बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो भूषण चपळ आहे. टास्स्क मधे कामाला येतो. त्याला पण कायम त्या सांडाच्या टोळीत घालतात त्यामुळे त्याच प्रभावाखाली असतो. बिबॉ ने टीम्स शफल करायला पाहिजेत. सर्व सतत अनिश्चित पाहिजे, मगच इंडिव्हिजुअल स्किल्स जास्त दिसतील.

BB ने स्वतः ची प्रतिमा सुधारण्यासाठी बिंब प्रतिबिंब task दिला हर्षदाला. रे रा एक नं माजोरडे, त्यांना काही फरक पडत नाही. रे ला तर वाटतंय फायनलला पोचलीच ती. पब्लिक votes देणार नाहीत तिला पण bb फेवर करेल.

हर्षदा मस्त वाचून, अभ्यास करून आलीय. ती रे रा grp जॉईन नाही करणार. टक्कर एका मेघाशीचं आहे हे माहितेय तिला.

म मां च्या आधी तिनेच शाळा घेतली, मस्त वाटलं. जरा इंटरेस्टिंग.

हर्षदा पुण्या-मुंबई मधल्या एखाद्या शाळेतून नाव काढून छोट्या शहरातल्या शाळेत नविन अ‍ॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थिनीसारखी वागतेय.

स्मिताला अजून कळलं नाही कि ती ज्या लोकांनी सपोर्ट करते त्याच लोकांनी ( राजेश, भूषण, आस्ताद) तिला पंच केलं .>>> ही बया सई ने लावलेलं विशेषण सार्थ ठरवतेय दिवसेंदिवस. यावेळी रे, रा, जु किंवा सु (हा नॉमिनेट आहे की नाही माहीत नाही) यांपैकी कोणीतरी जावं अशी अपेक्षा आहे.

पंचिंग बॅग च्या टास्क मध्ये सई ने खूप मार खाल्लाय सर्वांकडून. तिचे फोटोच संपले.
नवीन Submitted by दक्षिणा
>>>>>>>

सर्वांकडून नाही, फक्त रा..रे टिम कडुन... ते तर स्वाभाविकच होत..
तशी पण सई सगळ्याना पुरुन उरेल अशी आहे... Happy

काही का असेना.. सई साठी आपल्या डोळ्यात बदामच आहेत... Wink

>>>स्मिताला अजून कळलं नाही कि ती ज्या लोकांनी सपोर्ट करते त्याच लोकांनी ( राजेश, भूषण, आस्ताद) तिला पंच केलं .---- कळलं पण तिने स्वतःच सांगितलं की तीच्या सांगकामेगिरीचा त्यांनाही राग आला म्हणुन. ति खुप कामे करते ईतरांची.

Thank u अमितव. बघते, छोटे छोटे पार्टस केलेत त्यामुळे हवं तेवढं बघता येईल, हर्षदा शाळा पार्ट बघायचाय.

हिनेच छान शाळा घेतली. आता ममां काय करणार? मागच्या वेळेसारखे यावेळेसही खेळ खेळावे लागतील बहुतेक.

अजून कोणाची शाळा घेतली आणि कशी घेतली ते बघितला नाहीये, पण चॅनलने सोनाराला पाठवलं असेल का कान टोचायला असं तुमच्या सगळ्यांच्या कमेंटस वरून वाटलं. मांजरेकरांनी पीसी, गुड बॉय राहायचं असेल मग हे सव्यापसव्य!

बिग बॉस च्या विरोधात जाम वातावरण आहे, रे रा ला फेवर करतात म्हणून त्यामुळे त्यांनी स्वतः ची प्रतिमा सुधारायचा प्रयत्न केलाय हर्षदा थ्रू.

समहाऊ रे आणी रा असेच उत्तर देतिल अस वाटल, राला निदान थोडफार तरी काही वाटल, रेशम मात्र व्य्वस्थित डेफेन्डच करत होती तिच्या चुका, किबहुना आपण काही चुक केलेय असच तिला वाटत नाहिये.
हर्षदा खमकी वाटली.

इश्क किया है... ती केवळ इश्क केलं म्हणून गेली तर म्हणेल..
हश्र के दिन भी कुछ गुनाह कर लू
मसियत मे कमी सी रेहेती है ||

हर्षदा तिला indirectly बाहेरचं वातावरण सांगायचा प्रयत्न करत होती, तिला लोकांशी काही घेणं देणं नाही हे एरवी ठीक पण पब्लिक votes नकोच आहेत असं वाटतंय एकंदरीत, मग फायनलला पोचणार कशी की bb ने सांगितलं आहे काही होऊदे फायनलला असणार तुम्ही असं. रे रा नी बाहेर पडून काहीही करावं, इथे कशाला बोअर करताय आम्हाला. इथे बऱ्याच प्रेक्षकांना बघवत नाहीये तर अगदी bb ने सांगून फेक करत असतील तरी त्यांची फॅमिली, नातेवाईक तरी कसं घेत असतील. बाहेर पडल्यावर प्रेक्षकांचा संबंध येत नाही, फॅमिली आणि ते बघतील पण बहुसंख्य प्रेक्षक नाराज असताना त्यांनी इथे करू नये. बोअर आणि चीप वाटते. बरं फक्त या दोघांसाठी लोकांनी सोडावं का bb बघणे. एरवी interest असेल तर.


Water storage task :

No one remembered "Chatur kavla" childhood story for water storing task if it was all about measuring the level ??

त्या ह खा ला जीवनाचा कंटाळा आलेला दिसतोय, आल्या आल्या रड्या सुशांतला रडू नको माझी शपथ आहे तुला बोलली.

म्हणूनच बिबॉ सारखे चलाखी, युक्ती वापरा म्हणत असतील.
मला आठवलेली ही कथा, पण इथे विरुद्ध गट पाणीही भरु देईनात आणि थोडे जरी पाणी साठवले कि ओतून, सांडून देत होते. त्यामुळे तसे करायला काही वाव नव्हता.

{त्या ह खा ला जीवनाचा कंटाळा आलेला दिसतोय, आल्या आल्या रड्या सुशांतला रडू नको माझी शपथ आहे तुला बोलली.}
Hahaha.. 1 number

Pages