बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सासरे कधीच सुनेला जाच करत नाहीत, पुष्करने कसं प्रेमाने वागवायला हवं होतं बरं सुनेला >>> Lol . त्याला काल खूप छळले तर आज तो बदला घेणार स्वाभाविक होतं. मला ते म्हणायचं नाहीये पण उलटी करू न देणं आणि toilet ला जाऊ न देणे दोन्ही फिजिकली incorrect वाटलं एवढंचं. ती दोघांची गेम policy होती. प्रेक्षक म्हणून मी लिहिलं की नाही पटले बास एवढंच.

पण उलटी करू न देणं आणि toilet ला जाऊ न देणे दोन्ही फिजिकली incorrect वाटलं एवढंचं. ती दोघांची गेम policy होती. प्रेक्षक म्हणून मी लिहिलं की नाही पटले बास.
<<+१
हे डिक्टेटर टास्कला एकवेळ ठिक होतं पण सासु/सासरा जाच म्हणून बाथरुमला न जाउ देणे प्रकार काही पटला नाही, हे काही बालविवाहातले सुन-जावई नव्हते, अ‍ॅडल्ट आहेत सगळे तिशी क्रॉस केलेले एक्स्पिरिअन्सड संसारी लोकं आहेत, बाथरुमला जायला परमिशनची गरज नव्हती.

सासू सारख्या थिकिंगने कोणी फार विचार नाही असं दिसतय, काहीही टास्क आलं तरी सगळ्यांची गाडी टॉर्चर-सरेंडर प्रकारात शिरते, थीम रिलेटेड काहीच नाही.
पुष्करला किंवा आस्तादला सोवळं नेसून स्वयंपाक करायला लावयला हवा होता १० लोकांचा, पुरणपोळी पंचपक्वन्न , पोळीभाजी टाइप, नक्की क्विट केलं असतं यापेक्षा लवकर , एखाद्या नास्तिक स्पर्धकाला दिवसरात्र पूजापाठ मंत्रपठण करणारी , स्तोत्रं म्हणणारी सूनबाई बनवायच, ज्याल्स स्तोत्रं पाठ नाही त्यांनी गिव्हपच केलं असतं !
पण इथे पक्षी मोजणे काय, पाणी/ताक्/दूध भलतच काहीतरी, खेळणी टास्क मधेही काहीच थीमशी संबंध नव्हता, इथेही तेच !
उषा नाडकर्णींची आयकॉनिक सासु या टास्कला हवी होती. >>> मस्त पोस्ट डीजे. मस्त झाला असता गेम असं काही सुचलं असते कोणाला तर.

ते डाळ तांदूळ वेगळे करायला लावणे मेघाने पुष्करला किंवा मेघाला मौनव्रत धारण करायला लावणे हे आवडलं मला.

आज नुसती वचवच चालली होती. कोणत्या सासवा अशी कामं देतात. काय तर म्हणे दूध पिऊन उल्टी नका करू , पक्षी/प्राणी मोजा ,टंग ट्विस्टर अगदी काहीही.. कालची टास्क्स बरी कि मग... आस्ताद भलतं डोकं लावतॊ, बेसिक टास्क तर समजावून घे रे बाबा.

उषा नाडकर्णींची आयकॉनिक सासु या टास्कला हवी होती.>>> हो ना.. विहिरीऐवजी स्विमिंग पूल पण होता सुनेला ढकलून द्यायला

आस्ताद अणि पुष्कर काय वेडे आहेत काय, रात्री ठरवल त्यानी की मेघा ला दुध आणि पाणी मिक्स करून द्यायच .याची त्याना पूर्ण कल्पना होती की पाणी दुध एकत्र पिल की उलटी किवा loose motion हौ शकतात .अस आरोग्य धोक्यात आणणारया गोष्टी कशा करु शकतात?यावर परवा बोलले पहिजेत ममा

Same thing happened with sharmistha . She is having allergy of cardamom n stupid sai asked her to drink tea with cardamom.

