Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि बायकांचा पुनर्जन्म का
आणि बायकांचा पुनर्जन्म का नाही झाला >>> अगं पण इतक्या अल्पवधीत कोणाचेच पुनर्जन्म शक्यच नाहीत ना! पिक्चर बनवणार्यांची मोठ्ठी आणि बेसिक चूक आहे ही.
पिक्चर बनवणार्यांची मोठ्ठी
पिक्चर बनवणार्यांची मोठ्ठी आणि बेसिक चूक आहे ही. >>> सगळा पिक्चरच चूक आहे.
अगं पण इतक्या अल्पवधीत कोणाचेच पुनर्जन्म शक्यच नाहीत ना! >>> सही पकडे है. मला तेव्हा लक्षात आले नाही. त्यांच्या सहवासाने मीही ढ झाले.
सगळा पिक्चरच चूक आहे. >>>
सगळा पिक्चरच चूक आहे. >>>
हिंदी पासून ते तेलुगू पर्यंत सर्वांना पिक्चरमधल्या हीरो वर परदेशी ललना फिदा आहेत >>> ओह, यात आद्य 'फॉरेनची पाटलीण' विसरू नका बरे! अजून कुठला आद्य असेल तर माझ्या माहितीत भर घाला
धमाल लिहिलंय..
धमाल लिहिलंय..
बाई गं !! काय वाट लावून
बाई गं !! काय वाट लावून ठेवलीय इथल्या सबलांनी !!
स्वजो बद्दल चक्क सहानुभूती वाटू लागलीय. जाऊन त्याला दु:खाने मिठी मारावी असे वाटतेय.
मायबोलीचा एक दुर्दैवी बळी.
र आ
र आ
भयंकर लिहिलंय काल झोपेत
भयंकर लिहिलंय काल झोपेत वाचलं होतं, काज परत वाचलं.
ड्राईव्ह थ्रू फिदा! भयंकर पंच.
मध्ये एकदा वाचलं होतं की आता लंडन आणि दुबई ला शूटिंग करणं भारतात शूटिंग करण्या पेक्षा बरंच स्वस्त आणि सोपं पडतं.
2 ऑक्टोबरला मैत्रिणीला बघायचंय म्हणून नवरा नवसाचा2 ला जाणार आहे.
अस्मिता
अस्मिता
कल्पना म्हणून वाईट नाहीये खरं तर ही. एखाद्या चांगल्या दिग्दर्शकाने चांगला सिनेमा काढला असता याच्यावर.
नमान - २
नमान - २
स्वप्नील जोशी सचिनचा मुलगा असतो. त्याच्या लग्नासाठी सचिनजी नवस बोलतात. त्यात कोकण रेल्वेने जाणं कंपल्सरी असतं. नवस खूपच कडक असतो असं लोक सांगत असतात. रत्नागिरी गावाच्या बाहेर एक झाड असतं, त्याच्या शेंड्याला आलेला आंबा तोडून सचिनने खाल्ला तर सचिन आजोबा होणार असतो.
पण शेवटी असं काही होतं कि सचिनचे सर्व गैरसमज दूर होतात आणि त्याला कळतं कि ज्याला आपण मुलगा समजत होतो, तो प्रत्यक्षात आपला भाऊ आहे, जो त्यांच्या वडलांनी बोललेला नवस फेडताना हरवलेला असतो. स्वप्नील जोशी पण म्हणतो कि "तेच म्हटलं माझे वडील माझ्यापेक्षा तरूण कसे ?"
इतक्यात वरून तो आंबा झाडावरून गळून अलगद सचिनच्या हातात पडतो आणि सुप्रिया आणि श्रेया या बहीणी बहीणी हात जोडत नवस फिटला म्हणून झाडाला धन्यवाद म्हणतात. त्या आंब्याची हेमल इंगळे बनते आणि स्वप्नील जोशीच्या गळ्यात वरमाला घालते. स्वप्नील जोशी सचिनकडे बोट दाखवून म्हणतो " हा तुझा धाकटा दीर"
इतक्यात हेमलची बहीण येते आणि गाणं सुरू करते " ताई तुझा उंदीर बिचारा " आणि हसत खेळत सिनेमा संपतो.
इथे हेमल आणि सचिन एकमेकांकडे पाहतात आणि चार बोटं दाखवतात.
