Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिव ठाकरे नको, त्यापेक्षा राज
शिव ठाकरे नको, त्यापेक्षा राज ला आणा .
पुष्करला दोन वोट्स दिली.
पुष्करला दोन वोट्स दिली. कितीही देऊ शकतो बहुतेक. सध्या दोन पुरेत.
कारण त्या bb चं ठरलेलं असणार, रे रा रहाणार. तरी मनात नको राहीला म्हणून दिलं पुष्करला.
बिगबॉस task मध्ये पण रे रा ला
बिगबॉस task मध्ये पण रे रा ला एकत्र ठेवतं, ती टीम सर्व एकत्र राहील हा जास्त प्रयत्न करते.
रेशमला माज किती, danger zone मध्ये जाते सारखी आणि bb वाचवतात असं वाटतं मला तरी, मेघा सई यांना तुच्छ लेखते. बाहेर पब्लिक मागे आहे ह्या दोघींच्या.
पाणी भरण्यात बिबॉनी टीम
पाणी भरण्यात बिबॉनी टीम पाडलेल्या का? मला वाटतं सगळे ओरिजिनल टीम सोबतच खेळत होते.
नेने काकू >>>>>>> या कोण ?
नेने काकू
>>>>>>>
या कोण ?
पाणी भरण्यात बिबॉनी टीम
पाणी भरण्यात बिबॉनी टीम पाडलेल्या का? मला वाटतं सगळे ओरिजिनल टीम सोबतच खेळत होते. >>> हो बिग बॉसने टीम पाडलेल्या.
नेने काकू >>> माधुरी दीक्षित
नेने काकू >>>
माधुरी दीक्षित. तिचा पिक्चर येतोय ना बकेट लिस्ट.
बकेट लिस्ट... असल्या नावाच
बकेट लिस्ट... असल्या नावाच सिनेमा आहे... ?
हो
हो
https://www.loksatta.com/manoranjan-news/ranbir-kapoor-to-make-his-marat...
KHARE AHE..JUI ANI SUSHANTLA
KHARE AHE..JUI ANI SUSHANTLA EKDAMACH HAKALA..
बॉक्सिंगच्या टास्कमध्ये मेघा
बॉक्सिंगच्या टास्कमध्ये मेघा पंचिंग करत असताना मस्त बोलत होती. रेशमकरता तिनं बरोब्बर रेशम नेमकी कशी आहे हे वर्णन करणारी विशेषणं वापरली.
त्याउलट रेशमची इन्सेक्युरिटी दिसून आली. तिनं नेमकं मेघा आणि सईला पंच करताना "तुम्ही माझी कॉम्पिटिशन नाहीच्चाहात" बोलून ती खरंतर नेमक्या या दोघींना घाबरते हे दाखवून दिलं. बाकी कोणाबद्दल नाही ते बोलली असं? तिला या दोघींचीच भिती वाटते आणि सई सुंदर आहे म्हणून पण जळफळाट होतो.
राजेशनं स्मिताचा फोटो पण लावला होता. आतातरी स्मिताचे डोळे उघडतील का? कळलं असेल का तिला तिची त्या गृपमध्ये काय व्हॅल्यु आहे ती?
सुशांत देखिल मेघा सईला उद्देशून तुमची पॉप्युलॅरिटी नाहीये वगैरे काहीतरी बरळला. हा कोण असा सुपरस्टार लागून गेलाय? आणि बिगबॉसनं त्या मुलींनाही तुझ्याबरोबर घरात बोलावलंय म्हणजे तरी काय ते समजून घ्यावं ना?
उना बेस्ट! स्वतःचाच फोटो लावला आणि रेशमनं त्यांचा लावला म्हणून तिचा. पण फोकस त्यांच्या स्वतःच्याच फोटोवर होता. पण एवढं करूनही कोणी त्यांना नॉमिनेट केलं तरी त्यावर त्या वैतागतीलच .
तो सुशांतही तसाच. मला घरी जायचंय, घरच्यांची आठवण येतेय म्हणत गुलाबी नॅपकीनात अश्रू जिरवतो, पण नॉमिनेट झाला तर चेहरा पडला त्याचा.
https://www.voot.com/shows/bigg-boss-marathi-s01/1/596072/remembering-ra...
