Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालच्या शेवटच्या दोन बॉल मधे
कालच्या शेवटच्या दोन बॉल मधे कोहली चे दोन शॉट्स जे होते ते बघितल्यावर Why he is one of the best who ever played limited cricket हे पटते. कसला रीड होता बॉलर च्या विचारांचा नि clean execution especially after being on ground for almost 50 overs in such a high temp and exhaustion due to running between wickets. Simply class act !
>>Simply class act !
>>Simply class act !
विराट कोहली हे खरेच एक अजब रसायन आहे.. जस जसे त्याच्यातील जिद्द, स्पर्धा, संताप, उन्माद, ऊत्साह.. ई. गुणांना तो योग्य मार्गाने व दिशेने चॅनल करत राहील तस तसे प्रतिस्पर्ध्यांसाठी तो अवघड होणार आहे. गेल्या काही मालिकांमधून खेळी/डाव आकार देण्याचे त्याचे गुण व कौशल्य अक्षरशः सामन्या गणिक बहरत आहे. निव्वळ 'फिटनेस' च्या बळावर कोहली त्याच्या समकालीन व आधीच्या ही अनेक महान विशेषतः भारतीय क्रीकेट खेळाडूंपेक्षा चार पावले पुढे आहे. या गतीने तो सचिन चे सर्व विक्रम येत्या ५ वर्षात मोडेल यात शंका नाही..
https://www.mansworldindia.com/sports/virat-kohli-vs-sachin-tendulkar-st...
हा संघ, कोहली चे नेत्रुत्व, आणि जमेस धोणी चे विकेट किपींग व अनुभव आणि धूर्तपणा हे सर्व बघता पुढील विश्वचषकात भारताला पुन्हा एकदा संधी आहे.. अंतीम सामना ईंग्लंड वि. भारत असा झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
(तूर्तास लंडन मध्ये आहे... पुढील वर्षी असलो तर विश्वचषक सामने नक्कीच थेट बघणार!)
या गतीने तो सचिन चे सर्व
या गतीने तो सचिन चे सर्व विक्रम येत्या ५ वर्षात मोडेल यात शंका नाही.. >>> आमेन. Just imagine how much good cricket is ahead of us if that happens!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> Just imagine how much good
>> Just imagine how much good cricket is ahead of us if that happens! Happy
Certainly.
At the same time very few charismatics cricketers are around at the moment... most of them will retire in next few years! So not sure how much of exciting stuff will get to see... given Pakistan is not playing enough cricket the contest between Bat and swing Bolwing won't be there much..
some interesting stats: Sachin has fugured in Top One day Ranking List only once in 1998..!
https://en.wikipedia.org/wiki/ICC_Player_Rankings#Historical_One-Day_Int...(ODI)_Cricket_Rankings
विराट जबरी खेळलेला दिसतोय.
विराट जबरी खेळलेला दिसतोय. हायलाइट्स बघायला पाहिजेत. २०६ च्या चेस मधे १२९!
सातवी मॅच खेळावी का त्याने? अशा वेळेस फॉर्मात असताना जास्तीत जास्त रन्स काढायच्या, की अशी 'डेड रबर्स' सोडून देउन खर्या मॅचेस करता फिटनेस टिकवायचा असा प्रश्न पडत असेल.
अशी 'डेड रबर्स' सोडून देउन
अशी 'डेड रबर्स' सोडून देउन खर्या मॅचेस करता फिटनेस टिकवायचा असा प्रश्न पडत असेल. .. >> मॅच खेळून तो आपला फिटनेस टिकवत असेल. त्याचे म्हणणे आहे कि आजच्या धकाधकीच्या schedule ला अनुसरूनच तो त्याच्या फिटनेस ची लेव्हल उच्च ठेवायचा प्रयत्न करतो. आता लग्नानंतर भाजी आणणे, वाणसामन आणणे वगैरे करताना किती जमेल हे देवालाच माहित![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण आज भारीच खेळला. आफ्रिका त्याला सारखे शॉर्ट बॉल वर बाद करायचा प्रयत्न करत होते नि तो पुरेपूर अंगाशी आला त्यांच्या.
