Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही मेजॉरीटी पुणेकर नाहीच
आम्ही मेजॉरीटी पुणेकर नाहीच फेस करत ती नळावरची भांडणं प्रकार , बिग बॉसच्या घरातले सुखवस्तु उच्चभृ पुणेकर पुष्की, स्मिता, अस्तादना तर नक्कीच नसेल फेस करायला किंवा पहायला लागलं :), पण समोर नेमके आले लालबाग परळ-गिरगाव -धारावीचे पैलवान
स्मिता तरी फायटर म्हणून निभाव लागला !
असेल त्यांची बाहेर ओळख. इतकी
असेल त्यांची बाहेर ओळख. इतकी वर्षं कामं करतायत. परवा त्या एलिमिनेशन आधी ममां आला तर रेशम जाऊन गळ्यातच पडली त्याच्या. एनीवे, एरव्ही ममां तरी कुठे इतका ऑनरेबल मनुष्य आहे नाही तरी
जुई भयानक कंटाळवाणा सूर लावून तेच तेच बोलत राहते. ममांच उलट तिला चढवत असतात सतत. छुपी रुस्तम आहे वगैरे. कसली छुपी न कसले काय. मागच्या अठवड्यात पण तिला एकटीला १०-१५ मिनिटे बोलायला दिले, म्हणे घे बोल आता काय हवे ते. ती १० मिनिटे ४ तासासारखी वाटली!
डे १ पासून रेशम कशी खेळते
डे १ पासून रेशम कशी खेळते पहाण्या आधीच काही ठिकाणी चर्चा होतेय कि रेशमच जिंकणार कारण आहे कारण म.मा आणि तिची फार जुनी मैत्री आहे म्हणे
अरे ते चॅनेलच्या हातात असत,
अरे ते चॅनेलच्या हातात असत, होस्टच्या नव्हे!
बायदवे, चॅनेलपण अस कुणाला विनर करायचे वगैरे ठरवून ठेवत नसेल..... जो जसा फेमस होईल आणि टीआरपी खेचेल त्याच्याकडे झुकत असेल चॅनेलचे पण माप..... अन्यथा गौतम गुलाटी विनर नसता झाला!
जुई आडमुठी, सतत व्हिक्टिम
जुई आडमुठी, सतत व्हिक्टिम प्ले करायची सवय लागलेली, रारेच्या मांडीवर जाऊन बसल्याने कसलाही स्वाभिमान न राहिलेली मुलगी आहे.
ती आज्ज्जिबातच पटत नाही.
स्मिताला कळलं आहे की रेराचे चाळे लोकांना खुपत असणारेत. स्वतःच्या वागण्याबद्दल सर्टिफिकेट घेण्यासाठी त्याने स्मिताला विचारलं ती म्हणाली की बाहेर लोक तुमच्याबद्दल कसा विचार करत असणार हे माहित नाही. पन परत राजेशने त्याचं टुमणं लावल्याने नेहमीसारखी स्मिताने नांगी टाकली.
बादवे, राजेश शृंगारपुरे कधीपासून एवढा मोठा नट बिट झाला? त्याची कामं तर किती आहेत अशी? ठोकळा आहे एक नंबरचा. त्याच्यापेक्षा भूषण मग किती तरी मोठा अॅक्टर म्हणावा लागेल. भरपूर नाटकं केलीयेत त्याने.
मी तर यातल्या कोणाचच अ
मी तर यातल्या कोणाचच अॅक्चुअल काम पाहिल नाहीये, उ.ना सोडून, रेशमचा एखादा छोटा रोल बाजीगर मधला पाहिलाय, राजेश झेंडा मधला. पुष्करला लहानपणापासून पाहिल आहे, त्याची जर्नी पाहिलीये म्हणून माहितेय , इतर कोणी ऐकूनही माहित नव्हते शो मधले.
भूषण माझा अतिशय आवडता कलाकार
भूषण माझा अतिशय आवडता कलाकार आहे. जबरदस्त टायमिंग असणारा कलाकार. तो जरी जिंकला तरी चालेल. त्याचा एक डाव भटाचा मधला बबन कसला भयानक सॉलिड आहे राव! त्याने श्यामची मम्मीमध्ये पण खुप झकास अॅक्टिंग केली होती.
