तर लहानपणापासून चहा हवाच असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरलेलं नसल्याने काही एक अडायचं नाही . मुळातच लहान मुलांना चहा मिळायचाच नाही . दूध पिणं मात्र अत्यावश्यक!
पुढे यथावकाश चहाने आयुष्यात एंट्री घेतली . चहा आवडू लागला .मात्र अस्मादिकांचे चहा पिण्यातले नखरे बघून स्वतःचा चहा स्वतःच बनवायचा असं फर्मान निघालं. खरेतर चहा किंचित चॉकलेटी पांढरा असायला हवा , खूपप गोड नको , त्यात कुठल्याही प्रकारचा मसाला नको आणि "ताजाच" हवा , ज्यादा उकळलेला नको या अटी फार नव्हेत असे आमचे प्रांजळ मत आहे .पण हाय ये जालीम दुनिया ! तर ते असो ..
अश्या "नखऱ्या"मुळे हवा तसा परफेक्त चहा मिळणं दुरपास्त .स्वतः उठून खटपट करायचा कंटाळा आणि त्यामुळे चहा पिण्याचं प्रमाण कमी !
पण एकदा गंमत झाली . फायनल इयरच्या वेळी आजींना सोबत म्हणून आमच्या खोलीत अभ्यास करशील का अशी विचारणा नवीन शेजाऱ्याकडून (पक्षी :- आठल्ये काका )झाली .त्यांना कुठेतरी बाहेर जायचे होते .खरेतर आम्हीच त्या सोसायटीत नवे होतो. शेजारी चांगले होते त्यामुळे आढेवेढे घ्यायचा प्रश्न नव्हता . संध्याकाळी 4 ची वेळ होती. त्यामुळे चहा घेणार असा प्रश्न समोर आला . माझे चहा प्यायचे नखरे स्वतःला माहित असल्याने "नको नको" असं घुटमळून म्हणाले . तर मी नवीन असल्याने लाजतेय असा अर्थ आठल्ये काकांनी काढला . आणि माझ्या नकाराची दखल न घेता थोड्या वेळाने चहाचा कप समोर आणून ठेवला.
तो चहा बघताक्षणीच अरे आपल्याला हवा तसाच रंगाचा चहा आहे की असा उद्गार तोंडातून निघाला. "मात्र दिखावेपे मत जाव " असाही मनाने इशारा दिला .
तर चहाचा पहिला घोट घेताच वा ! हा माझा चहा असा जिभेने कौल दिला . मला हव्या तश्या पांढऱ्या चॉकलेटी रंगाचा , ज्यादा उकळी न आलेला ,कुठलेही मसाले घालून चव न बिघडवलेला असा तो चहा होता . नाही म्हणायला गवती चहाच पात होतं पण त्याने चव अजूनच एंहान्स झालेली . चहा आवडल्याने काकांना तस ताबडतोब सांगूनही टाकलं . ते फारच खुश झाले . आणि मग संध्याकाळचा चहा तू आमच्याकडेच घे असं निमंत्रणही दिलं .
आठल्ये काकांना चहा करायला फार आवडायचं . एखादी सुगरण तिची सिग्नेचर रेसिपी मन लावून करते त्या तन्मयतेने ते चहा करायचे . जीव ओतून चहा बनवल्याने त्यांचा चहा परफेक्त बनायचा आणि ती तन्मयता चहात उतरायची . ती फिकट तरीही किंचित गोडूस अशी चव अजूनही जिभेवर आहे .तसा चहा मी नंतर कुठेच प्यायले नाही . अगदी आठल्ये काकूंना पण तसा चहा जमायचा नाही . चहाच डिपार्टमेंट काकांकडे आहे असं त्या गंमतीने म्हणायच्या .आणि ते खरच होतं .चहा करायचा कंटाळा आलाय हे वाक्य चुकूनही त्यांच्या तोंडून ऐकलं नाही . अर्थात त्यांना स्वयंपाकघरातलं तेवढंच यायचं पण त्यातील मास्टरीवर ते स्वतः आणि इतरही खुश होते.