ठाकूर नवा आगरकर असावा. ४ चांअग्ले, एक ओके नि एक अगदीच फडतूस बॉल टाकतो नि नेमक्या त्या दोन बॉल वर विकेट उचलतोच.
ठाकूर नवा आगरकर असावा. >>>
ठाकूर नवा आगरकर असावा. >>> लोल असाम्या
"ठाकूर नवा आगरकर असावा." -
"ठाकूर नवा आगरकर असावा." -
आता फिल्डींग करताना फाईन लेग बाऊंड्री वरून थेट नॉन-स्ट्राईकर एण्ड ला टप्पा न टाकता थ्रो केला तर 'नेक्स्ट आगरकर' म्हणून लेबल लावून टाकू.
कोहली जबरदस्त खेळला. अक्षरशः हुकमी बाऊंड्रीज मारत होता. रहाणे चा खेळ पहाताना नेहमीच प्रश्न पडतो की हाच का तो बॅट्समन जो इतर वेळी इतक्या स्वस्तात आऊट होतो.
कोहली फारच छान खेळतोय ! बॅटला
कोहली फारच छान खेळतोय ! बॅटला 'बॅकल्लिफ्ट'न घेतां व बॅटला 'फॉलोथ्रु' न देतां तो जे कव्हर-ड्राईव्ह व स्ट्रेट ड्राईव्ह मारतो ते तर अफलातून असतात.!! त्याच्या सफाईदार फलंदाजीला सलाम !!
भारतीय फिरकी गोलंदाज चेंडूला 'फ्लाईट' देण्यास कचरत नाहीत ही पण या दौर्यावरची लक्षणीय बाब !
या दौर्यामुळे द. आफ्रिकेत खेळण्याचा धसका नाहीसा होईल हें नक्की !
"ठाकूर नवा आगरकर असावा."
"ठाकूर नवा आगरकर असावा."
कोहली नवा सचिन तेंडूलकर नि रहाणे नवा द्रवीड?
नवा गांगुली नि नवा व्हि. एस. लक्ष्मण कोण?
भारतीय फिरकी गोलंदाज चेंडूला
भारतीय फिरकी गोलंदाज चेंडूला 'फ्लाईट' देण्यास कचरत नाहीत ही पण या दौर्यावरची लक्षणीय बाब ! >> खरय भाउ. चांगले पदलालित्य असणार्या खेळाडूंसमोर पण हेच बघायला मिळाले कि मजा येईल.
some interesting stats:
some interesting stats: Sachin has fugured in Top One day Ranking List only once in 1998..!
>>
२००३ ला सुद्धा होता ..
रहाणे नवा द्रवीड? छे हो या
रहाणे नवा द्रवीड? छे हो या भिन्तीला खुप भोक आहेत.
या रोहित शर्माचं काय करायचं ?
या रोहित शर्माचं काय करायचं ?
शिरीष कणेकर
http://www.saamana.com/article-on-rohit-sharma/
या रोहित शर्माचं काय करायचं ?
या रोहित शर्माचं काय करायचं ?>>>>
पुन्हा विश्वासाला तडा नाही जाऊ दिला रोहित ने..
<< या रोहित शर्माचं काय
<< या रोहित शर्माचं काय करायचं ? >> जेंव्हां त्याचा खेळ बहरतो , तेंव्हां त्याच्या प्रतिभाविलासाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा; त्याने खेळ कसा सुधारावा किंवा तो तसा कां सुधारत नाही , हे प्रश्न निरर्थक आहेत हें त्यानेच अनेकदां ठासून सिद्ध केलंय !! क्रिकेटची शान असे लहरी खेळाडूही वाढवतच असतात !!!
नेपाळला आंतरराष्ट्रीय
नेपाळला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघ म्हणून मान्यता!!