ती स्मिता बघाव तेंव्हा कुणाला
ती स्मिता बघाव तेंव्हा कुणाला न कुणाला चंपी करत असती!
पंचिंग बॅग चा टास्क कळला नाही
पंचिंग बॅग चा टास्क कळला नाही. त्याने काय होणार? कोणी चांगला केला कोणी वाईट हे कसे कळणार? की यात जिंकणं-हरणं असं काही अपेक्षित नाहीये ? नुस्तंच व्हेंट आउट.
>>आम्ही मेजॉरीटी पुणेकर नाहीच
>>आम्ही मेजॉरीटी पुणेकर नाहीच फेस करत ती नळावरची भांडणं प्रकार ,
जितके सर्व सामाजिक (सोशल) व स्ट्रीट स्मार्ट होण्याचे प्रशीक्षण त्या अनुभवातून घेतले आहे तितके कुठल्याच युनिवर्सिटी मध्ये नाही मिळाले. 

मी सकाळची फास्ट लोकल पकडण्या च्या अनुभवाबद्दल बोलत होतो..
असो.
लहानपणी कोथरूडात मामा कडे जायचो तेव्हा तिकडे बघितली आहेत नळावरची भांडणे.. त्यांच्या जवळच होती एक मोठी वसाहत.. डेक्कन वरून टांगा करायला लागायचा तेव्हा.. पिएम्टी ८६ क्र. फार नंतर आली.. आता पाय ठेवायला जागा नसते.. सगळे सार्वजनिक नळ गायब झालेत
>>सगळे सार्वजनिक नळ गायब
>>सगळे सार्वजनिक नळ गायब झालेत Wink
हो.... नळस्टॉप आला ना मध्ये!
लहानपणी कोथरूडात मामा कडे
लहानपणी कोथरूडात मामा कडे जायचो तेव्हा तिकडे बघितली आहेत नळावरची भांडणे.. >>>:) हो. कोथरुडमधेही एकेकाळी बाहेर नळावर पाणी भरावे लागायचे. एका नंबरला एकच भांडे पाणी भरण्यावरुन आमची भांडणे व्हायची.
>>> अमितव, तुम्ही रे रा टिमचे
>>> अमितव, तुम्ही रे रा टिमचे Fan आहात का?
नाही मी फॅन नाही. ती लोकं लाडात आली की डोक्यात जातात. पण मराठी मध्यमवर्गीय संस्कृतीरक्षक विचार जसे की ह्याच्या बायकोला काय वाटेल आणि त्याच्या पोरीला काय वाटेल असे डोक्यात येत नाहीत. रा परत आला तेव्हा त्याने रे ला जे हग केलं ते मात्र इंटेंन्स असल्याने आवडलं आणि इमोशनल अत्याचार झाला नाही.
मेघा पायात रॉड आहे हे आत्तापर्यंत इतक्यांदा बोलली आहे ... त्याचं अनेकदा भांडवल केलं आहे की ती पाय तुटकी आहे ही फॅक्ट आहे. आणि ती फॅक्ट ती आपल्या फायद्यासाठी वापरते. मला ती आवडत ही नाही सो तुटक्या पायाबद्दल सहानुभूतीने पीसी शब्द वापरावासा वाटत नाही.
>>>पेशंट आऊ >> यात काय वावगं वाटलं? फिजिकल टास्क आहे तर आहे... अगेन हे हळदीकुंकू नाही, की दुसर्याची काळजी करत बसायला अॅडल्ट डे केअर नाही.
काल ऋ ने काहीही केलं नाही सो बिन कामाची.
रे महेशला महेश म्हणत होती तर मग काय 'महेश सर' म्हणायला हवं होतं का 'महेश दादा'!
कठिण आहे!!!
