बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

एकाच ग्रुप चे दोन उमेदवार एकमेकाविरुद्ध हे पूर्वी झाले आहे की. मेघाने स्वतः पण उमेदवारी घेऊ नये याचे मला नवल वाटले.

पुष्करच्या विरोधात ती उभी राहिली असती तर तिला कितीजणांचे समर्थन मिळाले असते याविषयी शंका आहे मला. Proud

कॅप्टनसी साठी आस्तादला नॉमिनेट केलं मेघानी. एकदम कॅल्क्युलेटेड मूव्ह! एका दगडात तीन पक्षी! वा, मेघा!
१. तशीही ती कॅप्टन होऊ शकलीच नसती हे तिला माहिती होतं. कारण पुष्कर सईला मत देणार. आउंनी ऑलरेडी मेघाविरुद्ध आघाडी उघडलेली आहे. एकट्या शराचं मत तिच्या बाजूनी होतं. तेव्हा तिला काही चान्स नव्हताच.
२. सईनी अनेकदा मेघाशी पंगा घेतला आहेच. तसंच पुष्कर आणि मेघा यांत निवड करताना सईनी नेहमीच पुष्करची साथ दिली आहे. तेव्हा तिलापण तिची जागा दाखवून दिली.
३. आस्तादला आत्ता उपकृत करुन ठेवले ज्याची परतफेड करण्याचं ऑब्लीगेशन त्याला येणार.

आजच्या एपिसोडला मजा येणार बघायला.

>>एकाच ग्रुप मधून दोघेही उभे राहिले तर आपली मते विभागली जातील त्यापेक्षा पुष्करला मदत करून जिंकवता येईल असा तिचा विचार असावा<<
पण आपल्याच गृप्मधल्या एकानं कॅप्टन होणं हे महत्वाचं नाहि? शिवाय, पुढचा कॅप्टन निवडीचा टास्क एकमताने/बहुमताने/संगनमताने होइलच याची खात्री काय? दोघांत स्पर्धा झाली तर आस्ताद सगळ्या डिपार्टमेंट्स्मध्ये पुष्करला भारी पडु शकतो...

३-४ च आठवडे राहिलेत त्यामुळे लोक आता स्वतःचा गेम खेळत आहेत ग्रुप चा विचार न करता असे वाटतेय. हंगर गेम्स आठवते मला सारखे.

Technicallyमेघा चे 4 points होते ,तीने आणि रे ने भांडून घेतलेल्या ranking चे मार्क्स लिहायला हव होतं . पण ते तिला उशिरा समजल ,नन्तर कोणी तिच्या बोलण्याला intentionally seriously घेतल नाही . आणि शुगोल म्हणतात तस तिला कोणी कप्तान बनू दिलच नसत.

>>तीने आणि रे ने भांडून घेतलेल्या ranking चे मार्क्स लिहायला हव होतं <<
कायच्याकै! स्मिताने तो मुद्दा चांगल्या रितीने खोडुन काढला. मेघा स्वतःचे नियम बनवते याचं ते अजुन एक उदाहरण होतं. बिग्बॉसने अर्थात त्याला धुप घातला नाहि. Happy

आस्ताद सारखे स्ट्राँग प्रतिस्पर्धी कँप्टंसीला सुचवले तर तेच पुढे कॅप्टन होउन पुढच्या दोन आठवड्यात (फिनाले पर्यंत) सेफ होतील आणि फिनालेत आपल्याला भारी पडतील - हा विचार शहाणपणाचा कि पुष्कर किंवा आपल्याच कंपुमधल्या वीक प्रतिस्पर्धीला कॅप्टन होउ देउन, त्याला फिनाले पर्यंत जायला मदत करुन, फिनालेत त्याचा पाडाव करायचा - हा विचार शहाणपणाचा?..

Ekun baghata .. megha nature ne changli aahe..
Aani Aastad la mat denyacha nirNay thoda spontaneous aani chukun emotional zala..
Faar kahi calculation navhate tya mage..

Tichya mate jar tine aastadla bb chya baher jaun kiti samajawal tari tyala tichi baaju kaLanar nahi so ithech rahun ek favor..
Pan he tichyawar khup waait ulatu shakat..

Puski sai ti sharmi paiki konihi captain zaala asata tari chalala asat..

