क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि अशाप्रकारे आपण दक्षिण अफ्रिकेत मालिका जिंकण्याचा 'बेस्ट चान्स' पुन्हा घालवला आहे. आता पुढचा 'बेस्ट चान्स' कुठला आहे? ऑस्ट्रेलिआ?

क्षिण अफ्रिकेत मालिका जिंकण्याचा 'बेस्ट चान्स' पुन्हा घालवला आहे. आता पुढचा 'बेस्ट चान्स' कुठला आहे? ऑस्ट्रेलिआ?>>>

त्यांचा श्रीलंका व्हावा लागेल आपण तिकडे जाऊन जिंकण्यासाठी!

असेच बेस्ट चान्सेस पूर्वी २०११ मधे ईंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात आले होते.
निक्काल ४-० लागला होता. त्यावेळच्या अन आत्ताच्या संघातल्या कॉमन गोष्टीही बर्‍यापैकी आहेतः

१: नंबर १ टेस्ट टीम
२: अव्वल आहोत, कुणालाही हरवू असा अ‍ॅटिट्यूड
३: प्रॉपर प्लॅनिंगचा आभाव (अन काही प्लॅन असलाच तर त्याच्या एक्झिक्यूशनचा)
४: आऊट ऑफ फॉर्म ओपनिंग पेअर
५: एकही सिरीज न गमावलेला कप्तान

ही माझी कालची दोन विधाने

१.. तो लुंगी कि नुंगी आणि रबाडा मिळून संपवतील या पिचवर आपल्याला...

२.. बाकी काहीही असो, रोहीत शर्मा उद्या किती मारतो हे बघायला मजा येणार Happy

>>

एक पुजाराचा रन ऑट. वगळता,. बाकी नऊ जणांना या दोघांनीच घेतले.

@ रोहीत शर्मा, - असामी आणि फेरफटका, आज त्यानेच जास्त मारले ना. याचसाठी म्हणालो होतो की आज तो उभा राहण्याऐवजी काही फटके खेळून रन्स होताहेत का हे आजमावायला बघणार. तेच केले त्याने. मी स्कोअरच पाहिलाय. अजून हायलाईटस पाहिली नाही. आता बघतो.

भारतीय संघासाठी खुशखबर! अगदी ‘आणंदाणे वेडे-पिशे होने‘ प्रकारातली. बीसीसीआय ने द. अफ्रिकेतल्या दणदणीत पराभवावर तातडीचा उपाय म्हणून २८ फेब्रुवारीला द. अफ्रिकेचा दौरा संपल्या संपल्या, ६ मार्चपासून श्रीलंका आणी बांगला-देश विरुद्ध टी-२० स्पर्धेत उतरायचा निर्णय घेतला आहे. तरी सर्व फलंदाजांनी खोर्याने धावा कुटून ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. ईतकी काळजी फक्त सक्खी आईच घेऊ शकते. तेव्हा बीसीसीआय चं अधिकृत नाव बीसीसी-आई ठेवायला हरकत नसावी.

रच्याकने, १९ वर्षाखालील विश्वकरंडक चालू आहे सध्या. भारताने सर्व सामने जिंकत उप-उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तितकेच कौतूक अफगाणिस्तानच्या संघाचे देखील... पाकीस्तान आणि श्रीलंकेला अस्मान दाखवत त्यांनी त्यांची उप-उपांत्य फेरीतली जागा नक्की केली आहे.

तरी सर्व फलंदाजांनी खोर्याने धावा कुटून ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
>>
आयपीएलची प्रॅक्टिस रे... टेस्ट मॅच ला विदाऊट प्रॅक्टिस जाऊन चालतं. आयपीएलला गेले तर ओनर्स चे पैसे बुडतील ना...

भारताने सर्व सामने जिंकत उप-उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
>>
खूप छान खेळताहेत. अनुकूल रॉय, पृथ्वी शॉ वर भविष्यात आशा ठेवता येतील. शॉ रणाजीमधेही चांगला खेळला होता.
पापुआ न्यू गिनी अन झिंबाब्वेला तर १० विकेट्सनी हरवलं आपण. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे त्यावेळी ओपनर्समधे रोटेशन ठेवलं होतं.

अनाठायी तुलना किंवा अपेक्षा असं काहीही नाही पण, पृथ्वी शॉ ची बॅटींग बघताना लहानपणच्या सचिन ची आठवण होते.

