Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
पण ह्यावेळी काळजी वाटते तिची
पण ह्यावेळी काळजी वाटते तिची मला.
पुष्कर आणि सई तर मागे एवढे confirmed होते, ती गेलीच असे मग इतकी तोंडे उतरली दोघांची की बास रे बास.
बिग बॉस ने जास्त वेळ झोपायचा
बिग बॉस ने जास्त वेळ झोपायचा आणि बेडवरुन न उठायचा टास्क ठेवायला हवा होता ,साई ने एक नंबर काढला असता . नुसती म्हशीसारखी बेडवर लोळत असते ब्लॅंकेट घेऊन लूक्स देत सगळ्यांना .डोक्यातच जाते
मी केल वोट शरा ला... यावेळी
मी केल वोट शरा ला... यावेळी कदाचीत शरा च जाईल
साई ने एक नंबर काढला असता ..
साई ने एक नंबर काढला असता .. +१
आणि मेघाला म्हणत होती, एक मिनीटही वेस्ट करु नकोस..
सई मेघाच्यामुळे इथपर्यंत आली,
सई मेघाच्यामुळे इथपर्यंत आली, पी आर चांगला आहे तीचा. पण मोस्टली लोकं मेघामुळे तिला मतं द्यायची. ती आता बरीच चिडली आहेत. सईला मत देऊ नका सांगतायेत सो मि वर पण आता bb वाचवतील तिला कारण ड्रामा हवाय ना.
सईला कायम center of
सईला कायम center of attraction राहायचं असतं. काही लोकांकडे "ऐच्छिक आजार" हा गुण असतो. जरा आपलं पारडं हलकं होतंय किंवा कुणी लक्ष देत नाहीये असं वाटलं की ते शस्त्र बाहेर काढतात.>>> अगदी अगदी. मला तर त्या स्केटींगच्या टास्कच्यावेळीच जाणवलेलं.रे ने धक्का दिल्यावर आधी सै उठून मागे वळून रे ला ओरडली पण तितक्यात तिला समजले तिचा बूट निघालाय तर लगेच रडायला लागली. हो तिच्या कमरेला झटका बसला असेल पण ती नक्कीच अती करत होती.
मेघा कशाला गेली सई चं डोकं
मेघा कशाला गेली सई चं डोकं बिकं दाबायला...
ईतकी बोलली सई तिला...काही सेल्फ रीस्पेक्ट आहे की नाई मेघा ला....२ दिवस तरी जरा लांब बसायचं ना सई पासुन...
आउ जाताना विचित्र च वागली....तसही तिच्याविरुद्ध काही घडलं की ती विचित्र च वागायची..तिला काही स्पोर्टींली घेता यायचं नाहीच..मग बाहेर पडल्यावर असं वागणं तस सहाजिक होतं तिच्यासाठी म्हणा..असो..
पण सगळ्यात महान शर्मिष्ठा....अग बाई आवरर् ते रडणं असं म्हणायची वेळ आली...किती रडतेय किती रडतेय ...(खरतर असं बोलु नये पण कोणीतरी गेल्या सारखं रडत होती अगदी)
मला तर वाटलं अजुन थोडावेळ आउ आत थांबली असती तिचं रडणं ऐकत तर आउ ने तिच्या खरच थोतरीत दिली असती..
नंतर पण कित्ती रडारडी न बड्बड करत होती...तिचं सगळं वागणं खोटच वाटतं मला समहाउ..तिच्या बहिणीने तिला दिलेला सल्ला की "तु दिसतच नाहियेस अज्जीबात "..तिने जरा अतिच मनावर घेतलाय....अता बास ग बाई असं झालेलं मला...
आज च्या भागात दाखवत आहेत की मेघा ला पुष्की ला छळायचा चान्स मिळणार आहे न शमा ला सई ला छळायचा....काईतरी सासुसुना टास्क दिसतय..आता काय करतात बघु दोघी...ममां ना परत एकदा मेघा ला न शमा ला बोलायला कारण मिळणार असं दिसतय..
पुष्कर बोलला की तू माझ्या
पुष्कर बोलला की तू माझ्या वाटणीचा 1 तास झोप तेव्हा लगेच त्याची री ओढत माझेही एक तास तू झोप असे बोलली ती सईला, अन नंतर स्वतः तिला उठवून जबरदस्ती झोप येत नसून झोपायचा प्रयत्न करत होती. पण मग जर असेच करायचे तर आधी कशाला तसे बोलायचे. >>>> सैला मेघाने नाही पु ने उठविले त्यावेळी सगळे बाहेर बसलेले. तेव्हा आ म्हणाला कुणाला मायग्रेनचा वै. त्रास असेल तर झोपून घ्या तेव्हा मेघा तिला मायग्रेन आहे आसे सांगून झोपायला गेली.