चला आता लंके बरोबर अजून एक गॅप फिलर संघ मिळाला भारताला!!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. म्याच जिंकली असली तरी रोहित शर्मा चांगला खेळल्याने तो किमान दहा म्याचेस मानगुटीवर बसून भोपळ्याची शेती करणार. त्यापेक्षा हरलो असतो तर बरे झाले असते. त्याला काढून तरी टाकता आले असते. विश्वकपात ऐन मोक्याला लेंड्या टाकणार हा...
रोहीत शर्माचा आफ्रिकेला
रोहीत शर्माचा आफ्रिकेला जाण्यापूर्वीचा गेल्या दिड दोन वर्षातील एकदिवसीय रेकॉर्ड चांगला आहे. कन्सिस्टंट देखील आहे.
बाकी कणेकरांना फार सिरीअसली घ्यायचे नसते. ते साबुदाण्याला फुगवून त्याचा बटाटावडा करतात. पण छान लिहीतात. त्यामुळे त्या बटावड्याचा आस्वाद घ्यावा फक्त !
रोहीत शर्मा विषयी, 'काही
रोहीत शर्मा विषयी, 'काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही'![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मध्यंतरी शर्मा कोहलीचा साधारण
मध्यंतरी शर्मा कोहलीचा साधारण दिड दोन वर्षे कालावधीतील एकदिवसीय रेकॊर्ड दाखवत होते. कोहलीच्या तोडीस तोड वा किंचित सरसच होता. आणि कोहलीचा स्वत:चा देखील त्या काळातील रेकॉर्ड तूफान होता, म्हणजे त्याची बरोबरी करणे सोपे नव्हते.
श्रीलंका वि. बांगलादेश सामना
श्रीलंका वि. बांगलादेश सामना अतिशय नाट्यपूर्ण व दोन्ही संघांची कस लावणारा झाला. अंतिम सामना तसाच होवो !
बांग्लादेश, भारत सामना
बांग्लादेश, भारत सामना
Wow, शेवट अप्रतिम
मस्तच, मजा आली
एकच नंबर होती शेवटची over
एकच नंबर होती शेवटची over.कार्तिकमुळे वाचलो.कसल टेन्शन आलेल.कॅच आऊट नंतर आशाच सोडलेली.पण शेवट भारी झाला.
म ट का.
म ट का.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण ठिक आहे. जावेद -चेतन शर्माच्या आठवणीवर थोडे मलम.
विश्वचषकासाठी आपली दुसरी फळी अजून तयार नाही हा एक निश्कर्ष या दौर्यातून निघतो. तस पाहिल तर मुख्य संघात अजूनही मधल्या फळीची बोंब आहे. येत्या इंग्लंड दौर्यात काही प्रश्नांची उत्तरे शोधायला लागतील. व मग ऑस्ट्रेलियाच्या दौर्यात त्याची तपासणी करता येईल.
मधल्या फळीतील संभाव्य उमेदवारांपैकी रैना व पांडे असूनही काल कसेबसे जिंकलो. दिनेश कार्तिक फक्त फलंदाज म्हणून ५० षटकांच्या सामन्यात मोठी खेळी करेल असा विश्वास वाटत नाही. केदार चे ही तेच. राहूल किंवा विजय आघाडीवर यशस्वी ठरले तर रोहितला खाली खेळवता येईल.
काल कार्थिक मस्त खेळून गेला.
काल कार्थिक मस्त खेळून गेला. अशा इनिंग्ज वन्स इन अ लाईफटाईम असतात.
बांग्लादेश कधीतरी, 'आपल्याला सतत कुणीतरी उपेक्षेनं मारून राह्यलाय' मोड मधून बाहेर येतील ही आशा आहे.
मला वाटतय की केकेआर चा कॅप्टन
मला वाटतय की केकेआर चा कॅप्टन झाल्याने त्याचा confidence वाढलाय!