शुभनम गिल चा खेळ पण चांगला आहे. पण तरी शॉ काँपॅक्ट वाटला.

मी वर ‘लहानपण’ चा सचिन म्हट्लय हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईलच. तो लहानपणी खेळायला लागला आणि तारूण्यात रिटायर झाला. असं नसल्यास त्याचा खेळ पहात पहात लहानाची मोठी झालेली एक पिढी २५ वर्षात ‘अकाली’ म्हातारी होईल.

ही मॅच ईंटरेस्टिंग होईल असं मला वाटतय. 'Whoever blinks first' ची मॅच असणार आहे. चांगल्या फिल्डींग ची साथ लाभली तर आपण द. अफ्रिकेला २००-२५० मधे रोखू शकू. उद्याच्या दिवसाची उत्सुकता आहे.

तर आपण द. अफ्रिकेला २००-२५० मधे रोखू शकू.
>>>>
आमीन !
मी तर त्यांना १४०-१५० ला गुंडाळत लीड घेऊ या आशेवर आहे.. ईतिहास गवाह है, आपण आफ्रिकेत सामने असेच जिंकले आहोत.. फक्त त्या एबीला कौंटेर अटेक करायला देऊ नका .. तो गेल्यावर लाईन लागते, पण तो जाईस्तोवर असल्या लौ स्कोरींग सामन्यात उशीर झालेला असतो..

१९ वर्षाखालील वर्ल्ड कप भारी सुरु आहे!

अफगाणने न्युझिलंडला लोळविळे अक्षरशः!!

लवकरच भारताला उपखंडात पराक्रम गाजवायला अजून एक संघ तयार होतोय!! Wink

सामना रद्द होईल बहुदा. पण आज विजय, कोहली, रहाणे, भुवनेश आणी थोडासा शामी काय जबरदस्त खेळले आहेत! व्वा!! मझा आ गया. प्रत्येक बॅट्समन ला वेगवेगळी परिस्थिती होती. विजय ला उभं रहाणं गरजेचं होतं. आणी शामी ला फास्ट रन्स करणं आणी ते सुद्धा मोठे फटके मारून गरजेचं होतं. रहाणे -भुवनेश ची पार्टनरशिप ची वेळ ह्या दोन टोकांच्या मधे पण शामी-एण्ड ला होती. आणी प्रत्येकानं परिस्थितीनुरूप खेळ केला. टेस्ट क्रिकेट अ‍ॅट इट्स बेस्ट!

अफगाणने न्युझिलंडला लोळविळे अक्षरशः!! >>> अरे वा, जिंकले का अफगाण.. त्यांची अंडर उन्नीस भारीच वाटत होती.
बाकी आपणच तो वर्ल्डकप जिंकायला फेव्हरेट असू ... कि कोण आहे टक्करला?

आपला सामना रद्द झाला तर .. Sad लई वाईट वाटेल..
रहाणे भुवी तीनही सामन्यात असते तर निकाल वेगळा असता..
आपण एकतरी सामना जिंकणे डिजर्व्ह करतो. कारण हरलेले सामनेही आपण दणकून हरलो नाहीयेत. कोहली आणि गोलंदाजांच्या जीवावर आपण त्यांना अगदी उन्नीस-बीस नाही तरी अठरा-बीस लढत दिलेली

दोन्ही ड्रॉप्ड प्लेयर्स (रहाणे आणी भुवनेश) आज 'बरे' खेळले. Wink

उद्धट आणी चुकीचं टीम सिलेक्शन नसतं तर कदाचित पहिल्या दोन सामन्यात निकाल वेगळा लागू शकला असता. उद्या निकाल लागला तर ही मॅच जिंकू बहूतेक.

अंडर-१९ वर्ल्डकप च्या सेमी फायनला ला भारत वि. पाकिस्तान आहे.

कदाचित म्हणालास म्हणून ह्या argument ला अर्थ राहात नाहि रे Happy हे दोघे हवे होते का तर उत्तर अर्थात 'हो'च असेल पण एकंदर ज्या कारणामुळे रोहित आत आला होता ते फारसे चुकीचे नाही जर तुम्ही कोहली च्या तर्‍हेने संघ निवडतो ते बघितले तर.