आता मंडळी आपले रंग दाखवायला लागली आहेत. मे-स रात्ररात्र फक्त प्लॅनिंग करत बसतात असं म्हणणारे रे-आ काल तेच करताना दिसले. जरा शांत होतोय म्हणे पर्यंत रे-आ परत काल हायपर झाले. स-पु आता मे च्या पूर्ण विरोधातच गेल्यासारखे दिसले. स-पु च्या शिवाय मे दोन दिवस जरा गोंधळलेली दिसली. धान्य निवडणे, पाणी भरणे हे सासू दिऊ शकेल अश्या प्रकारचे टास्क तरी होते, पण पक्षी-प्राणी मोजणे (त्यावर स्मि म्हणते मांजर पण मोजू का Happy ) , दूध पिणे वगैरे वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे सासू संबधित काही वाटलं नाही.
बाथरुम ला जाऊ न देणे आणि उलटी करु न देणे दोन्ही सम प्रमाणात विक्षिप्त होतं !
रच्याकने, ट्विटरवर हे रत्न दिसलं. वूट अ‍ॅप नसल्याने पडताळून पाहता आलं नाही..
Untitled_0.jpg

पुश्कर कय डोक्यावर पडला आहे काय, म्हणे मला विचरुन उलटी करायची,मेघा ने शेवटी तर खुर्ची बसल्या जागिच उलटी केली. आणि ही सै मैत्रीण म्हणवते ,मेघा उलट्या करताना पण तावा तावाने भांडत होती, का मेघाने patch up केल???

कालचा आणि परवाचा एपि पाहिला नाही, त्यामुळे नो कमेंट्स. पण एकंदरीतच जे मत आहे ते सांगते. Happy

यावर परवा बोलले पहिजेत ममा>>>
म मां पेक्षाही बिग बॉस नेच हस्तक्षेप करायला पाहिजे खरं तर चुकीच्या गोष्टी घडत असताना. पण या कार्यक्रमात बि बॉ गप्पच बसतात. जो गोंधळ चालू आहे तो चालू देतात आणि मग सो मि वर आरडाओरडा झाला की शनिवारी म मां येऊन त्यानुसार बडबड करतात. म मां तर सोडाच खुद्द बि बॉ तरी बिग बॉसचे एपिसोडस् पाहतात की नाही कोणास ठावूक !!!

खुद्द बि बॉ तरी बिग बॉसचे एपिसोडस् पाहतात की नाही कोणास ठावूक !!!>> Lol पॉइंट आहे! ते टास्क देऊन आराम करत असतील किंवा पुढच्या स्टॅटर्जीज Wink ठरवत असतील. मधल्या काळात हे स्पर्धक भांडतात, मारामा-या करतात, ओरडतात वगैरे वगैरे. मग बिबॉ येतात आणि म्हणतात, ’ए असं नाही हं कराय्चं’.

आस्तादची तर कीवच यायला लागलीये. मूर्खांच्या नंदनवनात हा एकटाच राहतो स्वत:ला लय भारी समजत!

काय मुर्ख टास्क होता गेले दोन दिवस..सासु सुन छळ नाही...हा तर हिटलर चाच टास्क पुढे चालु असल्यासारखं वाटलं..
डाळ तांदुळ एकत्र करुन निवडुन घेणे, घर झाडुन घेणे या जरातरी सासु टास्क वाटत होत्या..बाकी सगळा मुर्खपण वाटला...
शु ला जाउ न देणे किंवा सतत दुध, पाणी प्यायला लावणे हे सगळ्यात भयानक होतं....कसली मेंटॅलिटी आहे या लोकांची...

पुष्कर ने मेघा च्या विरुद्ध सगळा राग बाहेर काढला काल...आणि ईतके दिवस स्त्री दाक्षिण्याच्या गप्पा मारणारा माणुस काल एका बाईची तब्बेत बिघडेल असे टास्क देत होता...आता कुठे गेलं याचं स्त्री दाक्षिण्य..स्त्रीयांचा आदर वगैरे सगळा ड्रामा आहे..
मेघा चुकली हे मान्य सतत पाणी प्यायला लावुन पण निदान प्रेमाने गुपचुप त्याला समजावत तरी होती की प्लीज टास्क सोड...तुझंचं रेकॉर्ड चांगलं आहे अत्तापर्यंत...तु होशील कॅप्टन वगैरे वगैरे....पण पुष्की सरळ मेघा वर डाफरत होता की मला अ‍ॅटीट्युड नको देउन न ऑल...
वर कहर म्हणजे मेघा ला मुद्दाम दुध प्यायला कचर्या च्या शेजारी बसवलं का तर म्हणे ईथे उलटी करणं सोपं आहे...आणि मुद्दाम तो कचर्याचं झाकण पण उघडत होता वासाने लगेच उलटी व्हावी म्हणुन....मेघा १ चुकली असेल पण पुष्कर १० चुकला....