<< पण ठिक आहे. जावेद -चेतन
<< पण ठिक आहे. जावेद -चेतन शर्माच्या आठवणीवर थोडे मलम. >> +१ . ती जखम अजूनही वेदना देते, हें खरंय !
काल रोहित शर्माने श्रीलंकेच्या प्रेक्ष़कांचे दोन दोनदां आभार मानताना बांगलादेशच्या संघाचं , विशेषतः गोलंदाजीचं , थोडं कौतुक करणंही उचित ठरलं असतं.
<< विश्वचषकासाठी आपली दुसरी फळी अजून तयार नाही हा एक निश्कर्ष या दौर्यातून निघतो. >> प्रत्येक मालिका ही निव्वळ पुढच्या विश्वचषकाच्या तयारीसाठीच असते , या भावनेतून पाहिल्यास त्या मालिकेची गंमतच निघून जाते, असं मला वाटतं. प्रत्येक मालिका व विश्वचषक हे त्यांच्या त्यांच्या जागीं आत्यंतिक महत्वाचे मानण्यातच खेळाडूंचं व प्रेक्षकांचं भलं असावं !
प्रत्येक मालिका ही निव्वळ
प्रत्येक मालिका ही निव्वळ पुढच्या विश्वचषकाच्या तयारीसाठीच असते , या भावनेतून पाहिल्यास त्या मालिकेची गंमतच निघून जाते, असं मला वाटतं. प्रत्येक मालिका व विश्वचषक हे त्यांच्या त्यांच्या जागीं आत्यंतिक महत्वाचे मानण्यातच खेळाडूंचं व प्रेक्षकांचं भलं असावं !>>> भाऊ, मान्य. क्रिकेटची मुख्य शिकवण हीच आहे. लक्ष फक्त आत्ताच्या चेंडू (नेक्स्ट बॉल) वर ठेवा. टेक ओव्हर बाय ओव्हर, सेशन बाय सेशन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण तुमच्या सारख्या जाणकारांच लक्ष संघ उभारणीवर असणारच. स्वतः खेळाडूही तशीच तयारी करतात आणि खेळतात. त्यातून कुणाचिही सुटका नाही. खेळाडू, संघनायक, प्रशिक्षक वा संघटना
आपण टी २०चा वर्ल्डकप जिंकू ही
आपण टी २०चा वर्ल्डकप जिंकू ही अपेक्षा करणे माझ्झ्यामते तरी फोल ठरत आहे.
टी२० मधे पहिले ६ ओवर्स मधे किमान ७०-८० धावा निघायला हव्या तरच १८०-२०० च्या जवळपास अथवा ओलांडून जाता येते हे स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या केकेआर टीम ने सुनिल नरेन ला ओपनिंगला पाठवून पहिल्या ६ ओवर मधे तुफान फटाकेबाजी करण्यास परवाणगी दिली होती त्यामुळे केकेआरचा स्कोर प्रत्येक मॅच मधे १६० च्या पुढे आरामात पोहचत होता. तोच कित्ता आता वेस्ट इंडीज आणि इतर टी२० लीग मधले संघ गिरवु लागले आहे. ज्या टीम मधे सुनिल आहे तिथे त्याला ओपनिंगला पाठवले जाउ लागले आहे. एक तर तो गोलंदाज असल्याने त्याची विकेट लवकर पडली तरी टीम ला काही खास फरक पडत नाही आणि दुसरे म्हणजे तो क्लिक झाला की धावसंख्या प्रचंड गतीने वाढते.
आता प्रत्येक संघ हा कित्ता उचलु लागला आहे. ऑस्ट्रेलियाचे "वॉर्नर-क्रिस लिन-मॅक्स्वेल" इंग्लंडचे "हॅल्स-रॉय-मॉर्गन" द. आफ्रिकेचे "स्मुथ-डिव्हिलिअर्स-मिलर" बांग्लादेश "तामिम-दास- मुझ्झफ्फिझुर" यांना पहिल्या ६ ओव्हर मधे धुलाई करण्याचे फुल्ल लायसन्स दिलेले आहे.
