बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आस्तादचं नाव अचानक घेतलं त्याचा राग येणे स्वभाविक पण पुष्करने ती loyal नव्हती task मध्ये हे मेघाला आधी सांगायला हवं होतं, डायरेक्ट bomb फोडला, सई ने भडकवले हे सांगून. तसं खरंच असेल तर मेघा दोन बाबतीत चुकली एक आस्तादचं नाव घ्यायच्या आधी यांना विश्वासात नाही घेतलं आणि मग आस्तादशी फेअर नाही राहिली. मला काल ती अनफेअर नाही वाटली, पण खरंचं असेल तर ते योग्य नाही केलं तिने. पण पुष्कर सईने तिला पार व्हिलन ठरवले आणि समोरचा grp पण नाराज, फार डाव उलटला तिच्यावर.

सई फार विषारी वाटली मला आज, जरी मेघा चुकली असेल तरी, फार मोठी शिक्षा तिला. सगळे विरुद्ध गेले.

फक्त मला कोणीतरी सांगा ती अनफेअर होती का task मध्ये. तर तिने मोठा मूर्खपणा केला, आस्ताद जिंकला असता ना.

डीजे म्हणाली मागे तसे voting केलं तर मेघासाठी वाईट. हितेन तेजवानी ला काढलं तसे तिला काढू शकतात. पण मग trp उतरेल साफ. मेघाचे खूप सपोर्टर्स आहेत.

मांजरेकरांना आज सोईस्कर किशोरचा पुळका आला. ज्या मेघाने पुष्करसाठी किशोरपुढे नाक घासले, तिचाच आज पुष्करने विश्वासघात केला. हुकुमशहा टास्कचे सीन्स वुटवरुन काढण्यात आले पण प्रोमोत स्पष्ट दिसलंय की मेघाने किती अन्याय सहन केलाय हुकुमशहा टास्कमध्ये. थोडा राग काढला किशोरवर तर काय बिघडले?
सई आणि पुष्करने मेघाला इतके दिवस वापरुन घेतले आता त्यांना ती जाईल तर बरे असे वाटतेय कारण तीच यांची मोठी कॉम्पिटिशन आहे. खंजीर पुष्करने खुपसलाय मेघाच्या पाठीत. मोठा स्त्रीदाक्षिण्याचा आव आणतो पण स्वतःच्या मैत्रिणीवर अन्याय करतोय.
आउ छान बोलल्या पुष्करला की मेघाचे चुकले असेल पण तीने तुझ्या प्रेमापोटीच केलंय. आस्ताद कितीतरी वेळा गद्दार म्हणुन खेळलाय. एक वेळ मेघाने ही स्ट्रॅटेजी केली तर जगावेगळे काय आहे? सईला नंतर हे उमगेल आणि वाईट वाटेल पण तोपर्यंत पुष्करने तिलाही लाथ मारलेली असेल.

अग राया bb ने सांगितलं असेल की चौगुलेला आम्ही task दिला होता आणि त्याने तो बरोबर केला म्हणून म मां ना कौतुक करायला लागलं असणार.

सईने खराब पीठ टाकणे चूक होतंच पण मेघाने तिचे बघून चौगुलेच्या डोक्यावर अंडे फोडणे चूक होतं. सो मि वर फार टीका झाली होती दोघींवर त्यामुळे म मां ना बोलायला लागले.

सई मेघाविरुद्ध जाणार आज किंवा उद्या दगा देणार असं वाटलंचं होतं. पुष्कर सरळ सरळ बोलायचा मेघाविरुद्ध, पण मेघा त्यांच्या हातात स्वत: चूक करून कोलीत देईल असं नव्हतं वाटलं. सई कितीदा तरी चुकली पण मेघाने सावरले तिला. सई तेव्हापासून बिथरली जेव्हा सर्वांनी मेघा रेशम तिघांत नक्की असतील पण सई किंवा पुष्कर असतील असं सांगितलं तेव्हापासून, ती आणि पुष्कर insecured झाले. मग ते फोन सई आवडते करणारे, मेघाला नावे ठेवणारे त्यामुळे तीचा असा समज झाला कि आपण आवडतो, मेघा नाही. त्यात मेघा चांगले सांगायला गेली कामे कर तिथे ठिणगी पडली पण मेघाची पहिली चूक त्याबद्दल बोलले ते काही नाही पण आस्तादशी ती अनफेअर खेळली हे पुष्करला काढायची गरज नव्हती असं वाटतं. फार बदला घेतला मेघाचा दोघांनी. दुसरा grp पण विरुद्ध गेला.

