बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही आणि रेशम दोघी बाहेर मैत्रीणी वगैरे असल्या तरी इथे त्यांचे पटेल असे वाटत नाही.... दोघीही डॉमीनंट आहेत..... एका म्यानात दोन तलवारी नाही राहू शकत..... ही सई आणि मेघाच्या ग्रूपला जाऊन मिळाली तर मजा येईल!
कदाचित रेशमचा सिनीअर सिनीअर वाला माज कमी करण्यासाठी हिला आणले असेल!

आणि हिने जर मेघाला आज जाउन जाणीव करुन दिली की तिला बाहेर प्रचंड फॅन फॉलॉइंग आहे तर मग मेघाला अजुन चेव चढेल.... आता जी ती नॉमिनेशनला घाबरतीय, ती तिची भिती निघून जाईल
फिर आयेगा मजा!
तेरा क्या होगा (रे) रेरा?

माझ्या मते ह. खा विल जॉईन पु स मे ग्रुप. ही बाहेरून आलीये. बाहेरच्या मतांची तिला व्यवस्थित जाणीव असावी. तिला जर रारे ग्रुप जॉईन करायचा असेन, तर तिच्यासारखी मूर्ख तीच!!

हर्षदा खानविलकर? अजून एक बाई ? आधीच बायांनी डॉमिनेट केलंय.
तिच्या येण्याने काय बदलणे अपेक्षित आहे?
नळाचा टास्क सईला इजा झाली तेव्हाच बंद करायला हवा होता. शक्तीचा वापर केल्यामुळे बंद केला म्हणे. तसेही टास्कच असा होता की शक्तीचाच वापर होणार हे उघड होते, यात कसल्या युक्त्या करणार होते हे लोक.
चुळा भरणे, फडकी पिळणे बघून किळस येत होती. पाण्याच्या अपव्ययाबद्दल कुणालाच विजेते करणार नाही अशी शिक्षा द्यायला हवी होती.

नळाचा टास्क सईला इजा झाली तेव्हाच बंद करायला हवा होता. शक्तीचा वापर केल्यामुळे बंद केला म्हणे. तसेही टास्कच असा होता की शक्तीचाच वापर होणार हे उघड होते, यात कसल्या युक्त्या करणार होते हे लोक. पाण्याच्या अपव्ययाबद्दल कुणालाच विजेते करणार नाही अशी शिक्षा द्यायला हवी होती.>>>>+१११११११

आक्कासाहेबांचा कलर्स वरचा शो बंद पडला का, त्यांना कसा वेळ. आता रे रा ची टीम अजून strong होणार. का फक्त आस्ताद चा बड्डे करायला आल्यात.

तिला जर रारे ग्रुप जॉईन करायचा असेन, तर तिच्यासारखी मूर्ख तीच!! >> बघु ना काय होते ते. घोडा मैदान जवळच आहे. पण मोस्टली ती आस्ताद, राजेश, रेशम बरोबरच राहिल.
because birds of same feather flock together.

अहो केस त्यांच्याच लोकांनी टाकली असेल किंवा पैसे देऊन टाकवली असेल अजुन न पाहणारे देखिल पाहू लागतील त्यामुळे!

त्यांना बाहेरचे सांगायला अलाउड नसेल नाहीतर त्या रे रा ला कशा शिव्या पडतायेत, आस्तादची इमेज कशी खराब झालीय पब्लिकमध्ये हे सांगू शकतील.

बि बॉ च्या कार्यक्रमात टास्क चे स्क्रिप्ट आणि ग्रहण मालिकेचे स्क्रिप्ट या दोघात जास्त कोण गंडलय याचा एक पोल घेण्यात यावा..

स्टुडंट वकिलासाठी काही जास्तीचा अभ्यासः
१. सई, रूतूजा (ऊदाहरणा दाखल) यांचे बरोबर प्रेमाचे चाळे करणारा एखादा एलिजीबल बॅचलर स्पर्धक दाखवला तरिही कोर्टात केस करता येईल का? का ते 'चालतय की' सदरात मोडेल? Wink
२. सई पुष्कर ची मर्जी नसताना त्याच्याबरोबर ऊगाच खोटे प्रेम दाखवायची नाटके करते आहे (non consensual flirting!) यासाठी कोर्टात केस दाखल करता येईल का?
३. मेघा भरपूर शिव्या देते- मूर्ख, ईडीयट, बेअक्कल, स्टुपीड वगैरे... खेरीज प्रचंड अशुध्द मराठी बोलते... दोन्ही पैकी कुठल्या गोष्टी साठी कोर्टात केस दाखल करता येईल?