स्मिताला पण झोप येत होतीना,
स्मिताला पण झोप येत होतीना, आस्ताद पण म्हणाला. स्मिता बिचारी उड्या मारून वगैरे झोप उडवत होती, तिचा हा त्याग बिग कोणा कोणाला म्हणून दिसणार नाही हो घरात .
स्मिता आपल्या विश्वात मश्गुल
स्मिता आपल्या विश्वात मश्गुल असते मस्त. तिला पडलेलं नसतं बाकी कुणाचं. आनंदात असते नेहमी. बाकीचे डंब म्हणोत किंवा कन्फ्युज्ड, तिचं तिचं काही तरी चाललेलं असतं. ती कधी आजारी पडलीये, कुठल्या कामाला नाही म्हटलीये किंवा कारण नसताना कुणाला मिठ्या मारत अन रडत सिंपथी गेन करते असे बघितलीये का?
मी आज स्मिता आणि मेघामध्ये कन्फ्युज आहे.
किती छान लिहिलं पुंबा.
किती छान लिहिलं पुंबा.
मी स्मिताला केले वोट, शक्यतो
मी स्मिताला केले वोट, शक्यतो शरा किंवा नंकि जाईल असे वाटते
Smita kharach chhan ahe..
Smita kharach chhan ahe.. At least fiinal madhe yavi ashi apeksha...
Sai ani pushlkar evadhe ka
Sai ani pushlkar evadhe ka jaltat tichyavar kay mahit? Doghehi dokyat jatat
मी स्मिताला केले वोट, शक्यतो
मी स्मिताला केले वोट, शक्यतो शरा किंवा नंकि जाईल असे वाटते >> sha ra la megha che supporters vvote karatil.. Jar double nomination asatil tar sai ani nand k jave
sha ra la megha che
sha ra la megha che supporters vvote karatil.. .. आणि मग मेघाला कोण वोट करेल?
स्मिता खरंच अत्यंत गुणी
स्मिता खरंच अत्यंत गुणी मुलगी आहे. मी तिला कधीही मोठ्या आवाजात बोलताना, भांडताना पाहिलं नाही.
मेघाने जेंव्हा आस्तादचं नाव
मेघाने जेंव्हा आस्तादचं नाव कॅप्टनसी टास्कसाठी दिलं, त्यादिवशीच्या आणि आधीच्या एक-दोन भागात मेघा आस्तादसोबत गप्पा मारतांना दिसली होती. इतक्या दिवसात ही गोष्ट कधीच घडली नव्हती, किमान दाखवली तरी नव्हती. जर तिने आधी कधी हे केलं नसेल, तर याचा अर्थ आता कमी दिवस राहिलेत, म्हणुन ती खरोखरच इमोशनल झालेली असणं शक्य आहे, जे तिने स्वत:च सांगितलं. शिवाय त्या दिवशीच, त्या घोषणेच्या जरावेळाआधीच आस्तादने ´वाट पाहुनी जीव शिनला` चं स्वतःचं व्हर्जन सादर केलं होतं, तेंव्हाच मेघा ते अतिशय मनापासून ऐकत, त्याला दाद देतांना दिसत होती. त्या क्षणी तिच्या मनात आस्तादविषयी सॉफ्टकॉर्नर निर्माण झाल्याचं मला तरी एकदम लख्ख जाणवलं..
पण मेघाच्या ह्या कृतीने पुष्कर आणि सई एकदम जेलस झाले असावेत! कारण ते दोघं कायम आस्ताद आणि गृपसोबत बोलायचे, अधून-मधून त्यांच्या बरोबरीने मेघाची खिल्ली उडवायचे, पण मेघा कधीही मनाने ह्या मंडळींच्या जवळ गेलेली त्यांना दिसली नव्हती आणि ती जावी किंवा जाईल अशी दूरदूरपर्यंत त्यांना कधीही शक्यता वाटलेली नसणार! म्हणजे त्यांचं तिच्याबाबतीत जे गृहितक होतं, की मेघा ही ह्या गृपची कट्टर शत्रू आहे आणि त्यांच्याशी ती कायम वाकडीच राहणार, त्याला अचानकच धक्का बसला आणि ते बिथरले! आधीपासूनच तिच्याबद्द्ल त्यांना तसंही काही प्रेम वगैरे नव्हतंच, मग आता त्यांना तिच्याविषयीचा राग उघडपणे दाखवायची संधीच मिळाली. पुष्करलातर मेघा कोणाच्याच गूडबुकमध्ये असलेली सहन होत नसल्याने स्वतः किती प्रामाणिक आहे, हे दाखवत त्याने मेघा कशी आस्तादच्या टिममध्ये असूनही त्याच्या विरुद्ध खेळली, (भलेही त्याला स्वतःला जिंकून देण्यासाठी का होईना,) सांगून तिला एक्सपोझ केलं. जेणेकरुन मेघाचा अगदी बरोबरीने द्वेष करणारा त्याचा साथीदार तसाच कायम द्वेष करत रहावा! सईला तर बहुतेक असं वाटत असणार की मेघाची तिच्यासोबतची मैत्री हे एक नाटक होतं आणि आता शेवटी शेवटी ती विरुद्ध टिमच्या गूडबुकात जाऊन त्यांचंही मन जिंकून तिला मागे टाकून बिबॉ जिंकणार!
