बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कब्बडी का नाही ठेवत राव? किंवा स्विमींग ची स्पर्धा? एव्हडं मस्त ग्राऊंड व पूल आहे..
ग्राउंड मस्त आहे पण पूल नाही. ते केवळ एक 'डबके' आहे पाणी साठवलेले.
मुळात त्याला पुरेशी लांबी, रुंदी, खोली नाही. जे ऑलिम्पिक साईझच्या पूलमध्ये पोहतात त्यांना लगेच जाणवेल. शिवाय नीट निरीक्षण केल्यावर जाणवेल की त्यातील पाणी शुद्धीकरणासाठी कोणतीही व्यवस्था नाही. याची कदाचित सर्व स्पर्धकांना कल्पना असावी, त्यामुळे त्यात नियमितरित्या कोणी उतरत नाही. फक्त टास्क खेळण्यासाठीच वापरला जातो तो पूल (खरेतर डबके!)

सई-पुष्कर ला मात्र गाढव-गाढविण आणि वाट्टेल ते बोलत होते.. कसले दुट्टपी आहेत थत्ते >> ते तोंडावर बोललेले आहेत त्यांना विचारलेल्या प्रश्नात . त्यावरूनच पुष्कर रागावलेला होता त्यांच्या वर . उना सारखे नाहीत पाठीमागून याला नाव ठेव आणि त्याला नाव ठेव. जे काय ते तोंडावर .ऊना च फाड फाड बोलणं फक्त थत्तेवर . रेशम समोर म्याव . मेघा पाठीमागे काय थेरडा आहे आणि आणि जाताना काका वि मिस यु . डबल ढोलकी. तोंडावर गोड पाठीमागे थेरडा ?

>>रे महेशला महेश म्हणत होती तर मग काय 'महेश सर' म्हणायला हवं होतं का 'महेश दादा'!
अरे ते माझ्या नंतर लक्षात आले की ती त्याच्याच वयाची किंवा आसपासची असावी आणि एकत्र काम केल्याने मोकळेपणा आलेला असावा!
असेही थत्त्यांनी जाताजाता ती त्यांच्या तारुण्यातली ड्रीमगर्ल होती म्हणून एक कॉंप्लीमेंट कम टोमणा मारलेलाच!

पण समहाउ ते दोघे त्या मांजरेकरांची फारशी काही ठेवत नाहीत याबाबत दुमत नाही!

पहिला धागा न संपताच धागा काढायची कोण घाई! >> Lol
अ‍ॅक्चुली मी नवा धागा फक्त काढून ठेवला होता, जाहीर नव्हतं केलं. त्या योक्याला कुठून बातमी लागली माहिती नाही. मी नवा धागा काढून बाहेर येईतो त्याने जुन्या धाग्यावर ही लिंक दिली होती, मग काय कल्पतरू आले मी पयला, मी पयला करत Rofl
तिथे स्पेस कमी पडू नये म्हणून अंत:स्फुर्तीने काढून ठेवला होता.

अगदीच अवांतर पोस्ट झाली

मेघाचे पंचींग बॅगचे टास्क चालू असताना जुई जी काय हसत होती त्याला केवळ 'छद्मी' हे एकच विशेषण आहे!
कायम आपल रेशमताई, रेशमताई करत मागे मागे फिरत असते!
एक नंबर चमची आहे ती!
आणि तो दुसरा चमचा सुशांत.... तो म्हणे की त्या राजेशने एक पंच मारला तर ती बॅग खाली पडायची!
पक्की साइडहिरोगिरी करत होतो तो!

सुशान्तला कधी हाकलणार ?
मला रा.रे पेक्षा डोक्यात जाणारे म्हणजे रड्या बायकांशी असभ्य वर्तन करणारा सुशान्त आणि (खोट्या)बिमारीयोंकी दुकान, जुई .
जो पर्यन्त राजेश अँड टिमला फेवर करणारी टास्क्स देतील , हे सांड लोक समोरच्याला अनफिट जखमी करून सरळ गेमच्या बाहेर करतील !