May be far calculative hushar move nasun chukichi emotional move aahe hi meghachi

पुष्कर कॅप्टन झाला म्हणजे सईला तो नॉमिनेशनपासून वाचवणार नेक्स्ट विक. लकी सई, कसंही वागून फायनलला जाणार. सर्वांच्या मनातून उतरली ह्या आठवड्यात. पण मतं नक्कीच मिळाली असतील, तिच्या फॅन्सची.

पुष्करला नॉमिनेट करायचा चान्स दिला तर तो मेघाला करेल. सईला वाचवेल.

चौगुले आणि रेशम पुष्करच्या बाजुने फेअर खेळले. चौगुलेचा जास्त वाटा आहे विजयात. स्मिता जोशात होती मात्र आज पण सक्सेसफुल नाही झाली. शेवटी आ चं नष्ट केलं सईने बहुतेक एन असावा. ह्या सर्वांमुळे खूप फरक पडला.

पण पुष्करने अक्षरं फाडायला सुरुवात केली तेव्हा मुळ स्त्रोत नष्ट करतोय तो ही कोणी तक्रार नाही केली आणि सर्व तसंच करायला लागले. परत ह्यावेळी लढाई टास्क होता.

आजच्या टास्क मधे रेशम, नंदु आणि सई हे पुष्कीला सपोर्ट करताना दिसतायत आणि शरा, मेघा, स्मिता हे आस्ताद ला. मजाच येणार सगळी Happy

जी काही स्ट्रॅटेजी असेल मेघाची ती असो पण सईला ते बॅकस्टॅबींग वाटण साहजिक आहे.... तिला वाटत असेल गिल्ट तर तो काही एका मिनिटात नाही आलेला ना.... पुष्कर बरोबर म्हणाला की जे काय करायच होत ते टीमला विश्वासात घेउन केल असत तर जास्त बर झाल असत!

हो, सर्व फेअर खेळले ज्या त्या टीमसाठी असं वाटलं.

सई अतिशय अ‍ॅरोगंट, स्वार्थी, आळशी, लाडावलेली मुलगी आहे असं माझं मत होतंच आधीपासून आता सोमि वर पण सगळे लिहीतायेत. मागे मेघा ला तिने आणि पुष्करने चुकीचं ठरवलं आणि बाजुला केलं, सई पुढे आली तेव्हा मेघाने नाही तमाशा केला. आज कित्ती तमाशा.

मेघाची स्मार्ट मुव्ह होती ती मात्र. पण आता पुष्कर कॅप्टन झाल्याने उलटू शकते तिच्यावर. सई कॅप्टन होण्यासाठी अतिशय अयोग्य आहे. फक्त तेवढेच दिवस बरी वागते मग ये रे माझ्या मागल्या.

पुष्करला कॅप्टीनचा स्पेशल अधिकार देणाराच नाहीत या वेळेस. >>> सांगता येत नाही. मागच्यावेळी त्याचा पचका झालेला ना.

जी काही स्ट्रॅटेजी असेल मेघाची ती असो पण सईला ते बॅकस्टॅबींग वाटण साहजिक आहे.... तिला वाटत असेल गिल्ट तर तो काही एका मिनिटात नाही आलेला ना.... पुष्कर बरोबर म्हणाला की जे काय करायच होत ते टीमला विश्वासात घेउन केल असत तर जास्त बर झाल असत! >>> हो मेघाने सांगायला हवं होतं, असं मलाही वाटतं पण सई तरी चिडली असतीच . मागच्या आठवड्यात ह्या दोघांनी पण मेघाला तोंडघशी पाडले होतं.

मेघा सैला म्हणत होती की स्पोर्टिन्गली घे , मी काही विचार न करता त्याक्षणी तो डिसिजन घेतला (जे पटण अवघडच आहे ) हेच जर सईने केल असत तर? मेघाचा पारा चढला असता नक्किच, तिने हे गुडबुक मधे जाण्यासाठी केलय सरळ सरळ पण हे चुकिचय की तिने ग्रुपला विश्वासात नाही घेतल .अर्थात त्यानी तिला हे करुच दिल नसत कदाचित.
सइचे सगळे पॉइण्ट बरोबर होते आज अगदी! आतापर्यत हा ग्रुप मायनॉरिटी झेलत होता आता नक्किच त्याना चान्स होता मेजॉरिटी दाखवायचा आणि गेम मधे राहण्याचा, बाकी आस्ताद पण घराबाहेर गेल्यावर कशाला इथले इश्युज कॅरीफॉर्वड करेल.
सगळ्यात मोठा गेम खेळली मेघा जो तिच्यावर बॅकफायर होवु शकतो.यात आत्ता आस्तादचा फायदा झालाच पण पुढेही सई-पुश्किने रेशम किवा आस्तादला सपोर्ट केला तर?? मेघालाही ते झेलाव लागु शकत.
आत्ता ग्रुप न राहता २-२ च्या जोड्या उरल्यात.
उद्द्या ममा "दोस्त दोस्त न रहा गाण्याने सुरवात करतिल बहुधा."