या क्लिपमध्ये १.२४ ला जुई अॅक्च्युअली च्या ऐवजी अॅचकुली म्हणालीये.
https://www.voot.com/shows/bigg-boss-marathi-s01/1/596072/the-poet-in-aa...
अस्तादची कविता. किती सुरेख लिहिलीये त्यानं आणि म्हटलीये पण फार सुंदर.
नवीन एंट्री : माझ्यामते तो कोणीतरी पुरुष आहे.
अस्तादचा अॅटिट्युड सतत एकच
अस्तादचा अॅटिट्युड सतत एकच :
आपण कसे एकदम भारी आहोत. आपण भारी विचार करून भारी बोलतो, आपण भारी विचार करून भारी वागतो, आपण भारी हुशारीनं भारी विचार करतो .... त्यामुळे आपण कसे एकदम भारी आहोत. आणि आपण असे एकदम भारी असल्याने इतरांना आपण एकदम भारी वाटतो. आणि असं आपल्याला आपण भारी वाट्तोय, इतरांना आपण भारी वाटतोय म्हटल्यावर आपण भारी असणारच ना! तर त्यामुळे आपण भारी आहोत.
लोल मामी...
लोल मामी...
मला व्हूटच्या साईटवर (अॅपवर
मला व्हूटच्या साईटवर (अॅपवर नव्हे) वोट कुठे करायचं ते सापडलं नाही. जरा सांगा प्लीज. ऋतुजाला वोट देणार आहे मी.
सापडलं.
मामी एक वोट माझ्यातर्फे पण.
मामी एक वोट माझ्यातर्फे पण.
मला तरी वाटतंय प्रत्येकाला
मला तरी वाटतंय प्रत्येकाला एकच वोट देता येतंय. पहिल्या वोटला टिकमार्क लाल असतो. नंतरच्या वोटना तो निळा असतो.
पण तरीही मी अनेक वोटं दिली ऋतुजाला. च्रप्स तुमच्यातर्फे त्यातली काही वोट आहेत. सईलाही थोडी दिली.
शक्ति जास्त वापरली जात आहे,
शक्ति जास्त वापरली जात आहे, हे बिग बॉस ने कोणाला उद्देशून म्हटले होते, हे समजले नाही का दादांना
आणि रड्या सुशांत कसला वासकून बोलतो मेघाबरोबर.
इतर वेळेस निरूपा रॉय आणि तिच्याबरोबर बोलताना एकदम अम्रिश पुरी
च्रप्स तुमच्यातर्फे त्यातली
च्रप्स तुमच्यातर्फे त्यातली काही वोट आहेत
>>> धन्यवाद मामी __/\__
सुशांत ला कुणाशी कसं बोलाव अन
सुशांत ला कुणाशी कसं बोलाव अन तेहि कॅमेर्यासमोर याची बिल्कुल तमा नाहि.. कसा तो काल मेघाला हिडिस-फिडिस करुन बोलत होता.. न हि येडी माझा आवडता आहे म्हणुन साईड घेत होती त्याची... त्याला तिच्याबद्दल जराहि आपुलकी नाहिय. मेघाने छान पंचेस दिले छान बोलुन विरुद्ध पार्टीला... नळावरचे भांडण एकदम बकवास टास्क. मला सईची काळजी वाटतेय.. एकतर ती उंच आहे अन कमरेलाच तिला लागलय.
ते तोंडावर बोललेले आहेत
ते तोंडावर बोललेले आहेत त्यांना विचारलेल्या प्रश्नात .>>> रारे बद्दल बोलायला काय तोन्ड शिवल होत वाटत? हिम्मत असति तर राजेश-रेशम बद्दल ही बोलले असते ममा समोर, तिथे बसले साळसुद चेहरा करुन! >> एकतर बिग बॉस च्या कार्यक्रमात त्यांना विचारलं होत . त्या सायकल च्या प्रमोशन वाल्यानी . ममा नि नाही विचारलं नाहीतरी फडकन तोंडावर बोलण्याची हिंमत आहे त्यांच्या कडे. .म्हणून तर ती डबलढोलकी मेघा त्यांना सांगत होती ना काका तुम्ही तोंडावर ताबा ठेवा -तोंडावर ताबा ठेवा आणि स्वतः काय तोंडावर ताबा ठेवत होती ? ते नसताना काय थेरडा आहे आणि जाताना विल मिस यु काका . अरेच्चा
मामी.. आस्तद..भारी..भारी..
