क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हैद्राबाद सेटल्ड टीम वाटतेय एक 'फिनिशर कोण ?' हा प्रश्न सोडला तर.
>>>>
वॉर्नरच फिनिश करून जातो Happy
सोबतीला सलामीला धवन, लेटेस्ट सेन्सेशन राशीद खान, सुरुवातीच्या दोन स्विंग ओवर तर शेवटच्या दोन डेथ ओवर टाकायला भुवी आणि सोबत यॉर्करलाईन थंपीची सोबत.. वेगवेगळ्या भुमिकेत मॅचविनर्स आहेत त्यांच्याकडे, ओव्हरऒल संतुलित टीम, सेमीला जाईल वाटते.

वॉर्नरच फिनिश करून जातो >> Happy ते वॉर्नर वर अधिकच अवलंबून राहतात जशीजशी टूर्नामेंट संपायला येते तसे नि तो फ्लॉप गेला कि गाशा गुंडाळतात.

>>पृथ्वी शॉ दिल्लीत गेला हे बघून बरे वाटले. द्रविड आणि सोबत गंभीर .. पोराचं भलं होईल

द्रविड नाहीये यंदा आयपीएल मध्ये.... पॉंटींग आहे दिल्लीचा कोच!
आता भले का काय ते तूच ठरव Wink

द्रविड नाहीये यंदा आयपीएल मध्ये.... पॉंटींग आहे दिल्लीचा कोच!
>>>
अरे देवा.. त्याचे भले जाऊ द्या.. आता पाँटींग गंभीरचे किती पटते यावर दिल्लीचे भवितव्य आहे.

राजस्थान रॉयल्स ने पहिल्यांदाच काटकसर सोडून, ‘होऊ द्या खर्च‘, अ‍ॅप्रोच घेतलाय. केकेआर आणि पंजाब सध्या तरी (कागदावर) दुबळे वाटताहेत.

सीएसके = चेन्नई ‘सिनियर’ किंग्ज! Wink डॅडीज आर्मी!

‘होऊ द्या खर्च‘ >> हो. पहिल्या दिवशी जरा 'अपने औकात मे रहते' तर दुसर्‍या दिवशी मिळेल तो घ्यायची वेळ न येती. बर्‍याच टीम गंडलेल्या वाटतात किती पैसे कोणावर घालवायचे ह्यावर यंदा. मी पांड्याच्या मोठ्या पातीचा फॅन आहे पण त्याला दिलेले पैसे अवाच्या सवा वाटतात. बर RTM कार्ड असताना त्याच्या मुंबई ने बिडींग का केले देव जाणे.

रच्याकने, पाकिस्तान ला दणदणीत हरवून अंडर-१९ मधे आपण फायनल मधे पोचलो.
आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल ३ फेब्रुवारीला!

पाकचा सामना बरा होईल असे वाटलेले पण त्यांनी खूपच खराब खेळ केला.. मुख्यतः क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी खूपच दुबळी बाजू!
आणि भारतिय क्षेत्ररक्षकांनी सर्वच झेल अप्रतीम पकडले!

आपले U-19 चे बॉलर्स खतरनाक आहेत.. फर्स्ट चेंज बॉलर नागरकोटी एकदम कन्सिस्टन्सीने १४० प्लस च्या स्पीडने बॉलिंग करतो. पहिले दोघे तर करतातच.. चार फास्ट बॉलर्स फास्ट ह्या व्याख्येत बसेल अशी बॉलिंग करतात..

चार फास्ट बॉलर्स फास्ट ह्या व्याख्येत बसेल अशी बॉलिंग करतात..>>>

आणि त्यांची अचूकता देखिल चांगली आहे विशेषत: शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीची!

आय पी एल मध्ये खेळाडूवर लावलेले पैशाचे शेअरिन्ग कसे असते? त्याला त्यातले किती मिळतात ?

"आपले U-19 चे बॉलर्स खतरनाक आहेत." - न्यूझिलंड आणी ऑस्ट्रेलिया मधल्या स्पीड गन्स आणी बाकीच्या ठिकाणी वापरण्यात येणार्या स्पीड गन्स मधे फरक आहे. बाकी ठिकाणी १३० च्या स्पीड मधे असणारा विनय कुमार ऑस्ट्रेलिया मधे १४०+ क्लॉक होतो.

आपले बॉलर्स चांगले आहेत, पण १७-१८ वर्षाच्या मुलांकडून १४५+ चा स्पीड आणी तो सुद्धा कन्सिस्टंटली क्लॉक होणं जरा अवघड वाटतं. पण चित्र नक्कीच आशादायी आहे. फायनल बघायला मजा येणार आहे.

हो मीही तेच वाचले पण फास्ट आहेत हे जबरी आहे. मला आठवते २००२ की २००३ साली अंडर-१९ मधे असेच इरफान पठाण आणि व्हीआरव्ही सिंग यांनी पाक चा धुव्वा उडवला होता. त्याकाळात भारतीय फास्ट बोलर्स च्या पुढे पाकडे चाचपडत आहेत असे चित्र दुर्मिळ होते. आता इतके नावीन्य नाही, तरीही ही पुढची पिढी तयार आहे हे चांगले आहे.

