संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.loksatta.com/mumbai-news/then-hospital-services-will-be-disr...

मागणीअभावी महानिर्मितीला त्यांचे अनेक संच बंद किंवा किमान पातळीवर सुरू ठेवावे लागले आहेत. दुसरीकडे करोनाच्या सावटात राज्यातील सर्व रुग्णालयांत व्हेंटिलेटरसह इतर यंत्रासाठी योग्य दाबाने वीज देण्याचे आव्हान महावितरणपुढे आहे. त्यात सर्वानी अचानक दिवे बंद केले तर ग्रिड कोसळण्याचा व त्यातून महाराष्ट्रासह देशही अंधारात जाण्याचा धोका आहे. शिवाय रुग्णालयांसह इतर वैद्यकीय तपासणी व सेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे. एकदा पॉवर ग्रिड बंद झाल्यास त्याला पुन्हा कार्यान्वित करायला १२ ते १६ तास लागतात. तर वीज स्थिती सामान्य व्हायला सुमारे आठवडा लागेल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिला.

नागरिकांनी एकाच वेळी घरातील वीज बंद केल्यास तांत्रिक समस्या निर्माण होऊन यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता निश्चितच आहे. एखाद्या रस्त्यावरील वाहतूक बंद करून नंतर एकदमच सोडल्यास जे होते, तशीच परिस्थिती ही विजेच्या बाबतीत निर्माण होऊ शकते. एखादा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद पडल्यास त्याला पूर्ववत करण्यास आठवडय़ाचा कालावधी जातो. यापूर्वी २००३ मध्ये असे घडले होते. तेव्हा १४ तास राज्य अंधारात गेले होते. मागणी एकदम प्रचंड कमी झाल्यास वरिष्ठ यंत्रणेपासून खालपर्यंत त्याचे नियोजन आवश्यक ठरते, पण ही बाब अत्यंत किचकट आहे. एखाद्या खोलीतील दिवा बंद करणे ठीक, पण सर्वच घरातील वीज बंद करणे योग्य नाही.

अभिजित परांजपे, विद्युत अभियंता

वाह बादशाह.. आज पुन्हा जिंकलंस... तू खराखुरा 'हिरो' आहेस भावा !

...गेली कित्येक वर्ष, अॅसीड अॅटॅक झालेल्या देशभरातल्या आपल्या बहिणींसाठी तू खूप मोठ्ठं काम करतोयसच ! ते ही गाजावाजा न करता !!
...विस्मृतीत गेलेल्या कितीतरी जुन्या अभिनेत्यांच्या हाॅस्पीटल-औषधपाण्याचा खर्चही तू उचलतोस, पण हे त्यांनाही माहिती नसेल, इतक्या शांतपणे !

..पण आज देशभरातल्या अनेक अभिनेत्यांसाठी तू आणखी एक आदर्श घालून दिलास - 'दान करावं पण ते कसं करावं' याचा आदर्श ! कोरोनाबाधीत रूग्णांच्या खर्चासाठी मदत म्हणून तुझ्या कोलकाता नाईट रायडर तर्फे पीएम केअर फंडात तू मोठी रक्कम दान करणार आहेस. ठीक आहे. बरेचजण करताहेत.

पण, एवढंच करून तू गप्प बसला असतास तर तू स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा कसला? महाराष्ट्राशी तुझं असणारं नातं लक्षात ठेवून रेड चिलीज स्टुडीओ तर्फे तू मुख्यमंत्री निधीतसुद्धा मोठी रक्कम दान करणार आहेस.

हे खरंतर खूप झालं... पण नाही. तुला माहिती अाहे की आता आपल्या देशाला नक्की किती पातळ्यांवर लढायचंय... तुझ्या मीर फौंडेशनतर्फे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यांना तू तब्बल ५०,००० Personal Protection Equipement (PPE)- म्हणजेच ग्लोव्हज-गाऊन्स-हेड गिअर्स-गाॅगल्स पासुन शूज पर्यन्त संपूर्ण किट- देणार आहेस !

आता काय राहिलं? तर गोरगरीब कुटूंबं. मीर फौंडेशन आणि एक साथ - दी अर्थ फौंडेशन मिळून ५५०० गरीब कुटुंबाना महिनाभर अन्न पुरवणार आहेत..

हे कमी होतं म्हणून की काय, याचबरोबर मीर फौंडेशन आणि रोटी फौंडेशन मिळून महिनाभर हातावर पोट असणाऱ्या १०००० गरीब कारागिरांना दरदिवशी...दरदिवशी, ३ लाख अन्नाची पाकिटे पुरवणार आहेत !
...आणि या सगळ्यासोबत दिल्लीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या २५०० कारागिरांना महिनाभराचे किराणा आणि राशन भरून देणार आहेत !