आस्ताद काळे स्वतः जोरजोरात ओरडतो आणि समोरच्याला आवाज खाली असं सांगतो...काय समजतो हा माणुस स्वतः ला....त्याच्या सो कॉल्ड सुपीक डोक्यातुन अतिशयच महान कल्पना आल्या होत्या काल..आणी त्या अतिशय फालतु न बोअर होत्या...ममां नी सुचना देउन सुद्धा स्वतः बीबॉ असल्यासारखे रुल चेंज करत होता काल...मेघानी उलटी केली म्हणुन पुष्कर ला हिरा चालतो..पण एकच लाईन १० वेळा नीट म्हटली म्हणून शर्मिष्ठा ला आणी त्रास होत असुनही दुध पिलं म्हणुन मेघाला हिरा का नाही....नेमकं मेघा टीम ला भाग्यश्री सारखी एकदम मऊ कअ‍ॅपटन वाट्याला आली..आतीशा कडुन किल्ली काढुन घेउच शकली नाही भाग्यश्री अजिबात..तिथे एखादी खमकी हवी होती..

बाकी पुढच्या सिझन मद्धे अतिशा ची एन्ट्री पक्की आहे...बिबॉ साठी अगदी योग्य उमेदवार आहे ती Happy

स्मिता ला रेशम ने हिरवा मसाला वाटायला लावला होता ना प्रोमो मद्धे...ते काल कुठे दाखवलच नाही...एडीटींग फार गंडतय यांचं

तब्येतीवर वाईट परिणाम करणारे टास्क चालू असताना आपल्याला कितपत झेपेल हे प्रत्येकाने ठरवायला हवं. पुष्करने पण जितका वेळ थांबवता आलं तितका वेळ थांबलाच की. नाहीच जमलं तेव्हा गेला. मेघाने पण तसंच करायला पाहिजे होतं. बिबाॅ हस्तक्षेप करणार नाहीत हे एव्हाना सिद्ध झालंच आहे. त्याना तर असे राडेच पाहीजे आहेत. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी.
मुळात सु कंट्रोल करता येते, उलटी नाही एवढा काॅमन सेन्स नाही म्हणजे कठीणच.

तब्येतीवर वाईट परिणाम करणारे टास्क चालू असताना आपल्याला कितपत झेपेल हे प्रत्येकाने ठरवायला हवं. पुष्करने पण जितका वेळ थांबवता आलं तितका वेळ थांबलाच की. नाहीच जमलं तेव्हा गेला. मेघाने पण तसंच करायला पाहिजे होतं. बिबाॅ हस्तक्षेप करणार नाहीत हे एव्हाना सिद्ध झालंच आहे. त्याना तर असे राडेच पाहीजे आहेत. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी.
मुळात सु कंट्रोल करता येते, उलटी नाही एवढा काॅमन सेन्स नाही म्हणजे कठीणच. >>> + ११११

पण आजवर मेघा टास्कच्या बाबतीत किती गंभीर आहे ते पाहता, पुश्कर ने मुद्दाम तसे केले असावे , किमान तब्येतीचा विचार करता तिने खेळ सोडावा जसे त्याने काल केले. काल सुरुवात मेघानेच केली होती, मुद्दाम पुश्कर ला उचकावत होती. दोघे कधीकाळचे मित्र . यावर विश्वास बसत नव्हता .
या बाबतीत रे, आ खुप छान . किमान अजुन तरी एकत्र आहेत.

आस्तादची बाजु घेत नाही पण शरा खुपच लाऊड आहे, मेघापेक्षाही. बापरे, ईतके लाऊड बोलणारे अन सतत बोलणारे सहन करणे हेच मुळात एक अचिव्हमेंट आहे, तेही इतके दिवस

पुष्कर अत्यंत डोक्यात जातोय, मेघाला समजलयं तो कसाय ते. अत्यंत वाईट मेंट्यालिटी. मेघा टास्क मध्ये कुठल्याही टिममध्ये असो, सगले फुल प्लैनिंग करतात तिला जास्तीत जास्त छलण्याचं.
सासू सून टास्क मध्ये थकवणारे house wife टाईप्स खूप कामे देण्यासारखे होते. उदा. सगले घर झाडून घेणे. पोछा मारणे, टौयलेट्स साफ करणे, बेडशिट्स बैंकेट्स धुणे, मोठी रांगोली काढणे. हे पी अन् ते पी करण्यापेक्षा.