चित्रपट स्वप्नटॉकीज मधे दिसला.
May be all five females are
May be all five females are in each universe. Like everything everywhere all at once. Swapnil travels to each for wish fulfilment he he
बाई ग…… मला काही कळलाच नाही……
बाई ग…… मला काही कळलाच नाही…….. आता बघु का मी पण????
दंडवत घालते पण विकत घेऊन बघू
दंडवत घालते पण विकत घेऊन बघू नका. >>
त्यांच्या सहवासाने मीही ढ झाले. Lol >>>
ड्राईव्ह थ्रू फिदा हे कहर आहे
ज्याला आपण मुलगा समजत होतो, तो प्रत्यक्षात आपला भाऊ आहे >>> सिरीयसली? चित्रपट "स्वप्नटॉकीज" मधे पाहिला वाचले त्यामुळे विचारतोय
बाई ग…… मला काही कळलाच नाही……
बाई ग…… मला काही कळलाच नाही…….. आता बघु का मी पण????
सिरीयसली? >>> म्हणजे स्वप्नात
सिरीयसली? >>> म्हणजे स्वप्नात पाहिला.
सचिन स्वप्नील जोशीचा बाप /सासरा हे त्याच्या चाहत्यांना कसे सहन होईल ?
इथे काय नाचायचंय ते नाचा >>>
इथे काय नाचायचंय ते नाचा >>>
हो उगीच इतर ठिकाणी असलं नाचकाम केलं तर लोक पकडून मेंटल हेल्थ इंस्टिट्यूटमध्ये न्यायचे…
पण मी काय म्हणतो सिनेमा पीळ
पण मी काय म्हणतो सिनेमा पीळ असणारे हे माहीत असून स्वतःला का शिक्षा करून घ्यायची?
मराठीत मी कायतरी लै भारी करतोय असा आव आणून चित्रपट बनवणारे जास्त झालेत.
मध्येच एखादा लख्खकन सैराट सारखी चमक.
मी पण एवढ्यातच घरत गणपती
मी पण एवढ्यातच घरत गणपती बघितला. आवडला. एकत्र कुटुंब पद्धती असल्याने काही गोष्टी रीलेट पण झाल्या. सगळे फॅमिली डायनॅमिक्स एकदम बारकाईने टिपले आहेत. इथे कोणीच त्याविषयी काही लिहिलं नाही म्हणून आश्चर्य वाटलं. मलाही मध्येच ' बाईपण ' च्या वाटेवर जातो की काय म्हणून भीती वाटलीच होती. पण नाही गेला. काही प्रसंग अगदी खरेखुरे वाटले. कोणीही स्वतः च्या मूळ स्वभाव आणि बॅकग्राउंड ला विसंगत वागत नाही. हे खूप आवडले.
त. टी. मुख्य स्टोरी लाईन एकदम छोटी किंवा घासून गुळगुळीत झालेली आहे. पण सादरीकरण उत्तम झाल्याने चित्रपट आवडून जातो एकदम.
'बाई ग' धमाल लिहिलं आहे. दत्त
'बाई ग' धमाल लिहिलं आहे. दत्त नाही ला जाम हसलो.
शिशुपाल वध आमच्या घरी फार लवकर झाला बहुतेक. लावलेला दिसला पण मी जाई पर्यंत बदललेला होता. मी ही फार चौकशी केली नाही. कदाचित माझी बडबड कोण ऐकणार म्हणून बंद केला असेल.
ढोम्या म्हणालेला की लंडन ला सबसिडी मिळते म्हणे.
मला पण हा काय कर लग्न आणि दे डिव्होर्स का मर करत होता काय शंका आली. पण वर वाचून निरसन करून घेतलं
पियू, मी लिहिलेलं. पण मला बकवास वाटलेला घरत गणपती. इथे नसेल तर चिकवा वर लिहिलं असेल.
मी काल थोडा पाहिला घरत गणपती.