थक्क व्हायला झालं हे सगळं पाहुन अगदी! आणि त्याहून मेघाचं सईच्या पुढेपुढे करणं पाहून झालं.. यामुळे सई किंवा पुष्करला त्यांनी केलेलं चूक आहे, हे वाटणारच नाही आता कधी! भलेही बाहेर त्यांच्या वागण्यावर कितीही टीका होत असली, तरीही..
असो, बाकी नॉमिनेशन प्रक्रियेतल्या सिक्रेट टास्कमध्ये शर्मिष्ठाने काय वेडेपणा केलाय! काही डोकं चालवायला नको का तिने? सगळ्या लोकांशी भांडणतरी काढायचं, नाहीतर मला जायचंय घरी ह्या आठवड्यात, घरची आठवण येतेय, आऊ गेल्या, आता माझं म्हणावं असं इथे कोणीच नाही, मला खुप एकटं वाटतंय इकडे.. असं म्हणत मेलोड्रामा केला असता, तरी चाललं असतं.. ती गृहितच धरुन चालली होती की तिला लोक नॉमिनेट करणार म्हणून.. स्मिता तिला बोलली ते अगदी गोड आणि बरोबर होतं की ती म्हणाली, मला भिती वाटतेय नॉमिनेशनची, म्हणून तिला कोणी नॉमिनेट केलं नाही.. शर्मिष्ठा जेंव्हा म्हणाली की मला बाहेर जायचं नाहीये, तेंव्हा ज्या प्रकारे रेशम आणि मेघा तिला चिडवत होत्या, त्यावरुन तरी तिला कळायला हवं होतं, की तिला कोणीही नॉमिनेट करणार नाहीये. तिची कल्पना अगदीच फ्लॉप होती.. आऊ आणि सई बरोबर ज्या मुलीने स्वत: भांडणाच्या स्क्रिप्ट्स लिहिल्या होत्या, तिच्या कडुन पार भ्रमनिरास झाला!
नंकिबद्द्ल बोलायचं तर, तो अगदीच एकटा पडल्यासारखा दिसतोय त्या घरात. एकतर बिबॉने दिलेले आधीचे टास्कस करुनही तोच बदनाम झाला होता. त्याने त्याचे टास्कस नीट पार पाडले, तो टास्कबरहुकूम छान खेळला, हे ओळखून बिबॉतल्या सभासदांनी त्याचं कौतुक केलं, तर तेही ममांना सहन झालं नाही, त्याचं कौतुक काय करताय? म्हणून वरुन त्यांनाच रागवले. म्हणून त्याने मनातून बिबॉवर एकतर बहिष्कार टाकलेला दिसतोय किंवा त्याचा सिक्रेट टास्क ह्या बाबतीत ताकसुद्धा फुंकून प्यावे, (की काहीही केले, तरी ते आपल्यावरच शेकू शकते.) असा अप्रोच असावा किंवा त्याचा आत्मविश्वास तरी गेलेला असावा, की त्याची तिथे राहण्यासाठीची एकही स्ट्रॅटेजी वर्क तर होत नाहीच्चे, पण त्याच्यावरच विचित्र पद्ध्तीने उलटतेय. या सगळ्याचा परिणाम म्हणून एकंदरीत तिथे राहण्यासाठी काहीही प्रयत्न करण्याइतका त्याला रसही उरला नसावा. म्हणून त्याने काहीच प्रयत्न केला नसावा.
अन्जूताई, यावेळी पण स्मितालाच
अन्जूताई, यावेळी पण स्मितालाच मत दिले. खरे तर मेघाला देणार होतो परंतू, मेघाला पब्लिक सपोर्ट खूप खूप जास्त आहे. शराला दिले नाही कारण, नॉमिनेट न होण्याची उत्तम संधी तिने स्वतःच्या बशेपणामुळे वाया घालवली. किशोर जाईल आणि डबल असेल तर शराला घेऊन जाईल अशी चिन्हे दिसतात.
