Submitted by मुग्धा केदार on 1 December, 2015 - 07:27
माझा मुलगा दिड वर्षाचा आहे. त्याला एक विचित्र सवय आहे. खालचा ओठ वरच्या दाताखाली घट्ट दाबुन ठेवतो. काही बोलताना किंवा खाताना सोडुन बाकीवेळ तसाच असतो, आपण सांगितल की तेवढ्या पुरता ओठ काढणार पुन्हा तसचं, झोपताना पण आणि झोपेत पण तसचं, आणि झोपेत तो ओठ चोखतो,अगदी आवाज येईपर्यंत. बरेच उपाय केले, कारल्याचा रस/ बारिक किस, कोरफडीचा गर जेवढ्या वेळा मी लावलं त्याने लगेच चाटून टाकलं. आणि पुन्हा तेच. आता एका ओळखीच्या डेन्टीस्टने सांगितलयं की सर्जिकल स्पिरीट लाव त्याच्या ओठाला..ते कडु असतं आणि त्याने ओठ जडावल्यासारखं होईल असं ती म्हणाली. पण असं केमिकल ओठाला लावणं कित्पत योग्य आहे. पेडी.ला विचारल तर ते सांगतात ती सवय आपोआप जाईल.
सगळे घरातले म्हणतात की त्याचा खालचा ओठ बारीक होईल.
मला आता काळजी वाटतेय कृपया मदत करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी व माझा भाऊ चादरीचे सूत
मी व माझा भाऊ चादरीचे सूत गालावर गुळगुळवत फिरवत झोपायचो. मग आईने चादरींच्या दशा कापून टाकल्या व सवय गेली
माझ्या मुलीला मधली दोन बोटं
माझ्या मुलीला मधली दोन बोटं चोखायाची सवय होती.
अगदी चार वर्षे पर्यंत पण फरक हाच की फक्त झोप आली की करायची. नंतर कळले की दुर्लक्ष हाच मंत्र.
पण चुलत बहिणीच्या मुलीची सवय अति भयानक आणि अन्हायजिनिक होती.
मुलीला झोप आली की ती चुलत बहिणीच्या गाऊनमधून बहिणीच्या काखेत मुलगी दोन बोटं घालायची आणि वास घ्यायची झोप येइपर्यंत. झोपली की बंद व्हायची.
आम्ही बहिणीला म्हणायचू, बाई अंघोळ कर रात्रीची परत; तुझ्याच मुलीसाठी.
आम्ही चु. ब. छळायचो की अशी कशी घाण सवय लागली.
हिरकणी, विकीची लिंक भारी आहे.
हिरकणी, विकीची लिंक भारी आहे. धन्यवाद.
@ झंपी
@ झंपी
अगो, तुझ्या भावाला माझ्या
अगो, तुझ्या भावाला माझ्या लेकीकडुन सेम पिंच...
योडी आणि अगो, माझ्या मुलाला
योडी आणि अगो, माझ्या मुलाला पण माझ्या दंडावर मसाज सारखा हात फिरवत झोपायची सवय होती. त्यामुळे कंपलसरी स्लीवलेस T किंवा लुज स्लिव्ज, ज्यामधुन त्याचा हात आत जाइल, असाच घालावा लागायचा. थंडी आहे म्हणुन फुल स्लीव्ज काही घातलं कि तो झोपेतच 'हात' 'हात' 'नॉट धीस' असं सतत कुरकुरत रहायचा. त्याचे डोळे बंद, अर्धवट झोप पण लागलेली, पण तरीही त्याचा हात माझ्या हाताला मसाज करतो आहे असा रोजचा रिवाज होता.
माझ्या मुलाला अश्या बर्याच
माझ्या मुलाला अश्या बर्याच विचित्र सवयी आहेत. त्यातल्या काही माझ्या फ़ायद्याच्या आहेत काही सवयींचा फ़ार त्रास होतो किंवा झालाय.