आणि हे कुठलंही व्हाॅटस् अॅप फाॅर्वर्ड नाही, जे बर्‍याचदा फेक असतं. असल्या फेक फाॅर्वर्डस् मुळे लोकांची दिशाभुल होऊ नये म्हणून तुला हे रितसर सर्क्यूलर काढून जाहीर करावं लागलं, नाहीतर हे कामही तू निमूटपणे केलं असतंस याची खात्री आहे !!! माझ्या मित्रयादीत पूर्वीपासून असणार्‍यांना खात्रीय किरण माने अफवा पसरवणारा आणि पोकळ उदोउदो करणारा नाही..

या देशावर प्रेम असणार्‍या प्रत्येकाला तुझा फक्त अभिमानच वाटेल..
सलाम किंग खान... कडकडीत सलाम !

- किरण माने. (सातारा)
अभिनेता

Srk is the only indian who won UNESCO award for charity.
तो जाहिरात करत नाही इतरांसारखी.

दहा हजार कामगारांना दर दिवशी ३ लाख अन्नपाकिटे यात एका शून्याची चूक वाटतेय. एक तर १०,००० आणि ३०,००० किंवा १००,००० आणि ३००,००० अशी जोडी योग्य वाटते.

हो

Blackcat, त्या अभिजित परांजपेंचे LinkedIn किंवा फेबू अकाऊंट ची लिंक आहे काय? बघू तरी कुठल्या मंडळात अभियंता आहेत ते..

शारुखचे पुन्हा एकदा अभिनंदन.... करोणाबाबतीत आता बदललेल्या परिस्थितीत अशा मदतीची गरज होती. काही करोणाग्रस्त जे डॉकटर व पोलिसांचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर थुंकतात वगैरे, अशांना शारुख ने दिलेल्या जागेवर (कालच कोणीतरी त्याने अशी जागा क्वारंताईं साठी दिलीय असे लिहिले) कारांताईं करावे. शारुखने शांत राहण्याची प्रार्थना केल्यास ते रुग्ण शांत होतील एव्हढी त्याची वट नक्कीच आहे...

महाराष्ट्र वीज मंडळाचे ट्विट. ते वेगळच काही सांगतंय म्हणून विचारलं अभिजित परांजपे कुठल्या मंडळात अभियंता आहेत म्हणून...

https://mobile.twitter.com/MSEDCL/status/1246463728025047041

मला वाटते सारे काही व्यवस्थित होईल. कारण पंप्रंच्या उद्घोषणेनंतर लगेचच विद्युन्निर्मिती, विद्युद्वाटप, विद्युद्वहन या क्षेत्रातली सगळी मंडळी झडझडून कामाला लागली आहेत. त्यांना मिळालेल्या तीन दिवसांच्या काळात पूर्ण दक्षता बाळगण्याची जय्यत तयारी झालीही असेल. तेव्हा, जे काही घडण्याजोगे होते किंवा नव्हते ते घडणार नाही.

ते कामाला लागले आहेत , म्हणजे भीती अनाठाई नव्हती , अन्यथा काम करायचे सोडून ते रविवार मजा करत बसले असते,

हल्ली मोदींजींचा कॉन्फिडनस कमी वाटतो , नैतर नोटांबंदीत कसे बोलायचे , नै 100 दिवसात अमुक तमुक झाले तर चौकात अमुक तमुक करा,
त्यामुळे त्यांच्यावरचा भरोसा आटत जाईल की काय असे वाटते

हो काही घडणार नाही आणि इतर विद्युत उपकरणे बंद करण्याची गरज नाही असे काही मरावीम व इतर विद्युतमंडळातील अभियंत्याकडून कळाले.

कोण कामाला लागलेत? काही अधिकृत पत्रकं वगैरे जाहीर झालीत की काय? लोड कमी जास्त होणे ही त्यांच्यासाठी नॉर्मल बाब आहे. रोज रात्री lights off होतात, रविवारी व शुक्रवारी अनुक्रमे कार्यालये व कारखाने बंद असतात.

त्यांनी काल फक्त एकच extra काम केलेलं दिसतय. वीज मंडळ वाले ग्राहकांना एसएमएस पाठवून सांगत आहेत की फक्त lights Off करा . घरातील सगळा वीजपुरवठा किंवा सगळी appliances बंद करू नका.. ( आग्या भौ, एसएमएस मिळाली की नाही?)

त्यामुळे त्यांच्यावरचा भरोसा आटत जाईल की काय असे वाटते

नवीन Submitted by BLACKCAT on 5 April, 2020 - 10:15 >>

सोनू, तुला त्यांच्यावर भरवसा होता व्हय?

