बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Safe zone वेळी मेघा ह्यांच्यासाठी स्वत: बाहेर गेली होती.मेघा टास्क मस्त खेळत होती.रेशमचा मस्त कावळा केला होता तिने व शराने.टास्कमध्ये नेहमीसारख्या ताकदीने नसली तरी fair वाटली.ep मध्येतरी सई म्हणते तसं ती काही म्हणाली नाही.काल पुष्कर 'हुकुमशहा टास्कवेळी आस्ताद captain नको असं मेघा म्हणत होती' हे ममांना सांगत होता पण मेघाच्या explanation नंतर तो तोंडावर पडला म्हणुन चिडुन त्याने fair चे नाणे वाजवले.

वेळ आली तर तो सई ला पण तोंडावर पाडेल.... कारण तो फक्त आणि फक्त स्वताचा विचार करतो.
सेफ खेळतो नेहमी...
आऊ ऐवजी आज शरा गेली तर आऊ सई कडे जाणार की मेघाकडे हे पहायला नक्कीच मजा येईल.
मेघा ने माफी मागुन सई कडे न जाता स्वता चा गेम खेळावा....
पुष्की आणि बाळ सई कस खेळतात ते लवकर च कळेल.

मेघामुळे सई पुष्करला जी मतं मिळत होती, ती मात्र आटणार. सई लकी आहे आधी झालं असतं हे तर आजच गेली असती, आता पुष्कर वाचवेल नेक्स्ट विक तिला.

कालचे scripted असावं असं बरेच जण म्हणतायेत.

सई-मेघा ला पीठ- अन्ड फेकण्यावरुन ममा त्यान्ना ओरडले ते १००% बरोबरच होत. मलाही नव्हत पटल त्यान्च वागण. अरे, तो किशोर वेगळयाच ब्रेकिन्ग न्यूजबद्दल बोलत होता, आणि हया दोघीन्च वेगळच काहीतरी चालू होत.

मेघाने चुक केली पण त्यानिमित्ताने तरी तिला हे कळल की सई आणि पुष्कर कसे backstabber आहेत ते. सई आणि पुष्कर मेघाला 'तुझी १२ आठवडयाची मैत्री खोटी आहे' असे म्हणतात. हयान्नी मेघाशी खरी दोस्ती किती निभावलीये हे तर अख्ख्या जगाने बघितलेय.

आऊ एलिमिनेट झाली अस काल एका विडियोवर बघितल.

म मां नी आ ला पण बोलायला हवं होतं किती बोलत होता स्मिताला ते. >>>> मेबी आज बोलेल ममा.

आज हे दोन मुद्देसुद्दा असायला हवेत ममाकडे:

१. स्मिताची 'सोळा सोमवार' कमेन्ट

२. वाळूच्या टास्कमध्ये स्मिता-सई चुकीमुळे कन्टेनर पडला. स्पेशली सईला झापायला हव त्याबद्दल.

मांजरेकर इंटरव्यू घेत होते मेघाचा असं वाटलं. तिच्या एका निर्णयावर इतका खल? तिने तो डिस्कस न करता घेतला म्हणून ती सॉरी पण म्हणाली . पण सतत तेच तेच. पुष्करला वाटतंय आपण हिरो झालो असं बोलून, पण मेघा राहिली बाजूला, त्यालाच जास्त नेगेटिव्ह कंमेंट्स मिळत आहेत.
हि मेघाची calculative move नसावी कदाचित. कारण एवढी चालबाज बाई सगळे एक्दम विरोधात जातील असं खेळेल असं वाटत नाही. सगळे मेघाला कॅप्टन्सी ची हाव आहे असं म्हणतात, पण सई / पुष्कर पण तेच तर करत आहेत. ती फक्त बोलून दाखवते आणि हे न बोलता करतात एवढंच. आणि पुष्करला दोन्ही वेळेस कॅप्टन्सी मेघ इंडिरेक्टली त्याच्या बाजूने खेळत होती म्हणूनच मिळाली. तसाही तो कधीच आवडला नाही. आधी neutral होते, आता आवडत नाही.
बाकी रेशम , आस्ताद काल खुश. आस्ताद संधी मिळाली कि मेघांविरुद्ध बोलायला तयार. रेशम वेगळ्याच झोन मध्ये गेलीये. Smita is too good to be in big boss. चौगुले पार गार पडलेत. आऊ आज बाहेर. शर्मिष्ठा पण बरी वाटते.