जेव्हापासुन उपडा वळायला लागलाय तेव्हापासुन तो पोटावर उपडाच झोपतो. आणि झोपवायला लागत नाही झोप आली की जोजो असं म्हणतो आणि जिथे गादी किंवा उशी दिसेल तिथे जाउन उपडा होतो आणि डोकं आणि पाय एकाच लयीत हलवत ( आता कसं सांगयच कळत नाहिये ) साधारण व्हायब्रेटिंग नीडल असते त्या प्रकारे स्लो मोशन मध्ये असा झोपतो.
मध्येच काही दिवस माझ्या अंगावर येउन असा झोपायाचा. ते नंतर विसरला पण गादीवर तसं करत झोपायची सवय अजुनही आहे.
मध्ये काही दिवस त्याला सवय लागली होती रात्री झोपेतच शी करायचा आणि तसाच झोपुन रहायचा, मला शीच्या वासाने जाग येउन मी धुवायला न्यायचे. ही झोपेत शी साधारण महिनाभर चालु होती. एकदा माझ्या डोक्याजवळ येउन शी केली आणि तेव्हा लुज छोटी चड्डी होती त्यातुन सगळी शी माझ्या केसावंर आली. मग घरातले सगळे उठले तरी हा झोपेताच. मग आधी मी डोक धुतलं. या प्रकार नंतर झोपताना डायपर लावणार होते पण मग ती सवय आपोआप बंद झाली.
हल्ली शेंडेफळास एक सवय लागली
हल्ली शेंडेफळास एक सवय लागली आहे. तिच्या छोट्याश्या मांजर किंवा वाघाचे पिल्लू सदृश खेळण्याची मऊ चिटुलकी शेपटी कुरवाळत झोपी जायचे. तिच्या नकळत ते खेळणे फिरवून त्याचा चेहरा तिच्या हाताजवळ आणला तरी ती न चिडता डोळे बंद ठेवूनच खेळणे परत फिरवून शेपटी कुरवाळत बसते.
मनिमाऊ... माझ्या मुलीला पण
मनिमाऊ... माझ्या मुलीला पण अगदी सेम सवय आहे बघ!
डोकं आणि पाय एकाच लयीत हलवत (
डोकं आणि पाय एकाच लयीत हलवत ( आता कसं सांगयच कळत नाहिये ) साधारण व्हायब्रेटिंग नीडल असते त्या प्रकारे स्लो मोशन मध्ये असा झोपतो. >>> मी अजुनपण
लाडु, बघितल्यावर अजुन हसु
लाडु, बघितल्यावर अजुन हसु येईल. माझी जाउ घरी आली कि थांबून रहायची हा त्याचा झोपताना चा प्रकार पहायला.
आणि उपडा वळायला लागल्यापासुन तर झोपायचा काही त्रासचं नाहिये. अंघोळ झाली की गादीवर उपडा ठेवुन द्यायचे की आपोआप झोपायचा. अजुन पण हेच आहे पण आता लक्ष ठेवावे लागते.
हा हा हा !! भारीयेत सवयी
हा हा हा !!
अश्या वेळी तुम्ही बाजुला असलात तर गेलात मग तुम्ही कामातुन...तो बोटे स्वतः ची चोखणार आणि कोपर तुमचे चिवडणार. चिवडण्यासाठी त्याला आणि कोणी ही चालायचे; लहान बाळे, त्याच्या वयाचे मित्र, आम्ही भावंडे, म्हातारी माणसे अगदी कोणी ही. 

भारीयेत सवयी
माझ्या सख्ख्या मावस भावाला आत्ता आत्ता पर्यंत उजव्या हाताची मधली दोन बोटे चोखायची सवय होती. बरं झोप आली वगैर तर चोखतोय, तर तसे ही नाही...मधेच कधी तरी प्रकर्षाने त्याला ती दोन बोटे चोखाविशी वाटायची, आणि त्याच वेळी दुसर्या हाताने स्वतः च्या तोंडात घातलेल्या हाताचे कोपर तो चिवडत बसायचा.
