आलम दुनिया दिशाहीन पळत होती; पण पळूनही फायदा काय? कुठंही गेलं तरी ऑक्सिजन नव्हताच. एका रात्रीतला हा बदल. झाडांनी बंड पुकारलं होतं.सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर बंद केलं होतं त्यांनी प्राणवायु बनवणं. प्रकाशसंश्लेषणाची अशी पद्धत शोधली होती त्यांनी, ज्यात ऑक्सिजन बाहेर पडत नाही.
दोन-तिन तास पुरला कसाबसा प्राणवायु. नंतर सगळेजण गुदमरु लागले; मिळेल त्या वाहनात बसून धावू लागले अज्ञाताकडे. पण प्राण नव्हता कुठंच. माणसं तडफडून मरु लागली. हॉस्पिटल मध्ये होते काही ऑक्सिजन सिलेंडर्स. तेसुद्धा डॉक्टरांनीच पळवले, ज्यांच्यात दम होता त्यांनी डॉक्टरांचा खून करून ते मिळवले.
ती मात्र घाबरली नाही.कारण तो बोलला होता असंच होणार अन ती विश्वास ठेवायची त्याच्या प्रत्येक वाक्यावर. सारा गाव रस्त्याच्या दिशेने पळू लागलेला. तिला मात्र जायचं होतं दुSर- सुर्य उगवतो त्या टेकडीच्या पाठीमागे. तिथेच तर ते भेटायचे. तिथली झाडं साक्ष होती त्यांच्या प्रेमाची. ती जवळ नसली की तो झाडांशी गप्पा मारायचा.
“तू झाडांशी का बोलतो?” तिने एकदा विचारलं होतं.
“कारण ते माझे मित्र आहेत. मला कळते त्यांची भाषा. मीपण त्यांच्यातलाच एक बनणार एक दिवस.” तो स्वप्नाळू डोळ्यांनी सांगायचा.
तिला हे पटायचं, पण लोकांना नाही.वेडा म्हणायचे सगळे त्याला, हसायचे खूप. पण त्याला कुठं होती पर्वा!
विचार करता करता पोहोचली ती टेकडीच्या मागे. सूर्य तापून लाल झाला होता एव्हाना. इथपर्यंत ती कशी पोहोचली हाच मोठा प्रश्न. कदाचित प्रेमामुळे असेल. याच प्रेमापोटी तिने त्याला जायची परवानगी दिली होती. तो बोलला होता,मी येईल तुझ्याजवळ कायमचा. विश्वास ठेव.
याच शब्दांपोटी तिने पिऊन टाकले होते सगळे अश्रू.
“एक दिवस संपेल हे जग पापी माणसांचं. राज्य येईल तेव्हा झाडांचं. तेव्हा तू ये इथेच, या टेकडीमागे. लाल रंगांची फुलं घेऊन उभा असेन मी तुझं स्वागत करायला.”
त्याचं सगळं बोलणं स्पष्ट आठवत होतं तिला; पण श्वासाची लय आता तुटक होऊ लागली होती, उरले होते फक्त काही क्षण. तिने शरीराच्या सगळ्या अणुरेणुंसकट आवाज दिला त्याला. पिसाटल्यागत धावली ती त्याला शोधायला; पण तो नव्हता कुठंच. तो वचन विसरला का? नाही असं कसं होईल? तिला ग्लानी आली, भान हरपू लागलं झपाट्यानं. अखेर ती कोसळलीच. पण अजूनही तिच्या शरीरातला कण अन कण प्राणवायुविना नाही तर त्याच्याविना तडफडत होता.
हळूहळू नजरेसमोरचं सगळं पुसट होत गेलं. जगण्याचं बळ संपलं…पण मरणसुद्धा एवढं सोपं नसतं हुलकावणी देतंच तेसुद्धा एखाद्याला. तिच्या मदतीला वायूंचा राजा आला धावून.नाकातोँडातून घुसून प्रवेश केला शरीरात चैतन्यानं.प्राणवायु दौडू लागला तिच्या नसानसांतून.
तिचे मिटलेले डोळे उघडले.समोर खरोखरच तो उभा होता, लाल रंगांची फुलं घेऊन. तिच मूर्ख होती,त्याला ओळखायला चुकली होती. तो लालज़र्द रंगांची फुलं अंगाखांद्यावर लेऊन जमिनीत आपली भक्कम मु़ळं रोवून उभा होता; आपले फांद्यांचे हात पसरवून तिला बोलावंत होता.
ती विरहिनी वाहत गेली लाटेसारखी. घट्ट बिलगली त्याच्या खोडाला.
आसवांचा पूर वाहू लागला, लाल फुलांच्या वर्षावात तिचा देह न्हाऊ लागला.