बाकी रेशम , आस्ताद काल खुश. आस्ताद संधी मिळाली कि मेघांविरुद्ध बोलायला तयार. >>>> अगदी अगदी. रेशम कालपरवापर्यन्त मेघाशी बोलत होती. ती रडत होती तेव्हा रेशमच तिच सान्तवन करत होती. पण ममाने त्यान्च्यातसुद्दा आग लावली. मेघा ब्रेकिन्ग न्यूज टास्कमध्ये राजेशची बायको बनून तिला शिव्या देणार होती हे तिला इनडायरेक्टली बोलून रे ला सावध केल. आता रे सुद्दा तिच्या विरोधात.

ममा माबो वाचतात हयाची आज पक्की खात्री पटली. सई-पुष्कर व्हर्सेस मेघा साठी त्यान्ना नेमक 'दोस्त दोस्त ना रहा' हेच गाण म्हणावस वाटल! Lol

या २ दिवसात मजाच मजा की. ब्रेकिंग न्यूज टास्क कन्टिन्यू व्हावा तसे वाटते आहे Happy
मलाही मेघाचा निर्णय झेपला नाही काही. काय विचार करून तिने सई ऐवजी आस्तद ला निवडले ते समजले नाही. पण ऐन वेळी सहज सुचले, गिल्ट वाटत असल्याने प्राय:श्चित्त म्हणून त्याचे नाव घेतले हे तिचे अर्ग्युमेन्टस् साफ खोटे वाटले. ती हुषार आहे, गेम समजतो, सई-पुष्कीला पण ती ओळखते त्यांची रिअ‍ॅक्शन काय येऊ शकते हे तिला नक्कीच कळत असेल. तरी तिने हे केले ही मिस्टरी आहे. पण एक खरे की जे काही तिने ठरवले होते त्याचे फासे चुकीचे पडले असावे असे वाटते. आस्ताद ला सपोर्ट करूनही तो धरून आख्खे घर तिच्या विरोधात गेलेय. हे सर्वच या तिघांनी संगनमताने केले असेल तर या लोकांना _/\_ !! पण तसे वाटत तरी नाही.
आऊ एलिमिनेट झाल्याचा व्हिडिओ दिसला नेट वर. तेच योग्य होईल आता. बाकी स्मिताचे असेच क्लूलेस वागणे चालू राहिले तर तिला पण आली रे आली आता तुझी बारी आली असे म्हणावे लागेल लवकरच. ती अजिबात दिसतच नाहीये स्क्रीन वर या आठवड्यात. नंकि - शर्मिष्ठाला पण तिच्याहून जास्त स्क्रीन टाइम मिळत आहे.
रेशम चा एकूणच कंटाळा, लॅक ऑफ इन्टरेस्ट जाणवतोय सारखा. फायनल ला जाण्यची काही जिद्द, एक्साइटमेन्ट काहीच दिसत नाहीये! असेच चालू राहिले तर तीही बॅग पॅक करेल. आस्त्याद चा पार खुळखुळा झालेला आहे. मेघा सई पुष्कीशी आलटून पालटून बोलणे, मिठ्या मारून सांत्वन करणे, त्यंच्या पॉलिटिक्स मधे वापरले जाणे आणि कधी ना कधी त्यांनी त्याचाच काटा काढला की रेशमताई कडे जाऊन तक्रारी करत बेड वर पसरणे हा त्याचा एकमेव कार्यक्रम दिसत आहे. स्वतः जिंकण्याची जिगर कमी दिसतेय किंवा असली तरी प्रेक्षकांपर्यन्त येत नाहीये.
थोडक्यात, काहीही असो, मेघा, सई, पुष्की या तिघांच्या काही ना काही युनिक ट्रेट्स, फायटिंग स्पिरिट, सध्याच्या बदलत्या इक्वेशन्स मुळे सनसनाटी माजवण्याची क्षमता पाहता हे तिघे फायनल साठी हॉट फेवरीट दिसतायत. सध्या जास्तीत जास्त वेळ हेच तिघे स्क्रीन वर दिसत आहेत, बाकी कोणी त्या घरात आहेत की नाहीत असे वाटावे असे चालू आहे!!

>>मला मेघाचा निर्णय अजिबातच आवडला नाही आणि तिनं जे कारण दिलं ते ही पटलं नाही. <<

थँक गॉड! एब लिंकनचं कोट खरं ठरतंय - यु कॅन फूल ऑल दि पिपल सम ऑफ दि टाइम अँड सम ऑफ दि पिपल ऑल दि टाइम, बट यु कॅनाट फूल ऑल दि पिपल ऑल दि टाइम... Lol

मेघाने ह्याच्या त्याच्यासाठी उमेदवारीचा त्याग करणं ह्या moment ला चुकीचं होतं, स्वतः उभं रहायचं. दहा वेळा माफी मागितली होती की नाही आस्तादची, एवढं होतं तर आस्तादची टेंगुळ news भारी म्हणायची होती, आपोआप आस्तादला पण 4 points मिळाले असते. सगळंच उलटलं.