मामी.. आस्तद..भारी..भारी..

अॅचकुली ..
तिला या दोघींचीच भिती वाटते.. +१
सांड माणुसकी दाख्वा सांगत होता सई- मेघाला पंच करताना..कोणासाठी? स्वतःसाठी की सई-मेघाला घाबरणार्या त्याच्या म्हशीसाठी?
Voot वर एकावेळी एकालाच वोट
Voot वर एकावेळी एकालाच वोट देता येते. पहिल्या वोटनंतर कितीही वोट दिले तरीही पहिले वोटच ग्राह्य धरले जाणार.
१२. The votes sent after the first vote of any unique user and email ID, shall not be counted and will be considered null and void. Thus, for e.g., a viewer has sent 10 votes per episode, during the Voting Cycle, then the vote casted by the viewer vide his/her user and e-mail id after the 1st vote for that particular episode during that particular Voting Cycle will not be counted and would be considered null and void.
आपण कितीही म्हटले की रे रा
आपण कितीही म्हटले की रे रा जावेत, पण चॅनेल त्यांना हाकलणार नाही.
एकतर त्यांचे हे चाळे चॅनेलने सांगितले म्हणूनच चालू आहेत. ह्या चाळ्यांनी त्यांची इमेज खराब होणार हे त्यांनाही माहित आहे, त्यासाठी त्यांनी चॅनेलकडुन जास्तच पैसे उकळलेले असणार. हे पैसे वसुल होईपर्यंत तरी चॅनेल त्यांना शोमध्ये ठेवणारच.
नविन येणारी बाईच आहे. बहुतेक
नविन येणारी बाईच आहे. बहुतेक तितिक्षा aka सरस्वती असावी बहुतेक. खानविलकर बाई पण असू शकतात
मला असे वाटते मत हे per
मला असे वाटते मत हे per episode देता येते. एक वुट id वापरून एका दिवशी एकावेळी आपण एकच vote करु शकतो . पुढचे votes जरी झाले तरी एकच vote count होनार. Voting cycle सुरु झाल्यानंतर आपण per episode vote करायचे आहे म्हणजे एका voot id वरुन दररोज १ अशी मंगळ ते शुक्रवार ४ मते देता येतील ..
कण्टाळा आला भांडणांचा गेल्या
कण्टाळा आला भांडणांचा गेल्या आठवड्यापासून बंद केले बघणे!
अत्यंत पोरकट टु़कार आणि मुद्दाम घडविल्यासारखे प्रसंग वाटत आहेत!
काय महाभयंकर एपिसोड, पुन्हा
काय महाभयंकर एपिसोड, पुन्हा तेच टास्क, स्पेशली सांड लोकांसाठी.. जिंकला माजोरडा वळु !

तरी मेघा ऋतुजा दोघीच अख्ख्या टिमला भिडल्या, कमाल आहेत या दोघी !
एक तर बिग बॉस स्वतः मारामार्या एन्करेज करतात मग टिम्सना म्हणे हिंसात्मक खेळताय
मुळात ही राजेशची टिम कधी झाली ? तो दादागिरी करतो म्हणून ??
मला नाही आठवत बिग बॉसने आधी कॅप्टन अनाउन्स केल्याचं .
ती जुई बिमारीयो की दुकान फक्त एक्स्क्युझ द्यायला कचरा टाकला कि आजारी.
पाणी टास्क मधे खेचाखेची मारामार्या करताना नो हेल्थ इश्यु.
सईची खरच काळजी वाटतेय, लोअर बॅक इनज्युरी किती वाइट , त्यातून कोण तो कुडमुडा डॉक्टर आला काय माहित, होप ती लवकर बरी होईल.
हे रानरेडे खुशच होणार शक्तीवाली टास्क्स आल्यावर.
बिग बॉसचे नक्की रुल्स काय आहेत ?
ते रेशम राजेश लफड्याला २ अॅडल्ट्स त्यांची मर्जी इ. सारवासारव करा , पण जर बिग बॉसने मेल फिमेल रुम्स वेगळ्या दिल्यायेत , प्रत्येकाला ठराविक बेड असाइन केलाय त्यात एक बाई कशी घुसली पुरुषांच्या रुम मधे ? हे कसं बसतं रुल्समधे ?