थत्तेगिरी पहिलि बाहेर
थत्तेगिरी पहिलि बाहेर गेल्यावरची, रारे च्या चाळ्यावर म्हणे तो त्यान्चा प्रश्न आहे आणि मी काही त्यात कॉमेन्ट करत नाही , सई-पुष्कर ला मात्र गाढव-गाढविण आणि वाट्टेल ते बोलत होते.. कसले दुट्टपी आहेत थत्ते.मेघाला पाताळयन्त्रि आणी काय काय बोलत होते.
त्या राजेश ला एवढ काय महत्व देतात सगळॅ काही कळतच नाही, १-२ मुव्हित दिसला होता ओ़झरता.
बिग बॉस ने टास्क डिझाइनच असा केला की राजेश टिम जिन्केल... सगळी सुत्र वरुनच हलतायत कलाकाराना काही से आहे कुठे,
बाहुलीचा आणि नळावरचा टास्क दोन्ही बेक्कार! एकतर कलाकारच तेवढे क्रिएटिव्ह नाहित वर अन्फेअर टिम पाडतात.
पहिला धागा न संपताच धागा
पहिला धागा न संपताच धागा काढायची कोण घाई!
योग +१ खरेच लोकल ट्रेन पकडणे हा एक भन्नाट अनुभव आहे (अजुनही)
लोकल ट्रेन पकडणे हा एक भन्नाट
लोकल ट्रेन पकडणे हा एक भन्नाट अनुभव आहे >> भन्नाट आहेच. मला लोकल प्रचंड आवडते. पण रोज सकाळ संध्याकाळ करायचं असेल तर प्लेझंट मात्र अजिबात नाही.
शूSSSSS )
थत्तेगिरी पाहिली. थत्त्यांबद्दलचं मत पार बदललं माझं. मिडिया मिडास गगनभेदी पत्रकार असताना एक वाह्यात माणूस असं होतं, तर ते एकदम मच्युअर निघाले. मेघा पाताळयंत्री आहेच की!
सई पुष्कीला गाढव गाढविण म्हणाले ते मोमेंटला काहीतरी हजरजवाबी बोलायचं टाईप वाटलेलं मला. काउ पण तसंच.
मला पुष्की आणि स्मिता आवडतात. ऋ पण त्यात शिरणारे वाटायला लागलंय. (... उप्प्स्स... हे काय लिहून बसलो!!!
थत्तेगिरी पहिलि बाहेर
थत्तेगिरी पहिलि बाहेर गेल्यावरची, रारे च्या चाळ्यावर म्हणे तो त्यान्चा प्रश्न आहे आणि मी काही त्यात कॉमेन्ट करत नाही , सई-पुष्कर ला मात्र गाढव-गाढविण आणि वाट्टेल ते बोलत होते.. कसले दुट्टपी आहेत थत्ते.मेघाला पाताळयन्त्रि आणी काय काय बोलत होते.>>> महाविचित्र आहेत ते. सिलेक्टिव्ह ओपिनियन बनवण्यात सराईत. काहीतरी मसालेदार बोलल्यामुळे आपण घरात टिकून राहू हा गैरसमज तुटला त्यांचा हे एकदम छान झाले.
कोण निघणार या वीकएंड ला? गेस
कोण निघणार या वीकएंड ला? गेस करा.. ज्याचा गेस बरोबर त्याच्या लेखाला/कथेला 50 प्रतिसाद बक्षीस ☺️
>>>थत्तेगिरी पहिलि बाहेर
>>>थत्तेगिरी पहिलि बाहेर गेल्यावरची, रारे च्या चाळ्यावर म्हणे तो त्यान्चा प्रश्न आहे आणि मी काही त्यात कॉमेन्ट करत नाही , सई-पुष्कर ला मात्र गाढव-गाढविण आणि वाट्टेल ते बोलत होते.. कसले दुट्टपी आहेत थत्ते.मेघाला पाताळयन्त्रि आणी काय काय बोलत होते.>>>--
यावरुन कळते की रा.रे प्रकरण स्क्रिप्टेड आहे.
च्रप्स >> अजून पुढे टास्क
च्रप्स >>
अजून पुढे टास्क होतील त्यात डेंजर झोन मधले लोकं आत बाहेर करतील ना?
