बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मेघा , शर्मिष्ठा छान खेळल्या . रेशमला स्मिताने काहीही सांगितले, कोणती सासू सुनेला शीर्षासन करायला सांगेन. त्यापेक्षा फुंकू नको म्हटलं असतं तरी तिने २ मिनिटात टास्क गिव्ह उप केलं असतं . आस्ताद मेघाला म्हणे कॅप्टन ठरवणार हिरा केव्हा द्यायचा ते, पण टास्क संपल्यावर स्वतःच म्हणाला कि आता मला हिरा द्या , नाहीतर मी उद्या खेळणार नाही . स्वतःसाठी वेगळे नियम, मेघासाठी वेगळे. सत्यव्रत पुष्कर कसा आज चिडी खेळला , चक्क रेशम आस्तादला पाणी टाकायला सांगितले बादलीत . सई जावी आता. दर टास्कला काय सतत दुखणं काढते.
Smita is too good to be in big boss. तिथे थोडे कंनिंग , चॅप्टर , पॉलिटिकली करेक्ट बोलणारे लोकं लागतात .

>>ते उगाच होतं पण Proud

अगदीच.... पण प्रश्न तो नाहीये!
जर तुम्हाला मेघाने बाकीच्यांना पढवलेले चालत नाही तर तुम्ही काय वेगळे करताय मग?

मेघाने गेम ओपन केलाय खरतर!
जे गेले कित्येक दिवस टीम टीम खेळत होते (जे त्या फेजमध्ये योग्यच होत) त्याने सगळ्यालाच एक प्रेडिक्टेबिलिटी आली होती... आणि आता जेंव्हा स्वतासाठीच खेळायची वेळ जवळ आलीय तेंव्हा हे टीमचे मोरल प्रेशर आले असते.... आत्ताच तिने स्वताबरोबर सई आणि पुष्करला आपापला गेम खेळायला मोकळे केलेय!
खरच शातिर खिलाडी है मेघा!

पण काल चौगुलेला हिरा देउ नका म्हणता म्हणता जेंव्हा तिच्या लक्षात आले की तो आपल्याच टीममध्ये आहे तेंव्हा भारी मजा आली!

बाय द वे.... रेशमला का इतका सॉफ्ट कॉर्नर आहे चॅनेलचा?
आधी डॅमेज कंट्रोलसाठी हर्षदाला पाठवले आणि तिला तिच्या बाहेर होत असणाऱ्या इमेजबद्दल कल्पना दिली.... नंतर ती जरा ट्रॅकवर आली खरी पण आळशीपणा मुळे लाइमलाइट मध्ये नाही येतेय आणि मेघा सगळे फुटेज खातेय तर आता सुकन्याच्या करवी तिला निरोप पाठवला की स्टॅंड घे म्हणून.... परत वरुन रेशम आणि तिच्या मुलीबरोबरचा एक किस्सा सांगून रेशमचे संस्कार किती चांगले वगैरे टिप्पणी करुन तिला एक प्रकारे advantage का दिला?
म्हणजे असतील तिचे संस्कार चांगले पण ते तिच्यासाठी केलेले कॅंपेनिंग वाटले!

असो!.... बाहेर कुणी कसेही आणि कुणीही असो, या गेममध्ये कुणी काय परफॉर्म केलय आणि कशी इमेज बिल्ड केलीय याच्यावर सर्वसामान्य प्रेक्षक मत देतो!
त्यामुळे आपले मत मेघालाच!

सुमो आणि ती दुसरी बाई अनॉयिंग होत्या. स्वतःच कन्फ्युज्ड होत्या कोणाला हिरा द्यावा कुणाला नको काही कळत नव्हते त्यांना.
वेडपट आस्ताद खंडणी मागितल्याप्रमाणे आजच्या कामाचा हिरा द्या म्हणाला Lol सध्या नंकि फार आवडत आहे मला Happy आस्ताद अ‍ॅज युज्वल जोकर!
पुष्कर पण उगीच सिंपथी मिळवायला डाळी निवडून थकल्याची अ‍ॅक्टिंग करत होता. तो आणि सई दोघांना कुणाचे तरी अप्रूवल घेण्याची गरज भासत होती. त्यामुळे पडायची वेळ आली तरी पुष्की रेशम ताई ला विचारायला गेला . सईचे ही तेच! मला स्मिताचे फार हसू आले ती पुष्कीला "स्स्स्सू " असा आवाज करून प्रवोक करत होती त्याचं Lol आस्ताद ला पण टोमणे मारून घेतले तिने Happy
सुकन्याच्या करवी तिला निरोप पाठवला की स्टॅंड घे म्हणून.... परत वरुन रेशम आणि तिच्या मुलीबरोबरचा एक किस्सा सांगून रेशमचे संस्कार किती चांगले वगैरे >>> याला +१११

