Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Maitreyee yana anumodan..
Maitreyee yana anumodan..
Aani smita ne kame kapade ghatale taree chhan disatat ya pakshpatach kaaran kay?
Reshamchya maraathi ch kaay..
Astad chya double dholaki ch kay?
Amhi comparatively barya group la support karat aahe.. asa konich kadhich mhanal nahiye ki megha group jagaat sarwottam aahe.. pan donhi group paiki taree toch group better aahe
अरे...आपली सई नॉमीनेट.....
अरे...आपली सई नॉमीनेट.....
पण ती नक्कीच वाचेल.
आपल मत सईलाच... ( सई व मेघा असती तर मग मेघाला )
स्मिताचा खुप मोठा घोळ झालाय तो असा -
सुरवातिला खुप गर्दी आहे पाहुन तिने व्हिलन ग्रुप जॉईन केला.
पण जस जसे दिवस ( व व्हिलन ग्रुपचे एक एक मेंबर) गेले तिला ल़क्षात आल की तिने चुकीचा ग्रुप जॉईन केलाय.
त्या नंतर तिचे व्हिलन ग्रुप मध्ये काही खटके उडाले.
तिने मग सई / मेघा ग्रुप मध्ये यायचा प्रयत्न केला, पण काही कारणाने तो सफल झाला नाही.
जेव्हा जेव्हा एक व्हिलन ग्रुप मेंबर कमी व्हायचा, तेव्हा सोमवारी स्मिता कडुन एक प्रयन्त व्हायचा मेघाला मीळायचा पण सई मुळे बहुतेक तिचा तो प्रयत्न असफल व्हायचा...
सईचा आळशीपणा..... अरेरे!
सईचा आळशीपणा..... अरेरे!
थोडक्यासाठी नको कंटाळा करुस आता..... मेघा उगीच तिला समजावायला जाते आणि वाईटपणा घेते.... पुष्की मधल्या मध्ये मौके पे चौका मारुन घेतो!
आज काय लोक कुणी किती सनसनाटी केली यासाठी भांडत होते.... श्या!
माझ्या मते ते रेटींग असे पाहिजे होते:
१ रेशम
२ चौगुले
३ मेघा
४ आस्ताद
५ पुष्की
आस्ताद किती उघडउघड चमचेगिरी करतो..... रेशमताईची!
माझा क्रम
माझा क्रम
मेघा
रेशम
सई
अस्ताद
पुष्कर
बाकी सगळे बाद.
नंकी किती फुकट पुढे पुढे करतो
अरे कुणी डिटेल्स लिहा ना.
अरे कुणी डिटेल्स लिहा ना.
आज स्मिता फार आळशी वाटली मला.
आज स्मिता फार आळशी वाटली मला, टास्क रिलेटेड म्हणतेय मी.
डीजे स्मिताच्या आईबद्दल छान लिहीलंस ग.
आज नुसता टीपी सुरु होता. मेघा सई वाद, त्यात काय बोलणार. मेघा बरेचदा सांभाळून घेते सईला असं वाटतं. स्मिता जर बोलली असेल तर कधीतरी तिने रे ताईला पण बोलायला हवं होतं, किचन टीममधे असेल रे ताई तेव्हा काम करताना दिसत नाही. रे ताई सर्वात आळशी दिसते दिसताना, दोन नं सई. पण सई पोळ्या करते बरेचदा. जास्त किचनमधे राबताना दिसतात त्या म्हणजे आऊ, मेघा, स्मिता, शर्मिष्ठा.
आज आउनं मेघा ऐवजी रेशमच्या
आज आउनं मेघा ऐवजी रेशमच्या बाजूनं पहिल्या क्रमांकाचं मतदान केलं. किती मूर्खपणा आहे. आणि हे तिला कळलं नसेल असं मला नाही वाटत. कळून सवरून केलंय. काहीही गरज नव्हती.
एनीवेज, तसंही या आठवड्यात जाईलच ती बहुतेक. शून्य कामगिरी. तिला सर्वात जास्त रक्कम मिळत होती खरंतर पण त्याचा परतावा काही बिबॉ ला मिळाला नाही.