हे टास्क 'सासू-सून' पेक्षा 'डिक्टेटर-दि हुकुमशहा reloaded' वाटलं. सासू आणि सूना अशा वागत असतील? असे नखरे करत राहील्या तर घरातली कामं कोण करेल? Proud
टास्क खूप छान होता. क्रिएटीव्हीटी दाखवायला फुल्ल स्कोप होता पण मग revenge कोण घेणार ना...नुसता किंचाळत फिरायला नाही मिळालं तर दिवस फुकट जातो इथे असं दिसतंय. Uhoh

.पुष्कर अत्यंत डोक्यात जातोय, मेघाला समजलयं तो कसाय ते. अत्यंत वाईट मेंट्यालिटी. मेघा टास्क मध्ये कुठल्याही टिममध्ये असो, सगले फुल प्लैनिंग करतात तिला जास्तीत जास्त छलण्याचं.
सासू सून टास्क मध्ये थकवणारे house wife टाईप्स खूप कामे देण्यासारखे होते. उदा. सगले घर झाडून घेणे. पोछा मारणे, टौयलेट्स साफ करणे, बेडशिट्स बैंकेट्स धुणे, मोठी रांगोली काढणे. हे पी अन् ते पी करण्यापेक्षा. ++१११

आस्ताद पुन्हा माफिया मोड मधे , त्याचे स्वतःचे रुल्स , डोळे मोठे करणे आणि मागून बडबड त्याचा टास्क चालुही नसताना.
अतिशाबाई येताच पार्शल होऊन हिरे वाटप मोड मधेच आली कोणीही कसलेही हिरे मागत होते तिला आणि ती वटारलेले डोळे गरागरा फिरवत देत होती हिरे .
पुष्करने स्वतःच डोकं अजिबात वापरल नाही, तिने काल त्याला पाणी दिलं ,यानी पण आज पाण्यात दूध दिलं जे आस्तादने त्याला सांगितलं , स्वतःची क्रिएटीव्हिटी काहीच नाही.
बाकी आज जर घरगुती कामं अ‍ॅडीशनल रुल दिला होता बिग बॉसने मग प्राणी पक्षी मोजणे कस्स्ले टास्क ?
टॉर्चरच्या नादात अ‍ॅलर्जीज टर्गेट करणे फेटल आहे ना ?
जीव जाउ शकतो सिव्हिअर अ‍ॅलर्जीज असतील तर.
बिग बॉसने रुल्स क्लिअर नाही दिले तर पेश्न्ट्सची गर्दी वाढत जाणार आणि जेलमधेही जाईल कोणीतरी.

स्मिता ला रेशम ने हिरवा मसाला वाटायला लावला होता ना प्रोमो मद्धे...ते काल कुठे दाखवलच नाही...एडीटींग फार गंडतय यांचं>> एडिटीग काहि गंडत नाहिय.. असं दाखवलं तर लोकांनाच नाहि का तिखट लागणार Proud सगळं मग रे विरुध्द होईल.
बरं आस्ताद घरात प्राण्यांच्या चित्रातले प्राणी मोजायला सांगत होता.. त्याच्या शाळेत नाहि शिकवलं वाटतं प्राणी, पक्षी, माणसं वेगवेगळे असतात.. घरातले ८ जण हि प्राणी.. अन या प्राण्यांसाठी इतक मोठं बिबॉ चं घर Uhoh

कोणाच्या लक्षात आलंय का... जे किशोर भाऊ पीठ आणि अंडे डोक्यावर ओतणं म्हणजे श्रीमंतीचा माज आणि गरिबांचे एका veleche जेवण वाया गेले... एक ना अनेक गोष्टी सुनावून गेले त्यांनीच एक अख्खा कुल्हड़ bharun साखर astad जावयाला गोळा करायला sangnyasathi किती सहज आणि कोणत्याही गरिबीचा ... आणि गरिबांचा विचार न करता अक्षरशः डायनिंग टेबल खाली फेकली.... त्याबद्दल कोणीच काहीच बोलले नाही... किंबहुना फेकणारा देखील आपण काय बोललो होतो हे विसरूनच गेला असावा... तारीख
28.44 KB 720 720 2018-06-16 15:52

कोणत्याच टास्क मध्ये रे आ ग्रुप ला कोणीही चांगला म्हणत नाही..काल मे राडा करिन म्हणाली तेच जर रे म्हणाली असती तर सगळीकडे बोंबाबोंब झाली असती..

राडा करेन हे नाटक होतं मेघाचं वेळ काढण्यासाठी. पूर्ण एपि बघितला नाही का. रेआ राडा करतातच. रेशम विनर Uhoh कुणी बघितला आहे का तो विडीओ.

रेशमला झुकतं माप दरवेळी मिळत आलंच आहे. ममांच्या वागण्यावरून ही तिला काहीतरी स्पेशल स्टेटस आहे हे देखील उघड होते.