योग Lol Rofl

because birds of same feather flock together.<<<<<< हे वाक्य प्रचंड आवडून गेले आहे. कथेत वापरण्यात येईल.
यामागचा इतिहासही फार मोठा आहे.

मला वाटतं राजेश-रेशमला बिग्बॉस कडुन परत एकदा कानपिचक्या मिळतील किंवा त्यांचा चाळ्यांचं भरपुर एडिटिंग होईल. बिग्बॉस हि काल्पनिक सिरियल नसुन एक रियॅलिटी शो आहे प्राइम टाइमला प्रसारीत होणारा. आणि त्यात हे लवबर्ड्स कुठेहि चालु होतात; शिवाय त्यांना "गो गेट ए रुम" सांगायची हि सोय नाहि. असो, बिग्बॉस सब जानता है...

कालच्या पंचिंग बॅगच्या सेगमेंटमध्ये मेघा आणि आउ वेर एंटरटेनिंग. जुईला पंचिंगबॅगच (रिकॉय्ल होउन) नॉकऔट्करते कि काय असं वाटंत होतं... Happy

आणि ते सारखं "तुम्ही कुठेही असलात तरी बिबॉ चं लक्ष आहे" हे का ऐकवत होते? रेराने काहीतरी कुजबूज केली त्याबददल होते का ते?
पाण्याविना एका मग मधल्या पाण्याने २-३ जणांनी चुळा भरणे, बाथरूम मधे एकच अर्धी भरलेली बादली असताना लोकांनी ती बाथरूम "वापरायला" आत जाणे वगैरे तपशील दाखवले नसते तरी चालले असते.
ऋतुजा नळच्या टास्क मधे लांब लांब का रहात होती हे काल लक्षात आले. ती मेघाला सांगत होती की भूषण की सुशांत कोणीतरी तिला धरायला येत होता, मग ती लांबच गेली इ. तिची एकूण मतं बघता जेन्ट्स प्लेयर्स बरोबर कसलीही शारिरीक झटापट किंवा साधा स्पर्ष ही होण्याची शक्यता असल्यास ती लांबच राहणार. ती स्मार्ट आणि केपेबल मुलगी आहे पण तिथे त्या एक से एक नौटंकी आणि पैसे देऊन कॉन्ट्रॅक्ट केल्यास एका बेड वरही झोपणार्‍या लोकांमधे मिसफिट ठरणार आहे हळुहळू. सॅड !

आणि ते सारखं "तुम्ही कुठेही असलात तरी बिबॉ चं लक्ष आहे" हे का ऐकवत होते? रेराने काहीतरी कुजबूज केली त्याबददल होते का ते? >>>>

बिबॉनं एक क्लिप दाखवली ज्यात रेरा एकमेकांशेजारी पहुडले होते आणि एकमेकांच्यात खुणांनी बोलत होते आणि कुजबुजत होते जे घरात अल्लड नाहीये. ती वाॅर्निंग देण्यासाठी ती क्लिप दाखवली. पण अंतस्थ हेतू हा होता की तुम्ही जे काही सर्व चाळे करताय ते सगळे आम्हाला दिसतं.

कालच्य शक्तिप्रदर्शनाच्या टास्कमध्ये भुषण, जुई, ऋतूजा धारातीर्थी पडले.

काल उना म्हणत होत्या की मी माझ्या घरात सुखी होते, उगाच यान्च्यासारख्या लोकान्त येऊन स्वत: च्या डोक्याला त्रास करुन घेतला वै वै. पण त्यान्नाही Big boss सोडायचे नाहीये. का?

ऋतुजाचा पन्चिन्ग दाखवल नाही? व्हीडिओमध्ये दाखवल होत. मेबी आज दाखवतील.

हर्षदा खानविलकर येणार म्हणजे रे रा ग्रुप आणखीनच powerful होणार. Sad

काल पाठीमागून फक्त तिचे लाम्ब केस दाखवले होते, आणि आस्तादला ती आल्यावर आनन्द झाला होता, सो मला वाटल आस्तादची Girlfriend स्वप्नाली पाटिल (ग्रहण ची मन्गल) आली की काय? आणि तेही दोन- दोन सिरियल्स सोडून?

