मुलांच्या विचीत्र सवयी आणि त्यावरील उपाय

Submitted by मुग्धा केदार on 1 December, 2015 - 07:27

माझा मुलगा दिड वर्षाचा आहे. त्याला एक विचित्र सवय आहे. खालचा ओठ वरच्या दाताखाली घट्ट दाबुन ठेवतो. काही बोलताना किंवा खाताना सोडुन बाकीवेळ तसाच असतो, आपण सांगितल की तेवढ्या पुरता ओठ काढणार पुन्हा तसचं, झोपताना पण आणि झोपेत पण तसचं, आणि झोपेत तो ओठ चोखतो,अगदी आवाज येईपर्यंत. बरेच उपाय केले, कारल्याचा रस/ बारिक किस, कोरफडीचा गर जेवढ्या वेळा मी लावलं त्याने लगेच चाटून टाकलं. आणि पुन्हा तेच. आता एका ओळखीच्या डेन्टीस्टने सांगितलयं की सर्जिकल स्पिरीट लाव त्याच्या ओठाला..ते कडु असतं आणि त्याने ओठ जडावल्यासारखं होईल असं ती म्हणाली. पण असं केमिकल ओठाला लावणं कित्पत योग्य आहे. पेडी.ला विचारल तर ते सांगतात ती सवय आपोआप जाईल.
सगळे घरातले म्हणतात की त्याचा खालचा ओठ बारीक होईल.
मला आता काळजी वाटतेय कृपया मदत करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळीकडे हात लावते व हात - बोट तोंडात घालते.
>>>>
वस्तूला हात लावल्या लावल्या लगेच तोंडात घालते का? म्हणजे त्या वस्तूला हात लावून चव बघितल्यासारखे?
ते हॅण्ड फूट माऊथ (असेच काही नाव आहे ना?) इन्फेक्शन अश्यानेच होते ना.. माझ्या लेकीला झालेले.पण तीनचार दिवसांनी आपोआप बरेही होते.. यावर घरातल्या वस्तू स्वच्छ ठेवणे हा एक उपाय तर करू शकतोच. आणि बूट चपला हाताला लागणार नाही अश्या जागी..

pacifier चा उपयोग होईल >>>> हो पण डॉक्टरांनी ते वापरू नका म्हणून सांगितलेय . त्याने पण इन्फेक्शन होते . म्हणून चोखायचे रबरी बूच असलेली दुधाची किंवा पाण्याची बाटली पण वापरत नाही .

बहुतेक सगळी बाळं हे प्रकार करतात थोड्या फार प्रमाणात. पण ही एक फेज आहे आणि काही दिवसांनी निघून पण जाईल. छल्ला नीं सांगितलेला उपाय करता येईल. प्रमाण जरा कमी होईल पण जास्तीत जास्त वेळ सुपरव्हिजन करावं लागेलच.

माझ्या मुलाला पण उजव्या हाताची दोन बोटं चोखायची सवय आहे, लहान असतांना झोप आली की बोट चोखायचा, आता नेहिमीच बोटं चोखतो (वय वर्ष १६), हि सवय घालवण्या साठी काय करावे

राज १, तुमचा मुलगा सोळा वर्षांचा आहे, हे चुकून लिहिलंय की खरं? रात्री झोपल्यावर femite लोशन लावतात काहीजण. मग दिवसभर बोट तोंडात घातलं की कडू चव येते.तुमच्या डॉक्टरांना विचारा.

ऑर्किड,
माझा मुलगा 16 वर्षाचा आहे, आत्ता तो घरीच असतो व त्याच्या सवई बद्दल आम्हाला माहीत आहे म्हणुन ठीक आहे पण घराबाहेर गेल्यावर त्याचा problem होईल

Pages