आज केबल बंद. बघायला मिळणार नाही बहुतेक.

मेघाला सईला कॅप्टन होऊ द्यायचं नव्हतं, कदाचित . पण त्या साठी आस्तादला बॅकींग द्यायची गरज नव्हती. ती स्वतः कँडीडेट झाली असती तर तिला तिचं धरुन ३ मतं होती. सईला तिचं आणि पुष्करचं अशी २. आस्तादला त्याच्या कंपूची ४ मिळून तो झालाच असता ना नॉमिनेट कॅप्टनसी साठी.

इतकं साधं गणित मेघाला जमलं नाही हे पटत नाही. तसंच ऐनवेळेला सुचलं आस्तादला फेवर करायचं हे ही पटत नाही.

त्यामुळेच हे स्क्रीप्टेड असावं अशी शंका यायला खूप वाव आहे. पुष्करची घोडदौड जरा जास्तच जोरात होते आहे हे पाहिल्यावर रेशमचं फायनलमधलं स्थान धोक्यात येऊ शकत होतं. म्हणून त्याला आगलाव्याची भूमिका देऊन त्याची लोकप्रियता कमी करण्याचा खेळ तर चॅनेलनी नाही ना केला ही आपली माझी एक शंका.

बाकी सध्या शो बघताना त्यांच्या स्ट्रॅटेजी काय असतील यावर स्वतःचं डोकं चालवायला मजा येतेय.

मेघाचा निर्णय calculated strategy वा फसलेलं गणित काहीही असले तरी ती ह्या स्पर्धेतील एक स्ट्रॉंग स्पर्धक आहे हे निश्चित. घरातील जे लोक म्हणताहेत की तिने backstabbing केले वा टास्क unfair खेळली तर घरातील कोणीच ह्या गोष्टी कधीच केल्या नाहीत का ? सर्व गेम्स flawless खेळलेले आहेत ? शिवाय मेघा किती energetic आहे, जे सकाळचा डान्स असो, घरातील कामे असो वा टास्क असो तो उत्साह दिसतो. प्लस ती आपले मुद्दे अगदी वीकेण्डलाही मस्त मांडते. स्पर्धा अशा contestant नी जिंकली तर स्पर्धेचे एक standard टिकते हे माझे वैयक्तिक मत आहे. उलट, जर ही स्पर्धा कायम बेडवर पडून राहणारे , फुंकणारे, वीकेण्डलाही आक्रस्ताळेपणा करणारे (रेशम, आस्ताद ), ऍरोगंट, कायम रडणारे (सई, पुष्कर ) जिंकले तर खरेच ह्या स्पर्धेविषयी शंका निर्माण होतील. श राही छान खेळते, कामं करते पण ती आपले मत स्पष्ट मांडू शकत नाही. त्यामुळे तिचा प्रभाव पडत नाही. स्मिता मला आवडायची पण आऊ - नं कि वादातील तिचा स्टॅन्ड / श रा १६ सोमवार प्रकरण यांमुळे मनातून उतरलीच.
आम्हां भारताबाहेर असणाऱ्यांना मत देता येते का ? मेघाला तशीही गरज वाटत नाही (सो फार आमच्या engg/ cousins/ मित्रमंडळ / म मं सगळ्या ग्रुपमध्ये मेघाचे सपोर्टर्स ठासून भरलेत. Happy ) पण ह्यावेळी तिला सपोर्ट आहें, हे चॅनेलला दाखवावेसे वाटतंय.
मला फक्त हे सई आणि पुष्कर bottom two झाल्यावर backstabbing करणार का दुसऱ्याला वाचवणार ते बघायचे आहे. Wink
सो सध्या फक्त मेघाला मनापासून शुभेच्छा !

आऊ गेल्या. स्मिताताई जेमतेम वाचल्या.

सईबाईंना आणि आस्ताददादांना सर्वांत जास्त मतं होती. त्यामुळे आता दोघांना आपण करेक्ट आहोत हा साक्षातकार झाला असणार.

एनिवे स्मिताचं कॅप्टन्सी टास्क व्यतिरिक्त काही योगदान पण नव्हते. पण खंजीरच्या बाबतीत पुष्करचं नाव घेतलं तिने, हे मस्त केलं. आता पुष्कर अजून खुन्नस देणार स्मिताला Lol

Agadi, Meghalach support karnar amhi pan out of India tun. Please mahesh Majrekarani pushkar ani Sai ch Meghala back stab karate he sangitale pahije. Mage Astad ne hi he kalale ahe. Pushkar pahilyapasunach cunning ahe he mahitach ahe, ani Sai arrogant.