स्मिताचा बाप वगैरे काढलेला सईने मागे, बरेचदा पु आणि स नावे ठेवायचे स्मिताला पण मेघा नव्हती ठेवत. आस्तादचं नाव सजेस्ट केलं त्याबद्दल बोलले हे दोघे त्याबद्दल मला त्यांचं काही चुकलं असं वाटत नाही पण अनफेअर खेळण्याबद्दल असं समोर सांगायला नको होतं वीकेंड एपिसोडमध्ये. मेघा किंवा समोरच्या grp ला नंतर किंवा आधी सांगायला हवं होतं. अति केलं दोघांनी असं वाटतंय.

फक्त मला कोणीतरी सांगा ती अनफेअर होती का task मध्ये. तर तिने मोठा मूर्खपणा केला, आस्ताद जिंकला असता ना.>>>> अंजुताई, मेघाची एकंदरीत टास्क करायची हिरीरी पाहता, हो असे वाटतं होते की ती नेहमीप्रमाणे नाही खेळत आहे, अन तिला सईशी काहीतरी कुजबुज करताना दाखविले होते.

मेघा जे वागली, तो तिचा जर एखादा गेम प्लान होता, तर तो तिच्यावर उलटला हे नक्क्की. सई तिच्या ह्या कृतीने दुखावणार अन असा आकांडतांडव करणार हे तिच्या आधी लक्षात आले नसेल तर नवलच, तसेही तिचे दुखावणे योग्य ही आहे. एक मैत्रीण म्हणून तिने मेघाला गृहीत धरणे साहजिकच होते. अन राहिली गोष्ट पुष्कर ची, तर वेळ आल्यावर तो त्या दोघीमध्ये सईला निवडणार हेसुद्धा बऱ्यापैकी क्लिअर होते.

दोघे तसेही मेघामुळे insecure वाटत होते मग अश्यावेळी पुष्कर ने मेघाच्या गेमचा जो पर्दाफाश डायरेक्ट शनिवारी केला, तेही अगदीच साहजिक होते, तसेही त्यांना काहीतरी सनसनाटी लागतेच शनिवारी अचानक बोलायला, आठवा रेशम चा किस्सा.

खरेतर मेघासोबत जे होतेय ते ठीकच आहे असे मला वाटते, खूप ओव्हरकॉन्फिडेंट वाटते ती, खूप अति करते, मला सगळे समजते, कळते, मला सगळे आधी पासून माहीत असते, हेच सर्व तिच्या विरुद्ध गेले. तसेही जरी खरे असेल तरी गेमच्या ह्या स्टेजला ती भावुक होऊन खेळली हे अगदीच अविश्वासहर्निय आहे.

गेल्या आठवड्यात नकी, आस्ताद, शर्मिष्ठा रेशम छान खेळले

नकी बद्दल ममा कधी नव्हे ते बरोबर बोलले,
मेघा अन सईने जे केले त्यावर नकीची रिअकॅशन, हॅट्स ऑफ मॅन, किती शांत होता तो.
सही एकदम
फक्त एकच, या सगळ्यात स्मिता दिसत नाहीये, गेला आठवडा एक आस्ताद वाला गेम सोडला तर फारशी दिसली नाही ती

फक्त एकच, या सगळ्यात स्मिता दिसत नाहीये, गेला आठवडा एक आस्ताद वाला गेम सोडला तर फारशी दिसली नाही ती >>> ते आस्तादमुळेच. मेघाने रेशमला निवडले, स्मिताला गेम कळला नाही ती कन्विन्स झाली की ती टेंगुळ news खास नव्हती. आस्ताद किती येता जाता बडबडला तिला, बिचारीने tasks पण नाही केले जी स्कीटस तिने ठरवली होती ती, स्वतः ला अपराधी समजत राहिली. म मां नी आ ला पण बोलायला हवं होतं किती बोलत होता स्मिताला ते.

शरा घराबाहेर नको जायला, कारण ती गेली तर मेघा खुप एकटी पडेल. प्रत्येकवेळी शरा मेघालाच साथ देते.
पुष्कर आणी सई तर तिच्या विरुद्ध झालेत. वरुन शरापण घराबाहेर गेली तर खुपच एकटी पडेल बिचारी.

पुष्कीने खरच मेघाचा गेम उघड पाडायला नको होता. त्यामुळे ज्याला वोट दिलं त्या अस्तादच्या नजरेतूनही ती उतरली आणि त्याने शेवटी त्याच्याच टीमचे कौतुक केले की त्यामानाने रेशम लॉयल राहिलीय टीमशी.
एकटी शराच आता मेघाकडून आहे, वाईट वाटतंय मेघासाठी.
पण एकअर्थी वाटतंय की मेघाला हे कधीतरी कळायलाच हवं होतं की हे दोघे तिला धोका देणारच.... फार डोळे झाकून विश्वास करत होती त्यांच्यावर.
आता त्या दोघांनाही कळेल की मेघामुळे त्यांना वोटस होते!
आणि एकट्या मेघाचा खेळ आता दिमाखदार होईल... होप सो!