म्हणजे असतील तिचे संस्कार चांगले पण ते तिच्यासाठी केलेले कॅंपेनिंग वाटले!>>> अगदि अगदि.. मलाहि असच वाटलं काल.. तिच्या चांगुलपणाची बिबॉ जाहिरात करतोय असं..
मेघा अन शर्मिष्ठा अन थोडा नंकि छान खेळले.

काल स्मिता ला बिचारीला chance च दिला नाही रेशम ने. तिला बिचारीला पुढे टास्क करायचे होते,पण रेशम ने लगेच give up केला,एवढी साडी make up फुकट गेला स्मिता चा. मेघाचे जावयला टोमणे अगदी प्रोवोकिन्ग होते.ते पुष्कर ला सु सु आधी सुकन्याने चालू केल,मग स्मिता ने री ओढली . भारी होतं ते ,कोणत्याही वयाच्या मानवाला लागू हा फंडा .सै ला quit करायच होतं तेव्हा अगदी पोटात दुखतय n all आणि उम्बरठा ओलंडताना अगदी dialogue and फुल ऐक्टिंग नौटंकी करताना बरि होती की.तेव्हा सुकन्या मोने बोलल्या की आता कसा जोर आला . मेघा शिवाय सै एकदम फीकी पडलीय. सै चे परवाचे gas प्रकरण फारच गाजतय सोमी वर, म्हणे एक पुस्की फुस्की अणि एक ढुस्कि याना बाहेर काढा

आजच्या सासवा सुनांना बाथरुम ब्रेक्स का देत नव्हत्या Proud
नंकि आणि मेघा थोडे एंटरटेनिंग होते पण सारखी टॉर्चर टास्क का देतात ? मर्डर मिस्टरी सारखी टास्क पुन्हा नाहीच आली !
सईला उषा ताई शाप देऊन गेल्या बहुतेक, पोट धरून बसलीये वाकडी तोंडं करत !
रेशम सगळ्यात सुस्तं , कंटाळलेली, कराकरा डोकं खजावणारी, नखं खाणारी,कान टोकरणारी, सगळ्यात हॉरिबल ड्रेसिंग करणारी, नॅशनल टेलिव्हिजन वर असल्याचं भान नाही, ना मेकप /ना हेअर कलर टचप, आजागळ नं.१ !
परवा वीकेंड का डाव ला तर ७२ वर्षाच्या आउंपेक्षा एजेड बायकांची साडी आणि भयंकर ज्वलरी घातली होती.
आता रेशम अशी दिसतेय ऑडियन्सला म्ह्संटल्यावर कलर्सने पाठवलच सुमोला रेशमच्या इमेज बिल्डींगला, कित्ती प्रयत्नं करतायेत ती सुसह्य दिसावी म्हणून !

सई आणि रेशमच्या मूळ स्वभावात जो माज आहे तो काल ठळक दिसला. दोघींना सून म्हणून अभिनय करताना देखील नम्रपणा दाखवता आला नाही. सासूची विनवणी करून तिचं मन वळवणं वगैरे भानगडच नाही. थेट 'मला जमत नाही, मी क्विट करते' Uhoh आस्त्या तर किती चिडका आहे. दाण्णकन खुर्ची आपटली. स्मिताने मजा आणली काल. अ‍ॅक्च्युअली ती वन लायनर्स मारत असते नेहेमी, अनेक मिस होतात, पण एखादा सॉलिड बसतो Happy

त्यातल्या कुठल्या सासूने “सूनबाई तुझे हिरे माझ्याकडे दे बघु लॉकर मधे ठेवायला “ नाही ऑर्डर दिली Proud
बाकी आज मी आउला मिस केलं, खाष्ट सासु म्हणजे त्यांचा फॉर्टेच, बेस्ट केला असता त्यांनी हा टास्क !