अगदी निकाल ३-० झाला तरी पाच इनिंग मधे आफ्रिके ला गुंडाळलेले आहे नि त्यांच्या सरस बॅटींग ला अजिबात चमकू दिलेले नाहि हा निव्वळ जबरदस्त प्लस पॉईंट आहे.

कदाचित म्हट्लं कारण क्रिकेट मधे 'जर-तर' ला फारसा अर्थ नसतो. कोहली च्या मानसिकतेतून विचार केला तर त्याचा प्रत्येक निर्णय पटेल. पण असं घडत नाही. आपण आपल्या दृष्टीकोनातूनच एखादी गोष्ट पहातो.

बरोबर आहे म्हणून म्हणत होतो कि टीम सिलेक्शन ह्या मुद्द्याला उगाळण्यात आता फारसा अर्थ नाही. अगदी होता तो संघ घेऊनही बघितले तरी आपण जिंकू शकत होतो, जर
१. स्लिप फिल्डींग सुधारू शकलो असतो
२. अजून १-२ बॅटसमन ने थोडा अधिक हातभार लावला असता
अगदीच क्लिशे वापरायचा तर दोन्ही मॅचेस आपण प्रत्येकी एक सेशन चांगले न खेळल्यामूळे गमावल्या आहेत.

I still can not get over the fact that batting line that reads Amla, AB de Villiers and F du Plessis has not scored single century on RSA pitches.

लॉनग विकेण्ड वसूल झाला. आरामात मॅच बघता आली. पावसाने विजय लांबवला. खरे तर टेंशनच दिलेले. पण उन्हं आली, खेळपट्टीतील ओलावा गेला, तसे बॉल पुन्हा ग्रिप धरू लागला आणि मग फलंदाजी पुन्हा पहिल्यासारखी अवघड झाली. नशीब लाईन लागायला उशीर झाला नाही. सेट बॅटसमन त्याही परिस्थितीत कसा उभा राहू शकतो हे एलगारने दाखवून दिले. आमला सोबत पार्टनरशिप वेळेत तुटली नसती आणि थोडक्यासाठी 2-3 विकेटने हरलो असतो तर चुटपूट राहिली असती.

IPL Auction बघितले का लोकहो? > बघितले नाही नुसते फॉलो केले. KKR ने काय विचार करून गंभीर ला सोडून दिले ? त्यांच्या सगळ्या सीजन मधे एक कॉमन कसिस्टंट बॅटसमन होता तो. तसेच मुंबई ने पोलार्ड ला का परत घेतले ? ब्रँड साठी > पोलार्ड ला कोण फॉलो करते राव ?

नेहमीप्रमाणे बंगलोर चा संघ कागदावर जबरदस्त वाटतो. कोणाला खेळवायचे नि कोणाला नाही न समजण्याइतका. म्हणजे नेहमीप्रमाणे त्यांचे correct combo जमेतो ते बाहेर असणार. पंजाब ने नेहमीप्रमाणे शक्य तेव्हढे विचित्र कॉम्बो करता येतील असे प्लेयर्स उचललेले आहेत. पाँटींग आल्यापासून दिल्ली सुधारलेली दिसतेय. मुंबई क्लिक झाली तर आर पार जाईल असे वाटते. चेन्नई ने जुन्या घोड्यांवर पैसे लावलेत सगळे. हैद्राबाद सेटल्ड टीम वाटतेय एक 'फिनिशर कोण ?' हा प्रश्न सोडला तर.

मी पाहिले अधूनमधून सुट्टीचा फायदा उचलत
गंभीरला कमी पैसे मिळालेले बघून वाईट वाटले. तरी दिल्लीचा कर्णधार म्हणून त्याला पर्याय नाही.
मनिष पांडे मला फारसा आवडत नाही. त्याला ईतके पैसे मिळालेले बघून पोटात दुखले.
हरभजन धोनीच्या संघात गेलेला बघून गुदगुल्या झाल्या. पण आता अकरात खेळतोय कि नाही ते आनेवाला वक्तही बतायेगा.
पृथ्वी शॉ दिल्लीत गेला हे बघून बरे वाटले. द्रविड आणि सोबत गंभीर .. पोराचं भलं होईल.
गेलला नंतर पंजाबने घेतले वाटते. हा आता उसळी मारत पंजाबला अच्छे दिन दाखवतो का हे बघणे रोचक. आयपीएलमध्ये अश्या बरेच कथा आहेत.

Pages