सध्या राजेश, रेशम, सई, ऋतुजा, सुशांत आहेत ना? आस्ताद स्थायी सदस्य असेलच ना?
सुशांत जावा.
जुई जावी... महानाटकी आणि जळकी
जुई जावी... महानाटकी आणि जळकी आहे ( सई वर खुपच जळते..)
सई साठी डोळ्यात बदाम...
अशी टास्क देण्यापेक्षा
अशी टास्क देण्यापेक्षा राजेशविरुद्ध कुस्ती खेळायला सांगितले असते तरी चालले असते. हे फक्त शक्ति प्रदर्शन टास्क होते राजेशला वेलकम बॅक करायला.
मेघा ऋुतुजा जपुणच खेळात होत्या. कदाचित दुसर्या दिवसासाठी एनर्जी सेव करत असतील. बाकी पुष्कर is a true gentleman.
अस्ताद्ने नॉमिनेट केल्यावर सुशांत काय रडका झालेला. असे वाटत होते की आता फुटतोय का मग...
रा रे जाणार नाहीत या वेळेस. बिग बॉस ला त्यांचे अजुन माकड करायचे आहे. सुशांत चा नंबर लागतोय बहुदा.
नाही जाणार सुशांत.. मी आणि
नाही जाणार सुशांत.. मी आणि माझे 1500 कॉलेज मित्र त्याला प्रत्येकी 100 वोट करणार आहोत. जुई जावी म्हणून.
तसा वोटिंग चा काही फायदा वाटत
तसा वोटिंग चा काही फायदा वाटत नाही. असेअसते तर रा रे पैकीगेले असते. It's all about TRP.
आणि आस्ताद अनिश्चित काळासाठी नॉमिनेटेड होता ना? त्याचे काय झाले?की मी मिसले काही?
वोटिंग ला अर्थ नसावा असेच
वोटिंग ला अर्थ नसावा असेच वाटते आहे. टिआरपीची गणितं असावीत सगळी. त्यामुळे रे, रा कुठ्ठे जात नाहीत इतक्यात. सई पण नाही. फॉर सम रीझन त्या जुईचाही पुळका दिसत आहे चेनल ला. सो सुशांत किंवा कदाचित ऋतुजाचा नंबर लागू शकतो या आठवड्यात
अन् पुढची टास्क्स असलीच फिजिकल असतील तर चॅनल च्या सोयीने आऊच जातील त्यानंतर.
मैत्रेयी.. 3 वेळा 1 न्यू
मैत्रेयी.. 3 वेळा 1 न्यू प्रतिसाद बघून क्लीक केले, दर वेळेस तुमचाच प्रतिसाद दाखवतोय ☺️
किती संपाडताय
होता है.
आत्ता पुन्हा एडिट करणार होते पण आता नव्या पोस्टीत लिहिते
तर वाइल्ड कार्ड केव्हा अणतात ? शेवटच्या दहात का? तसे असल्यास आउ गेल्यावर मग कदाचित जुई जाईल आणि मग तो खंडेराया किंवा तो रोडीज वाला यापैकी कोणीतरी टोणगा आणतील सई-मेघाच्या ग्रुप मधे जॉइन व्हायला
कोणितरी हॅन्डसम बन्दा आणायला
कोणितरी हॅन्डसम बन्दा आणायला पाहिजे म्हणजे सई ची स्तोरी सुरु होइल, पुश्कर काय दाद देत नाही, तो तसा भिरभिरल्यासारखाच वाटतोय.
कोणितरी हॅन्डसम बन्दा आणायला
कोणितरी हॅन्डसम बन्दा आणायला पाहिजे म्हणजे सई ची स्तोरी सुरु होइल, पुश्कर काय दाद देत नाही, तो तसा भिरभिरल्यासारखाच वाटतोय.
प्राजक्ता तू दोनदा पोस्ट
घ्या! आता प्राजक्ता तू दोनदा एकच पोस्ट टाकलीस!! च्रप्स ना किती वाईट वाटेल याचा काही विचार? !!
Pages