संध्याकाळी बाहेर कामं असल्याने अगदी रोज नाही तरी वरेचवर आठल्येआजींना सोबत जावं लागायचं .त्यांनी केलेला चहा मला आवडतो हे ठाऊक असल्याने काका माझा चहाचा कप तयार ठेवायचे . त्यांच्या या उत्साहाचं , कधीही न बिघडणाऱ्या रेसिपिच कौतुक केलं की ते फार खुश व्हायचे .
मला तुमच्यासारखा चहा बनवायला शिकवा असं मी सांगून टाकलेलं .आणि त्यांनीही ते कबूल केलेलं . मात्र ते कधीही कोणत्या न कोणत्या कारणांमुळे वर्क आउट झालंच नाही .तर ते राहूनच गेलं .
पुढे आम्ही ते घर बदललं आणि सगळंच थांबलं .तशीही चहाची सवय नसल्याने फार काही अडत नव्हतं.
मग साध्या आजाराचं निमित्त होऊन आठल्ये काका गेले आणि पाठोपाठ तो चहाही गेला . तसा चहा नंतर कुठेच मिळाला नाही .अगदी रेस्तराँमध्येही नाही .चहाची रेसिपी अशी काही अवघड नसली तरीही आठल्ये काकांची चहा करण्यातील असोशी /आवड त्यात नसल्याने ती चव जिभेवर पुढे आलीच नाही .माझी आजी म्हणायची तस स्वयंपाक चवदार होतो ते करण्याऱ्याच्या तन्मयेतेमुळे . त्याला चव असते .
मग आठल्ये काकांच्या चहाच्या रेसिपीच डॉक्यूमेन्टेशन झालं असत तरीही त्या चवीचं /त्या तन्मयतेच डॉक्युमेन्टेशन कुठून आणायचं होतं ?
खुप छान लिहीलय....
खुप छान लिहीलय....
आम्ही कोल्हापूरला असताना आमच्या घराजवळचा टपरीवाला जो चहा बनवायचा..... असा चहा मला परत कधिच मिळाला नाही
> इतकी चिकित्सा मी करत नाही.
> इतकी चिकित्सा मी करत नाही. दुसऱ्या कुणीही केलेला आयता चहा मला आवडतो. > तुम्ही अजून कोणाच्या हातचा डेन्जर-भयानक चहा पिलेला दिसत नाही
इतकी चिकित्सा मीदेखील करत नाही खाण्यापिण्याबाबतीत. आयतं && eatable/drinkable असावं अशी अपेक्षा असते.
सर्वांना धन्यवाद ..
सर्वांना धन्यवाद .. चहा हा जिव्हाळ्याचा विषय !
वर्षा , होय . मलाही ते मसाले घालून , उकळलेले चहा अजिबातच आवडत नाहीत. गोड उकळलेले मसालेदार पाणी पितोय अस फिलिंग येत मग .
उपाशी बोका , मला जसा हवा तसाच चहा हवा असेल तर मलाच करावा लागतो .तेंव्हा इतर कोणीही करून द्यावा अशी अपेक्षा देखील मी करत नाही .
मस्त लेख, जाई!
मस्त लेख, जाई!
मला मलई नसलेला, 1 चमचा पेक्षा
मला मलई नसलेला, 1 चमचा पेक्षा जास्त साखर घालून बासुंदी न बनलेला कोणताही कोणाच्याही हातचा चहा चालतो.
उऊ
*काका गेले आणि पाठोपाठ तो चहाही गेला . * -
स्वर्गात आतां शोधून काढतोच त्या काकांना ! जाम बोअर झालोय रोजचं अमृत पिऊन !!... नारायण...
Lol भाऊकाका
Lol भाऊकाका
रायगड , मी अनु धन्यवाद
फार छान लेख. चहा म्हणजे अगदी
फार छान लेख. चहा म्हणजे अगदी जीव का प्राण.
जाई., छान जमलाय लेख.. अगदी
जाई., छान जमलाय लेख.. अगदी आठल्ये काकांच्या चहासारखा. रच्याकने आठल्ये काका म्हणजे विनय आठल्ये का?
भाऊकाका लय भारी.
भाऊकाका लय भारी.
भारी व्यंगचित्र! मस्त आलय
भारी व्यंगचित्र! मस्त आलय अगदी!

भ्रमर हो ! विनय आठल्ये .