मी काल थोडा पाहिला घरत गणपती. सुमारे अर्धा तास. ठीकठाक वाटतोय अजूनतरी. कोकणाचे एरियल शूटिंग फार सुरेख आहे. त्या पंजाबी/दिल्लीच्या मुलीला प्रसाद/नेवैद्य हा कन्सेप्ट माहीत नाही हे जरा जास्तच झाले. आणि घरी पूजा असेल तर कसे कपडे घालावेत याबाबत्तीतही नॉर्थ महाराष्ट्रापेक्षा जास्त कट्टर आहे, त्यामुळे तेथील मुलगी इतका इनअॅप्रोप्रिएट ड्रेस गणपतीच्या दिवशी वापरेल हे ही चांगलेच ताणलेले आहे.
आश्विनी भावेला ओळखलेच नाही आधी. लोक अगदी पुण्यामुंबईची भाषा बोलत आहेत. कोकणी भाषा नव्हे - मराठीच, पण तो टिपिकल कोकणी टोन व वाक्यरचना अजून ऐकू आली नाही. "मधल्या आळीतील" भाषा वगैरे.
येथे अमितने 'घरत गणपती' वर
येथे अमितने 'घरत गणपती' वर लिहिलेले वाचून मी तो बघण्याऐवजी हा 'बाई गं' बघितला. सारखेसारखे शंभर अपराध होण्याची वाट बघत आहोत असे वाटते. सुदर्शन चक्र नीड्स अ ब्रेक , अर्धा तासात शंभर अपराध करतात हे.
तुम्ही दोघांनी (फा आणि पियू) लिहिलेले वाचून सुदर्शन 'हॅन्डी' ठेवून बघून बघते.
सर्वांना धन्यवाद.
अनु, लंडनला मराठी चित्रपटाच्या शूटींगसाठी सबसिडी मिळते आणि 'हे' तयार होते.
इतक्यात वरून तो आंबा झाडावरून
इतक्यात वरून तो आंबा झाडावरून गळून अलगद सचिनच्या हातात पडतो आणि सुप्रिया आणि श्रेया या बहीणी बहीणी हात जोडत नवस फिटला म्हणून झाडाला धन्यवाद म्हणतात. त्या आंब्याची हेमल इंगळे बनते आणि स्वप्नील जोशीच्या गळ्यात वरमाला घालते. स्वप्नील जोशी सचिनकडे बोट दाखवून म्हणतो " हा तुझा धाकटा दीर"
>>>>
मी काही दिवसांपूर्वी 'बॉम्बे टू गोवा' बघितला होता, त्यातल्या बऱ्याच गोष्टी 'नवरा माझा नवसाचा-१' मधे ढापलेल्या वाटल्या. इकडे किशोर कुमारची गाडी खराब होते व तो लिफ्ट घेतो तिकडे सोनू निगमची. श्रेय दिलेय की नाही कल्पना नाही. 'बॉम्बे टू गोवा' ऑटाफे आहे, त्यातला विनोद धमाल आणि निरागस आहे.
त्यातल्या बऱ्याच गोष्टी 'नवरा
त्यातल्या बऱ्याच गोष्टी 'नवरा माझा नवसाचा-१' मधे ढापलेल्या वाटल्या. इकडे किशोर कुमारची गाडी खराब होते व तो लिफ्ट घेतो तिकडे सोनू निगमची. श्रेय दिलेय की नाही कल्पना नाही. > प्रवासातील बऱ्याच गोष्टी ढापलेल्या आहेत , तो अम्मा पकोडे वाला मुलगा , रीमा लागूचे character ललिता पवार वरून घेतले आहे असे वाटते . पण श्रेय दिलेले नाही . उलट मला ह्या गोष्टी सुचल्या असेच महागुरू म्हणतात. मी काही दिसांपूर्वी नमान १ परत पहिला. पूर्वी पाहिलेला तेव्हा आवडला होता , आता अभिनय , जोक्स अगदीच फालतू वाटले .
सचिनचे बहुतेक सिनेमे ओरिजिनल नाहीत. आम्ही सातपुते- सत्ते पे सत्ता, बनवाबनवी -बीवी और मकान, एकापेक्षा एक - see no evil hear no evil या सिनेमांवर आधारित आहेत
थिएटरला जाऊन सचिनचा शेवटचा
थिएटरला जाऊन सचिनचा शेवटचा चित्रपट मापक पाहिला होता. एका पेक्षा एक हा तुकड्या तुकड्यात पाहिलेला. बनवाबनवी नंतर आलेला का ? कारण तो पण पाहिला होता. आम्ही सातपुते पाहिल्यानंतर सचिन चं सपक लोशन झाल्याची खात्री पटली होती. मापक च्या वेळीच ते जाणवलेलं, पण त्या वेळी ते चालून गेलं.