या नंबराच्या गेम चा काय हेतू
या नंबराच्या गेम चा काय हेतू आहे? कॅप्टनशिप साठी आहे का हे?
या नंबराच्या गेम चा काय हेतू
या नंबराच्या गेम चा काय हेतू आहे? कॅप्टनशिप साठी आहे का हे? >>> ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून मी हातभर मोठी post डिटेल्ड लिहिली. पोस्ट करताना नेट गुल. मी कॉपीपण नव्हती केली. सॉरी, आता कंटाळा आला.
श्या खरंच, मोठी post लिहिली तर कॉपी करायला हवी हे नेहेमी विसरते.
आऊ डोक्यावर पडली आहे का. रेशम
आऊ डोक्यावर पडली आहे का. रेशम कितीवेळा आऊला तोंडावर बोलली आहे की तुमचं ईथे काही काम नाही तेव्हा तुम्ही गेलेलं बरं, याऊलट मेघा आऊची बाजू घेऊन नंकिशी भांडली आहे. रेशम काय म्हणून एक नंबर समजते स्वत:ला, अफेअर करून चर्चेत राहणं ही अभिमानाची गोष्ट आहे का. चांगली कामं आणि मग सनसनाटी असं होतं ते पण नेहेमीप्माणे आस्ताद आणि रेशमने स्वत:ला पाहिजे तो अर्थ लावला, मेघाला बोलू दिलं नाही, तिचं ऐकून घेतलं नाही आणि पाहीजे ते मिळवलं. आस्तादला रेशमची एवढी बाजू घेऊन काय मिळतं आणि ईकडे पुष्कर,सै स्वत: पुरतं बघून मोकळे. पुष्कर तर म्हणाला मी तीन नंबरला खूष आहे (बाकी तुम्ही काय गोंधळ घालायचा तो घाला). स्मिताने तर काहीच प्रयत्न केले नाहीत. मेघाची न्यूज मला आवडली, तेरा फूट उंच खापर पणजीची नथ नंकिला स्वत:चं काहीच सुचत नाही का, मेघाद्दल बोलून न्यूज बनवायची काहीच गरज नव्हती, यात मेघाचाच फायदा आहे व ते किती असुरक्षित समजतात स्वत:ला ते दिसून येतं. सै किती अॅरोगंट आहे आणि किती बोलते, मेघानेही तिला ऊकसवायची गरज नव्हती, ती खरंच दमली होती.
सई माझ्या डोक्यात आधीपासूनच
सई माझ्या डोक्यात आधीपासूनच जायला लागलीय, मागे तिने आठवडाभर नखरे केले तेव्हापासून. पण आज तिचे वागणे बघून ज्यांना आवडत होती तेपण टीका करतायेत, त्यांच्याही डोक्यात जायला लागलीय. सो मि वर बऱ्याच निगेटिव्ह प्रतिक्रिया वाचल्या bb पेजवर.
रेशमचं मराठी किती वाईट आहे,
रेशमचं मराठी किती वाईट आहे, मेघासंग रेशम असं बोलली ती आणि शेवटी काय बोलली जेव्हा आस्तादच्या मुलाखतीबद्दल सांगत होती. नंकि सगळ्यात जास्त मराठी शब्द वापरतो. सैचा ड्रेस साधा होता पण तिने तो अॅक्सेसरीजने छान खुलवला होता. स्मिताचं काॅम्बिनेशन आज मला विचीत्र वाटलं आणि त्यावरचे ते लाल कानातले.
रेशमचं मराठी किती वाईट आहे,>>
रेशमचं मराठी किती वाईट आहे,>> हो हे बर्याचदा दिसून आलंय. कालपण कन्फेशन रुममधे रुलबूक वाचताना मेघाप्रमाणेच ती ही स्तोत्र म्हणाली स्त्रोत ऐवजी. 'जास्त' शब्दातला 'ज' ती 'जर' मधल्या 'ज' सारखा उच्चारते. बादली ला 'बाल्डी' (हा मराठी शब्द आहे की नाही माहिती नाही) म्हणते ती.