ममा सगळ सगळ सान्गुन टाकणार असतिल तर काय अर्थ उरेल गेमचा? नुसत पर्सनली जावु नका येवढ सान्गण पुरत, नुसता विचार केला होता, गेल्या का त्या राजेशची बायको बनुन? ममा म्हणजे सगळ्याचे सगळे पत्ते ओपन करुन भाण्डण लावतात.

हा आठवडा अज्जिब्बात बघीतलं नाही बिबॉ..
कालचा भाग पाहिला आत्ता..
पुष्करने ममा समोर मेघा अनफेअर खेळली हे बोलणे म्हणजे वर्गातल्या हुशार पोराने मी नाही रे काही साम्गणार असं म्हणत शेवटच्या क्षणी मास्तरांना नावासकट कोणी काय काय कामं केले ते सांगणे असं वाटल.. अतिशय बेकार आणि डिसगस्टींग मुव्ह होती ती माझ्यामते..
वर एक मत दिलं म्हणुन १२ आठवड्याची मैत्री हि खोटी होती याला सईने हो माझ्यासाठी ती होती असे म्हणने सुद्धा घाण...

टिना खरंच disgusting होतं ते पुष्करचं. स्मिताने पुष्कर मेघा करत firmly शेवटी पाठीत खंजीर खुपसणे साठी पुष्करचं नाव घेतलं हे बघून मला फार बरं वाटलं.

पोरगी चुकत असली तरी मधेच आस्तादला smoking साठी tont मारून घेतला, मी लईच खुश झाले बघ Wink .

शर्मिष्ठाला स्मितापेक्षा जास्त वोट्स होती का?
तिने १६ सोमवार व्रत ( त्याने नवरा चांगला मिळतो म्हणे )केले होते असे काहीतरी ती म्हणत असताना स्मिता तिला म्हणाली काय फायदा झाला मग व्रत करून!

रच्याकने अगोदर रे ग्रुप ज्यावेळी म्हणत होता की सई arrogant आहे तर सगळे मे सपोर्टर रे ग्रुपला नावे ठेवत होतीत..आता काय झालं..
म्हणून मागे म्हणल्या प्रमाणे मे सपोर्टर म्हणजे गिरे तो भी टांग उपर..

काय बोलली ती? >>> घरात ठीणगी टाकणारा कोण, असं काडेपेटी दाखवून विचारलं. आमच्या स्मिताताई नेहेमीप्रमाणे confused, आधी त्यांनी बरोबर उत्तर दिलं होतं मग त्यांना आपल्या मनातली दुसरी बाजूही सांगावी असं वाटलं, त्यांनी आस्तादच्या स्मोकिंग चा संदर्भ देऊन हाही मला वाटतो, जास्त पीसीओ मध्ये असतो म्हणून त्या अर्थाने मीन्स जास्त smoking करतो तो त्यामुळे ठिणगी, काडेपेटी तिथेही लागू होतं. फार वैचारिक आमच्या स्मिताताई Wink . पण मजा आणते ती.

टिना खरंच disgusting होतं ते पुष्करचं. स्मिताने पुष्कर मेघा करत firmly शेवटी पाठीत खंजीर खुपसणे साठी पुष्करचं नाव घेतलं हे बघून मला फार बरं वाटलं.>> मला पण...
राधिका turbo vpn app किँवा अजुन कुठले vpn app डाउनलोड करुन कंट्री इंडिया सिलेक्ट करून , browser मधे voot. Com open करू शकता.

टीना म्हणते तशी, पुष्करची मूव्ह अगदी बेकार आणि डिसगस्टींग होती. मेघाच्या निर्णयामागे स्वतःची उमेदवारी त्याग करण्याचं तरी श्रेय आहे.

मेघाच्या खेळामुळे पुष्करचं काहीच नुकसान झाले नाही. उलट त्याचा फायदाच झाला आहे. अशावेळी त्यानी जो आगलावेपणा केला, जिनी त्याला वेळोवेळी मदतच केली आहे तिच्या विरुद्ध , या त्याच्या वागण्याला खरंच क्षमा नाही.

देवा! यातलं काय काय स्क्रीप्टेड होतं तुलाच माहित!

स्पेशली सईला झापायला हव त्याबद्दल >>> फोन आला होता एकीचा त्याबद्दल, तिने सईवर नेहेमीच तू task मध्ये फिजिकल होतेस, असंही म्हटलं. रे आ ला बोलतेस पण तूपण तेच करतेस म्हणाली. तरी म मां काही बोलले नाहीत. स्मिता खरंच issue नाही करत बिचारी. तिच्या जागी सई असती तर दातओठ खाऊन खुनशी नजरेने धावली असती स्मितावर. पुष्करला स्मिताचा ठोसा लागलेला नाकावर, त्यानेही नाही केला issue.

Pages