उद्द्या ममा "दोस्त दोस्त न रहा गाण्याने सुरवात करतिल बहुधा." >>> Lol

सकाळी उठताना पण काही अशा आशयाचे उडते गाणं असेल तर लावतील bb पण.

सगळ्यात मोठा गेम खेळली मेघा जो तिच्यावर बॅकफायर होवु शकतो.यात आत्ता आस्तादचा फायदा झालाच पण पुढेही सई-पुश्किने रेशम किवा आस्तादला सपोर्ट केला तर?? मेघालाही ते झेलाव लागु शकत. >>> होऊ शकतं असंही

मेघाने सांगायला हवं होतं की मी असं करणार grpला आणि firmed राहायला हवं होतं. आता ही गोष्ट तिच्या फार विरुद्ध जाणार आहे.

शर्मिष्ठाला सई आणि पुष्कर काही बोलू शकत नाहीत खरं म्हणजे कारण सेव्ह करण्याच्या वेळी पुष्करने तिचे नाव घेतलं नव्हतं आणि परवाही सर्व शर्मिष्ठाने करून सई ला क्रेडीट मिळत होतं, तेव्हा सई एक शब्द बोलली नाही, बिचारी शर्मिष्ठा सांगत होती.

हा सेव्ह करायच्या वेळी त्याला शराचं नाव घ्यायचं होतं पण मेघाने विरोध केलेला , फायनली सईचं नाव घेतलं त्याने.

मेघानी सईला आधी सांगायला हवं होतं. सईनी केलेले तमाशे कमी नसते झाले पण मेघावर बॅकस्टॅबींगचा आरोप नसता झाला. आणि तिला आत्ता करते आहे तसं लास्ट मिनीट थॉट वगैरे न पटणारं एक्सप्लनेशनही देत बसावं लागलं नसतं.

आता पुष्कर कॅ. झाल्यामुळे मेघाची स्ट्रॅटेजी (वर कुणी म्हटल्याप्रमाणे ) तिच्यावर बॅकफायर होऊ शकते.

बाकी पुष्कर खूष असेल. सई मेघापासून तुटल्यामुळे. आता सईचं मत कायम त्यालाच!

रच्याकने, रेशम का रडत होती? मेघानी तिचं /तिच्यासाठी काहीतरी आणून द्या इ. बिबॉला सांगितलं. काय हवंय ते कळलं नाही मला.

मुलांचे हवेत बहुतेक, तेच येताना आणले नाहीत का किंवा मध्ये मुलीने दिले नाही का, असा मलाही प्रश्न पडलाय.

मुलांचे हवेत बहुतेक, तेच येताना आणले नाहीत का किंवा मध्ये मुलीने दिले नाही का, असा मलाही प्रश्न पडलाय.,>>> <अंजुताई, बिबॉ ने ते काढून घेतले आहेत मागे असे ते सगळे बोलत होते. आमचे काही फोटो घ्या पण तिचे परत द्या असे

कालच्या एपीमध्ये आस्ताद किती मस्त गायला, खूप आवडले. अन खेळला ही फेअर.
आता खरेतर आऊंनी बाहेर जावे, काल संचालक म्हणून खूप चुकल्या, सगळे जेव्हा बॉक्स तोडत होते, तेव्हा संचालक म्हणून त्यांनी हस्तक्षेप करायला हवे होते.

कालच्या एपीमध्ये आस्ताद किती मस्त गायला, खूप आवडले. अन खेळला ही फेअर. >>> हो.

अंजुताई, बिबॉ ने ते काढून घेतले आहेत मागे असे ते सगळे बोलत होते. >>> थँक यु. मला फार काही समजलंच नाही ते. एका जागी बसून नीट बघितलं नाही की मला काही कळतंच नाही. इथे वाचल्यावर लक्षात येतं, अरे हे मिस्ड आपलं Lol

Pages