त्यामुळेच मेघाची घोडदौड जोरात सुरू होताच तिची वाढती प्रचंड लोकप्रियता कमी करण्याचे अत्यंत बालिश प्रयत्न सुरू झाले. त्याचवेळी रेशमच्या बाबतीत डॅमेज करेक्शन जोरदार सुरू झालं. सुरूवात हखापासून झाली.

त्यातून गंमत अशी की जिला विनर करायचं आहे तिनं स्वतः आपलं सतत प्रतिमाहनन करण्याचंच मनावर घेतलं.

आता तर येणारे फेक काॅल्सही मेघाचं मोराल डाऊन करणारे असतात. ममांनी आतापर्यंत केवळ एकच क्लिप दाखवली ती ही बरोबर फक्त मेघाच्याविरोधात. हा अतिशय फालतूपणा आहे.

कदाचित आता इतर सगळे सदस्य मेघाविरोधात आहेत तर आपसात वोटिंग करून मेघाला नाॅमिनेट करण्याचा घाटही घातला जाईल.

जर रेशम खरंच विनर झाली तर घरातले राडे काहीच नाहीत असे अभूतपूर्व राडे सोमिवर होतील.

* शर्मिष्ठा खूप मोठ्याने आणि एकसारखी बोलते ते इर्रिटेट होतं Angry कालच्या भागात अस्ताद पेक्षाही तिचा आवाज मोठा होता.
*शर्मिष्ठा उगिचच का इंग्रजी बोलायचा प्रयत्न करते? Uhoh मी कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली टास्क करत नाही हे सांगताना तिला जे काही रडूसदृश कोसळलं होतं ते साफ खोटं वाटलं.
* अस्तादची स्ट्रॅटेजी मला आवडली होती.
*स्मिता कसली गोड आहे.
* सुकन्या आतिषा आणि भाग्यश्री पैकी भाग्यश्री अजिबात आवडली नाही.
* शर्मिष्ठा आणि मेघाने जे केलं तेच पुष्कर आणि सई ने केलं तर बिघडलं कुठे?
* उर्मट मेघा दोन उलट्या केल्या म्हणून २ हिरे मागत होती, मठ्ठ कुठली.
* मला हिरे हवेत नाहीतर मी राडा करीन असं जेव्हा मेघा म्हणाली तेव्हा रेशम म्हणाली कर राडा आम्हाला पहायचं आहे, त्यावर मेघा काही नाही बोलली. हाऊ फनी Proud

मामीच्या प्रत्येक वाक्याला अनुमोदन!
मी थोडे उशीरा बिबॉ पहाय्ला सुरुवात केली. ३८- ३९ एपिसोड झाल्यानन्तर
आतापर्यन्त माझ्या पहाण्यात आलेल्याप्रमाणे, मेघा कितीही मोठ्याने बोलली तरी तिच्या आवाजात तुसडेपणा नसतो, अगदी तोडुन बोलत नाही ती. वाद घालते पण तोन्ड वेडेवाकडे करत नाही ती. 'राडा करेन' हे म्हणतान्ना सुद्धा कपाळात आठी घालुन बोलत नव्हती ती. तसाच पु.च्या आवाजात पण नसतो. (पण आजकाल त्याच्याही आवाजात कोरडेपणा जाणवतो, टास्कच्या वेळेस. )
याउलट सई, रेशम, आस्ताद यान्च्या आवाजात खुन्नस आहे, तुसडेपणा आहे. बदलेकी भावना जाणवते.

अर्थात हेमावैम.

मेघा कितीही मोठ्याने बोलली तरी तिच्या आवाजात तुसडेपणा नसतो, अगदी तोडुन बोलत नाही ती. वाद घालते पण तोन्ड वेडेवाकडे करत नाही ती. 'राडा करेन' हे म्हणतान्ना सुद्धा कपाळात आठी घालुन बोलत नव्हती ती. तसाच पु.च्या आवाजात पण नसतो. (पण आजकाल त्याच्याही आवाजात कोरडेपणा जाणवतो, टास्कच्या वेळेस. )
याउलट सई, रेशम, आस्ताद यान्च्या आवाजात खुन्नस आहे, तुसडेपणा आहे. बदलेकी भावना जाणवते.>>>> माझंही असंच मत आहे. मेघा फक्त बोलत होती की राडा करेन, राडा करेन. समोरच्या लोकांनी मिलीटरी आणायला लावली असती. Biggrin

आ नावाचा प्राणी स्मि शी भांडला वाटतं.
रे नि आ: ब्ला ब्ला ब्ला (९०dB)
Others: ब्ला ब्ला ब्ला (९१dB)
रे नि आ: हळू बोल मी हळू बोलतोय.(७०dB)

Pages