तेव्हाही इरफान आणि सिंग ने पाकची अवस्था १३/५ अशी केली होती आणि हरवले होते त्यांना. ती स्पर्धाही भारताने जिंकली होती
http://www.espncricinfo.com/series/8616/scorecard/328266/pakistan-under-...

द. अफ्रिकेविरुद्ध पहिली वन-डे निम्मी संपलीये. भारताला २७० रन्स करायचे आहेत. चहल आणी कुलदीप ने मस्त बॉलिंग केली. आता बॅटींग क्लिक व्हायला हवी.

मनिष पांडे मला फारसा आवडत नाही. त्याला ईतके पैसे मिळालेले बघून पोटात दुखले.
>>> के एल राहुलच्या केस मधे सेम इमोशन्स...
पृथ्वी शॉ दिल्लीत गेला हे बघून बरे वाटले. द्रविड आणि सोबत गंभीर .. पोराचं भलं होईल.
>>> द्रविड नाहिये आता आयपीएल मधे. पण शॉ ला द्रविडचं मार्गदर्शन वर्ल्डकप मधे होतंच आहे...

काल कोहली अन राहणे मस्त खेळले.
राहणेच्या सलग ५ फिफ्टीज. त्यातल्या आधीच्या ४ देशातल्या पिचेसवर ऑसीज समोर होत्या (अन तरीही बसवला त्याला)
उपख्ण्डाबाहेर ४ नंबर साठी राहणे बरा पडेल वन डेज मधे असं वाटतंय. पण त्यानी श्रेयस अय्यरला स्पर्धा वाढली.

कालची मॅच मस्त जिंकली. प्रोफेशनल पार्टनरशीप. Everything measured and under control. रविवारी मजा येणार.
त्याआधी उद्या ऑस्ट्रेलियाचा कचरा करून विश्वकरंडक युवा पिढी पटकावणार यात शंका नाही. राहुल सरांनी गेल्या ५ - ६ दिवसात धावा पळण्याच तंत्र घोटून घेतलेले असेल. त्यात काल विराट सरांनी कसे पळू नये याचे प्रात्यक्षिक धवनला बाद करून दिलेच आहे. मुलांनी त्यातून बोध घेतला तर बरे. पाकिस्तान विरूद्ध तेवढी एकच उणीव दिसली होती.

So, happy weekend.

गेला विकेंड पण भारी. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी. पाकिस्तानला धुतला. साउथ आफ्रिके विरुद्ध संघर्षपूर्ण विजय आणि फेडरर विजयी. माणसाला अजून काय पाहिजे. वाहवा. Happy

गेला विकेंड पण भारी. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी. पाकिस्तानला धुतला. साउथ आफ्रिके विरुद्ध संघर्षपूर्ण विजय आणि फेडरर विजयी. माणसाला अजून काय पाहिजे. वाहवा. >>> विक्रम - हा वीकेण्ड ही भरपूर स्पोर्ट्स वाला आहे इथे. आज रात्री अंडर १९ ची फायनल, रविवारी सकाळी दुसरी वन डे आणि संध्याकाळी सुपरबोल.

आय पी एल चे खेळाडून्चे लिलावाच्या पैशाचे शेअरिन्ग कसे असते? त्याला किती पैसे मिळतात?

ऑस्ट्रेलिया ला ४८ व्या ओव्हर मधेच ऑल डाउन करत २१६ वर थोपवत अंडर-१९ मधे अर्धी बाजी मारली आहे !
सध्या ७१/० ११.२ ओव्हर्स ! कमॉन बॉइज !!!

संपूर्ण सिरीज मधे निर्विवाद वर्चस्व गाजवत, चौथ्यांदा अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. (ऑस्ट्रेलिया-३ वेळा, पाकिस्तान-२ वेळा). मनजोत कालराचं दणदणीत शतक !
टीम इंडिया आणि द राहुल द्रविड यांचं अभिनंदन !

मस्त खेळले आज! कालरा तर खेळलाच चांगला पण शॉ आणि गिल चे शॉट्स ही जबरदस्त होते!

द टीम, आणि द वॉल द द्रविड! Happy

किती सहज जिंकले सारेच सामने.
फलंदाज कोणाला ऐकत नव्हतेच, पण गोलंदाज सुद्धा.. एकूण एक सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळण्यात आले आहे.
आपले अंडर १९ ईतर देशांच्या मानाने फारच स्ट्राँग वाटत होते आणि सारेच क्लिनिकल परफॉर्मन्स. म्हणजे अगदीच तयार पोरं होती. आपल्या ईथल्या पोरांना ईतरांच्या तुलनेत नक्कीच चांगला एक्स्पोजर मिळत असणार.

कालचा दिवस भारतासाठी मस्त होता. तर दक्षिण आफ्रिकेसाठी पटकन विसरुन जावा असा !
तिकडे पोरांनी - ३०३ मारले, तर पोरींनी ३०२ हाणले !
विराट ने १६० केले, तर स्मृती मंधाना ने १३५ !
चहल-कुलदीप ने गुंडाळलं, तर पुनम यादव- राजेश्वरी गायकवाड ने संपवलं !
भारीच Happy

Pages