----------------------------------------------------------
@vicky8....खाली पाटील ब्लॉग
@vicky8....खाली पाटील ब्लॉग ची लिंक दिली आहे....छान स्टोरीज आहेत...वाचू शकता.
http://www.patilsblog.in/marathi-kadambari-horror-suspense-thriller/
कथा आवडल्याबद्दल सर्वांचे
कथा आवडल्याबद्दल सर्वांचे आभार.
वाचली तेंव्हा नव्हती आवडली .
वाचली तेंव्हा नव्हती आवडली . फँटसीत नक्की काय सांगायचय हेच कळत नव्हते कारण तेंव्हा तो झाड बनतो आणि ती आल्यावर तिला ऑक्सिजन पुरवतो एवढेच समजले होते. तो ऑक्सिजन न बनवायचा संकेत धूडकावून लावतो. यासाठी त्याला शिक्षा मिळेल हा aspect लक्षातच आला नव्हता. तो समजल्यावर फँटसीतली प्रेमकहाणी खूप आवडली.
पण प्राण नव्हता कुठंच. >>> इथे प्राणवायु हवं ना?
धन्यवाद माधवजी
धन्यवाद माधवजी
प्राण आणि प्राणवायु दोन्ही शब्द चालतील. इथे प्राण हा शब्द प्राणवायु शब्दाचे लघुरुप नसून स्वतंत्र शब्द म्हणून वापरला आहे.
"तू माझा जीव की प्राण आहे" याप्रकारच्या वाक्यात प्राण शब्दाला असलेला अर्थ मला अभिप्रेत आहे. ज्या व्यक्तीशिवाय किंवा वस्तूशिवाय आपण जगू शकत नाही ती म्हणजे प्राण. अर्थात हा अलंकारिक अंगाने जाणारा शब्द असल्यामुळे गद्यात विशिष्ट परिस्थितीमध्येच वापरला जातो. वरील कथेत पद्यात्मक अंगाने जाणारी शब्दरचना योजली असल्याने प्राण हा शब्द वापरला आहे.
"तू माझा जीव की प्राण आहे"
"तू माझा जीव की प्राण आहे" याप्रकारच्या वाक्यात प्राण शब्दाला असलेला अर्थ मला अभिप्रेत आहे. >>> बरोबर. पण तो अर्थ फक्त 'ती'ला लागू होईल ना? आणि त्या वाक्यापर्यंत तर कथेत तिची एंट्री झालेलीनाहीये.
बाकी सगळ्यांची तर नुसतीच जगण्यासाठी धडपड चालू आहे. आणि त्या धडपडीच्या वर्णनात प्राणवायु जास्त योग्य वाटला मला. असो, त्याने कथेत काही बाधा नाहीये येत, फक्त डोळ्यांना थोडं खटकलं एवढंच.
तुमची शंका रास्त आहे. पण वरील
तुमची शंका रास्त आहे. पण वरील वाक्य फक्त मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. इथे 'ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी सजीव किंवा निर्जीव गोष्ट' हा अर्थ व्यक्त करायचा होता. प्राण मी तिच्यासाठी वापरला नव्हता.
तरीपण तुमच्या शंकेवर मी अजून विचार करेन
कथा आवडल्याबद्दल सर्वांचे
कथा आवडल्याबद्दल सर्वांचे आभार
कथेचा उद्देश सुंदर असल्यामुळे
कथेचा उद्देश सुंदर असल्यामुळे कथा आवडली.
धन्यवाद mr. Pandit
धन्यवाद mr. Pandit
अप्रतिम
अप्रतिम
Khup chhan, mala aawadte
Khup chhan, mala aawadte tumche likhan... Khup shubhechha vinayji...
धन्यवाद
धन्यवाद
विनयजी, खूप छान कल्पना ! खूप
विनयजी, खूप छान कल्पना ! खूप छान कथा !!
धन्यवाद
धन्यवाद
आवडली.
आवडली.
ही कथा अमेरिकेच्या FantasyFlash या मासिकात ( english version), लखनऊच्या विग्यान कथा त्रैमासीकात (हिंदी), आणि पुण्याच्या प्रभात दीपोत्सव या दिवाळी अंकात छापून आली आहे.>>>> अभिनन्दन
_/\_
_/\_
ही कथा अमेरिकेच्या
ही कथा अमेरिकेच्या FantasyFlash या मासिकात ( english version), लखनऊच्या विग्यान कथा त्रैमासीकात (हिंदी), आणि पुण्याच्या प्रभात दीपोत्सव या दिवाळी अंकात छापून आली आहे.>>>> वा! मस्तच की! अभिनंदन आणि शुभेच्छा!
धन्यवाद
धन्यवाद
Pages