क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झाली मॅच. मी फक्त शेवटच्या ६-७ ओव्हर पाहिल्या. बुमराह डेथ ओव्हर्समध्ये किती थंड डोक्यानी बॉलींग करतो. आयपीएलमध्ये पण भारी करतो हेच

मस्त मॅच झाली कालची आणि ही सिरीजच..
एबीडी नंतर भारताविरुद्ध चांगला खेळूनही आवडलेल्या सध्याच्या खेळाडूंमधे या सिरीज नंतर टॉम लेथम ची भर पडली. काल सॉलीड खेळलाय संपूर्ण सिरीज मधे !

टॉम लॅथम, मागच्या वर्षी झालेल्या टेस्ट सिरीज मधेही भारताविरुद्ध जबरदस्त खेळला होता. तेव्हा तो टेस्ट मधे ओपन करायचा.

ह्यावरून दोन प्रश्नः भारताविरूद्ध डावखोरे फलंदाज जास्त दादागिरी करतात का? (सईद अन्वर, गॅरी कर्स्टन, मॅथ्यू हेडन, सनथ जयसूर्या, अ‍ॅलिस्टर कूक आणी आता टॉम लॅथम). ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे हरभजन सिंग (पूर्वीचा) किंवा झहीर खान सारख्या ऑफ-स्पिनर / डावखोरा फास्ट /स्विंग बॉलर्स ची कमतरता?

ह्यावरून दोन प्रश्नः भारताविरूद्ध डावखोरे फलंदाज जास्त दादागिरी करतात का? >>> इण्टरेस्टिंग, फेफ!

विलो टीव्ही वरचे हायलाइट्स एकदम दरिद्री होते. शेवटचा तो थरार काही दिसलाच नाही.

काल पहिल्या टेस्टचा शेवट छान झाला. पहिल्या दिवशी डावाने हरतो की काय अशी शंका होती, तर शेवटच्या दिवशी आपण जिंकता जिंकता मॅच ड्रॉ झाली. डिकवेला आणि मंडळींनी वेळकाढूपणा केला, तरी आपली बॉलिंग पण स्लो झाली. अर्थात बर्‍याच वर्षांनी (की पहिल्यांदाच!) आपण पूर्ण ५ दिवस टेस्ट मधे फास्ट बॉलर्स कडून स्पीनर्स पेक्षा जास्त बॉलिंग करुन घेतली यामुळे असेल ! काल अश्विन जडेजा ला जास्त वापरलं असतं तर कदाचित जिंकलोही असतो असं वाटलं.
फ्लडलाइट्स, पांढरा बॉल यांचा वाढलेला वापर या पार्श्वभूमीवर बॅडलाइट मुळे मॅच वेळेपेक्षा लवकर संपणे थांबवता येईल का असा प्रश्न मात्र पडला !

हो मस्त झाली मॅच शेवटी. पहिल्या डावात पुजारा अगदी "द्रविड" खेळला. निवांत बॉल ची वाट पाहात खतरनाक ऑफ/कव्हर ड्राइव्ज मारले त्याने मस्त. दुसर्‍या डावातील बॅटिंग चा फक्त स्कोअर पाहिला. मस्त खेळलेले दिसतायत.

अशा टेस्ट मॅचेस झाल्या की फार फार बरं वाटतं. आपल्याला क्रिकेट का आवडतं त्याचं उत्तर reinforce होतं. मस्त झाली मॅच. भुवनेश ने तीन्ही फॉर्मॅट्स मधे केलेली प्रगती impressive आहे. पुढच्या दोन्ही मॅचेस मधे त्याची कमतरता जाणवेल. आऊट न होता रन्स काढत रहाणे हा बहुदा पुजारा चा छंद असावा. कोहली तर सद्ध्या रन-मशिन झालाय. आत्तापर्यंतचा पॅटर्न बघता रहाणे नागपूर ला रन्स काढेल असं वाटतय.

आज भारत-श्रीलंका, आणि अ‍ॅशेस! ब्रिंग ईट ऑन! इंग्लंडची ऑसी पेसर्सना दमवण्याची स्ट्रॅटेजी काम करतेय असं दिसतंय. ५२ षटकांत १२१/१. गब्बा फोर्ट्रेस १९८८ पासून ब्रिच झालेला नाही. आता होणार का?

स्टोनमन गॉन! कमिन्सने मस्त आत आणला बॉल. हिंट ऑफ रिव्हर्स नाऊ? Happy पुढचा सेशन मस्त असेल मग. ऑसीजनी रन्स रोखून धरल्याने अजूनही २ क्विक विकेट्स गेल्या तर परिस्थिती बिकट होऊ शकते.

८१ षटकात केवळ १९६ धावा हे जरा संथ झाले किमान २३० ते २४० धावा करायला हव्या होत्या! दोन विकेटस जलद गेल्याने ऑसीज चा वरचष्मा झाला!

मॅच पाहताय का? भारत ९ षटकांमध्ये ८/३ ! लकमल आणि मॅथ्यूज बोलिंग सुपर्बली अ‍ॅट धरमशाला!