हल्ली मोदींजींचा कॉन्फिडनस कमी वाटतो , नैतर नोटांबंदीत कसे बोलायचे , नै 100 दिवसात अमुक तमुक झाले तर चौकात अमुक तमुक करा ---- तेव्हा विश्वास ठेवला होता का? मग आता त्यांच्या confidence ची आणि त्यांच्या कॉन्फिडन्स booster dose ची गरज का भासते आहे!
आमचा विश्वास आहे पंतप्रधानांवर की सध्या देश संकटात असताना आम्हाला फक्त ते सांगतील ते ऐकायचं आणि त्याप्रमाणे वागायचं आहे. निर्णय आणि परिणामांची जबाबदारी घ्यायला ते समर्थ आहेत.
सतत second guess केल्यामुळे काय साध्य होते? सेकंड guess करणारी मंडळी नेतृत्वाला second guess करता करता कधी शंका त्यांच्या स्वतःच्या मनाचा ताबा घेते हे कळत पण नसेल. Problem दुसऱ्यांच्या नाही स्वतः चा आहे/होतो.

मी माझा
तुमचा आटेल हो

आमचा नेहरुवर भरोसा आहे, काहीही झाले तरी अजून वरून खाली उतरून जबाबदारी घेतात व राजीनामा देतात

देशात काँग्रेसच राज्य असतं तर इतक्यात बंगाराम बेटांवर एक सेफ हाऊस तयार झाले असते आणि सर्वोच्च व्हीआयपी संचारबंदी तोडून तिथे राहायला गेले असते , नाही का? आणि आजूबाजूला विनाशिका, पाणबुड्या वगैरे रक्षणासाठी... मग काय बिशाद कोरोनाची?

मी माझा
तुमचा आटेल हो. >>

हे असले भास व्हायला कुठलं इंजेक्शन घेतलंस भावा?

भाजपचे चाणक्य काश्मीर नावाच्या बेटावर होते. तिथल्या बातम्या सध्या दुर्लक्षित आहेत Wink

मोदी स्वतच्या विरोधकांना lollipop देतात आणि विरोधक इतर महत्वाच्या गोष्टींकडे कानाडोळा करत राहतात.

pinchi.jpg

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1246390033189187585
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
We will save Maharashtra from this crisis. But, if someone circulates fake news or videos like commodities or notes being smeared with saliva or with inflammatory content, my law will catch up with them. They will not be spared. Dont do this even for fun.

दिवे बंद प्रकरणी यंत्रणांना काय काय करायला लागेल त्याच्या मेनस्ट्रीम मीडियातल्या बातम्या आहेत. ते का करायला लागेल तेही त्यात सांगितलंय. आकडेवारी आहे. आधी असं झालं होतं का त्याचे दाखले आहेत. एका केंद्रीय मंत्र्याचं नावही त्यात आहे. पण आपण रोज रात्री दिवे मालवून दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पुन्हा लावतो इतकं ते साधंसोपं आहे. त्यावर बातम्या येताहेत, स्पष्टीकरणंं येताहेत.
आणि हे सगळं कशापायी?

उत्तर नको.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1246390033189187585
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
We will save Maharashtra from this crisis. But, if someone circulates fake news or videos like commodities or notes being smeared with saliva or with inflammatory content, my law will catch up with them. They will not be spared. Dont do this even for fun.

नवीन Submitted by भरत. on 5 April, 2020 - 11:12. >>

कोणी एखाद्या व्यक्तीला थुंकी इतर वस्तूंना लावताना पाहिले किंवा तसे रेकॉर्डिंग केले तर गप्प बसावे, ते कोणालाही सांगू नये. नाहीतर तुमच्यावर कारवाई होणार !.

असा अर्थ वरील ट्विट चा माझ्यामते निघतोय. जाणकारांनी दुरुस्ती सुचवावी.

समजा, एखाद्या व्यक्तीने एखाद्या विक्रेत्याला फळांना/भाजीला थुंकी लावताना पाहिले, तर त्याने काय करावे, मग ती.माहिती आजूबाजूच्या लोकांपर्यंत जे आधी त्या विक्रेत्याच्या संपर्कात आले असतील त्यांना त्या प्रकाराबद्दल कसे माहीत पडणार, याची मार्गदर्शक तत्वे कुठेही सांगितलेली नाहीत. Clearly a communication blunder!

नवीन Submitted by भरत. on 5 April, 2020 - 11:22 >>

त्याआधी , मोदींनी फक्त दिवे बंद करा अस म्हटलेलं असताना , सगळी appliances off करा असे इतरांना मुद्दाम संगण्यामागे काही लोकांचा काय उद्देश असेल असा मला.प्रश्न पडतो.

आता विद्युत मंडळे "फक्त लाईट बंद करा, इतर appliances नको" असे एसएमएस पाठवून सांगत आहेत. त्यांना तसे एसएमएस पाठविण्याची गरज पडली कारण काही लोकं अफवा मुद्दाम पसरवत आहेत.

या सर्व प्रकारात विद्युत मंडळे बरोबर आहेत कारण त्यांना त्यांचे काम चांगल्या प्रकारे माहीत आहे.

Pages