गेले ४ वर्ष त्याची ही सवय सुटली आहे........कारण त्याचे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे
माझ्या लेकाला अचानक जॅकेट /
माझ्या लेकाला अचानक जॅकेट / शर्ट ची कॉलर, बाही खायची सवय लागली होती. ही सवय घालवायला 'स्टार रिवॉर्ड' योजना कामी आली. (वस्तू / खेळणी वापरून झाली की जागेवर ठेवणे, लॅपटॉप ठारावि़क वेळासाठी पाहणे, कॉलर, बाही कोरड्या असणे, शांतपणे पोटभर जेवणे, फळ्यावर १० शब्द लिहिणे हे सगळे ज्या दिवशी असेन त्या दिवशी एक स्टार मिळतो, आठवड्यात जर ७ स्टार मिळाले तर २० क्रोनर त्याला त्याच्या मनी बँकेसाठी मिळतात. पुढील आठवड्यात परत नव्याने स्टार मिळवायला लागतात.)
तसेच वरीलपैकी बर्याच सवयी घालवायला 'स्लिप टॉक मेथड' मदत करु शकते. मुल झोपलं की १०-१५ मिनिटाच्या आत आपल्याला त्याने/ तिने जे केलेले हवय ते सकारात्मक वाक्यात सांगायचे. अमुक एक गोष्ट करू नकोस सांगण्याऐवजी नक्की काय करायचे ते सांगायचे. १५ -३० दिवस असा स्लिप टॉक दिल्याने फरक नक्की दिसतो.
उदा: ठराविक एकच लाल रंगाचा रूमाल लागत असेन तर सांगायचे की शोनूला हिरवा, गुलाबी, निळ्या (इत) रंगाचे रूमाल पण खूप आवडतात. दर दिवशी तो नवा रूमाल वापरतो. वापरलेला रूमाल आईकडे धूवायला देतो.
यात कुठेही लाल रूमालाचा उल्लेख नाही कींवा लाल रूमाल वापरू नकोस असे म्हटलेले नाही.
आपण पालक बर्याचदा एखादी गोष्ट करू नकोस हे सांगताना आपल्या हे लक्षात येत नाही की आपण हे सांगत असेपर्यंत कल्पनेत त्याने ती गोष्ट केलेलीपण असते. त्यांना जेव्हा काय करायचे हा विचार येतो, तेव्हा पहिला पर्याय तोच सुचतो जो आपण करू नका म्ह्णून सांगितलेले असते.
एक प्रयोग आपणच करून पाहू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीला डोळे बंद करायला सांगायचे आणि पुढील वाक्य ऐकवायचे. जगात कुठेही युद्ध होत नाही. कोणीच कोणाला मारत नाही. कुठेच रक्त सांडलेले नाही. जगात अतिरेकी नाहीत. ... असे बरेच काही, नाही ने शेवट होणारे.
तुम्ही हे सांगत असताना त्यांनी काय विचार केला हे त्यांना विचारा.
परत डोळे मिटायला सांगून पुढील वाक्य ऐकवा. जगात सर्वत्र शांतता आहे. सर्वजण आनंदी आहेत. दिवसभरातील सर्व कामे व्यवस्थित पार पडत आहेत. आता हे सांगत असताना त्यांनी काय विचार केला हे परत विचारा.
महान आहेत सवयी ...
महान आहेत सवयी ...
आई, जेवायला बसल्यावर ५
आई, जेवायला बसल्यावर ५ वर्श्यापर्यन्त मुलाना शी येते, याचे वैद्यानिक कराण आहे. ९ महीने बाळ पोटात असताना, आईचे पोट भरले कि आत शी करते, आणी तिच सवय ५ वर्श्रा पर्यन्त रहाते. तसेच बाळाना आई , बाबाचा वास आणी स्पर्श कळतो. मुल झोपलेले असले आणी आई त्याच्याजवळुन उथली, मुलाचि झोप चाळवते. (५ वर्श्यापर्यन्त).
आईचे पोट भरले कि आत शी करते,
आईचे पोट भरले कि आत शी करते, >> नाही.. असं काही नसावं बहुतेक..