भुताचा भाऊ गजब वरून काढलेला. बनवाबनवी हृषिकेश मुखर्जींच्या बीवी और मकान वरून काढलेला. आम्ही सातपुते तर चक्क सत्ते पे सत्ता वरून काढलेला. सत्ते पे सत्ता मधे सचिन सहनेबल होता. पण बिग बी च्या जोड्यात पाय घालायचा प्रयत्न आम्ही सातपुते मधे केला.
एका पेक्षा एक मधेच एक आंधळा एक बहिरा असेल तर तो सी नो एव्हिल, हिअर नो एव्हिल वरून काढलेला. बाबाब्र फारच पांचट आहे असा रिपोर्ट प्राप्त झाल्याने पाहिलाच नाही. तो ही नक्कलच असेल.
बाबाब्र: 3 men and a baby
बाबाब्र: 3 men and a baby
याच कल्पनेवर साजिद खान चा हेय बेबी पण निघाला.
अशी ही बनवाबनवी
अशी ही बनवाबनवी
नवरी मिळे नवऱ्याला
गंमत जंमत
माझा पती करोडपती
...
हे लहानपणी पाहिलेले एकूण एक आयकॉनिक चित्रपट सचिनने दिग्दर्शन केलेले आहेत?? सिरीअसली??
पडद्यामागच्या सचिनबद्दल अजून जाणून घ्यायला हवे..
कोणाला वेगळा धागा काढता येईल का?
उगा टार्गेट करतात सचिनला.
उगा टार्गेट करतात सचिनला. त्याची मुलाखत बघितली तर चांगला बोलला की!
“ 'बॉम्बे टू गोवा' बघितला
“ 'बॉम्बे टू गोवा' बघितला होता, त्यातल्या बऱ्याच गोष्टी 'नवरा माझा नवसाचा-१' मधे ढापलेल्या वाटल्या. ”
“ सचिनचे बहुतेक सिनेमे ओरिजिनल नाहीत.” -
लाहोर व्हाया कुवेत!! काय हे/हा गजब!!! सचिनला आधी सुचलेल्या आणि त्याने मोठ्या मनाने इतरांना सांगितलेल्या स्टोर्यांवरून हे चित्रपट निर्माण झाले आणि ते ‘खरं तर कसे असायला हवे होते‘ हे सामान्य प्रेक्षकांना कळण्यासाठी सचिनने ते परत मराठीत काढून दाखवले…… म्हणजे ह्या सगळ्या युनिव्हर्सल केऑसमधून, ऑकल्ट एक्स्पिरियन्स घेताना….. तुम्ही एकदा गुरूदेवांचं ‘इन ट्यून विथ द ट्यून‘ वाचाच, ( ५ रुपये किंमत आहे!) म्हणजे तुम्हाला कॉसमॉस म्हणजे काय ते नीट कळेल.
फेफ
फेफ
'बॉम्बे टू गोवा' ऑटाफे आहे,
'बॉम्बे टू गोवा' ऑटाफे आहे, त्यातला विनोद धमाल आणि निरागस आहे. >>> टोटली! त्यातील १० मिनिटाच्या रोल मधला किशोरही धमाल आहे. त्याला पाहून मेहमूद व तो ड्रायव्हर नाचू लागतात, तर तो ही नाचू लागतो
सत्ते पे सत्ता मधे सचिन सहनेबल होता >> हो तो सचिन मस्त होता. इव्हन शोले मधला. त्याची महागुरू पर्सनॅलिटीवाले कार्यक्रम किंवा मुलाखती वगैरे मी पाहिलेले नाहीत, त्यामुळे इतरांच्या तो डोक्यात जातो तसे मला इरिटेट होत नाही.
बाकी ढापण्याबद्दल काही नाही. श्रेय द्यायला हवे हे बरोबर पण ते हिंदीवाल्यांनीही दिलेले नाही. इव्हन सत्ते पे सत्ता इंग्रजीवरून घेतला होता. पिक्चर मस्त असला म्हणजे झाले. आम्ही सातपुते पाहिलेला नाही. नमन-१ ही पाहिल्याचे लक्षात नाही.
फेफ
फेफ
Pages