धन्यवाद लोकहो
भ्रमर हो ! विनय आठल्ये .
मस्त लेख.
मस्त लेख.
भाऊकाका, व्यंगचित्र मस्तच.
भाऊ, चित्र मस्त !
भाऊ, चित्र मस्त !
मस्त लिहीलंयस जाई.
मस्त लिहीलंयस जाई.
छान लिहिले आहे जाई!
छान लिहिले आहे जाई!
मला पण माझ्याच हातचा चहा आवडतो कमी साखरेचा...इकडं माझी एक मैत्रीण शेजारीण एक कपाला तीन चमचे साखर घालते आणि आग्रह करून करून प्यारला लावते एकदा कसाबसा घेतला तो चहा... त्यानंतर कधीही चहा दिला कि,काहीतरी कारण सांगून मी घरी जाऊन पिते म्हणून मी कपच घरी घेऊन जायचे
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
छान..
छान..
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
चहाची तल्लफ आली तर अर्धाच कप.पण perfect हवा. उगीच कायतरी जुगाड नकोच वाटतो.
कधी बाहेर गेलो की टपरिवाल्याला स्पेशल चहा आणि त्यात साखर थोडी कमी, आद्रक, वेलची आणि कडक करायला सांगतो. त्याला कळेपर्यंत 2 वेळा तरी सांगतोच.
छान.
छान.
love is the secret ingredient of any perfect recipe हेच खरे
छान झालंय डॉक्युमेंटेशन.
छान झालंय डॉक्युमेंटेशन.
माझ्या ओळखीपाळखीत आणि
माझ्या ओळखीपाळखीत आणि नात्यातही असे बरेच पुरूष आहेत ज्यांच्या हातचा चहा चांगला होतो.... गेस्ट वगैरे आले की हे लोक अगदी हौसेने चहा बनवतात आणि पिणाऱ्याने पसंतीची पावती दिली की त्यांना अगदी कृतकृत्य वाटते
बाय द वे; मला आले/गवती चहा/मसाला चहा फार आवडतो..... पुण्यातला टिपीकल अमृततुल्य चहा फार आवडीचा
लेख आवडला, जाई. मलाही रस, रूप
लेख आवडला, जाई. मलाही रस, रूप, गंधाच्या विशिष्ट मानांकनात बसणाराच चहा आवडतो. तसा नसेल तर चहा न पिताही चालतं.
छान आठवण. रिसिपी+वेळ
छान आठवण. रिसिपी+वेळ+ingredients+प्रमाण+etcetc हे सगळे मिळून एकंदर जे काही क्लिष्ट समीकरण बनते त्याला "हातची चव" म्हणतात
माबो वरच एक धागा वाचला होता त्यात चहा करताना आधी पूड की आधी दूध की आधी साखर यावर चर्चा होती. पण हे मात्र खरे आहे प्रत्येक चहा करणाऱ्याची एक सिग्नेचर असते 
थॅन्क्स लोकहो
थॅन्क्स लोकहो
स्वरूप,हो .काहींचा चहा फारच सुरेख होतो.
अतुल, खरे आहे. प्रत्येकाची सिग्नेचर डिश वेगळी.
चंद्रा, हो. चहाच्या बाबतीत चव नसली तर प्यावसा वाटत नाही.
अनिंद्य , येस love is secret ingredient for recipe
अरे छानेय हे... कसे मिसले
अरे छानेय हे... कसे मिसले होते..
चहाचे नाव शीर्षकात हवे होते
चहाप्रेमी असल्याने चहाचे रिलेट झाले.. पण अश्या डॉक्युमेंटेशन न झालेल्या चवीत माझ्या आज्जीचा हातचा मटणाचा काढा नेहमी आठवतो. ती चव पुन्हा आयुष्यात कुठे नाही आढळली.. किंबहुना आढळणे शक्यच नाही असे वाटते.. पण तरीही जीभेवर आजही रेंगाळते.
खरे आहे ऋन्मेश. माझी आजी
खरे आहे ऋन्मेश. माझी आजी जी साबुदाण्याची खिचडी बनवायची ती रेसिपी नोंदवून ठेवायला हवी होती असे वाटते
तशी खिचडी कोणालाच बनवता येत नाही.
Pages