बाळं शी च करत नाहीत पोटात असताना जनरली
अवनी, अग हे सर्व खरे आहे.
अवनी, अग हे सर्व खरे आहे. माझ्या मुलाने जन्माच्या वेळेस पोटात शी केली होती. त्यामुळे माझे BP वाधुन, Doctor ला 'C' section करावे लागले. हे सर्व माला माझ्या Doctor दीरकडुन कळाले.
जन्माच्या वेळेस होऊ शकते शी,
जन्माच्या वेळेस होऊ शकते शी, पण तोवर पोटात शी होत नाही असं मला माझे गायनॅक म्हणाले होते.
प्र + १
प्र + १
माझ्या मुलाने जन्माच्या वेळेस
माझ्या मुलाने जन्माच्या वेळेस पोटात शी केली होती. त्यामुळे माझे BP वाधुन, Doctor ला 'C' section करावे लागले. हे सर्व माला माझ्या Doctor दीरकडुन कळाले.--------
शी केली याचा अर्थ बाळ श्वास घेवू लागले . हि EMERGENCY झाली.म्हणून तर Doctor ला 'C' section करून बाळाला ताबोडतोब बाहेर घ्यावे लागले. बाळ शी नाही करत कधी पोटात.
बहुतेक वेळा आई बाळाल खायला घालून स्वतः जेवायला बसते. लहान बाळाची Digestive System अजून develope होत असते, लहान असते. बाळाच्या पोटात काही गेले कि थोड्याच वेळात बाळाला पोटात pessure येवून त्याला शी येते .
आईने जेवण करून घ्यावे मग बाळाला जेवायला द्यावे . बघा अस करून
आईने जेवण करून घ्यावे मग
आईने जेवण करून घ्यावे मग बाळाला जेवायला द्यावे . बघा अस करून. >> हे कुठली आई करेल?
बाळाचं पोट भरल्याशिवाय आईच्या घशाखाली घास उतरताना कठीण. 
मुलीला जुजबी खाऊ देऊन (आवडते
मुलीला जुजबी खाऊ देऊन (आवडते स्नॅक्स पॉपकॉर्न घरी केलेले किराणामधल्या मक्याच्या लाह्यांचे,चणे इ.इ) स्वतः व्यवस्थित जेवून घेऊन मग तोपर्यंत भूक चांगली लागल्यावर मुलीला जेवण देणे हे काही वर्षे केले आहे. (जरा 'काय स्वार्थी आप्पलपोटी आई/बाई आहे का कोण' वाले लुक मिळतात त्याला इग्नोरास्त्र द्यायचे.)
) आणि त्यात 'खाण्याकडे लक्ष दे' हे आठ दहा वेळा सांगणे ऑफिसातून आल्यावर आणि तेही पोटातले कावळे दाबत स्वतः कधी जेवणार याची वाट पाहत हे प्रचंड दमवणारे ठरते.
मुलं भाजी पोळी वरण भात इ. नॉन चटपटीत गोष्टी जेवायला एक तास लावतात(आमची मुलं शहाणी कधीच नव्हती आणि आताही अगदीच हळूहळू थोडी थोडी होत आहेत
खाल्ले (/दूध प्यायले) की शी
खाल्ले (/दूध प्यायले) की शी हे बाळांच्या बाबतीत एकदम बरोबर.
पण एकदा सॉलिड्स सुरू केली की शीच्या वेळा नियमित होत जातात. तेव्हा जर नेमकी आईच्या जेवायची वेळच निवडली गेली तर घोळ.
जेवणाच्या बाबतीत अनुशी सहमत. मुलांना भूक लागेपर्यंत आईने स्वतःच्या भुकेकडे दुर्लक्ष करायचे हे एकदम न पटणारे लॉजिक आहे. तरी शक्य झाल्यास सगळ्यांनी एकदम जेवायला बसणे सगळ्यात उत्तम असे माझे मत.
नलिनी, स्टार सिस्टिम मस्त आहे. अजून आमच्याकडे चाललेली नाही पण. (मला काही गरज नाही स्टारची असे बाणेदार उत्तर येते.)