येस्स. मलाही आउच आठवल्या.
आउ असताना का नाही हा टास्क आला? अस वाटायला लागले.

आउ आणि नन्दकिशोरच्याही करड्या आवाजात जरब आहे, त्यामुळे त्यान्ना शोभतात असे टास्क.

सगळेच लोक एकूण कंटाळल्यासारखे वाटतात. कुणीकडून एकदा 22 जुलैपर्यंत टिकायचं. बास. एंटरटेनमेंट वगैरे काही दिसतच नाही. बोअर करतात नुसते.

चॅनल ला रेशम आवडते किम्वा तिच्याबद्दल सॉफ्टकॉर्नर आहे हे वाचायला बरोबर नाही वाटत. मला नाही वाटत चॅनल असं काही करू शकतं. हा एक इंटरनॅशनल रिअ‍ॅलिटी शो आहे. हिंदी बघताना आपण नाही असं बोलत, पण मराठी बघताना का? Uhoh

रेशम जुनी आहे इंड्स्ट्रीमध्ये त्यामुळे सर्वजण तिला ओळखतात म्हणून जास्ती बोलणं, कौतुक होत असेल

ते तिच्यासाठी केलेले कॅंपेनिंग वाटले +१ .. मेघापुढे ती फिकी पडत असल्याने तिचा चांगुलपणा अधोरेखित करण्यासाठी खुद्द बिग बॉसच धडपडतायत.
मेघा-सै-पुष्करच्या वादामुळे तिघांची मतं विभागली गेलीयेत..त्याचा फायदा खरतर रेशमला व्हायला हवा..पण रेशम सारखी लोळत पडते.. टास्क खेळण्यासाठी कधी उत्साहित नसते.. मग कुठल्या बेसिस वर हिला मत मिळणार..त्यामुळे बिग बॉस्लाच तिचं कॅपेनिंग करावं लागतय.

>>मला नाही वाटत चॅनल असं काही करू शकतं.

ते नक्कीच करु शकतात.... पण कुण्या व्यक्तीपेक्षा कार्यक्रमाचा टीआरपी त्यांच्यासाठी जास्त महत्वाचा असायला हवा.... जास्त टीआरपी खेचणाऱ्या स्पर्धकाला ते वाचवत फिनालेपर्यंत नेउ शकत असावेत निदान तसा प्रयत्न तरी करत असावेत..... पण रेशमच्या बाबतीत ती ही शक्यता नाहीये...... ती फारसा कंटेंटही देत नाहीये.... मग हे अगदी जाणवण्यासारखे प्रयत्न का होताहेत चॅनेलकडून?

आत येणारे पाहुणे चॅनेलच्या गाईडलाइन विना असे काही इमेज बिल्डींगवाले स्टेटमेंट परस्पर करु शकतील असे मला वाटत नाही!

जो कुणी येतो तो रेशमचं कौतुक करतो, नक्की कुठून बघून येतात हे लोक? चॅनलच सांगत असेल त्यांना हे पटते. > >
+१००००
अगदे अगदी, आरती सोळंकी फेसबूक लाईव्ह वर किती शिव्या घालत होती रेशमला , ती आउंच्या अंगावर ओरडली होती म्हणुन. तीच आरती जेव्हा भेटायला आली होती सगळ्यांना, तेव्हा कीती कौतूक करत होती रेशमचे . अगदी डोळ्यात पाणी आणुन तिला तू छान खेळते आहेस वगेरे सांगत होती !!! तेव्हाच कळले, चॅनेलनीच तिला संगितले असणार काय बोलायचे ते.

स्मिताला काल जावई शब्दच आठवत नव्हता काल. तुमचे ते हे म्हणाली, ते खूप फनी होतं.>>>आणि वर हाईट म्हणजे महान नंदू दादा बोलले सर्व्हन्ट का म्हणून Happy Happy Happy

>>जो कुणी येतो तो रेशमचं कौतुक कर
>>ते नक्कीच करु शकतात...