या नंबराच्या गेम चा काय हेतू
या नंबराच्या गेम चा काय हेतू आहे? कॅप्टनशिप साठी आहे का हे? >>> हो पण पहिले दोन नं महत्वाचे त्यावरून पुढे task सुरु.
रे आणि मेघा पहिल्या दोन नं वर होत्या म्हणून त्यांना news reader आणि camera person ह्या भूमिका दिल्या. बाकीच्यांनी सनसनाटी news निर्माण करायच्या ज्या मीडियात जास्त चर्चेत राहतील तसे पुढचे नं आणि पहिल्या दोन भूमिका त्यांना आणि तसे तसे फोटो लावणार बोर्डवर.
पुष्करने बिकिनी घातली आणि लंडनची लिंडा म्हणून आला. आस्तादने डोक्यात चीप आहे ते सांगितलं आणि मंगळावरच्या लोकांशी बोलतो हे दाखवलं मार्शियन भाषेत. आऊ शर्मिष्ठा भांडल्या. मेघा आणि रेशमने पहिला नं पुष्कर आणि दुसरा आस्तादला दिला म्हणून ते आता news reader आणि cameraman, त्यांनी पुढचे निवडायचे.
ह्यात जास्त वेळा ज्यांना पहिले दोन नं मिळतील आणि बोर्डवर फोटो लागेल जास्त वेळा ते कॅप्टनशीपचे उमेदवार. असा task आहे जो उद्या परवाही असेल बहुतेक.
मला सईचा राग यायला लागलाय.
मला सईचा राग यायला लागलाय. अगं तू दमलीस म्हणजे बाकीचे काय टाईमपास करत होते का खेळात? शरा तर एकटीच खेळत होती ६ चे ६ तास , हिचं काय कौतुक
मेघाने आता शहाणं व्हावं
मेघा कायम सांभाळून घेते सईला.
मेघा कायम सांभाळून घेते सईला. सई फार गैरफायदा घेतेय तिचा. बरेचदा वाटेल तसं बोलते तिला. ही मेघाला दगा देणार वेळेला असं मला बरेचदा वाटतं. मेघा देईल तिला असं मात्र वाटत नाही. कामं करायची असतील तेव्हा मेघाने करायची, क्रेडीट मेघाने एकटीने घेतलं की प्रचंड राग.
सई खुप ईमॅच्युर आणी शॉर्ट
सई खुप ईमॅच्युर आणी शॉर्ट टेम्पर आहे तिला मेघाने सईड्या सईड्या करुन लाडावुन ठेवलय, कशाला एकुण घ्यायचे नाही ते टॅन्टरम हिचे बाकिच्यानी शराला पण किती हाड-तुड करते. शरा बिचारी एकुण घेते.
रेशमने स्वतःच्या नबर १ असण्याची काय पण कारण दिली! हिची कूणाची कॉम्पिटिशन नाही ना मग कशाला नबर रेस मधे एवढा रस हिला
मेघा कॅमेरापर्सन असुनही बोलतच होती
मेघा कॅमेरापर्सन असुनही बोलतच
मेघा कॅमेरापर्सन असुनही बोलतच होती >>
मी हुकुमशहा असते तर मेघाला एक पुर्ण दिवस एकही शब्द न बोलण्याची अज्ञा दिली असती
रिया सेम एकीने bb fb वर
रिया सेम एकीने bb fb वर लिहिलेलं. मेघाला मी एकही शब्द बोलू नकोस, स्मिताला काहीही काम न करता बसून फक्त आराम करायचा etc अशा शिक्षा दिल्या असत्या असं लिहिलं होतं.
मेघा कॅमेरापर्सन असुनही बोलतच होती >>>
सै: हेच स्पिरिट आवडतं लोकांना
सै: हेच स्पिरिट आवडतं लोकांना आपलं .