सई-मेघा-पुष्कर च्या गदारोळात रेशम सुमडीत ममां सकट पब्लिकच्या गुडबुक्स मधे दाखल होऊ लागली आहे (ते ही आस्ताद, स्मिता सारखे चांगले खेळाडू डावलून!) हे लक्षात येतंय का !!
म्हणजे चॅनलला रेशमला फायनलला पोचवण्याचा उद्देश जो पहिल्यापासून वाटतच होता , तो अधोरेखित होत आहे ! Wink

म्हणजे चॅनलला रेशमला फायनलला पोचवण्याचा उद्देश जो पहिल्यापासून वाटतच होता , >> +१०० हे तिच्या सुरवातीलाच ठरले असेल बहुतेक नाहीतर राजेशनंतर खरेतर हिलाच हाकलून लावले असते प्रेक्षकांनी

मलातरी मेघा नीट खेळली असे वाटत. ती नेहमी तसेच खेळते.

सःईच वागणं खूप घाणेरडं होतं. तिला आणि पुष्करला मेघाने त्यांना विश्वासात न घेण्याचा बोचणीपेक्षा मेघा रे आ च्या गुडबुकात जाण्याचे जास्त दुःख होतं.

जर मेघाने कँप्टनशिपच्या टास्कमध्ये दुहेरी भूमिका घेतली असतील तर ममांनेच तीला ओरडा दिला असता, पण ममांने तीचे स्पष्टीकरण मान्य केले आणि तीला संशयित वाटेल असे न वागण्याचा सल्ला दिला.

सई आणि पुष्करने त्या गोष्टीचा खूप बाऊ केला, ते मेघा दगाबाज आहे हे बाकी मेंबरच्या गळी उतरण्यात यशस्वी झाले; त्यावर तिखटमीठ म्हणून त्यांची आतापर्यतीचे डावपेच आणि मेघाचा पुढाकार रे आ ला सांगितला. हेपण एकप्रकारे ग्रुपचे सिक्रेट उघडल्यासारखे झाले, जे पूर्णपणे चुकीचे आहे.

मेघाचा हा रे आ च्या गुडबुकात जाण्याचा बहुतेक पहिला प्रयत्न होता नाहीतर नेहमी तीच रे आ शी भांडण्यात पुढे असते. सई आणि पुष्कर नेहमी रे आ च्या गुडबुकात जायचं बघतात. रे ने सईचा बूट काढला तेव्हा पुष्कर आणि सई रे ला काहीच बोलले नाही. आता रँकिंगच्या टास्कमध्ये पुष्करने स्वतः च्या रँकीगचे स्पष्टीकरण दिले आणि बाकीच्या रँकीगचे बोलण्यास नकार दिला.

आता स्पर्धा कठीण होत चालली आहे, त्यामुळे एका ची चूक झाली तर बाकीचे सगळे त्याचा बकरा करतात.

मला मेघाचा निर्णय अजिबातच आवडला नाही आणि तिनं जे कारण दिलं ते ही पटलं नाही. मेघानं काहीही विचार न करता हे केलं असेल हेच मुळात झेपलं नाहीये. आतापर्यंत तिनं जो गृप धडपड करून टिकवला, तो तिनं पटकन उधळून लावला. तिला माहित होतं रिअ‍ॅक्शन काय येणार.

अस्तादला आपल्या बाजूला करून घेण्यासाठी हे तिच्या अगदी आयत्यावेळी डोक्यात आलं असेल पण ते अत्यंत आततायी कृत्य होतं. यामुळे आता सई, पुष्कर, अस्ताद तिघं आणि उर्वरित व्हिलन गँग तिच्याविरोधी गेलीये.

आज जर आउ किंवा शरा पैकी कोणी बाहेर गेलं तर मेघा अगदी एकटी पडेल. शरा घरात टिकली तर मेघाला जरातरी कोणी सपोर्टर असेल. आउचा काही फायदा नाही टिकली तरी. तिचा काही भरवसा नसतो. तिचं चॅनेल वेगळंच लागलेलं असतं दरवेळी.

अर्थात तरीही माझा सपोर्ट मेघालाच!

सई आणि पुष्करने त्या गोष्टीचा खूप बाऊ केला, ते मेघा दगाबाज आहे हे बाकी मेंबरच्या गळी उतरण्यात यशस्वी झाले; त्यावर तिखटमीठ म्हणून त्यांची आतापर्यतीचे डावपेच आणि मेघाचा पुढाकार रे आ ला सांगितला. हेपण एकप्रकारे ग्रुपचे सिक्रेट उघडल्यासारखे झाले, जे पूर्णपणे चुकीचे आहे.