पण भारतीय ओपनर मधे एकदा धवन खेळतो तर दुसरीकडे रोहित शांत असतो. रोहित १० मॅच मधे कांड्या पिकवतो आणि एक मॅच मधे खेळून जातो. त्याची कंटीन्युटी नाही. किती दिवस त्याला एखादी मॅच खेळेल या आशेवर १० मॅच मधे संघाचे नुकसान करायला पाठवायचे ? तो खेळला तरी पहिल्या ६ ओवर मधे अपेक्षित अशी "धुलाई" धवन आणि रोहित दोघे ही करत नाही कारण दोघांवर २० ओव्हर एक जन तरी टिकण्याचे दडपण असते. यामुळे पहिल्या ६ ओव्हर मधे भारत ५० धावांपेक्षा अधिक धावा कुठल्याही संघाविरुध्द काढू शकला नाही. अगदी बांग्लादेश सारख्या संघाविरुध्द सुध्दा नाही. ही बाब आता गंभीर वाटत नाही परंतू जेव्हा टी२० विश्वचषकात इतर संघाचे फलंदाज वेगात धावा काढू लागतील तेव्हा ती बाब आपल्यासाठी अशक्य होऊ लागेल. विराट ३र्या नंबरवर येऊन किती फटाकेबाजी करेल? पहिल्या ३न्ही फलंदाजांवर विकेट वाचवून खेळण्याचा प्रचंड दबाव आहे. याऐवजी ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांना ६ ओव्हरच्या फटाकेबाजीसाठी तयार करावे. धवन बरोबर पंत उतरला आणि पंतची विकेट गेली तर श्रेयस ला पाठवावे. "धुलाई बहद्दूर ची रिप्लेसमेंट धुलाई बहद्दूर बरोबरच करावी" मुख्य फलंदाजांनी विकेट सांभाळून मारामारी करावी. दोन्ही बाजूने फटाकेबाजी पहिले ६ ओव्हर आणि नंतर ४ ओव्हर एका बाजूने सुरु ठेवावी. ११-१५ ओव्हर मधे टारगेट कितीपर्यंत होऊ शकेल या अंदाजाने फलंदाजी करावी. त्यात जर विकेट शाबूत राहिल्या तर १५व्या ओव्हर पासून पुन्हा दोन्ही बाजूंनी हाणामारी करायला सुरुवात करावी. अन्यथा एकच बाजूने चालू ठेवावी.
अखेरच्या ओव्हर मधे अतिमारामारी करण्याची वेळ भारत प्रत्येक मॅच मधे आणून चुक करतोय. दरवेळी बांग्लादेश समोर नसणार आहे. हीच ओव्हर श्रीलंकन गोलंदाजाने टाकली असती तर षटकार बसण्याचे चांसेस ५०% होते. खरतर ११ ओव्हर पासुन आपणच फार हळू खेळत होतो. त्यामुळे आवश्यक धावगती वाढली गेली. पांडेने स्व्तः हाणामारी करण्याची जवाबदारी घेतली असती तर रोहीतची विकेट गेली नसती. संघव्यवस्थापनाने पांडेला चुकिचा सल्ला दिला की एक धाव काढून रोहीतला स्ट्राईक दे. त्यामुळे ज्या बॉल वर ४ धावा निघू शकणार होत्या त्या चेंडूवर १ धावेसाठी पांडे हळु खेळू लागला. रोहीत कडे स्ट्राईक आल्यावर त्याच्याकडून पण १च धाव निघू लागली. त्यमुळे जिथे २ - ३ धावा हव्या होत्या तिथे १च धाव मिळू लागल्याने धावगती वाढली. उलट पांडेला मिळेल तसा खेळ सांगितले असते तर तो प्रत्येक बॉल मारु लागला असता १ धाव मिळाली तर रोहीतला असाही स्ट्राईक मिळणारच होती.
भारतीय संघव्यवस्थापनाला यावर विचार करावाच लागेल.
Pages