मी_अनु +११११ 'काय स्वार्थी
मी_अनु +११११
'काय स्वार्थी आप्पलपोटी आई/बाई आहे का कोण' वाले लुक मिळतात >> अगदी अगदी
अजूनही मी भूक दाबून पोरांचं उरकते. मग जेवते. पूर्वी रात्री १०:३०/११ वाजायचे. आता मुलं मोठी व्हायला लागली तस ९:३० ला बसू शकते..
.
पण मला दुर्दैवाने इग्नोरास्त्र नाही मारता आले कधी.
दिवेकर बाईंन्नी ऐकलं तर खूप
दिवेकर बाईंन्नी ऐकलं तर खूप झापतील बरं चैत्रगंधा
स्टार्व्हेशन इज स्ट्रिक्ट नोनो इन डायट सायन्स.
त्यांचं म्हणणं असतं दर दोन तासांनी खा, सकाळी उठल्यावर वीस मिनीटाच्या आत खा, संध्याकाळी साडे सात ला खा, स्वतःची आवडती गोष्ट बनवा. इ.इ.(मी पाळायचा बराच प्रयत्न केला पण नंतर 'आता खायचंय्/खाणं स्वतःजवळ तयार ठेवायचंय' चा जाम लोड यायला लागला. स्वतःला एक बायको असावी असं वाटतं :))
स्वयपाक करताना , वाढताना ,
स्वयपाक करताना , वाढताना , मुलाला खायला घालताना हे करणार्याचे मन प्रसन्न हवे असे सगळे सांगतात कि नाही .

मग भुकेल्या पोटी मन कसे बरे प्रसन्न राहणार
so आयानो आधी जेवून घ्या .
>> बायको अनु!! रोबो चालेल
>> बायको
अनु!!
रोबो चालेल का? पाचेक वर्षात मिळेल माझ्यामते.
आईने जेवण करून घ्यावे मग
आईने जेवण करून घ्यावे मग बाळाला जेवायला द्यावे . बघा अस करून. >> हे कुठली आई करेल? स्मित बाळाचं पोट भरल्याशिवाय आईच्या घशाखाली घास उतरताना कठीण. स्मित>>>>
मी करते असं त्याच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेस आणि घरी होते तेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळेसही करायचे.
माझा मुलगा सकाळी १०.३० वाजता खाउन-पिउन अंघोळ करुन झोपायचा तो १.३० ला उठायचा मग मी त्या आधी जेवुन घ्यायचे. आता त्याची आजी पण असचं करते.
आणि संध्याकाळी त्याचं ७ वाजता स्नॅक टाईम असतं मग आजी त्याला पोटभरीचं काहीतरी देते मग मी त्याला ८.३०-९ला भरवते त्याच्या जस्ट आधी मी जेऊन घेते.
वपुंची स्टोरी आहे अशी
वपुंची स्टोरी आहे अशी काहीतरी. नवरा बायकोला सुचवतो की तु दमतेस म्हणून आपण कामं करायला एक बायको आणूया. मग त्यातून हळूहळू स्टँड्बाय नवरा आणायची कल्पना पण आकार घेत जाते आणि खरा नवरा विषय आवरता घेतो
खरे तर हि विचित्र सवय नाही ,
खरे तर हि विचित्र सवय नाही , पण कोठे विचारावे हे न समजल्यामुळे इथे लिहीत आहे .
घरातील १ .५ वर्षाचे मूल सगळीकडे हात लावते व हात - बोट तोंडात घालते. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची भीती असते. अगदी डोळ्यासमोर बघताबघता हा प्रकार होतो. वस्तूंना स्पर्श करून पाहणे हा त्याच्या वाढीचा एक टप्पा असल्याने त्याला त्यापासून परावृत्त करणे हे पटत नाही. (आणि खरेतर शक्यही नाही.) फक्त त्याने तो हात तोंडात घालू नये यासाठी काय करता येईल का ?
Pages