बिबॉनं एक क्लिप दाखवली ज्यात रेरा एकमेकांशेजारी पहुडले होते आणि एकमेकांच्यात खुणांनी बोलत होते आणि कुजबुजत होते जे घरात अल्लड नाहीये. ती वाॅर्निंग देण्यासाठी ती क्लिप दाखवली. पण अंतस्थ हेतू हा होता की तुम्ही जे काही सर्व चाळे करताय ते सगळे आम्हाला दिसतं. >>>+१ मुळात रेराच असे वागायला आता अल्लड राहिले नाहियेत हे बिबॉला सान्गायच होत.

>>स्वप्नाली पाटिल (ग्रहण ची मन्गल) आली की काय? आणि तेही दोन- दोन सिरियल्स सोडून?
शक्य आहे.. तिकडे 'भिरभिरली' असेल आणि वैतागून ईकडे!
बाकी आत्ता या घडीला स्त्री पात्र कशाला आणले बि बॉ ने? थ्रीसम चा विचार आहे की काय? Wink
>>मुळात रेराच असे वागायला आता अल्लड राहिले नाहियेत हे बिबॉला सान्गायच होत.
प्रेमात आकंठ बुडलेत ते... त्यांना आता अल्ल्याड पल्याड काही दिसत नाहीये... अल्लड चं काय घेऊन बसला आहात?

Already एक आऊसाहेब आहेत आत आता या आक्कासाहेब आल्या! >>> या दोघान्ची एकदा जुम्पली पाहिजे एकदा. मज्जा येईल बघायला. Proud

खरच अस होणारे का? हे पहा:

https://www.youtube.com/watch?v=BczyocTI04A

{पैसे देऊन कॉन्ट्रॅक्ट केल्यास एका बेड वरही झोपणार्‍या }
हे लोक अभिनेते आहेत आणि त्यांनी असे सीन्स करणं हा त्यांच्या कामाचा भागच नाही का?

What's the big deal about it?
इथेही camera आहेच. अगदी night vision वाला

सुलू, वरच्या लिंक मधे ऊ ना, ह.खा बद्दल कुठे काय दाखवलय?

ह खा ला तिच्या 'नवरा असा असावा' कार्यक्रमापेक्षा बी.बी. मधली हाणामारी,भांडणं जास्त आवडलेली दिसतात. म्हणून तो प्रो सोडून ईकडे आलीये.ईथेही सगळ्यांना 'कळलं..कळलं? विचारत बसेल..
आणि आपल्या सगळ्यांचे अंदाज मोडून काहीतरी तिसरच, भलतच घडेल.. १-तिची व ऊ नां ची जोडी जमेल Proud ..२-तिचं तिचं एकटीचच काहीतरी चालू राहिली.थत्त्यांसारखं स्वतः वर फोकस ठेवण्याकरता...३- रे रा मेघा सै सगळ्यांना ती एकटी पुरून ऊरेल..
आधीचे सगळे भाग बघून आल्यामुळे तिचा काहीतरी plan तयार असेलच व channel कडूनही सुचना मिळाल्या असतीलच do's and don'ts च्या.

कोण ही ह.खा.? आणि काय विशेष क्रेडेंशियल्स आहेत म्हणे जे बि बॉ साठी ऊपयोगी आहेत?
जाणकारांनी प्रकाश टाकावा..

सुलू, वरच्या लिंक मधे ऊ ना, ह.खा बद्दल कुठे काय दाखवलय? >>> अग तशी मी कल्पना करत होते, म्हणजे समजा अस झाल तर. अजून तस काय झालेल नाहीये.

>>सुलू, वरच्या लिंक मधे ऊ ना, ह.खा बद्दल कुठे काय दाखवलय? >>> अग तशी मी कल्पना करत होते, म्हणजे समजा अस झाल तर. अजून तस काय झालेल नाहीये.
बिग बॉस आदेश देत आहेत की ईथे दिशाभूल करणार्‍या लिंक्स टाकू नयेत Wink

बिग बॉस आदेश देत आहेत की ईथे दिशाभूल करणार्‍या लिंक्स टाकू नयेत

वरची लिन्क बरोबर आहे. त्यात ममा रेराला फाईनली warning देणार आहे अस सान्गितलय. खरच अस होणारे का? हे पहा: हे वाक्य त्याच लिन्कला उद्देशून होत. माझ्या कमेन्टवरुन दिशाभुल झाली असेल. Sorry

Pages