पुष्कर: हो, थांब मी जरा जाऊन येतो . :-d
सईचा अटीट्युड खूप विचित्र होत चाललाय. उगाच आरडा-ओरडा असतो .
मेघा पहिल्या नंबरला किंवा कॅप्टन साठी आली कि आस्तादच नुसता थयथयाट होतो. ती नॉमिनेशनमधून सेफ झाली तर नक्कीच गुपचूप रडला असणार तो.
आऊ खरंच जा घरी आता, तुम्हाला अजुनपण गेम समजेना
आज एका कंमेंटमध्ये स्मितासाठी
आज एका कंमेंटमध्ये स्मितासाठी हे वाचलं " लाडाच भजं आणि जगाला ओझ"
आज एका कंमेंटमध्ये स्मितासाठी
आज एका कंमेंटमध्ये स्मितासाठी हे वाचलं " लाडाच भजं आणि जगाला ओझ">>> सईसाठी असेल हे
डंब म्हणता म्हणता स्मिताने
डंब म्हणता म्हणता स्मिताने काल मस्त गेम केली. हे तिने मुद्दाम केलं की नकळत झालं हे समजलं नाही. पण सईच्या आक्रस्ताळेपणाला मस्त किल्ली मारली तिने. आधीच नॉमिनेट झाली असलेल्या सईच्या दृष्टीने हा आक्रस्ताळेपणा धोक्याचा ठरु शकतो. हे आधीही १-२ वेळा तिच्या बाबतीत झालं आहे, की असं काही झालं तर ती मेघावर डाफरतेच.. पुष्कर आणि शरा ला सुद्धा जुमानत नाही. मेघाच्या शांतपणे , चिकाटीने ही परिस्थिती हाताळण्याचं मात्र कौतुक वाटतं तितकाच रागही येतो.. का इतकं मागे मागे करावं !
१ ते ५ क्रमवारी च्या टास्क मधे घराबाहेर चर्चेत कोण जास्त राहिलं ह्या निकषावर नक्कीच रेशम साठी पहिला नंबर योग्य होता. नंतरच्या ४ नंबरांमधे पुष्कर पेक्षा नंकी नं ३ साठी जास्त योग्य वाटला. बाकी क्रम ठीक ठाक !
त्यानंतरचं ब्रेकिंग न्यूज टास्क अजिबातच रंगलं नाही. रेशमचं बोलणं त्रासदायक वाटत होतं. अपवाद पुष्करच्या लिंडा चा ! धमाल आणली त्याने..
उना-शरा चं भांडण त्याच त्याच संवादांमुळे खुललं नाही, तरीही दुसरा नंबर त्यांचाच हवा होता.
सदैव धीरगंभीर आस्ताद स्वतःच परग्रहावरचा वाटत असला तरी त्याचं मंगळवासीयांशी बोलणं, डोक्यात चीप आहे वगैरे जाम बोअर झालं. तेच मेघाच्या बाबतीत. मजा नाही आली.
'जास्त' शब्दातला 'ज' ती 'जर'
'जास्त' शब्दातला 'ज' ती 'जर' मधल्या 'ज' सारखा उच्चारते. बादली ला 'बाल्डी >>> ती पंजाबी कुंटुंबात राहीली असल्याने होत असेल असे. जेवण पण ती बरेचदा कढी पकोडेच बनवायची, जे आ ऊंना आवडायचं नाही.
स्मिता मराठी फारच विचित्र बोलते, ते तिला स्वतःलाच लक्षात येतेय, त्यामुळे ती मोठ्याने आणि जास्त बोलत नाही.
