सोम्यागोम्या त्यांच्यावर 'श्रीमंत!' म्हणून ओरडतो!
अगदी फिक्शनल स्थळकाळ आहे असं मानलं तरी पखवाज न्हाणीघरात नेऊ नये इतकं पात्रांना कळायला हवं ना?!
संपूर्ण भारतातून फुलवंतीला शिकवायला आलेल्या नर्तिका हा तर सर्वात मोठा विनोद आहे. विभावरी देशपांडे इरकल तमिळ पद्धतीने गुंडाळून आंडाल अंबाडा बांधून हिंदी बोलते, आणि ती कुणी मुघल अनारकली घातलेली नर्तकी त्यावर ठुशी घालून मराठी बोलते!
मस्तानी महाल आणि त्यातला नाच हा बहुतेक 'भूल भुलैया'ला नॉड आहे. तो बॅड आहे.
जो माणूस एकदादेखील घरात घेत नाही, त्यासाठी स्वतःच देशत्याग करतो, त्याच्याशी 'आता आपलं जन्मोजन्मीचं नातं जुळलं' असं समजणं हा थोर डिल्यूजनल क्लायमॅक्स आहे. ते नातं दाखवायला सीक्वल न निघो इतकीच गजाननाच्या चरणी प्रार्थना! Proud

मैच्या रिव्ह्युला अनुमोदन!
चान्गला करता आला असता मुव्हि असा विषय होता पण सगळच भव्य दिव्य आणी घाइघाईत केलेल दिसतय..
प्रा ने एक दोन इन्टरव्ह्युत सान्गितले की बजेट इशु मुळे सगळे डान्स दिड का दोन दिवसात शुट केलेत..एवढ्या घाइत केल्यावर काय क्वालिटी राहणार?

एका पैठणीची गोस्ट बघितला, साध्या भाबड्या पण सचोटिने वागणार्‍या लोकाची कथा...सायली सन्जिव वेगळ्या भुमिकेत आवडली, सुयोग च काम पण छान आहे...इतर कलाकार, छोट्स घर वैगरे एकदम चपखल घेतलय.

फुलवंती मधे अर्चना जोगळेकर होती तेव्हां गुलाब, जाई, जुई , मोगरा अशी फुलं उगवायची,
प्रामा च्या फुलवंतीच्या काळात कर्दळी, धोतरा, हातगा अशी फुलं उमलू लागली आहेत.

>>>>>त्यातून त्याला दोन-तीनदा अंघोळ करायला लावलीये. पैसे इथेच वसूल होतात.
क्या बात है मामी. रसिक रसिक Happy

गश्मीरचा फोटो पाहीला. जबरदस्त!!! फुलवंती इज अ मस्ट वॉच नाऊ Happy

कॉपीराईट इश्यू असेल. आठवत असतील तर गाणी लिही ना कुठली होती.
हल्ली चला हवा येऊ द्या मधली पण गाणी म्युट करतात Rofl

'माई री मैं नीर भरन नहीं जाऊं' हे एक आठवतंय नक्की.
आणि 'तेरा मेरा मनवा कैसे इक होई रे'.
ही 'लेकिन'च्या अल्बममध्ये अ‍ॅड केलेली दिसतायत यूट्यूबवर.

आणखी आठवतील तशी लिहिते (टीपापात Proud ).

विभावरी देशपांडे इरकल तमिळ पद्धतीने गुंडाळून आंडाल अंबाडा बांधून हिंदी बोलते, आणि ती कुणी मुघल अनारकली घातलेली नर्तकी त्यावर ठुशी घालून मराठी बोलते! >> Lol

अमित, च ह ये द्या अजून चालू आहे?

स्वाती ही गाणी लेकीनच्या सीडी मध्ये होती. आम्ही पहिल्यांदा जेव्हा सीडी प्लेअर घेतला ९७ साली, तेव्हा ही सीडी मी आवर्जून घेतली होती. काय अफलातून ऐकायला यायची ही सगळी गाणी. सापडली सीडी तर कव्हर टाकतो इथे.

Pages