मेघाचा हा रे आ च्या गुडबुकात जाण्याचा बहुतेक पहिला प्रयत्न होता नाहीतर नेहमी तीच रे आ शी भांडण्यात पुढे असते. सई आणि पुष्कर नेहमी रे आ च्या गुडबुकात जायचं बघतात. रे ने सईचा बूट काढला तेव्हा पुष्कर आणि सई रे ला काहीच बोलले नाही. आता रँकिंगच्या टास्कमध्ये पुष्करने स्वतः च्या रँकीगचे स्पष्टीकरण दिले आणि बाकीच्या रँकीगचे बोलण्यास नकार दिला.

>> +१

मेघा जेव्हा बोलली कि माझ्या मनात अपराधी भावना होती म्हणून मी आस्तादला उमेदवारी दिली. त्यावरुन आधिच पुसै चिडले होते त्यामुळे उमेदवारी देऊनही ती त्याच्या गटाकडून नाही खेळली म्हणून ती अपराधी भावना खोटीच होती हे सिद्ध करायला पुसैने ते सगळ्यांना सांगितले.

तिने सांगायला हवे होते. पण मला वाटते बिबॉसनेच तिला तसे न करायला सांगितले असेल(स्क्रिप्टेड), नाहीतर टिआरपी कसा मिळणार Happy एरवी कॅमेरात सगळं दिसते आणि ममाही लगेच शाळा घेतात पण आज पुष्कर आणि सईने सांगेपर्यंत का गप्प बसले? तसेही आता एकट्याने खेळायची वेळ आली आहे तर फूट पडणे सोईचे झाले.

रेशम छान दिसत होती. आता ती छान खेळतेही. फायनल मधे असेलच.

आता सई, पुष्कर, अस्ताद तिघं आणि उर्वरित व्हिलन गँग तिच्याविरोधी गेलीये.>>>>> कदाचित हेच पाहिजे असेल तिला. आता मराठी बिबॉ हिंदी ११ च्या वळणावर चाललाय असे दिसतयं. त्यात शिल्पा शिंदे आणि तिची ती नाईटीवाली (नाव आठवत नाहीये) सुरवातीपासून खास, शिल्पामुळे तीपण सेफ नेहमीच. नंतर भांडणं होऊन ना वाली वेगळ्या ग्रृपमध्ये गेली त्यामुळे शिल्पा विरूध्द इतर. जो कॉर्नर होता त्याला पब्लिक सिंपथी आणि वोट्स त्यामुळे जिंकायचे चान्सेस वाढतात.
मेघाला माहित आहे आता जर ग्रृपमधे खेळलो तर वोट्स विभागले जातील त्यामुळे तिने हा डाव खेळला असेल आणि जर तिच्या विरोधात पब्लिक गेलेच तर ती रिजाॕईन होईल ग्रृपला.

आजच्या एपिसोडचा आवडलेला भाग, नंकि ला अ‍ॅप्रिशिएट केलं म.मां नी , त्याच्यावर पर्सनल खुन्नस काढल्याबद्दल सई मेघाला रागावले ते पटलच.
बाकी सई मेघा वाद आता चांगलाच भडकलाय आणि डॅमेज इज डन बाय बोथ साइड्स, ज्या प्रकारे सई पेटलीये , सई मेघा फिनाले मधे नक्की !
रेशम उलट तितकी निगेटिव जात नाहीये आणि इंटरेस्ट गेल्यासारखा वागतेय, पहिल्यांदाच वाटतय रेशम आता एलिमिनेट होणार !
पण सगळ्यात पाताळयंत्री कनिंग , थत्तेंच्या शब्दात आनंदीबाई झाली पुष्कर !
त्याने सगळं पेटवून दिलं, दोघींचे भांडण पुष्करचा लाभ !

त्याने सगळं पेटवून दिलं, दोघींचे भांडण पुष्करचा लाभ !>>> अगदी अगदी

त्या दोघींचा विश्वास अन मैत्रीचा सॉलिड फायदा-गैरफायदा घेत स्वतःची इमेज सुधारली त्याने सगळीकडे

त्याची इमेज सुधारली कि नाही माहित नाही, सोशल मिडीयावर जाम खेटरं पडतायेत, राजेश रेशमला पडायची तशी सई पुष्किला पडतायेत पण ममा आणि घरवाल्यांच्या नजरेत मेघाला नक्कीच उतरवलं त्यानी.

रेशम उलट तितकी निगेटिव जात नाहीये आणि इंटरेस्ट गेल्यासारखा वागतेय, पहिल्यांदाच वाटतय रेशम आता एलिमिनेट होणार ! >> ह्म्म असा विचार केला नव्हता. बरोबर , सई आणि मेघा विरोधी झाल्याने अता रेशम ची गरजच उरलेली नाहीये, सो ती एलिमिनेट होऊ शकते.

Pages