ही सगळी रेशम गँग ची काँस्पिरसी आहे.. ! बिचार्‍या मेघा गँग ला त्रास देण्यासाठी.
सॉरी: बिचार्‍या मेघा गँग ला त्रास देण्यासाठी. Proud

बाकी काहीही असो, ही रेशम खर्‍या आयुष्यात चांगली असणार आहे माणुस म्हणून. मागे, पुष्कर सुद्धा म्हणत होता, तू तिला बाहेर येऊन भेट, शी इज अ स्वीटहार्ट..
ती आळशी आहे, ढ आहे, थोडी जळकी पण आहे पण चिटर नाही, शक्यतो चीटींग करत नाही ती.

रच्याकने, कुणाला स्मिता फ्रेंड्समधल्या फिबीप्रमाणे वाटते का? मला वाटतं फिब्ज जशी स्वतःच्या विश्वात मग्न असते तशीच स्मिता पण आहे. सई स्वार्थी रेचेल, मेघा वर्कोहोलिक मोनिका, चँडलर, जोई आणि रॉस मात्र कुणी नाहीत..

परवा स्मिताताई अन्गाईगीतावर contemporary dance कसा करावा ह्याचे प्रात्याक्षिक देत होत्या. Lol

मेघा-शरा सासू म्हणून बेस्ट. मेघासारखी सतत बडबड करणारी सासू असेल तर जावई/सून एका दिवसात पळून जाईलच.

काल सई किती नाटके करत होती टास्कमध्ये! Uhoh सई Toilet ला जायला निघाली तेव्हा शरा तिच्यामागे 'आधी भान्डी घास' म्हणत धावत आली होती. त्यानन्तर काय झाले ते दाखवलेच नाही.

सईने ग्लास फोडला असावा मुद्दामहून. ग्लास चुकून पडला अस दाखवत होती.

बादवे, ती पाल खोटी होती की खरी? Uhoh शरा ती पाल खोटी आहे अस काय तरी बडबडत होती.

नन्दकिशोरला ममा नक्कीच ओरडतील साखर वाया घालवली म्हणून. त्यादिवशी तोच मेघाला म्हणत होता की पीठ वाया घालवून तुम्ही गरीबान्च एक वेळच अन्न हिरावून घेता म्हणून.

आज आतिशा नाईक आणि अमृताचे भान्डण होणारे बहुतेक.

स्मिताला काल जावई शब्दच आठवत नव्हता काल. तुमचे ते हे म्हणाली, ते खूप फनी होतं.>>>आणि वर हाईट म्हणजे महान नंदू दादा बोलले सर्व्हन्ट का म्हणून >>>> Rofl

मला तर असं वाटतंय की चॅनेल ने ठरवून च टाकलंय की रेशम च बिग बॉस होणार. मेघा खोटं खूप बोलते.
रेशम मेघाइतकं खोटं नाही बोलत.....इथली लोकं रेशम किती घाणेरडी आहे हे लिहिण्यात च धन्यता मानत आहेत.....
बाकी लोकं ही आहेत की, ( चांगली )जशी स्मिता....ती कन्फ्युज असली तरी टास्क मस्त खेळते याला महत्व नसावं बहुदा... सई फार इनसिक्युअर झालेली आहे आणि म्हणून कदाचित ती अशी वागतेय. पुष्की इथल्या लोकांच्या मते नालायक असला तरी तो गेम खेळतोय आणि त्याला पुढे जायचं आहे त्या दृष्टीने खेळतोय. नंदकिशोर ला बहुतेक कळलंय की मी काही शेवटपर्यंत टिकणार नाहीय. सो तो जे पुढ्यात येतंय ते चालवून घेतोय....
मला फक्त एक विनंती करावी वाटतेय की कोणाला पण इतक्या घाणेरड्या कमेंट्स मारून हिणवू नका. यात आपले च विचार उघडे पडतात... मी ही विनंती केलीय...नाही आवडली किंवा इथे तसं केलेलं चालत नसेल तर फाट्यावर मारा

Sadhhya bore hotay.. pahila marathi season mhanun he karu ka te karu.. he pan takun baghu te pan takun baghu karat experiments madhe bb sampat aala.. bb ne kadhi khup majja aanali naahee.. apalyala saway zaliy mhanun nahitar baryapaiki sagale boring aahet..
Kaahee contestants na pathishi ghalanyamule bb jast bore zaal.. lokana laagech kalun yete.. hindi bb madhe khudd bb ch asa wagatana nahi baghitale

Pages