फक्त दुसर्याच्या हो ला हो करते
गेल्या 2 3 आठवडयापासून सई फार
गेल्या 2 3 आठवडयापासून सई फार iritating वागतेय। आधी आवडायचि आता नाही। खरच खूप pampered child आहे ।नुस्ता चांगला task करुन नाही तर वागणूकिने winner होणार। मी जेवणार नाही काहि कामं करणार नाही हे किती immature बोलण । दमलेय वगैरे तिला कमी आवाजात पण सांगता आल असत।
मेघा खरच balanced आहे पण तितकीच मीठी छुरी। कालच तिच वागंण परत washroom मधे जाऊन चर्चा करण हे पुढच्या रहिलेल्या दिवसन्ची आपली चान्गली बाजू दिसन्या साठी चा पण प्रयत्न असु शकतो। but that is fair enough. शरा ला फायदा होऊ शकतो। शरा पण खुप balanced आहे। ती रहावी।
एवढ होउन पण परत मेघा बोलायला
एवढ होउन पण परत मेघा बोलायला गेली , सै एवढ हड तुड करुन पण का जाते लगेच मेघा बोलायला
सनसनी किंवा काँट्रोव्हर्शिअल
सनसनी किंवा काँट्रोव्हर्शिअल / न्युज मधे असणे प्रकारात नं.कि एक नंबर हवा होता, काय काय उलथापालथ झाली तो आल्यापासून, कमीत कमीवेळेत सनसनी !
माझ्या दृष्टीने १.नंकि २.रेशम ३.मेघा ४.आस्ताद ५.सई
न्युजसेगमेन्ट टास्क मधे आउ -शर्मिष्ठा न्युज जास्तं टीआरपी कॅटॅगरी होती, त्याचं सोप्प उदाहरण हेच कि कलर्सने प्रोमो साठी तीच न्युज निवडली
मेघानेही मस्तं स्टोरी बनवली बिग बॉसच्या प्रॉप्स वरून !
बाकी सईचा सुरवातीचा ड्रामा तिलाच निगेटिव बनवणार, बाकी पब्लिक ट्र्क्निकली करेक्ट वागायचा प्रयत्न करतायेत आता !
सईनं इतक्या आठवड्यात जे काही
सईनं इतक्या आठवड्यात जे काही कमावलं ते ती आपल्या हातानं आणि कर्मानं गमावतेय.
याउलट
रेशमनं जे भलं मोठ्ठं गमावलं होतं ते तिनं बर्याच प्रमाणात परत कमावण्यात यश मिळवलंय. स्मिता गेले दोनेक आठवडे ढेपाळल्यासारखी वागतेय. याचाही फायदा रेशमला होतोय.
सध्या माझ्यामते पॉप्युलॅरिटीमधे मेघा पहिली, रेशम दुसरी, पुष्कर-शरा तिसरे, सई-स्मिता चौथे आणि अस्ताद पाचवा असेल. आणि असं असेल तर आउ आणि अस्ताद डेंजरझोनमध्ये जातील आणि आउ बाहेर पडेल.
सईने रेशमला सॉरी म्हंटलेल
सईने रेशमला सॉरी म्हंटलेल आवडलं नाही तसच तिने स्वतःला नं ४ वर समाधान मानलं हे सुध्दा नाही आवडलं, पुष्कि नंतर स्वतःला का म्हणून ठेवायचं ?
असो, उद्याची वाट पहातेय मी, सईनी आणि मेघाने नंकिशी स्कोअर सेट्ल केलेत ब्रेकिंग न्युज सेगमेन्ट निमित्तानी , मज्जा येईल पहायला !
प्रोमो बघून खुर्ची सम्राट ची सई - मेघा जोडी आठवली, त्या एकाच टास्क मधून आधी मुळीच माहित नसलेल्या या दोघी एवढ्या आवडायला लागल्या, hope to see my fav girls back in fighting and standing for right !
स ई आवडते परंतु गेल्या
स ई आवडते परंतु गेल्या आठवड्यापासून सईचे सगळे दुर्गुण दिसायला लागले आहेत. याचा फायदा अर्थातच मेघाला होऊ शकतो पुष्कर मात्र सेफ राहण्याचा नादात मेघाला नक्कीच दगा देणार हे पुढील आठवड्यात दिसून येईल. आता शेवटचे काही दिवस राहिले आहेत तेव्हा रेशम पुष्कर aastad असे समीकरण तयार झाले तर आश्चर्य वाटायला नको.
आऊ आता नक्की जाव्यात.
Pages