पुरुषांना प्रायव्हसी इश्युज नाहीयेत का ?
उद्या हा वळु मुलींच्या बेडरुम मधे घुसेल रुल्स ढिले ठेवले तर.
बिग बॉस फक्त आणि फक्त रेशम राजेशला फेवर करण्यासाठी डिझाइन करतायेत सध्याचे एपिसोड्स.
कठिण आहे असेच एपिसोड्स आले तर, अत्ता पर्यन्त फक्त खुर्चीसम्राट आणि मेघाने त्यांना कचर्याने आंघोळ घालणे धमाल होतं.
व्हेंट आउट मधे मेघा मस्तं बोलली.
मेघाबद्दल मला एकच तक्रार आहे, त्या हात उगारण्याला रडक्या बैलाचा हात सईच्या लाथेखाली तुडवून उखाडण्या ऐवजी ती जुन्या मैत्रीला जागते.
पुष्कर पंच मारतानाही अतिसभ्य भाषेत बोलत होता
आउंनी स्वतःचा फोटो लाऊन गंमतच केली.
>>>कण्टाळा आला भांडणांचा
>>>कण्टाळा आला भांडणांचा गेल्या आठवड्यापासून बंद केले बघणे!
अत्यंत पोरकट टु़कार आणि मुद्दाम घडविल्यासारखे प्रसंग वाटत आहेत!>>>खरंय...मी तर केव्हाच सोडलं बघायचं... लोक वाट्टेल तसे स्वतःचे रुल बनवतायेत, म मां चा पण मान ठेवत नाही...मीच खरा मीच खरा.. म मां ना पण यांची शाळा घेता येत नाही... नीट ग्रुप करता येत नाहीत..टास्क पण मजा नाही...सावळा गोंधळ चाललंय.. अरे काय आहे...
परवा आस्ताद सईला कन्फेशन रुम
परवा आस्ताद सईला कन्फेशन रुम मधे घेवुन जाताना किती छान समजावत होता तीला, आवडले मला त्याचे असे काळजीने वागणे, अन कालही त्याच्यापरीने चांगला खेळला असे वाटले पण तो बैल कसा आवरणार त्याला...
यावेळी तो बैल बाहेर जायलाच हवा, जर बिग्बॉस त्या दोघांना खरेच फेवर करत असेल तर चुकिचेच आहे.
कालचा एपी अर्धाच बघीतलाय पण काल बिबॉने त्या दोघांची एक क्लिप सगळ्यांसमोर दाखविली अन ईथे सगळे दिसते याची त्यांना जाणीव तर करुन दिलीये, सो कदाचीत आता थोडेतरी शिकतील त्यातुन तर बरे
पुरुषांना प्रायव्हसी इश्युज
पुरुषांना प्रायव्हसी इश्युज नाहीयेत का ? >> तु म्ह्टल्यावर मला पण एकदम जाणवलं. खरंच की, कुणिच आवाज कसा नाही उठवला रेशम तिथे असण्याबाबत
बाकी नळाच्या भांडणाचा शेवटचा भाग अतिशय हास्यास्पद होता. भूषण ने तोंडात पाणी घेऊन ड्रमात साठवण्याच्या नावाखाली चुळा भरल्या
आयमिन कोण वापरेल?
प्रामाणिकपणे, तोंडातले, फडक्याने पिळलेले, अनेकांनी हात बुचकळलेले, बुट घातलेले पाय पडलेले पाणी त्यांनी साठवले तर ते दैनंदिन कार्यासाठी वापरणं कसं अपेक्षित आहे?
>>आस्तादचा अॅटिट्युड सतत एकच :
आपण कसे एकदम भारी आहोत. आपण भारी विचार करून भारी बोलतो, आपण भारी विचार करून भारी वागतो, आपण भारी हुशारीनं भारी विचार करतो .... त्यामुळे आपण कसे एकदम भारी आहोत. आणि आपण असे एकदम भारी असल्याने इतरांना आपण एकदम भारी वाटतो. आणि असं आपल्याला आपण भारी वाट्तोय, इतरांना आपण भारी वाटतोय म्हटल्यावर आपण भारी असणारच ना! तर त्यामुळे आपण भारी आहोत.>> पुण्याच्या पाण्यातच काहीतरी घोळ असावा
Pages