लकमल आणि मॅथ्यूज बोलिंग सुपर्बली अ‍ॅट धरमशाला! >>> स्वच्छ , ताज्या, प्रदूषणविरहित हवेचा परिणाम की काय Wink

लंका जबरदस्त खेळली. they deserved to win. टीम इंडिया अगदीच गरीब क्रिकेट खेळली. धवन चा सेट-अप आणी विकेट मला तरी बाळबोध वाटली... लंकेकडून नाही, धवन कडून... amateur mistake. कार्थिक क्लब लेव्हल वरून पहिल्यांदाच इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय असं वाटत होतं (त्याच्या उड्या पाहून). कोहली च्या अनुपस्थितीत, विकेट बॉलर फ्रेंडली असताना कदाचित रहाणे प्लेयिंग ११ मधे असायला हवा होता. बुमराह ने नो-बॉल वर विकेट काढणं हे त्याच्या छोट्याश्या इंटरनॅशनल करियर मधे थोडं जास्त वेळा झालय आणी ते २-३ वेळा महागात पण गेलय.

भारत-श्रीलंका मॅच एकतर्फी झाली. पण भारताने डॉमिनेटींग पद्धतीनं जिंकल्यामुळे मजा आली. रोहीत शर्मा जबरदस्त खेळला. १०० ते २०० फक्त ३५ बॉल्स मधे म्हणजे कमाल होती. धवन आणी अय्यर पण छान खेळले. अय्यर चा निर्धास्त अ‍ॅटीट्यूड आवडला.

आज द. आफ्रिकेला ३०० च्या आत काढल्यावर बिनडोक बॅटिंग मुळे आपले ही दोन गेले आहेत. तीन स्लिप आणि एक गली आहे, बॉल आउट्स्विंग होतोय तरी विजय साहेब चांगला फूट भर बाहेर असलेल्या बॉल ला टेम्प्ट झालेच. चिकार वेळ आहे मॅच मधे. रन्स ही होत होते.

आणि धवन! अरे सेहवाग सुद्धा इतक्या लौकर पुल्/हुक मारायला जात नसे!

तीनही विकेट्स बॅट्समेन ने बहाल केल्या. धवन ला बाहेर का नेतात कुणास ठाऊक! चालती-बोलती embarrassment आहे. फ्लॅट ट्रॅक बुली आहे तो. कितीही फॉर्म मधे असला / नसला तरिही, धवन पेक्षा राहूल आणी ५ व्या क्रमांकावर रहाणे ला खेळवावं असं मला वाटतं.

तीनही विकेट्स बॅट्समेन ने बहाल केल्या. >> +१. विकेट थोडिशी लाईव्ह वाटते पण त्यापलीकडे काहीही नाहि. बुमराहला का घेतलय ? शेपूत संपावयला असेल तर त्याला सात विकेट्स नंतर बॉलिंग का दिली नाहि देव जाणे.

राहणे साठी ideal track होता.

कोहली खालोखाल ओव्हरसीज बॅटिंग अॅव्हरेज असताना राहणेला पहिल्याच टेस्टमधे बाहेर ठेवताना शास्त्रीबुवा अन कोहलीनी काय खाऊन टीम सिलेक्ट केली आहे देव जाणे .

धवन, शर्मा, पांड्या, बुमरा ... थोडे दिवसानी परत एकच टीम तीन्ही फॉर्ममधे खेळताना दिसणार बहुतेक

आपल्याकडे लिमिटेड ओव्हर्सच्या फॉर्म वरून टेस्टमधे चान्स मिळतो , पण टेस्टच्या फॉर्म वरून वन डे ला मात्र मिळत नाही

आता पुजारावर मदार पण चुकुन माकून उदया नोहिट किंवा पांड्या खेळले तर राहणे सडणार परत ...

मजा आली जरा आज.. ईतके दिवस घरेलू क्रिकेट आणि लंका विंडीज झिम्बाब्वेचे दौरे बघून जीव सडला होता.. आज आफ्रिकन गोलंदाजी पाहिली जरा ताजेतवाने वाटले. पण विकेट बहाल केल्या. सराव सामने हवे होते. गेले आणि सरळ खेळले त्याचे परीणाम दिसले. हा सामना जाणार असे वाटते.
रहाणेला आफ्रिकेत खेळल्या जाणार्‍या पहिल्याच सामन्यात बसवणे धक्कादायक होते.
ओपनिंगला संगीत खुर्ची असली तरी के एल राहुल पहिल्या समन्यात पहिल्या दोघात असायला हवा होता.
बुमराह आणि पांड्या जोडण्यापेक्षा उमेश यादव (आहे का तो?) आणि एक्स्ट्रा बॅट्समन (निदान मग तरी रहाणे आला असता) चालले असते.
मधल्या काळात आश्विन फलंदाजी खूप कॅज्युअली करत होता. उद्या मात्र मनावर घेऊन करेल असे वाटतेय. ईथे संघातली जागा टिकवायला त्याला धावा कामात येतील.

शेवटच्या विकेट्स घ्यायला अश्विन ला आणायला उशिर करणे किंवा बुमराहला न वापरणे ब्लंडर होते जे hopefully महाग पडणार नाहित. बेसिकली अशा विकेट्स वर express pace असलेला १४०-१४५ च्या वर ४ बॉल तरी टाकेल असा कोणीच नसणे महागात पडनार आहे. स्लिप कॅचिंग बद्दल काय करायचे कळत नाहि. संगीत खुर्ची हे कारण २ वर्षे वापरू शकत नाहि आपण. राहणे नाहि त्यामूळे एक गली मधला भरवशाचा माणुस पण नाहि.

२-३ दिवसांपूर्वी, स्लिप कॅचिंग बद्दल क्रिकइन्फो वर एक छान आर्टिकल आलं आहे. आपलं स्लिप कॅचिंग अगदीच स्लिपरी कॅचिंग असतं.

Pages