पुढच्या वेळी पुष्कर असला
पुढच्या वेळी पुष्कर असला नॉमिनेट तर तो १००% घराबाहेर असेल.
पुढच्या वेळी पुष्कर असला
पुढच्या वेळी पुष्कर असला नॉमिनेट तर तो १००% घराबाहेर असेल.>>> +१००
ह्यावेळी सई जावी, ही मनापासून इच्छा! अगदीच मनातून उतरलीये ती आता..
नंकि चे चान्सेस जास्त आहेत
नंकि चे चान्सेस जास्त आहेत बाहेर जाण्याचे. फॅन फाॅलोविंग तर जमवायला मिळालीच नाही त्याला. उलट निगेटिव्ह इमेज तयार झाली. शरा कदाचित वाचेल पण. स्मिताचे फॅन्स आहेत खूप. त्याशिवाय का इतके आठवडे टिकली. सई आणि मेघा नाहीच जाणार. निदान भूषणला काढल्याशिवाय तरी नाहीच.
मला पण असच वाटतय की सै जावी
मला पण असच वाटतय की सै जावी.किशोर काय जास्त harmful नाही वाटत. आता सै स्क्रीन वर बघवत पण नाही.काल तर पुष्कर आणि सै सोडुन बाकी सर्व एकत्र बसले होते. पुष्कर ला पण जायच असेल पण सै बै मुले अडकला असेल.बर झाल , बस बेबी sitting करत.
सईचे अटेन्शन सीकिंग अनॉयिंग
सईचे अटेन्शन सीकिंग अनॉयिंग वाटत आहे फार. म्हशीसारखी लोळत होती सतत. घरातले लोक तरी तिला काय सतत इतके भाव देतायत? आमचे झोपेचे तास घे म्हणे! का म्हणून!! ते पादणे वगैरे डिस्कशन पण बोर झाले फारच.
काल मेघाचे काही चूक नाही वाटले. मायग्रेन होऊ न अये म्हणुन झोपायला गेली, पण झोप नाही आली म्हणून उठून आली बाहेर. एकूण न झोपणे हे टास्क मला अवघड वाटले. पण लगेच शेवट केलेला दिसतोय. आजच्या झलक मधे काहीतरी सासू सून जावई प्रकार दिसतोय.
निदान भूषणला काढल्याशिवाय तरी
निदान भूषणला काढल्याशिवाय तरी नाहीच. >>> भूषण गेला कधीच बाहेर, पुष्कर म्हणायचंय का तुम्हाला
शरा ने भ्रमनिरास केला काल....
शरा ने भ्रमनिरास केला काल..... तिला काहीही सुचलं नाही आणि वरताण किती रडत होती आऊ गेली म्हणुन...
तिला तर पुष्की सई नंकि यां सोबत किती तरी भांडता आलं असतं.
स्मिता.... घरातील सर्वच काम करते. टास्क पण व्यवस्थित करते. म्हणुन बोलायला नाही तर सर्व जण एकच कारण देतात. बि बाँ ला पण चालतं एकच कारण आणि प्रत्येका ला सांगतात की योग्य आणि प्रामाणिक कारण द्या.
बाळ सई प्रत्येक सोमवारी च कसं आजारी पडते की नाँमिनेट करू नये म्हणुन नाटक करते.
आस्ताद आणि रेशम सेफ झाल्याने स्मिता ला मतं जास्त पडायलाच हवी.
बाळ सई, मेघा आणि शरा यांना मिळणारी मतं विभागली जातील त्यामुळे कदाचित नं कि ला पण फायदा होऊ शकतो.
आपल मत तर फक्त स्मितालाच....
पुष्कर म्हणायचं होतं मला
पुष्कर म्हणायचं होतं मला
पुढचा नंबर किशोर किंवा
पुढचा नंबर किशोर किंवा शर्मिष्ठा
ज्यांना ईतके दिवस लोकांनी
ज्यांना ईतके दिवस लोकांनी डोक्यावर चढवले होते ते आता लोकांच्या डोक्यात जात आहेत.. जे पहिल्याच दिवशी व्हिलन ठरले त्यांच्यात चांगले गुण दिसत आहेत.. ज्यांना सदा सर्वकाळ माजोरडे म्हटले जात होते ते आता सेफच रहात आहेत..
सगळीच मज्जा!
आता सर्व रिक्षाचालक भाडे नाकारायला लागले बहुतेक..!
असो. अगदी ठार चूकीचे ईंग्लीश पण किती आत्मविश्वासाने बोलते मेघा..!
Pages