आत्ता सहज राजेश चा विकीपेज पाहिला. त्याने सरकार राज मध्ये काम केले होते म्हणून तो पिक्चर सहज पाहीला.

त्याचा त्यात मस्त रोल आहे. अमिताभ, दिलिप प्रभावळकर आणि अभिषेक यांच्यात पण हा उठुन दिसतो. अ‍ॅक्टींग पण चांगली केली आहे.

पंचिंग बॅग भडास काढायला दिली असेल>>>असे आपल्याला वाटते. खरेतर कोण कोणाचा तिरस्कार करतो ते स्पष्ट झाले. आता अजून खुन्नस वाढेल.... मला पंच करत होती/होता काय? बघतेच्/बघतोच याला म्हणून पुढचा राडा जाम रंगणार.

बाई आहे कुणितरी>>>काय? नको...... टफ बायका आहेत इथे..... मे पु स च्या गटाला एक मजबूत गडीची गरज आहे....तरच कार्यात मजा येईल नाहीतर रोजच नळावरची भांडणे होतील.

प्राजक्ता, किती तो उताविळपणा हॅन्डसम बन्दया साठी!>> मग काय तर पान्ढर्या दाढितले, टकले,रडके,गर्दुले चेहरे बघुन कन्टाळा आला कोणितरी एनर्जटिक आणा राव ,
मराठित तसेही हॅन्डसम हन्क कमिच त्यात आहेत तेहि या शोला काय भाव देणारे वाटत नाहित.
ते तोंडावर बोललेले आहेत त्यांना विचारलेल्या प्रश्नात .>>> रारे बद्दल बोलायला काय तोन्ड शिवल होत वाटत? हिम्मत असति तर राजेश-रेशम बद्दल ही बोलले असते ममा समोर, तिथे बसले साळसुद चेहरा करुन!

सायली संजीव Sad अरे देवा Uhoh
आत्ता सहज राजेश चा विकीपेज पाहिला. त्याने सरकार राज मध्ये काम केले होते म्हणून तो पिक्चर सहज पाहीला. >> मर्डर ३ मध्ये पण आहे तो, चांगला रोल आहे त्यात पण.

सुशान्तला कधी हाकलणार ?
मला रा.रे पेक्षा डोक्यात जाणारे म्हणजे रड्या बायकांशी असभ्य वर्तन करणारा सुशान्त आणि (खोट्या)बिमारीयोंकी दुकान, जुई .
नवीन Submitted by दीपांजली >>>>>>>>>>.

(खोट्या)बिमारीयोंकी दुकान, जुई
दीपांजली, एकदम परफेक्ट वर्णन... हासुन हासुन लोळन.... Lol

ती जुई सारख कायमचुर्ण खाल्यासारखा चेहरा का करुन असते कुणास ठाउक..

मी आज नेटवर वाचलं की मराठी बिग बॉस साठी संतोष जुवेकर, ललित प्रभाकर, रोहित राऊत, प्राजक्ता माळी आणि कादिप चा हिरो (कुणी सक्सेना) याना आमंत्रण दिलं होतं पण हे पाच जण नाही म्हणाले म्हणे Uhoh

ट्रेलर पाहिल नाही पण वाइल्ड कार्ड अस मधेच नसावे , आस्तादचा बड्डे आहे ना, त्याची कोणीतरी आई/बहिण असेल !
कधीकधी फॅमिली मेंबर सरप्राइझ व्हिजिट पण असते ना ? ज्यांना अजुन घरून फोन आले नाहीत असे कोणीही असेल , पुष्करची बायको ? राजेशची किंवा भूषणची बायको ?स्मिताची आई/बहिण ?
शो टीआरपी हवा असेल तर राजेशची बायकों आली तर मज्जा येइल Happy

नेने काकू येतील मलाही वाटलं पण ती झी स्टुडीओज निर्मिती आहे , बहुदा कलर्स वर नाही करायचे प्रमोट !
Btw आता बिग बॉस स्केड्युल बदलल का ? सोम् ते शनि म्हणतायेत , म्हणजे रविवारी नाही ?

Pages